Skip to main content

समाजामध्ये कमी माहिती जैन समाजाबद्दल ?

लेखक निओ१ यांनी शनिवार, 03/09/2016 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या समाजामध्ये जैन समाजाबद्दल खूप कमी माहिती आहे का ? दिगंबर जैन का आहेत? त्याची गरज का आहे? ते दिगंबर का आहेत ? जर आपल्याला एका धर्माबद्दल माहिती नसेल तर आपण आपले मत व्यक्त करताना थोडी माहिती का शोधू नये? काही लोकांनी "ते नागडे" इत्यादी प्रकारे उपहास केला आहे. त्याना धर्माची माहिती घेणे गरजेचे आहे असे का वाटत नाही? जैन धर्म मधील प्रत्येक व्यक्ती हिंदू-जैन असे लिहितो, तुम्हीच जर असे लिहले किंवा विरोध केला तर त्याचा परिणाम काय होइल याचा देखील विचार करणे गरजेचे आहे. जैन हे आधी हिंदू आहेत मग ते जैन आहेत पण असे दिसू लागले आहे की हिंदू जैन समाजाला आपले समजत नाही आहे. खूप वाईट वाटले म्हणून लिहिले.

वाचने 40274
प्रतिक्रिया 182

प्रतिक्रिया

णमो अरिहंताणं णमो सिद्धाणं णमो आयरियाणं णमो उवज्झायाणं णमो लोए सव्व साहूणं ही जैन धर्माचि शिकवन आहे. वादाला वाद करने नाहि. विरोधि मताचे स्वागत आहे पन आम्च्या मताला विरोध म्हनुन विरोध करु नका. काहि बाबिबद्दल मि सविस्तर उत्तर देइन पन आता उत्तर देत नाहि याचा अर्थ असानाहि कि उत्तर देनार नाहि. जैन धर्मामध्ये दिग्न्बर जैन हे नग्न राहतात, त्याबद्दल सविस्तर् लिह्तो आहे.

In reply to by निओ१

>>>> जैन धर्मामध्ये दिग्न्बर जैन हे नग्न राहतात, त्याबद्दल सविस्तर् लिह्तो आहे. सविस्तर लिहा. मला खूप विचित्र वाटतं तो सर्व प्रकार . "नागड़ेपण" आजच्या काळात धर्मोपयोगी कसं आहे, तेवढे नक्की पटवून द्या. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

"नागड़ेपण" आजच्या काळात धर्मोपयोगी कसं आहे, तेवढे नक्की पटवून द्या. जगातल्या सर्व धर्म, पंथांचे साधक आपापली संख्या वाढवत राहतात. त्या दृष्टीने नग्नता उपयोगी आहेच.

In reply to by प्रभाकर पेठकर

पेठकर काकांनी षट्कारच मारलाय. चेंडू स्टेडियमच्या बाहेर.

In reply to by आदूबाळ

बहुधा ते पाली, अर्धमागधी किंवा ब्राह्मी (ह्यापैकी असेल ते) असावेत. त्यात न एवजी ण असेल. मिच्छामि दुक्कडम, पर्युषण आले वाटते. कार्डांची ऑर्डर येईल बहुधा. ;)

In reply to by बॅटमॅन

"गाथा सप्तशती"ला "गाहा सत्तसई" लिहिणारी भाषा अन ही जैन पद्धतीची अर्धमागधी सेम का बॅटमॅन भाई? का ती पाली/ब्राह्मी अन ही अर्धमागधी? ब्राह्मी स्क्रिप्ट असते की भाषा?

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

गाहा सत्तसईची भाषा महाराष्ट्री प्राकृत. पालीचीच ही विविध व्हर्जन्स. सुप्रसिद्ध विनोदी लेखक चिं. वि. जोशी हे पाली भाषेचे मोठे विद्वान होते हे खूप कमी जणांना माहित आहे. ब्राह्मी ही लिपी आहे.

In reply to by प्रचेतस

महाराष्ट्री प्राकृत म्हणजे "दिण्णले, दिधल्ले असे बोलणारे" असा उल्लेख आहे तीच का? चिं. वि. जोशींची माहिती रोचक आहे राव. पूर्वी पाली अन अर्धमागधी ह्या भाषा दहावीच्या/बारावीच्या अभ्यासक्रमात होत्या असे ऐकिवात आहे. मुले स्कोअरिंगसाठी त्या घ्यायचे.

In reply to by प्रचेतस

देवी सप्तशती कोणती?

In reply to by अभ्या..

तो दिण्हले, गहिल्ले, इ. उल्लेख असलेला श्लोक/आर्या सुमारे इ.स. ७००-८०० च्या सुमारास आहे, उद्योतनसूरी नामक एका जैन मुनींच्या कुवलयमाला नामक ग्रंथातला. त्या काळात महाराष्ट्रात जी भाषा बोलत तिला अपभ्रंश अशी संज्ञा आहे. महाराष्ट्री प्राकृत ही सातवाहन(वल्ली)कालीन, अदमासे दोनेक हजार वर्षांपूर्वीची. अर्थात याचा अर्थ त्या दोहोंत काही साम्यच नव्हते असा आजिबात घेऊ नये. पण यांच्यातले फरक मला नक्की माहीत नाहीत. नीट अभ्यासले पाहिजे.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

वल्ली सरांनी उत्तर दिलेलेच आहे. त्यात भर घालायची म्हणजे महाराष्ट्री प्राकृत ही भारताच्या पश्चिम भागातली, तर अर्धमागधी ही पूर्व भागातली भाषा आहे. पाली हे अनेक बोलींचे कडबोळे मुद्दाम तयार केले गेलेले आहे.

गिन्बर जैन हे दिशा हे आमचे वस्त्र आहे असे मानते, वस्त्र त्यागाने मोक्श प्राप्तिमध्ये मदत होते. जैन धर्म्चाचि ५ तत्वे आहेत. १. अहिंसा २. सत्य ३. अस्तेय ४. ब्रह्मचर्य ५. अपरिग्रह या मध्ये जो अपरिग्रह आहे त्याचा अर्थ सरल आहे, कि कुथल्याहि ताज्य वस्तुबद्दल ममत्व न थेवने. त्यामध्य भोजन, वस्तु, वास्तु व परिधान याचा त्याग अभिप्रेत आहे व त्याचेच पालन मुनि करत असतात.

In reply to by निओ१

तुमची मराठी शुद्ध दिसते. टायपिंग मुद्दाम अशुद्ध केल्यासारखे दिसते आहे. शिवाय शाब्दिक हिंसाही भरपूर करीत आहात ;)

In reply to by निओ१

>>> गिन्बर जैन हे दिशा हे आमचे वस्त्र आहे असे मानते, वस्त्र त्यागाने मोक्श प्राप्तिमध्ये मदत होते. दिगंबरावस्थेत राहिल्याने मोक्षप्राप्तीसाठी कशी मदत होते हे जरा उलगडून सांगता का?

In reply to by श्रीगुरुजी

कपडे घातल्याने तरी मोक्ष मिळतो का ? ..... अपरिग्रह १०० % पाळायचे म्हणजे नागडेच रहायला लागेल ना ?

In reply to by श्रीगुरुजी

>>>>>> दिगंबरावस्थेत राहिल्याने मोक्षप्राप्तीसाठी कशी मदत होते हे जरा उलगडून सांगता का? हो,हो, मोक्षप्राप्तीचा मार्ग जरा उलगडून सांगा. मोक्षप्राप्ती मिळत असेल तर मलाही असल्या अवस्थेत राहायला आवडेल. ;) (फक्त आजूबाजूला लोक नसले पाहिजेत, म्हणजे कुठे जंगलात वगैरे बरं पडेल) -दिलीप बिरुटे (लाजाळू)

नाय शिकून आलुय क्लास लावला होता शिकवणी लावण्यापूर्वी :तुम्हालापन हे ताइपिन्ग शिकताना वेल लागल असेल ना ? मला थोदा त्रास होतो आहे पन शिकेन. शिकवणी लावल्यानंतर: तुम्हाला पण हे टायपिंग शिकताना वेळ लागला असेल ना? मला थोडा त्रास होतो आहे, पण शिकेन. खात्रीलायक बदल फक्त एका आठवड्यात! पत्ता तुम्हाला व्यनि करतो पण तुमच्या शिकाऊ वृत्तीला सलाम

निओ साहेब, तुम्ही आहे तसं लिहा, शुद्धलेखन आता तरी महत्वाचे नाही, माझ्या वक्तव्याने अपमान कसा झाला तेवढ्या पुरतं बोललात तरी पुरे, म्हणजे नेमक्या मुद्द्यावर बोलता येईल, बाकी भडकाऊ प्रतिसादांकडे इग्नोर मारा,

मुनीवर कि जय!! नागासाधु कि जय!! गौमाता कि जय!! भारत माता कि जय!!

संदीप डांगे, >> महाशय, माझ्या वक्तव्याने जैन धर्माचा अपमान कसा झाला याबाबद्ल उत्तर हवंय, आहे का तुमच्याकडे? >> बाकीचा फाफट पसारा नन्तर बघू! अगा जे घडलेचि नोहे त्याची वार्ता काय पुसताहे? बरं, पण जैन धर्मावर आगपाखड कशासाठी? जैन धर्माला सत्याची लाज वगैरे वाटते का म्हणून? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

अगा जे घडलेचि नोहे त्याची वार्ता काय पुसताहे? >> झालं तर मग.. विषय संपला. जैन धर्मावर आगपाखड कशासाठी? >> असे का वाटले बुवा तुम्हाला? माझे जैन धर्म किंवा जगातल्या कोणत्याच धर्माशी कसलेही वैर नाही. धार्मिक कारणांवरुन भावना दुखावून घेणार्‍या जमातीबद्दल मात्र वेगळे विचार आहे. मी एक हिंदू आहे पण नागासाधूंबद्दल कोणी भलतंसलतं बोलत असेल तर मला काही फरक पडत नाही. कारण त्याने नागासाधूंना काही फरक पडत ना हिंदूधर्माला काही फरक पडत. मला नागासाधूंबद्दल योग्य ती माहिती आहे आणि ती माझ्यापुरती पुरेशी आहे. इतर कोणी अजाणतेपणी-जाणूनबूजून नागासाधूंबद्दल खिल्ली उडवणारं बोलत असेल तर मला हिंदूधर्माचा अपमान झाल्याचे वाटत नाही. जो स्वतःला हिंदू समजतो त्या कोणालाही वाटू नये. माझा आक्षेप जैनमुनिंवर नव्हताच, तो होता त्यांना विधानसभेत बोलवणार्‍या महान लोकप्रतिनिधींबद्दल आणि ते पाडत असलेल्या चुकीच्या पायंड्याबद्दल. उद्या कोणी झाकिर नाईकला बोलावले तरी असाच आक्षेप असणार आहे. तसेच त्यांच्या दांभिक भूमिकेवर. एकिकडे स्त्रियांनी उचित कपडे घालावे असे आग्रह धरणारेच नग्न साधुंबद्दल मात्र उलट भूमिका घेतात. त्यावर हा आक्षेप होता. निओ१ साहेबांना तो समजला नाही, म्हणून मी चर्चेला तयार आहे असे सांगितले.

In reply to by अप्पा जोगळेकर

दिगंबर जैनांच्या मते, मोक्षाचा मार्ग हा फक्त पुरुषालाच साध्य आहे. त्यामुळे स्त्रियांना दिगंबर साध्वी होण्याची परवानगी नाही. ओशोंनी ह्या विषयावर बरीच बेधडक वक्तव्ये केली आहेत, त्यांच्यावर जैनधर्मिय कधी उखडलेले दिसले नाहीत.

In reply to by अप्पा जोगळेकर

दिगंबर जैनांच्या मते, मोक्ष फक्त पुरुषालाच साध्य आहे. त्यामुळे स्त्रियांना दिगंबर साध्वी होण्याची परवानगी नाही. ओशोंनी ह्या विषयावर बरीच बेधडक वक्तव्ये केली आहेत, त्यांच्यावर जैनधर्मिय कधी उखडलेले दिसले नाहीत.

संन्यास धारण केलेल्या साधूंबद्दल काही वाचनात आले आहे. संन्यास धारण केल्यावर चैनीच्या वस्तू वापरायला त्यांना मनाई आहे. त्यामुळे केस कापण्यासाठी, दाढी करण्यासाठी ते कात्री, ब्लेड इ. चैनीच्या गोष्टी वापरत नाहीत. ते डोक्याचे व दाढीचे केस कोणतेही साधन न वापरता हाताने उपटून काढतात. माणसाच्या डोक्यावर अंदाजे १ लाख केस असतात म्हणे. इतके केस उपटून काढणे खूप वेदनादायक असणार. पण मग ते शिजविलेले अन्न ग्रहण करतात का? शिजविलेले अन्न ग्रहण करत नसतील तर पश्नच नाही. पण शिजविलेले अन्न ग्रहण करीत असतील तर अन्न शिजविण्यासाठी गॅस, स्टॉव्ह इ. चैनीची साधने वापरावी लागतील. कदाचित ही साधने न वापरता चुलीवर अन्न शिजविता येईल. पण त्यासाठी तोडलेली लाकडे लागतील व लाकडे तोडण्यासाठी कुर्‍हाड, करवत इ. साधने वापरावी लागतील. तसेच चूल पेटविण्यासाठी काड्यापेटी या साधनाचा वापर करावा लागला असता. तसेच अन्न शिजविण्यासाठी पातेली वगैरे कारखान्यात तयार झालेल्या वस्तू वापराव्या लागल्या असत्या. म्हणजे अशा चैनीच्या वस्तू संपूर्णपणे टाळता येणे अशक्य आहे.

In reply to by श्रीगुरुजी

सन्यासी भिक्षा मागून उदरभरण करतात. भिक्षेत मिळालेल्या वस्तू ह्या चैनीच्या समजल्या जात नाहीत.

In reply to by श्रीगुरुजी

केशलोचनाचा(लुंचन) विधी त्रासदायक असतोच पण त्याचा समारंभ केला जातो. मी पाहिलेले नाही पण काहीतरी टेक्निक असते ते. बर्‍याच विधींचे लिलावही बोललेले असतात धनाढ्य लोकांनी. कोणी श्रमणदिक्षा घेत असेल तर ते त्याच्या पूर्ण घराला सन्मानाचे गौरवाचे मानले जाते. मी माझ्या डिझाइनच्या कामानिमित्त एका स्थानकवासी जैनांच्या स्थानकात गेलेलो होतो. साध्वी पूर्ण पांढर्‍या पोशाखात होत्या. वय अंदाजे २० ते २२ वाटत होते. अत्यंत अलौकिक सुंदर अन शांत चेहरा असलेल्या त्या साध्वीजी फक्त सूर्याची किरणे जेथे येतात तेवढ्याच उजेडात(दिवे वापरत नाहीत) डिझाइन पाहून अत्यंत मृदू भाषेत करेक्शन्स सांगत होत्या. सुरुवातीला मी तसे होत नसते, जमत नाही वगैरेची टेप वाजवल्यावर त्यांनी शांतपणे माझ्या सॉफ्टवेअरमधीलच कन्सेप्ट मला सांगितल्या. ते सुध्दा फर्ड्या इंग्रजीतून. बाहेर आल्यावर माझ्या जैन प्रेस वाल्या मित्राने (त्याने मला तेथे नेले होते) सांगितले की साध्वीजी बीई कम्प्युटर आहेत. हा प्रकार पाहून हात जोडायचेच बाकी राह्यले फक्त.

In reply to by अभ्या..

शरीराला वेदना देऊन, दिगंबरावस्थेत राहून, भिक्षा मागून, दिवे/कात्री/पादत्राणे इ. सर्वसामान्यांच्या गरजेच्या वस्तू चैनीच्या समजून त्या न वापरणे इ. मुळे परमार्थात प्रगती होण्यास व मोक्ष मिळण्यास कशी मदत होते हे समजून घेण्याची उत्सुकता आहे.

संदीप डांगे,
>> माझा आक्षेप जैनमुनिंवर नव्हताच, तो होता त्यांना विधानसभेत बोलवणार्‍या महान लोकप्रतिनिधींबद्दल
आक्षेप पूर्णपणे मान्य. खरंतर मुनीश्रींना असं बोलावणं धाडणं मलाही खटकलं. फक्त एक विनंती आहे. जो आक्षेप आहे तो कृपया स्वच्छ शब्दांत मांडावा. लेकी बोले सुने लागे असं नको. जैन धर्माला सत्याची लाज वाटते का वगैरे प्रश्न कृपया नकोत. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

तो प्रश्न दुखावलेल्यांसाठी आहे. तिथे कोणताही धर्म-पंथ टाका, अर्थ बदलत नाही. धार्मिक कारणाने दुखावले जाणे हा एक वेगळाच प्रकार आहे. ती 'घेट्टो मेन्टॅलिटी' आहे. कोणताही धर्म हा मनुष्यास मुक्त करणारा प्रकार आहे. बांधले जाणे हे आचरण 'धर्म' ह्या संकल्पनेच्या अगदी विरुद्ध आहे. सगळ्या धर्मसंस्थापकांचे संदेश बघितले तर त्यांनी मुक्त व्हायला सांगितले आहे. लोक अगदी उलट करतात. आपल्या विचारांशी साम्य ठेवणार्‍या लोकांचा संघ हा धर्माचरणासाठी उपयुक्त आहे. पण धर्माशी असलेल्या बांधिलकीपेक्षा अशा संघाशी होणारी मोठी बांधिलकी ही समस्येचे मूळ आहे. कितीही म्हटले तरी मनुष्याचा कळप करुन सुरक्षित राहण्याचा अंगभूत नैसर्गिक गुण सुटत नाही आणि महात्म्यांनी दिलेल्या संदेशाच्या अगदी उलट आचरण सुरु होते. सर्व साधु, संत, महंत, योगी, सन्यासी, फकिर, अवधुत हे खरंतर मुक्त असतात. त्यांच्यावर विशिष्ट गटाने मालकी सांगणे हे त्यांच्या शिकवणुकीच्या उलट वागणे ठरते. ते मुक्त असल्याने, मान-अपमान इत्यादींच्या वर असल्याने अपमान हा त्यांचा होतच नाही. मग कोणाचा होतो? त्यांच्यावर मालकीहक्क सांगणार्‍या मनोवृत्तीचा. मालकीहक्क सोडा, अपमान झालेला वाटणार नाही. जैनांना मुनिंचे नग्न असणे खुपते का? नाही. मग इतर कुणाच्याही कोणत्याही प्रतिक्रियेने त्रास का होतो हा मुद्दा आहे. धार्मिक भावना दुखावल्या जाणे हा एक घातक ट्रेन्ड सुरु झाला आहे. त्यात जैनधर्मियांसारख्या मोजक्या शांतिप्रिय समाजानेही उतरावे हे आश्चर्यजनक आहे. अपमान करणार्‍याला 'इग्नोर मारणे' हा सर्वात मोठा उपाय आहे. अन्यथा मल्टिप्लिकेशन होत जातं. समजूतींमधे विसंगती आली की दुखावले जाण्याचे चान्सेस वाढतात. तुम्ही मला वर एका प्रतिसादात विचारले की माझ्या जन्माचं रहस्य चारचौघात उघड करुन सांगितलं तर कसं वाटेल? त्यावर मी चिडलो नाही. कारण मला सत्याची लाज वाटत नाही. कारण असे केल्याने माझा किंवा माझ्या जन्मदात्यांचा नव्हे तर जाहिर उघड करणार्‍याचा अपमान होतो. संभोग करणे पाप आहे असे मी समजत असेल तर मी नक्कीच दु:खी होईल. "संभोग व त्यातून अपत्यप्राप्ती हे काही पाप आहे, चुकीचे आहे, वाईट आहे, गुन्हा आहे" असे कुठेतरी तुम्हाला वाटत असेल म्हणून तुम्हीही हेच उदाहरण दिले असावे. कोणत्याही धर्मातल्या नग्न साधुंचे वर्तन मला अयोग्य वाटत नाही. ते सत्य आहे तसेच स्विकारले पाहिजे, ते कुणी नाकारत असेल तर त्याला लाज वाटते का हा प्रश्न येईलच. माझे मूळ विधान हे डबलस्टॅण्डर्ड ठेवणार्‍या लोकनिर्वाचित नेत्यांसाठी होते. त्यात जैन समाजाचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नक्कीच नव्हता.

In reply to by संदीप डांगे

डांगे बुआ, हा प्रतिसाद आपल्या हातून कोणीतरी लिहून घेतला आहे! उत्तम पटलेला आहे.

In reply to by संदीप डांगे

सहमत. खासकरून, समजूतींमधे विसंगती आली की दुखावले जाण्याचे चान्सेस वाढतात. आजकाल धार्मिक अस्मिता प्रचंड टोकदार होत चालल्यात. त्यामुळे कोण केव्हा कुठ कसा दुखावेल काहीच सांगता येत नाही.

In reply to by संदीप डांगे

ती 'घेट्टो मेन्टॅलिटी' आहे.
+११११
धार्मिक भावना दुखावल्या जाणे हा एक घातक ट्रेन्ड सुरु झाला आहे.
+११११
कारण असे केल्याने माझा किंवा माझ्या जन्मदात्यांचा नव्हे तर जाहिर उघड करणार्‍याचा अपमान होतो.
पटलं

संदीप डांगे यांचा दुखावले जाणे वगैरेबद्दलचा समंजस प्रतिसाद या सर्व लोच्यावर नेमके बोट ठेवणारा आहे. त्याचेशी १००% सहमत.

लेखकाने घेतलेला अ‍ॅप्रोच चुकीचा वाटतो आहे , त्या ऐवजी त्यांनी जैन धर्माच्या स्थापने पासून आतापर्यंतची स्थित्यंतरे , प्रथा , परंपरा अशी लेखमाला लिहिली असती तर या समाजाबद्दल अधिक माहिती मिळाली असती ( काहीतरी कंस्ट्रक्टीव लिहायला हवे होते )

In reply to by कपिलमुनी

सहमत. हे ऊठसूट काही झालं की लोक 'आमच्या भावना दुखावल्या' अशी जी ओरड मारतात त्याचा अक्षरश: वैताग आलेला आहे.

In reply to by मोदक

(भावनाप्रधान) लोकांसाठी मिपा एक फिरता "दवाखाना" सुरू करणार आहेत तो पर्यंत कळ काढा (आम्ची सोडून कुणाचीही) अखिल मिपा साधक-बाधक चर्चा महाम्डळाकडून गणपती बाप्पा चरणी विनवणी.

एखादा लेख कसा लिहावा, सुरुवात कशी करावी आणि कुठून वाचकाला वाहवत न्यावे आणि आपल्याला नक्की काय सांगायचे आहे ते दुसर्‍याच्या गळी कसे उतरावे यावर लेख लिहायला पाहीजे. मला कळतंय की जैन धर्माच्या काही चार गोष्टी तुम्हाला सांगयच्या आहेत. पण उगीचच चार प्रश्न विचारून वाचकाला जिज्ञासा उत्पन्न होईल ही जरा अती अपेक्षा झाली.

"अपमान करणार्‍याला 'इग्नोर मारणे' हा सर्वात मोठा उपाय आहे. अन्यथा मल्टिप्लिकेशन होत जातं" हे थेराँटीकली ओके वाटतं पण प्रत्यक्षात... ? असो नव्याने प्रयत्न करून बघेन म्हणतो.

In reply to by झेन

उपदेश करणे सोप्प, आचरण महाकठिण. पण आपल्या अपमानाचा-रागाचा-दुखावल्या जाण्याचा ट्रिगर कोणा दुसर्‍याच्या हातात असणे हे जास्त भयावह आहे. प्रयत्न करुन पाहण्याची तयारी दाखवणे ही सुद्धा एक उत्तम सुरुवात आहे. आपण साधी माणसं आहोत, रागावणे-दुखावल्या जाणे साहजिक आहे, त्यावर उपाय केला गेला पाहिजे, फक्त तो वर कपिलमुनि यांनी म्हटल्याप्रमाणे कन्स्ट्रक्टिव असावा, डिस्ट्रक्टिव नको.

संदीप डांगे, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. काही प्रश्न उभे राहिले. १. >> तो प्रश्न दुखावलेल्यांसाठी आहे. तिथे कोणताही धर्म-पंथ टाका, अर्थ बदलत नाही. धार्मिक कारणाने दुखावले जाणे >> हा एक वेगळाच प्रकार आहे. ती 'घेट्टो मेन्टॅलिटी' आहे. खालच्या चित्रात विधानसभेचा काहीही अपमान झालेला दिसंत नाही. उलट मुनीश्रींच्या भाषणाची अॅब्सर्ड आणि नॉनसेन्स म्हणून हेटाळणी करण्यात आली आहे. http://images.indianexpress.com/2016/08/vishal-tweet_759.jpg तरीपण तुम्ही विधानसभेचा आणि घटनेचा अपमान झाला म्हणून ओरडा करता आहात. तुमच्यांत आणि घेट्टोवाल्यांत फरक तो काय उरला मग? २. >> कोणताही धर्म हा मनुष्यास मुक्त करणारा प्रकार आहे. बांधले जाणे हे आचरण 'धर्म' ह्या संकल्पनेच्या >> अगदी विरुद्ध आहे. कोण्या बावळटानं हे सांगितलं तुम्हाला? उलट धर्म म्हणजे कर्तव्य आणि मर्यादा यांचा सुसंगत संगम आहे. कर्तव्ये कशी पार पाडावीत याची चिकित्सा म्हणजे धर्म. जिवंतपणी देह धारण केलेला असतांना जरी सायुज्य मुक्ती मिळाली तरी देहबंधन असतंच. ३. >> सगळ्या धर्मसंस्थापकांचे संदेश बघितले तर त्यांनी मुक्त व्हायला सांगितले आहे. जरा उदाहरण देणार का? मुक्ती वा मोक्ष देणं ईश्वराचे हाती आहे. मुक्तीसाठी प्रयत्न करणे म्हणजे मुक्त होणे नव्हे. ४. >> कितीही म्हटले तरी मनुष्याचा कळप करुन सुरक्षित राहण्याचा अंगभूत नैसर्गिक गुण सुटत नाही आणि >> महात्म्यांनी दिलेल्या संदेशाच्या अगदी उलट आचरण सुरु होते. प्रस्तुत प्रसंगात असं काही दिसून येत नाही. ५. >> सर्व साधु, संत, महंत, योगी, सन्यासी, फकिर, अवधुत हे खरंतर मुक्त असतात. >> त्यांच्यावर विशिष्ट गटाने मालकी सांगणे हे त्यांच्या शिकवणुकीच्या उलट वागणे ठरते. दोन वाक्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. वाट्टेल ते ठोकून देताय होय? शिवाय प्रस्तुत प्रसंगात असं काहीही झालेलं नाहीये ते वेगळंच! ६. >> मालकीहक्क सोडा, अपमान झालेला वाटणार नाही. उपरिनिर्दिष्ट चित्रात दाखवलेले absurd nonsense हे शब्द मुनीश्रींचा अपमान सोडून दुसरं काय दर्शवतात? ७. >> मग इतर कुणाच्याही कोणत्याही प्रतिक्रियेने त्रास का होतो हा मुद्दा आहे. भारतीय राज्यघटनेचा अपमान झाला म्हणून तुम्ही नाय का थयथयाट केलात? कोणी केला होता घटनेचा अपमान? मुनीश्रींनी? की खट्टरांनी? आणि त्यामुळे तुम्हाला कसाकाय त्रास होत होता? स्वत:च्या पायाखाली काय जळतंय ते कधी दिसणार तुम्हाला ! ८. >> धार्मिक भावना दुखावल्या जाणे हा एक घातक ट्रेन्ड सुरु झाला आहे. त्यात जैनधर्मियांसारख्या मोजक्या >> शांतिप्रिय समाजानेही उतरावे हे आश्चर्यजनक आहे. घटनेचा अपमान झाल्याची हाकाटी करणे हा एक घातक ट्रेन्ड सुरु झाला आहे. त्यात संदीप डांग्यांसारख्या मोजक्या विवेकप्रिय मनुष्यानेही उतरावे हे आश्चर्यजनक आहे. ९. >> अपमान करणार्‍याला 'इग्नोर मारणे' हा सर्वात मोठा उपाय आहे. माझ्या मते आजिबात नाही. अर्थात तुमचं मत बाळगण्याची तुम्हाला पूर्ण मुभा आहे. १०. >> तुम्ही मला वर एका प्रतिसादात विचारले की माझ्या जन्माचं रहस्य चारचौघात उघड करुन सांगितलं तर >> कसं वाटेल? त्यावर मी चिडलो नाही. कारण मला सत्याची लाज वाटत नाही. नेमकी हीच परिस्थिती आम्हा हिंदुत्ववाद्यांना बदलायची आहे. विनाकारण आईबाप काढले की चिडायचं असतं. आणि साधूंची नग्नता विनाकारण काढली की देखील चिडायचं असतं. अर्थात, तुम्हाला तुमचा थंडपणा बाळगण्याचा पूर्ण अधिकार आहे. ११. >> "संभोग व त्यातून अपत्यप्राप्ती हे काही पाप आहे, चुकीचे आहे, वाईट आहे, गुन्हा आहे" असे कुठेतरी तुम्हाला >> वाटत असेल म्हणून तुम्हीही हेच उदाहरण दिले असावे. छे छे ! काहीतरीच काय !! अहो, तुमच्यासारखा दिव्य जीव पैदा होण्यामागची कथा किती विलक्षण असेल, हाच विचार माझ्या मनी होता. १२. >> माझे मूळ विधान हे डबलस्टॅण्डर्ड ठेवणार्‍या लोकनिर्वाचित नेत्यांसाठी होते. त्यात जैन समाजाचा अपमान >> करण्याचा कोणताही हेतू नक्कीच नव्हता. हे विधानाच्या ठिकाणीच स्पष्ट व्हायला हवं. अन्यथा तुमचे प्रतिसाद आणि स्वगत एकमेकांत गुंतत गेलेले वाटू शकतात. मग हे विधान याच्यासाठी अन ते विधान त्याच्यासाठी अशी मांडणी ( की बतावणी? ) करंत बसावं लागतं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गा मा साहेब, तुम्हाला फ्रेंच कार्टुनिस्ट ची हत्या आणि काही महिन्यांपूर्वी महंमद पैगंबरचा अपमान केल्याबद्दल एका हिंदू नेत्याची फाशीची मागणी करणारा लाखोंचा समुदाय ह्या दोन्ही घटना मान्य व उचित असल्याचे तुमच्या प्रतिसादावरून लक्षात येते, बाकी विशाल दादलानी काय बोलला त्याचे बिल माझ्यावर फाडू नका, माझे विचार मांडून झाले, ह्यापेक्षा अधिक चर्चेत फार काही तथ्य नाही, तुमचे विचार तुम्ही बाळगा, माझे माझ्यापाशी, धन्यवाद!

In reply to by संदीप डांगे

संदीप डांगे, १. >> तुम्हाला फ्रेंच कार्टुनिस्ट ची हत्या आणि काही महिन्यांपूर्वी महंमद पैगंबरचा अपमान केल्याबद्दल एका हिंदू >> नेत्याची फाशीची मागणी करणारा लाखोंचा समुदाय ह्या दोन्ही घटना मान्य व उचित असल्याचे तुमच्या >> प्रतिसादावरून लक्षात येते, विषयांतर. एवीतेवी तुम्ही विषयांतराची गाय मारलीच आहे, तर मी आता वासरू मारून घेतो. तुम्ही भारतीय राज्यघटनेचा अपमान झाल्याचे ढोल बडवता आहात. ठीके. बडवा खुशाल. पण एके ठिकाणी तुम्ही भारतीय राज्यघटनेत नसलेली तरतूद घुसडली होतीत. कलमं १६ (४) आणि २९ (२) आठवताहेत का? तो राज्यघटनेचा अवमान म्हणून धरायचा का हो? तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म? २. >> बाकी विशाल दादलानी काय बोलला त्याचे बिल माझ्यावर फाडू नका, जैन धर्माला सत्याची लाज वाटते का वगैरे अक्कल युष्मादिक कोणास शिकवीत होते? ३. >> माझे विचार मांडून झाले, ह्यापेक्षा अधिक चर्चेत फार काही तथ्य नाही, तुमचे विचार तुम्ही बाळगा, >> माझे माझ्यापाशी, बरोबर आहे. तुमचे विचार तुम्हाला लागू केल्यावर तुमचा चर्चेतला रस संपुष्टात आला. चालायचंच! आ.न., -गा.पै.

वर काही प्रतिसादात उल्लेख आल्याप्रमाणे हिंदू-मारवाडी कधी बघण्यात आलेले नाहीत. माझे काही मित्र आहेत ते धर्म जैन आणि जात मारवाडी लावतात. ते स्वतःला हिंदू म्हणवत नाहीत. उद्योग धंद्यात बराचं पुढारलेला समाज आहे हा. तसेचं कोल्हापूर जिल्ह्या च्या आसपासचे बरेचं जैन लोकं धर्म हिंदू आणि जात जैन लावतात. ते दिगंबर जैन म्हणवतात स्वतःला. पाटील ,चौगुले, खोत अशी आडनावं आहेत त्यांची. लहानपणापासून जैन-मारवाडी (स्थानकवासी) बहुल भागात राहिल्यामुळे दीक्षा समारंभ, भिक्षा मागण्याच्या पद्धती हे प्रकार जवळून बघितले आहेत. भरीस भर म्हणून शालेय शिक्षण सुद्धा जैन विद्या प्रसारक मंडळाच्या मराठी माध्यम शाळेतून झाल्यामुळे जैन-मारवाडी लोकांशी संपर्क पहिल्यापासून आला आणि त्यांच्या बऱ्याचं प्रथा अगदी जवळून पाहायला मिळाल्या.

"छे छे ! काहीतरीच काय !! अहो, तुमच्यासारखा दिव्य जीव पैदा होण्यामागची कथा किती विलक्षण असेल, हाच विचार माझ्या मनी होता" it is irrelevant and not required at all.

In reply to by सचु कुळकर्णी

नका लोड घेऊ! त्यांच्यावर काहीही आक्षेप घेतले तरी ते त्यांना मंजूर असतात कारण ते हिंदुहिताचे असतात! ;)

In reply to by सचु कुळकर्णी

सचु कुळकर्णी, अगदी बरोबर बोललात पहा. वाद उद्भवल्यावर काही लोकांनी (मिपाकर नव्हे) जैन साधूंचा 'नागडे' म्हणून उपहास केला आहे. जो अनावश्यक आहे. नेमकी हीच खंत निओ१ (=धागालेखक) यांनी व्यक्त केली आहे. यावर आपले डांगेबुवा बोधामृत पाजताहेत की जैन धर्माला सत्याची लाज वाटते का! डांगेबुवांचं तर्कट लावू पाहता, जे आहे ते तसेच सत्य ठळक भाषेत मांडायला काहीच हरकत नसावी, नाहीका? जो न्याय मला लावाल तोच संदीप डांग्यांनाही लावावा एव्हढीच विनंती. :-) आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

जे आहे ते तसेच सत्य ठळक भाषेत मांडायला काहीच हरकत नसावी, नाहीका? >> अहो मांडा की मग, मी नाही म्हटलंय का? सत्याची लाज बाळगू नयेच. ;)

सदर मुनींचा आणि आमच्या आयडीचा काहीही संबंध नाही. आमची कोठेही शाखा नाही : कपिलमुनी

Aa. Na. GA. Pai. Every human being come to this world thru the same natural process. Nobody exist here because of his or her parents consume "payas"