Skip to main content

माझीच मी...

लेखक आनंदमयी यांनी गुरुवार, 01/09/2016 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
शुभ्र कोऱ्या चांदव्याशी हासले माझीच मी धुंद हळव्या शब्दगंधी गुंतले माझीच मी.. लाख स्वप्ने गुंफुनी मी बांधली तारांगणे उसवता अलवार टाका उसवले माझीच मी सौख्यसमयी भोवताली लाख होते सोबती आणि दु:खाच्या घडीला सोबती माझीच मी हाय तू तुडवून जाता दूर प्रीतीची फुले त्या फुलांच्या अत्तरासम बहरले माझीच मी मतलबी सारेच येथे, नाहि कोणाचे कुणी मुखवटे नुसते सभोती, शेवटी माझीच मी! © अदिती
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2639
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

छान झालीये.

सुंदर

हाय तू तुडवून जाता दूर प्रीतीची फुले त्या फुलांच्या अत्तरासम बहरले माझीच मी हे फार आवडलं. सुंदर कविता.

सगळे अगदी मनातले शब्द आहेत...

छान