✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

१७ अगेन..

न
नीलमोहर यांनी
गुरुवार, 09/01/2016 - 20:36  ·  लेख
लेख
मध्यंतरी '१७ अगेन' हा झॅक अ‍ॅफ्रॉन, मॅथ्यू पेरीचा चित्रपट बघण्यात आला. मिडलाइफ क्रायसिस मध्ये अडकलेल्या, एक साचलेलं, हरलेलं आयुष्य जगणाऱ्या नायकाला एका अपघाताने अचानक पुन्हा सतरा वर्षीय होण्याची संधी मिळते तेव्हा तो आपल्या चूका सुधारून, आयुष्याची घसरलेली गाडी परत रुळावर कशी आणतो त्याची ही कहाणी. असे टाइम ट्रॅव्हल वर आधारित बरेच चित्रपट आधीही येऊन गेलेत, जसे की बॅक टू द फ्युचर, १३ गोइंग ऑन ३० इ. चित्रपट हलकाफुलका मनोरंजक आहे, करण जोहरादी मंडळींनी या कथेवर आधारित पॉपकॉर्नपट हिंदीत आणला नाही हे एक आश्चर्यच. चित्रपट पाहिल्यानंतर मनात असा विचार आला की खरेच असे झाले तर..? आपल्याला जर परत वय वर्षे सतरा होण्याची संधी मिळाली तर..? आपण आयुष्यात काय वेगळे करू ? स्वत:बद्दल सांगायचे तर, १७ पेक्षाही बालपणात परत जाता आले असते तर आयुष्यातील एक दुर्घटना नक्कीच रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला असता. बाकी अर्थात आधी शिक्षणात बदल केला असता, नॅशनल स्कूल ऑफ डिझाईन (NSD), जेजे वा तत्सम कला संस्थेतून कला विषयक उच्च शिक्षण घेतले असते, त्याशिवाय थोडी दंगा-मस्ती अजून केली असती, जी स्वत:ला फार सिरिअसली घेण्याची वाईट सवय लहानपणापासून लागल्याने केली नाही ;) थोडाफार स्वभावात बदल केला असता, बऱ्याच गोष्टी वेगळ्या पद्धतीने केल्या असत्या. असो. ही यादी कितीही वाढेल. हे सर्व अजूनही केले तरी पुष्कळ आहे :) परत सतरा वर्षीय होण्याची संधी मिळाली तर तुम्ही काय वेगळे कराल वा आपल्या आयुष्यात काय बदल कराल ?? :)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
6593 वाचन

💬 प्रतिसाद (48)

प्रतिक्रिया

चित्रपट पाहिल्यानंतर मनात असा

सही रे सई
गुरुवार, 09/01/2016 - 20:43 नवीन
चित्रपट पाहिल्यानंतर मनात असा विचार आला की खरेच असे झाले तर..? आपल्याला जर परत वय वर्षे सतरा होण्याची संधी मिळाली तर..? आपण आयुष्यात काय वेगळे करू ? अगदी माझ्या मनातला प्रश्न मांडलास. परवाच मी एका मित्राशी बोलत होते. माझ्या दोनवर्षाच्या मुलीच बाल्पण बघून मलापण वाटायला लागल की मी पण अत्ता अशी लहान झाले तर काय बहार येईल. पहिला विचार मनात आला तो म्हणजे माझ्या आइबाबांना जर मी लहानपणी त्रास दिला असेल तर तो कमी देण्याचा प्रयत्न करेन. अत्ता आईच्या रोल मधे आल्यामुळे कळत आहे की तिला व बाबांना किती छळलं असेल लहान असताना अजाणतेपणी. बाकी मज्जा तर भरपूर करेनच.
  • Log in or register to post comments

माझी एक चूक निस्तारायची आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 09/01/2016 - 20:45 नवीन
मला परत मागे जाऊन फक्त रुटीन आयुष्यातील दोन मिनिटाचा काळ कट करायचा आहे. बाकी, आयुष्यात या क्षणापर्यंत मागे काही राहीलं म्हणून बोच नाही. अलवेज हॅपी म्यान. :) आता ती दोन मिनिटं काय असतील धागा कर्तीने अंदाज लावला पाहिजे. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

हा विचार तर मी रोज करतो

लोनली प्लॅनेट
Fri, 09/02/2016 - 12:20 नवीन
हा विचार तर मी रोज करतो बारावी च्या परिक्षेतच आजारी पडलो होतो.... मागे जात आले तर आधी गॅप घेईन आणि चांगल्या गुणांनी पास होऊन Geology ,oceanography, anthropology, archaeology, astronomy या विषयांमध्ये शिक्षण घेऊन शास्त्रज्ञ होईन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दोन मिनिटांचा हिशेब तुम्हीच सांगा सर,

नीलमोहर
Fri, 09/02/2016 - 12:47 नवीन
- एवढी हुशारी जवळ असती तर काय होते, बाकी मलाही शक्य असते तर इथल्या कितीतरी चूका नक्कीच मागे घेतल्या असत्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तांत्रिक चूक झाली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 09/02/2016 - 20:50 नवीन
माझ्याकडून असं समजा की विनाकारण उगाच बंदूक हाताळतांना बंदुकीतून गोळी सुटावी तशी एक गोळी सुटली आणि इतकं मोठं अवकाश असतांना तिथे जायचं सोडून जिथे नेमकं नकोच लागायला तिथेच त्या गोळीने अनपेक्षितपणे वेध घेतला. (मी बंदूक हाताळायला जी मिनिटं घेतली ती मोठी चूक) " मेरे मरने पर तो लाखो रोने वाले हैं, तलाश उस पगली की है जो मेरे रोने से मर जाए..." -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

समकालीन आयुष्यायात

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 09/01/2016 - 20:52 नवीन
समकालीन आयुष्यायात पॅरामिलिटरी अकादमी पाहिली, तिथे केले जाणारे संस्कार घेतले, देशसेवेचे व्रत घेतले, परत 17चा झालो तर आकाशपाताळ एक छाप मेहनत करून मी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी उर्फ NDA मध्ये प्रवेश घेईन, माझे भंगलेले स्वप्न पूर्ण करीन नखशिखांत ऑलिव्ह ग्रीन रंगात रंगून जाईन, परत एकदा पॅरा कमांडोज साठी प्रयत्न करेल :) इफ ओन्ली 17 अगेन
  • Log in or register to post comments

डेक्कन कालेजात

प्रचेतस
गुरुवार, 09/01/2016 - 21:01 नवीन
डेक्कन कालेजात पुरातत्वशास्त्राचे शिक्षण घेतले असते आणि आता राखीगढी किंवा तत्सम ठिकाणी उत्खनन करत बसलो असतो :)
  • Log in or register to post comments

काय एकेक ध्येय असतं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 09/01/2016 - 21:11 नवीन
पुरातत्वशास्त्राचं प्रशिक्षण आताही घेता येईल एम.ए.इतिहास करा त्यात स्पेशलायझेशन पुरातत्वशास्त्र विभाग विषय घ्या. तुम्हाला मी पैठणला घेऊन जाईन. पालथी नगरी म्हणून तिथे आपण उत्खनन करू. सोन्याची नाणी अजुनही सापडात बघू तिथे नेमका काय जुगाड़ आहे ते....शोधुच. हाय काय आन नाय काय ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आता नाही शक्य ते. जमेल असं

प्रचेतस
गुरुवार, 09/01/2016 - 21:15 नवीन
आता नाही शक्य ते. जमेल असं वाटत नाही. पालथी नगरी असल्यामुळेच उत्खनन करु देत नाहीत :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१ , मला जर शिपाई झालो नसतो

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 09/01/2016 - 21:14 नवीन
+१ , मला जर शिपाई झालो नसतो तर डॉक्युमेंट कॉन्सरवशन अँड अरकायव्हिंग मध्ये विलायतेत उच्च शिक्षण घ्यायची इच्छा होती. कारण किती खजिना आहे भारतात तो conserve करायला हवाय :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

खरंच खजिना आहे.

प्रचेतस
गुरुवार, 09/01/2016 - 21:21 नवीन
खरंच खजिना आहे. नुसत्या पुण्याच्या पेशवे दफ्तरातच साडेतीन कोटी रुमाल आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

मग नारायण सायकल हाणीत

गवि
गुरुवार, 09/01/2016 - 21:23 नवीन
मग नारायण सायकल हाणीत क्यांपापर्यंत का गेला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मार्झोरीनच्या पेस्ट्रीज

प्रचेतस
गुरुवार, 09/01/2016 - 21:34 नवीन
मार्झोरीनच्या पेस्ट्रीज आणायला. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

नॅशनल ट्रेझर पार्ट वन तसे

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 09/01/2016 - 21:48 नवीन
नॅशनल ट्रेझर पार्ट वन तसे पाहता एक डिस्नी खजिनापट आहे वल्लीजी, तरीही त्यात एक सीन आहे बघा डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडेन्स संबंधी, च्यायला आपण भावूक होतो तो सीन पाहूनच! खंत वाटते आपल्याकडे होत असलेली हेळसांड पाहून, असो! मागे तुम्हांस लोथलचे फोटू पाठवले हुते, त्या विटा पाहूनही असेच वाटत होते, 4000+ इयर्स स्टील गोइंग स्ट्रॉंग! आज 21व्या शतकातल्या आधुनिक भारताला सुद्धा जे जमले नाही ते त्या लोक्स ने त्याकाळी केले होते, स्टँडर्डायझेशन ऑफ ब्रिक्स!!!! अफाट!!! असो, धागा वहावत जाईल देवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अगदी अगदी.

प्रचेतस
गुरुवार, 09/01/2016 - 21:51 नवीन
अगदी अगदी. कालपरवाच पेपरला धोलविराच्या त्सुनामीपासून संरक्षण करणाऱ्या विटांच्या भिंतीबद्दल आलं होतं. अजूनही शाबूत आणि अजूनही मजबूत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

चांगली भाजलेली माती हे जगातले

अभ्या..
गुरुवार, 09/01/2016 - 22:37 नवीन
चांगली भाजलेली माती हे जगातले सर्वात टिकाऊ मटरेल आहे. उत्खननात खापरेच सापडतात, धातू अथवा दगडसुद्धा झिजतात, नष्ट होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मलाही पुरातत्व शास्त्राची फार

लोनली प्लॅनेट
Fri, 09/02/2016 - 12:30 नवीन
मलाही पुरातत्व शास्त्राची फार आवड आहे ...पिरॅमिड व अबू सिमबेल चे मंदिर पाहण्यासाठी आयुष्यात एकदातरी इजिप्त ला भेट द्यायचे स्वप्न आह पुन्हा माचू पिचू.. मेक्सिको चे पिरॅमिड .. wow.. े
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मस्तं धागा नीमो. 17 अगेन....

पद्मावति
Fri, 09/02/2016 - 13:49 नवीन
मस्तं धागा नीमो. 17 अगेन......आयुष्य रीवाइंड करता आलंच तर काही चुका सुधारण्याची इच्छा आहे.
पिरॅमिड व अबू सिमबेल चे मंदिर पाहण्यासाठी आयुष्यात एकदातरी इजिप्त ला भेट द्यायचे स्वप्न आह...
आहा...मस्तं. हियर. ईजिप्ट, टर्की आणि जॉर्डन असा त्रिकोण करता आला तर....पण सध्याच्या अराजकते मुळे पुढली काही वर्षे तरी शक्य दिसत नाही :( तसेच मला मेक्सिको, साऊथ अमेरिका, बालीला पण जायचंय. कितीतरी गोष्टी करायच्या आहेत ....miles to go before i sleep...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लोनली प्लॅनेट

सॉरी, सेम हियर असे वाचावे.

पद्मावति
Fri, 09/02/2016 - 14:06 नवीन
सॉरी, सेम हियर असे वाचावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति

मी सतरा असते तर वेटिंग लिस्ट

अजया
गुरुवार, 09/01/2016 - 21:47 नवीन
मी सतरा असते तर मेडिकल वेटिंग लिस्ट मधल्या दुसर्या नंबरसाठी थांबुन मेडिकलला गेले असते!
  • Log in or register to post comments

नको... सतरा नको परत....

माम्लेदारचा पन्खा
गुरुवार, 09/01/2016 - 22:43 नवीन
हाय ते बरं हाय....जाऊद्या गाडी !
  • Log in or register to post comments

सतरा खरच नको, जिंदगीतल

अभ्या..
गुरुवार, 09/01/2016 - 22:47 नवीन
सतरा खरच नको, जिंदगीतल बेक्कार वर्ष होते. पळून जाऊन बाईकचे गॅरेज टाकलो असतो.
  • Log in or register to post comments

सेम हिअर...

प्रसन्न३००१
Fri, 09/02/2016 - 11:44 नवीन
सेम हिअर... १२वि च्या परीक्षेत फट्टे लागली होती... नापास नाही झालो तेच मिळवलं. पण तसंही याचा पुढील करिअरवर काहीच परिणाम नही झाला.. त्यामुळे जे होते ते चांगल्यासाठी होते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

तेव्हा घरातून पळून जाऊन दूर

संदीप डांगे
गुरुवार, 09/01/2016 - 22:54 नवीन
तेव्हा घरातून पळून जाऊन दूर निर्मनुष्य जंगलात एकटेच जाऊन कायमचे राहावे असे खूप तीव्रतेने वाटत होते, तसं करायला मिळालं तर करिन... लय लोकांचे लय त्रास वाचतील... ;)
  • Log in or register to post comments

कुठं जाता वारी हनमानाच्या

कैलासवासी सोन्याबापु
Fri, 09/02/2016 - 06:56 नवीन
कुठं जाता वारी हनमानाच्या डोक्यावर बसायला!! बसा अटीच गपचिप! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

बाप्पू

नाखु
Fri, 09/02/2016 - 08:32 नवीन
तसेही आता डांगे अण्णा जंगलातच हैत्,फक्त अण्णा त्यांना (माणसांच) जंगल म्हणून ओळ्खतेत इतकाच काय तो फरक. बाकी मूळ लेख १७ वर्षाबाबत असल्याने "सोळावं" वर्षात जाणार्यांची कुचंबणा करणारं आहे ही बाब नम्रपणे नोंदवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

मी सतराचाच आहे. फक्त वय एकवीस

एस
गुरुवार, 09/01/2016 - 23:04 नवीन
मी सतराचाच आहे. फक्त वय एकवीस सांगतो. ;-) वीह्ही वाह्हू वाह्ह्यॅ!
  • Log in or register to post comments

मला १७ व्या वर्षात परत जायची इच्छा

बोका-ए-आझम
गुरुवार, 09/01/2016 - 23:29 नवीन
फक्त माझ्या वडिलांना भेटण्यासाठी आहे. ते नेमके मी त्याच्या दुप्पट वयाचा झाल्यावर गेले.:(
  • Log in or register to post comments

शैक्षणिक जीवन ठीक होते ,

साधा मुलगा
गुरुवार, 09/01/2016 - 23:34 नवीन
शैक्षणिक जीवन ठीक होते , त्यात आणखी चांगले मार्क्स मिळवून पुढे काहीही उपयोग झाला नसता आणि पुढे व्यावसायिक जीवनातही काही फरक पडला नसता. पण त्याकाळी आवडायच्या अश्या मुलीला/मुलींना प्रोपोज अथवा किमान कोफीपानासाठी तरी विचारले असते. timepass म्हणून पण लफडे करता येते हि कल्पना त्यावेळी माहिती नव्हती. आता त्या मुलींची लग्न होऊन पोरं झाली आहेत. असो, गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.
  • Log in or register to post comments

मला असेही सगळे मी १७ चीच

रुपी
Fri, 09/02/2016 - 01:19 नवीन
मला असेही सगळे मी १७ चीच दिसते असे म्हणतात.. त्यामुळे मी वागतेही त्याला साजेल असंच ;)
  • Log in or register to post comments

नको! नको!!

नावातकायआहे
Fri, 09/02/2016 - 08:25 नवीन
गायभने! १२वीआठवते...
  • Log in or register to post comments

NDA मध्ये प्रवेश घेऊन भूदलात

झुमकुला
Fri, 09/02/2016 - 08:40 नवीन
NDA मध्ये प्रवेश घेऊन भूदलात रुजू झालो असतो
  • Log in or register to post comments

हा एक विपणनाचा डावपेच

सुबोध खरे
Fri, 09/02/2016 - 12:15 नवीन
हा एक विपणनाचा डावपेच (marketing strategy) आहे. घाऊक प्रमाणावर घेतली तर १३० किरकोळ घेतली तर १८० रुपये. घाऊक भाव हा कमीत कमी दहा किलोला म्हणजे माणूस विचार काय करतो? ५०० रुपये वाचतात नाही तरी डाळ आपल्याला लागणार आहेच त्यातून नंतर भाव वाढला तर? म्हणजे १० किलो डाळ एका फटक्यात खपली. शिवाय किरकोळीत घेणारा माणूस म्हणतो जाऊ दे महाग आहे तर अर्धाच किलो घ्या. पण हिशेब डोक्यात पक्का कि आपले २५ रुपये बुडाले. मग जेंव्हा हातात पैसे येतात तेंव्हा दहा किलो घेऊन टाका. पंचवीस रुपयाचा तोटा ५०० रुपये फायद्यात वळता झाला. अशा वीस किरकोळ घेणाऱ्या लोकांना पिशव्या बांधून देण्यापेक्षा सौ सुनार कि एक लुहार कि. हा हिशेब आहे. ५० % सूट म्हणून जाहिरात करणाऱ्या कंपन्या आपले कपडे ५० % सूट म्हणून देत नाहीत तर एकावर एक फुकट म्हणून आपला मागच्या वर्षीचा न खपलेला माल तुम्हाला खपवतात तसेच आहे. एकच हवा असले तर ३० % सूट मिळते. पॅन्टलून , सॅन फ्रिस्को, पीटर इंग्लंड इ कंपन्यांचे पावसाळ्यात सेल असेच असतात.
  • Log in or register to post comments

प्रतिसाद चुकीच्या ठिकाणी आला

सुबोध खरे
Fri, 09/02/2016 - 12:17 नवीन
प्रतिसाद चुकीच्या ठिकाणी आला क्षमस्व
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मी तेच म्हटलं....

माम्लेदारचा पन्खा
Fri, 09/02/2016 - 14:02 नवीन
काही अर्थबोध होईना प्रतिक्रिया वाचून !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

आपल्याला नाय १७ चं आकर्षण.हाय

कंजूस
Fri, 09/02/2016 - 14:04 नवीन
आपल्याला नाय १७ चं आकर्षण.हाय तो पुढचा स्पीड बराय.
  • Log in or register to post comments

आमच्या बोटीवरचा कॅप्टन

स्वीट टॉकर
Fri, 09/02/2016 - 14:40 नवीन
आमच्या बोटीवरचा कॅप्टन कोचीनचा होता. त्याने घर बांधताना चाणाक्षपणे दोन प्लॉट्स शेजारशेजारचे विकत घेतले होते. एकावर बंगला बांधून पाच वर्षं राहिल्यावर त्याने 'ह्या घरात कायकाय सुधारणा पाहिजेत' याची यादी केली आणि दुसर्या प्लॉटवर तसा सुधारित बंगला बांधला. मला तो भेटला तेव्हां या दुसर्या बंगल्यात राहायला जाऊन तीन वर्षं झाली होती. मला म्हणाला, "मी तेव्हां तीन प्लॉट्स विकत घ्यायला पाहिजे होते. या घरात देखील चुका आहेतच!" तात्पर्य काय, तर '17 again' नी फक्त भूक चाळवली जाईल. पोट '17 again and again and again' नी देखील भरणार नाही.
  • Log in or register to post comments

पटले! मन कधी भरत नाही हे खरेच

संदीप डांगे
Fri, 09/02/2016 - 16:07 नवीन
पटले! मन कधी भरत नाही हे खरेच! अवांतरः ते घरात राहून नंतर सुधारण्याच्या कल्पनेवर एवढ्यात एक सुचलेले! बंगला बांधण्यास साधारण पन्नास लाखाच्या पुढेच खर्च येतो. बरेचदा बांधल्यावर अनेक ठिकानी तोडफोड होते, बरीच गैरसोय अशीच स्विकारली जाते. तेव्हा सिनेमाच्या सेट सारखा बंगला आधी बांधून त्यात थोडे दिवस राहून बदल करुन बघून फायनल डिझाईन प्रत्यक्ष बांधले तर अनेक नंतरचे खर्च आणि भानगडी कमी होतील. ह्यात फर्निचरपासून गॅजेट्सपर्यंत सर्व 'ट्राय' करुन बघता येईल. चला आता याचाही बिजनेस प्लान बनवायला घ्यावा! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वीट टॉकर

मस्त प्रतिसाद!

रातराणी
Fri, 09/02/2016 - 23:29 नवीन
मस्त प्रतिसाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वीट टॉकर

सतरा कुठले?

पैसा
Fri, 09/02/2016 - 14:55 नवीन
  • Log in or register to post comments

खी खी खी.....

पद्मावति
Fri, 09/02/2016 - 16:13 नवीन
खी खी खी..... ऋषि आणि टीना, दोघेही तू सोला मै सतरा म्हणताहेत वरवर पण मनातल्या मनात म्हणत असतील '' चल झूटी....चल झूटे.........."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

सतरा नाही त्याहुन थोडा अजुन मागे गेलो

मारवा
Fri, 09/02/2016 - 16:34 नवीन
अजुन थोडा लहान होता आलं आणि थोडी परीस्थीती बदलण्याची पण मुभा दोन्ही मिळाले तर पोटभर जेऊन घेतलो असतो, माझी स्वतःची नवी कंपासपेटी घेतली असती, नवी पुस्तके नव दफ्तर, शाळेजवळच्या गाडीवरुन केव्हाही कितीही वेळा क्रिम बिस्कीट घेऊन खाल्ल असत. साल सगळच जुन सगळच अपुर.
  • Log in or register to post comments

परत १७ ची झाल्यास मी अजून

रायनची आई
Fri, 09/02/2016 - 16:41 नवीन
परत १७ ची झाल्यास मी अजून सिरियसली अभ्यास करेन, आयुष्य मोकळेपणाने एन्जॉय करेन आणि आईच्या घरी मनसो़क्त राहून घेइन.आता लग्न झाल्यावर, स्वतः आई झाल्यावर कळत की तिला किती त्रास दिला होता,उलट उत्तर दिली होती,गृहीत धरल होत..
  • Log in or register to post comments

माझ्या कडे बराच वेळ आहे अजून...

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 09/02/2016 - 16:55 नवीन
अजून दोन वर्षांनी जेव्हा मी अठरा वर्षांचा होईन तेव्हा मी या विषयावर विचार करेन. तो पर्यंत मी बाकिच्यांच्या प्रतिक्रीया वाचत बसतो. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

अहो, इकडे सतरा वर्षांचं

संदीप डांगे
Fri, 09/02/2016 - 17:05 नवीन
अहो, इकडे सतरा वर्षांचं होण्याबददल चर्चा सुरु है.. एकशेसतरा नाही. तो अठराच्या आधीचा गाळलेला शब्द टाका परत.. लब्बाड कुठले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

स्वतःलाच चार कानाखाली लावल्या

अद्द्या
Fri, 09/02/2016 - 17:38 नवीन
स्वतःलाच चार कानाखाली लावल्या असत्या. "हरामखोरा अभ्यास कर.. सोड तो गेम थोडे दिवस " असं म्हणून . . परत गेम चालू केला असता.. =]] No regrets.. जे आहे ते चांगलंय ..
  • Log in or register to post comments

+१११

मोदक
Fri, 09/02/2016 - 18:48 नवीन
+१११ No regrets.. जे आहे ते चांगलंय..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

इंटरनेट वर मिपा शोधल असत .

जेपी
Fri, 09/02/2016 - 18:20 नवीन
इंटरनेट वर मिपा शोधल असत ..सदस्यत्व घेतल असत.. नुकतच चालु झालत.. च्यामारी जेष्ठ मिपाकर म्हणुन मिरवता आल असत.. गेलाबाजार मिपा संपादक झालो असतो. शक्य झाल तर हे जमाव ही भासंपदी प्रार्थना.. (no guilt in personal life)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा