असेच म्हणतो. आवडले गजाभाऊ.
सांपत्तिक परिस्थिती बेताची असून गजाभाऊ एकटेच नव्हे, तर ताराबाईसुद्धा मुलींसाठी प्रेमाने खपायच्या, म्हणजे शाळेशी नाते गहिरेच.
लिहायला शब्दच नाहीत. हेच खरे.
असे गजाभाऊ सर्वाना सर्वत्र लाभोत आणि '...देणार्याचे हात घ्यावेत' या उक्ती प्रमाणे या गजाभाऊंसारखे कधीतरी काही थोडेतरी आपल्यालाही करता वागता येवो!
सुंदर प्रकटन!
गजाभाउंच शाळेवरचं ओबडधोबड पण सच्चं प्रेम आणि तितकाच सुंदर शेवट.
गजाभाउंची गोष्ट तर गळ्यात आवंढा दाटविणारी आहेच पण तुमच्या लेखणीतून उतलीयसुद्धा तितक्याच हळुवारपणे.
छान केलीत सुरवात दिवसाची...
सहमत
माझ्या मनातली प्रतिक्रिया माझ्या आधी लिहिली ह्यांनी !
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
मॄण्मयी :)
खुप सुंदर लिहिले आहेस्..............शाळेतले शिपाई हे पद फक्त राबण्यासाठीच असते असा सर्वमान्य समज्........पण हेच शिपाई सगळ्या शाळेचा भार आपल्या खांद्यांवर समर्थपणे पेलत असतात्..........सहसा यांच्या कार्याची दखल घेतली जातेच असे नाही................
माझ्या शाळेचे रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे होत आहे या निमित्ताने शाळेच्या मा़जी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन शाळेने दिनांक ११ जानेवारी रोजी आयोजीत केले होते...............यासाठी तयारी करताना काही तरी वेगळ करायची अनिवार इच्छा होती..............माजी विद्यार्थ्यांनी काही सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याचे ठरवले पण आपण देखिल आपल्या शिक्षकांसाठी कायम स्मरणात राहिल असे काही तरी करावे या प्रामाणिक भावनेने आम्ही माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या आजपर्यंतच्या सगळ्या आजी व माजी शिक्षकांचे सत्कार करायचे असे ठरवले. ..............पण त्याच बरोबर सर्व शिक्षकेतर कर्मचार्यांचे सत्कार करण्याचे देखिल ठरवले................जे माजी विद्यार्थी या स्नेहसंमेलनाला प्रेक्षक म्हणुन उपस्थित रहातील त्यांच्यातल्याच कुणाला तरी व्यासपिठावर आमंत्रित करुन त्यांच्या हस्ते या सर्वांचे सत्कार करुन घ्यावा अशी एक कल्पना सुचली व ती सर्वमान्य देखिल झाली............................तुझे जसे गजाभाऊ तसे आमचे उमाजीकाका .........शाळेत असतानासुद्धा त्यांना कधी मुलांवर रागावताना अथवा चिडताना बघितलेल नाही..............कायम हसतमुख रहाणारे उमाजीकाका खर तर मागील वर्षी निवृत्त झाले होते पण शाळेने संस्थेला विनंती करुन त्यांचा १ वर्षाचा सेवाकाल वाढवुन मागितला यात सर्वकाही आले..............त्यांचा ६० वा वाढदिवस देखिल शाळेने आणि विद्यार्थ्यांनी शाळेत साजरा केला............सतत पायी फिरणारे अगदिच वेळप्रसंगी सायकलवर जाणारे आमचे उमाजीकाका आज देखिल आहेत तसेच आहेत्................शाळेत २० वर्षांनंतर गेल्यावर बरेच काही बदलले आहे असे जाणवले पण उमाजीकाकांमधे तिळमात्र फरक नाही.................जुन्या शिक्षकांचे पत्ते व दुरध्वनी क्रमांक उमाजीकाकांना तोंडपाठ होते........जे पत्ते शब्दशः माहित नव्हते त्या सगळ्या पत्त्यांच्या आसपासच्या सगळ्या खाणाखुणा त्यांनी आंम्हाला समजावुन सांगितल्या...........त्यांच्याच मुळे आम्ही आमच्या प्राथमिक विद्यालयाच्या सर्व माजी शिक्षकांना बोलावु शकलो................सत्कारासाठी उमाजीकाकांना व्यासपिठावर बोलावताना आंम्हा सुत्रसंचालन करणार्यांना शब्द सुचत नव्हते ....................त्यांच्या सत्कारासाठी कुणालातरी व्यासपिठावर आमंत्रित करण्यापुर्वीच एक माजी विद्यार्थिनी धापा टाकत व्यासपिठावर आली आणि ध्वनीक्षेपक हातात घेऊन उमाजीकाकांच्या आठवणी सांगायला सुरुवात केली ...............आम्ही सगळे फक्त उमाजीकाकांच्या चेहर्याकडे पहात होतो .............आत्यंतिक समाधान व तृप्त भाव त्यांच्या चेहर्यावर दिसत होते ".............त्या मुलीचे शब्द ऐकताना आमचे डोळे मात्र अखंड पाझरत होते ..............उमाजीकाकांना दोन शब्द बोलायची विनंती केली पण ते फक्त हसले ,चेहर्यावर हसु आणताना त्यांचे डोळे मात्र अशृंनी डबडबलेले होते...............त्यांच ते रुप पाहुन आंम्हाला कृतकृत्य झाल्यासारखे वाटले........त्यानंतर आमच्या वर्तकबाईंनी आपल्या भाषणात आमच्या या कृतीचे कौतुक करताना जे वाक्य वापरले ते कायमचे मनावर कोरले गेले"या माजी विद्यार्थ्यांनी कळसाच्या चकचकाटाकडे न बघता मंदिराचा पाया घालणार्यांना सन्मानित केले ही अतिशय आनंदाची बाब आहे"
असे लाखो उमाजीकाका आणि गजाभाऊ या देशात आहेत्...........................या सगळ्यांचे ऋण फेडणे कुठल्याही विद्यार्थ्यासाठी अशक्यच....................पण संधी मिळाली तर या गुणीजनांचे उतराई होण्याचा प्रयत्न प्रत्येक विद्यार्थ्याने जरुर करावा ..........................शाळेतले सुसंस्कार फक्त शिक्षकांकडून होतात असं कुठेय? हे मात्र अगदी खरं!!!!!!!!!!!!!
"अनामिका"
अनामिका आणि मृण्मयी
गजाभाऊ आणि उमाजीका दोन्ही खुप आवडले. लेख वाचला आणि गजाभाऊ डोळ्यासमोर उभे राहिले. मनात लगेच घर केले.
शाळेतले सुसंस्कार फक्त शिक्षकांकडून होतात असं कुठेय?
सलाम!
--मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.
आवडला. तसेच त्याचे नावही अत्यंत समर्पक वाटले.
काही महिन्यांपूर्वी मुंबईतील क्रिकेटसाठी प्रख्यात असलेल्या एका कॉलेजातील माजी क्रिकेटपटूंनी (ज्यात मुंबई व भारत ह्यांच्या संघांतील अनेक मोठी नावे आहेत), त्यांच्या प्रिय सरांचा सत्कार केला. त्याचबरोबर वर्षांनूवर्षे त्या कॉलेजच्या क्रिकेट संघाचा भार वाहणार्या गृहस्थांचाही हृद्य सत्कार केला, व सरांप्रमाणे त्यांनाही भेट अर्पण केली. त्याची आठवण झाली.
अनामिका, उमाजीकाकांबद्दल वाचलं. फोटो बघीतला. सुरेख लिहिलंय! वर्तकबाईंचं ते वाक्य कायम लक्षात राहील!
आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रीयांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
गजाभाऊ वाचले आणि डोळ्यांनी दगा दिला नाही, ते आपसूक पाझरलेच!
असं मोठं मन आपण बर्याच वेळा व्यवहारिक दृष्ट्या छोट्या असलेल्या माणसांकडे अनुभवतो. ते कृतीतून शिकवून जातात जे आपल्याला आतपर्यंत स्पर्शून जातं.
आणि अनामिका उमाजीकाकांचा फोटो आणि आठवण देऊन तू एकप्रकारे लेखन पूर्णत्त्वाला नेलंस तुझेही आभार.
दिव्यत्वाची जेथे प्रचिती
तेथे कर माझे जुळती!
चतुरंग
hi
I have read your experiance about गजाभाऊ
and forwarded to my friend . I am attching his reply herewith .
Great .
...........
Date: Mon, 3 Feb 2009 08:24:01 -0600
Subject: Re: गजाभाऊ
From: saundaryasohoni@gmail.com
To: abhy_ankar@hotmail.com
Dear Mahesh,
Apratim.
It took me back to my school days and atomospehere. Till I finished reading, I was totally in my school.
Very high nostalgic feelings. Very well written. Really great.
I am forwarding this to many of my school days friend and sure everybody would like it.
Keep sending.
Sanjay
at and post : janadu.
प्रतिक्रिया
पुन्हा एकदा
छान वाटले
सुरेख..
हेच
...
किती छान
सुंदर!
खुप सुंदर
गजाभाऊ
सुंदर
उत्तम
+१
+१
अप्रतिम....
पूर्णपणे सहमत!
सुंदर व्यक्तिचित्र
अप्रतिम
मॄण्मयी
सुंदरच.
खुप सूंदर
छान
छान!
सहमत शंकरर
अनामिका
खुप सुंदर...
अनामिक पंत
सुंदर लेख
धन्यवाद!
सुंदर ...
सुंदर लेखन मृण्मयी!
गजाभाऊ
छान
+१
गजाभाऊ