फॉकलंड युद्ध- अर्जेन्टिनाचे आक्रमण (१)
दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांचा सहजासहजी विजय झाला नव्हता. त्यातच ब्रिटन ची अर्थव्यवस्था हि भारत गमवावा लागल्यामुळे कमालीची ढासळली होती. दुसरी कडे दक्षिण अमेरिका खंडात एक वेगळाच कट शिजत होता. २ एप्रिल १९८२ ,कुठलाही संदेश न पाठवता अर्जेन्टिना ने आपल्या फौज फॉकलंड बेटांवर घुसवल्या. आणि सुरवात झाली एका युद्धाची.
फॉकलंड बेटे हि ब्रिटिश स्वयंशासित समूह चा भाग आहेत. गव्हर्नर रेक्स हंट तिथे कार्यरत होता. पण ५७ मारिन आणि ११ सिविल गार्ड अशी आणि एव्हडीच ब्रिटिश फौज बेटावर होती. वात्स्तविक अर्जेन्टिना फॉकलंड बेटांवर हल्ला करू शकतो ह्याची ब्रिटनला कल्पनाच नव्हती. कारण प्रश्न चर्चेने सोडवावा अशी ब्रिटन आणि अर्जेन्टिना ची भूमिका होती. पण अर्जेन्टिना मध्ये झालेल्या लष्करी उठावानंतर सुद्धा ब्रिटिश सरकार झोपलेलाच होते. पंतप्रधान होत्या मार्गारेट थॅचर. आयर्न लेडी ऑफ ब्रिटन.
आणि अशातच अर्जेन्टिना च्या नाविक दलाने ऑप्रेशन रोसारिओ म्हणजे फॉकलंड युद्धाची सुरुवात केली.
ह्या मोहिमेत पहिली चाल होती ती अर्जेन्टिना ची पाणबुडी संत फे ची. १४ तांत्रिक युनिट बरोबर ह्या पाणबुडीला विल्यम बंदरातल्या ब्रिटिश फौजांची आणि हालचालींची माहिती मिळवायची होती. म्हणून त्यांनी ३१ मार्च लाच हि माहिती मिळवायला सुरुवात केली. ह्यात त्यांना अशी माहिती मिळाली कि विलियम बंदरात उतरण्यास धोका आहे. म्हणून त्यांनी दक्षिण किडनी बेट आणि पेम्ब्रोके जवळ उतरण्याचे ठरवले. आणि १/२ एप्रिल च्या सकाळी ४.२० वाजता अर्जेन्टिना फौजेच्या ६०० जणांच्या तुकडीने फॉकलंड बेटावरती पाय ठेवला. पेम्ब्रोके जवळ असलेली धावपट्टी आणि दीपगृह अर्जेन्टिना फौजांनी लगेच ताब्यात घेतला. फॉकलंड बेताची राजधानी असलेल्या स्टॅन्ले शहरावर्ती हल्या साठी ह्या धावपट्टी चा अर्जेन्टिना वायुदलाला खूप उपयोग होणार होता. दुर्दैवाची गोष्ट हि कि त्यावेळी रॉयल एअर फोर्सचे एकही विमान फॉकलंड बेटावर नव्हते.
ह्याच वेळी योरके बे मध्ये अर्जेन्टिना च्या दुसऱ्या मारिन तोफखाना दलाने आपले रणगाडे आणि चिलखती गाड्या उतरवल्या . आणि राजधानी कडे कूच केले. अमेरिकी बनावटीच्या चिलखती गाड्यांमधून अर्जेन्टिना ची सुसज्ज फौज राजधानी च्या रोखाने निघाली पण त्यांना रोखण्यासाठी फॉकलंड बेटांवर सैन्यच नव्हत. कसे बसे १०० जण ब्रिटन कडे होते. अर्जेन्टिना चिलखती गाड्यांनी स्टॅन्ले सिटीचा एअरपोर्ट रास्ता ताब्यात घेऊन बाहेरील जगाशी तोडून टाकला आणि फॉकलंड बेटाच्या उरल्या सुरल्या अशा हि धुळीस मिळाल्या.
स्टॅन्ले चे गव्हर्नर हौस हे एका छोट्या टेकडी वर वसले आहे. गव्हर्नर नि उरली सुरली ब्रिटिश फौज तिथे एकत्र केली आणि लढण्याचा आदेश दिला. परंतु फार उशीर झालेला होता स्टॅन्ले शहर अर्जेन्टिनाच्या ताब्यात गेलेले होते. फॉकलंड बेटाच्या उरलेल्या भागात अर्जेन्टिना फौजेचा मुक्त वावर सुरु होता. ब्रिटन ची स्थिती अत्यंत वाईट होती. २ एप्रिल लाच सकाळी अर्जेन्टिना लष्करी दलांनी गव्हर्नर बंगल्या वर हल्ला चढवला. अर्जेन्टिना नौदल आणि काही सैन्याचा डोळा चुकवून काही ब्रिटिश फौज समुद्रात उतरण्याचा यशस्वी झाली पण शत्रूच्या नाविक दलापैकी ग्रॅन्व्हिले बोटीने त्यांचा पाठलाग सुरु केला. मग पोलिश(पोलंड) देशाच्या मासेमारी बोटीच्या आधारे हे सांगळे मारिन गव्हर्नर बंगल्यात परत आले. ह्या वेळे पर्यंत गव्हर्नर बंगलो च्या भोवती सशत्र अर्जेन्टिनन फौजेचा वेढा पडला होता. शेवटी सकाळी ८ वाजता गव्हर्नर ने अर्जेन्टिना समोर गुढगे टेकले. सर्व सैनिकांना एअरपोर्ट वर नेले गेले आणि सी-१३० विमानातून ब्रिटन ला पाठवून देण्यात आले. ब्रिटनच्या बेटाचा अर्जेन्टिना नि घास खेटला होता. पुढे काय घडले? बेट कधी परत मिळवता आले का? ते आपण पुढच्या भागात बघू
----------------------------------------------------------------------------------------
याद्या
9454
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
आवडला बुवा.
मूळ हि बेटे कुणाची आणि त्या
दुसऱ्या महायुद्धात दोस्त
Post oil shock का अमितदादा?
In reply to दुसऱ्या महायुद्धात दोस्त by अमितदादा
होय !
In reply to Post oil shock का अमितदादा? by कैलासवासी सोन्याबापु
वा, छान विषय. याबद्दल आधी
असेच म्हणतो! लेख लांब झाला
In reply to वा, छान विषय. याबद्दल आधी by एस
लेखाचा विषय आवडला, एका
छान
जेच्या नावाने आम्ही बर्याच
ते लॉर्ड फॉकलंड, अभ्याभौ
In reply to जेच्या नावाने आम्ही बर्याच by अभ्या..
ज्याच्या नावाने उद्धार करता
In reply to जेच्या नावाने आम्ही बर्याच by अभ्या..
सुंदर प्रयत्न.
औरंगजेब साहेब,
रोचक विषय
पुलेप्र.
फाॅकलंड बेटं
त्यामुळे ब्रिटनमधल्या पंच या
In reply to फाॅकलंड बेटं by बोका-ए-आझम
त्यामुळे ब्रिटनमधल्या पंच या विनोदी साप्ताहिकाने या युद्धाचं ' एका कंगव्यासाठी दोन टकल्यांमध्ये लागलेलं भांडण ' असं वर्णन केलं होतं.'पंच'चे हे विधान एक विनोद म्हणुन ठीक आहे. पण, ते त्याच्या लेखकाचे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे घोर अज्ञान उघडे करणारे विधान आहे. अंटार्क्टिका खंडाचे क्षेत्रफळ १ कोटी ४० लाख चौ किमी आहे (तुलनेसाठी, युरोपचे क्षेत्रफळ १ कोटी चौ किमी आहे, हे ध्यानात घ्यावे.) व ते अनेक प्रकारच्या खनिज संपत्तीने समृद्ध आहे. त्याशिवाय त्याच्या आजूबाजूच्या सागरातील मासे व इतर साधनसंपत्तीचा हिशेब अजून लागलेला नाही. अंटार्क्टिका खंड हे काहीसे ५०० वर्षांपूर्वीच्या अमेरिका खंडासारखे आहे. फरक इतकाच की तेथे त्यावर माल्की हक्क सांगायला कोणी मूलनिवासी नाहीत. पण, याचाच अर्थ असा की जो त्याच्या भूभागांवर प्रथम हक्क प्रस्थापित करेल त्याची ती मालकी होऊ शकेल ! तशा मालकीचे दावे अगोदरच अनेक देशांनी केलेले आहेत. त्या देशांत झगडे / युद्धे होऊ नयेत यासाठी ५३ देशांत, Antarctic Treaty System या कराराअन्वये, सद्या अंटार्क्टिकावर शास्त्रिय संशोधन सोडून इतर कोणत्या कारवाया करू नये असे ठरलेले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर, फॉकलंडसारख्या दूरदराजावरच्या पण अंटार्क्टिका खंडाजवळ असणार्या बेटांवर, ती कितीही दूर आणि कितीही चिमुकली असली तरी, सार्वभौम सत्ता असणे वाटते तेवढे बिनमहत्वाचे खचितच नाही. या बेटांचे महत्व मुख्यतः खालील गोष्टींमुळे आहे... १. बेटांच्या स्वामित्वामुळे त्या भूभागावरचे आणि त्याच्याबाजूच्या आर्थिक अधिकार असलेल्या समुद्रावरचे स्वामित्व : यामुळे तेथिल खनीजसंपत्तीवर (तेल, धातू, इ) हक्क स्थापित होतो. अंटार्क्टिक खंड व त्याच्याबाजूचा समुद्र यांच्यात बरेच तेल असल्याचे अंदाज आहेत. अजून काही वर्षांनी ती खनीजसंपत्ती वापरण्यावर असलेले निर्बंध मोडीत निघाले तर ब्रिटनसाठी फॉकलंड बेटाचे महत्व अनन्यसाधारण असेल. २. बेटाच्या आजूबाजूच्या समुद्रातल्या मासेमारीचे हक्क. ३. राजकिय वर्चस्वाचे प्रतिक. ४. हे तुलनेने कमी थंड हवा असलेले बेट, अंटार्क्टिक खंडातल्या कारवायांसाठी रसद साठवायला व व्यक्तींना रहायला उपलब्ध असणे ही फार मोठी सोय आहे. अजून काही... १. भारताचे ग्रेट निकोबार हे बेट इंडोनेशियाच्या ब्र्युएह (Breueh) बेटापासून जेमतेम १०० किमी दूर आहे. ते ताब्यात असल्याने जवळ जवळ संपूर्ण बंगालचा उपसागर व अंदमान समुद्रावर भारताची सरहद्द आणि हुकुमत आहे. अंदमान निकोबार द्वीपसमुह भारताच्या ताब्यात नसता तर आपली सागरी सरहद्द ६०० ते ८०० किलोमीटर पश्चिमेस (आपल्या पूर्वकिनार्याजवळ) आली असती आणि बंगालचा उपसागर व अंदमान समुद्रावरचा ८०% हिस्सा आंतरराष्ट्रिय पाणी झाले असते आणि त्यात चीनला खुलेआम कारवाया करता आल्या असत्या. अर्थातच, याचा भारतीय महासागरावरच्या भारताच्या हक्क व वर्चस्वावर लक्षणीय परिणाम झाला असता. २. चीन आणि त्याच्या शेजारी देशांचे दक्षिण चीन समुद्रात चाललेल्या बेटांच्या मालकीच्या वादांमागे वरचीच कारणे आहेत.एक्काकाका
In reply to त्यामुळे ब्रिटनमधल्या पंच या by डॉ सुहास म्हात्रे
+1
In reply to त्यामुळे ब्रिटनमधल्या पंच या by डॉ सुहास म्हात्रे
चांगलीं माहिती म्हात्रे साहेब
In reply to +1 by अमितदादा
अर्जेंटिनानेही एक मोठी
In reply to फाॅकलंड बेटं by बोका-ए-आझम
शेफील्ड ही ब्रिटिश विनाशिका
In reply to अर्जेंटिनानेही एक मोठी by शाम भागवत
पुढील भाग
पुढचा भाग केव्हा
पुढचा भाग केव्हा?
पुढचा भाग केव्हा?