औरंग्याचे ठाणे खादाडी धागे पाहून पिंपरी चिंचवडमधील ठिकाणांसाठी पण धागा असावे असे वाटल्याने इथल्या काही ठिकाणांची भर टाकत आहे. पिंपरी चिंचवडचे मिपाकर अजून काही ठिकाणांबद्दल लिहितीलच.
१. नाशिककर कॅन्टीन - एच ए कॉलनीत,
ह्याचं फरसाण खूप जबरदस्त. वडापाव पूर्वी खूप छान होता पण हल्ली सोडा जास्त मारतो. सामोसा आणि त्याबरोबर देत असलेली खोबर्याची चटणी मात्र अत्युत्तम. गुलाबजामपण खूप उत्कृष्ट. सकाळी ८ ते संध्याकाळी ५.३० / ६ पर्यंत चालू असतं.
२. करमरकर - चापेकर चौक, चिंचवड
साबुदाणा खिचडी, कोथिंबीर वडी खूप छान, पोहे, उपमा, मिसळ वगैरे मिळतात. किंचित महागडं पण दर्जेदार
३. मयुर मिसळ - चिंचवड स्टेशन
पिंचिंमधली सर्वात चांगली मिसळ इथेच खाल्लीय. बाकी चिंचवडगावात नेवाळे ( हा तिखटाचे डबेच्या डबे ओतत असावा रश्श्यात इतकी तिखट), लिंक रोडवर दे धक्का, पिंपरीगावात निसर्ग, अतिथी, जनता, दिप्ती असे मिसळीचे ठेले आहेत.
४. कुदळेची भेळ - पिंपरीगाव, नवमहाराष्ट्र शाळेच्या मागे.
मटकी भेळेसाठी प्रसिद्ध. भेळेची ताटली अगदी भरगच्च देतो. त्यवार मटकी आणि लिंबाच्या रसात वाफवलेल्या हिरव्या मिरच्या. अफाट लागतात.
५. महादेव पॅटिसवाला - पिंपरी कॅम्प
सकाळी ह्याच्याकडे खास सिंधी पक्वान मिळतं. दाल पकवान. आणि संध्याकाळी रगडा पॅटिस (सिंधी स्टाईलचं). दोन्ही वेळा भरपूर गर्दी असते. दालवडा, मिरचीवडा, भजी ह्या अजून काही खासियती.
६. गीता स्नॅक्स सेंटर - निगडी
पावभाजी आणि कॉल्ड कॉफीसाठी फेमस
७. गणेश स्वीट मार्ट - पिंपरी कॅम्प.
ह्याच्यासारखी रसमलई अगदी चितळे बंधू, काका हलवाईकडे देखील मिळत नाही. माफक गोड आणि चवीला प्रचंड सुंदर.
८. यशवंत स्वीट मार्ट - चिंचवडगाव
गुलाबजाम, बाकरवडी आणि इतर पदार्थ. गुलाबजाम जवळपास नाशिककरसारख्याच चवीचे.
९. कलादीप स्वीट मार्ट - चिंचवडगाव.
इथला ढोकळा खूप भारी आणि त्याच्याबरोबर मिळणारी पुदिन्याची चटणीपण खूप भारी. खूप लवकर संपतो ढोकळा इथला.
हाटेलं वगैरे मुद्दामच दिलेली नाहीत, मिपाकर अजून भर घालतीलच.
वाचने
38779
प्रतिक्रिया
202
मिसळपाव
प्रतिक्रिया
वरील ठिकाणे
दुत्त दुत्त नाखुन चच्चा.
In reply to वरील ठिकाणे by नाखु
दुत्त दुत्त प्रचेतसकाकाच.
In reply to दुत्त दुत्त नाखुन चच्चा. by प्रचेतस
एकतर येतोस रात्री ८ च्या पुढे
In reply to दुत्त दुत्त प्रचेतसकाकाच. by अभ्या..
हायला तुम्ही पुण्यात पण येता
In reply to दुत्त दुत्त प्रचेतसकाकाच. by अभ्या..
ब्याट्या, धन्या वल्लया
In reply to हायला तुम्ही पुण्यात पण येता by महासंग्राम
नेक्ष्ट टैम आले कि कळवा आम्ही
In reply to ब्याट्या, धन्या वल्लया by अभ्या..
अवश्य मंदारराव. भेटूच आपण.
In reply to नेक्ष्ट टैम आले कि कळवा आम्ही by महासंग्राम
आपला रम-यज्ञ सुद्धा ड्यु आहे
In reply to अवश्य मंदारराव. भेटूच आपण. by अभ्या..
बापुसाठी कवापन, कुठपन, कसापन.
In reply to आपला रम-यज्ञ सुद्धा ड्यु आहे by कैलासवासी सोन्याबापु
माझं नाव घ्या.
In reply to बापुसाठी कवापन, कुठपन, कसापन. by अभ्या..
तोंडाला पाणी सुटलं ना राव
उद्या जमवू. आज ८ पर्यंत
In reply to तोंडाला पाणी सुटलं ना राव by महासंग्राम
आमचा विकी* पॉईंट आहे तो
व्वा!
म्याप हवाच .गुगल नको.साधा रोड
मटकी भेळ..
कुठेशी नेमके?
In reply to मटकी भेळ.. by ब़जरबट्टू
लागल्या हाती थोडं समोर जावून
In reply to कुठेशी नेमके? by प्रचेतस
अगदी अगदी. :)
In reply to लागल्या हाती थोडं समोर जावून by महासंग्राम
तुम्ही जे म्हणाल ते या बाबतीत
In reply to अगदी अगदी. :) by प्रचेतस
बाब्बो !
In reply to कुठेशी नेमके? by प्रचेतस
प्रदीप स्वीट्स आणि अरिहंत भेळ!!!
अरिहंत भेळ सांगली स्टाईलची
In reply to प्रदीप स्वीट्स आणि अरिहंत भेळ!!! by जिन्गल बेल
अरिहंत भेळ... माझ्या मित्राचे
In reply to प्रदीप स्वीट्स आणि अरिहंत भेळ!!! by जिन्गल बेल
डी के ची भेळ , पाणीपुरी,
भेळ आणि फरसाण भेळ चांगली असते
In reply to डी के ची भेळ , पाणीपुरी, by इल्यूमिनाटस
१. प्रदीप स्वीट्स पण चांगले
वासु वडापाववाल्याचे आता हॉटेल
In reply to १. प्रदीप स्वीट्स पण चांगले by मृत्युन्जय
लायनीनं देतो एक एक
दत्त्याचा वडापाव झकास आहे.
In reply to लायनीनं देतो एक एक by गणामास्तर
दत्त्या कधी कधी खारट वडा पाव
In reply to दत्त्याचा वडापाव झकास आहे. by प्रचेतस
आकुर्डीच्या संभाजी चौकात बर्गर
In reply to दत्त्या कधी कधी खारट वडा पाव by इल्यूमिनाटस
दत्ताचा वडापाव
In reply to दत्त्या कधी कधी खारट वडा पाव by इल्यूमिनाटस
मुंबई मासोळी
गांधी पेठेतील बालाजी मिसळ,
बालाजी मिसळ म्हणजेच कवी मिसळ.
In reply to गांधी पेठेतील बालाजी मिसळ, by संपत
सॉरी नेवाळे मिसळ गल्लीबाहेर
In reply to बालाजी मिसळ म्हणजेच कवी मिसळ. by प्रचेतस
शशीची मिसळ
In reply to सॉरी नेवाळे मिसळ गल्लीबाहेर by संपत
शशीची खाल्ली नाही. वीकांती
In reply to शशीची मिसळ by देवांग
शशी का विनायक
In reply to शशीची खाल्ली नाही. वीकांती by प्रचेतस
वाचनखुण
हे असं नुसतं तोंडाला शाब्दीक
ह्ये परफेक्ट एक्काकाका.
In reply to हे असं नुसतं तोंडाला शाब्दीक by डॉ सुहास म्हात्रे
पिंचीमध्ये कट्टा
In reply to हे असं नुसतं तोंडाला शाब्दीक by डॉ सुहास म्हात्रे
अगदी अगदी.
In reply to पिंचीमध्ये कट्टा by कपिलमुनी
एक तारीख ठरवून धागा टाका
In reply to अगदी अगदी. by प्रचेतस
लवकरच तारीख ठरवून धागा काढतो.
In reply to एक तारीख ठरवून धागा टाका by डॉ सुहास म्हात्रे
धाग्याच्या
In reply to लवकरच तारीख ठरवून धागा काढतो. by प्रचेतस
ठाणे डोंबोलीकरांसारखे जाहिरातबाजही नाहित....
In reply to अगदी अगदी. by प्रचेतस
यायचंय हो खरंच.
In reply to ठाणे डोंबोलीकरांसारखे जाहिरातबाजही नाहित.... by मुक्त विहारि
आम्ही मुंबईकरांनी धागा टाकला,
In reply to यायचंय हो खरंच. by प्रचेतस
=))
In reply to आम्ही मुंबईकरांनी धागा टाकला, by बोका-ए-आझम
आझम राव जसं पुण्यात नदी
In reply to आम्ही मुंबईकरांनी धागा टाकला, by बोका-ए-आझम
तसं पुणं पण मुंबईतच येतं म्हणा!
In reply to आझम राव जसं पुण्यात नदी by महासंग्राम
देवा आता तुमच्या सारखे लोकं
In reply to तसं पुणं पण मुंबईतच येतं म्हणा! by बोका-ए-आझम
अहो मुवी आपल्या ठाण्याच्या
In reply to ठाणे डोंबोलीकरांसारखे जाहिरातबाजही नाहित.... by मुक्त विहारि
तुम्ही टांग दिलीच की.
In reply to अहो मुवी आपल्या ठाण्याच्या by प्रमोद देर्देकर
ठाण्याच्याच कशाला शोरबा,
In reply to तुम्ही टांग दिलीच की. by मुक्त विहारि
थांबा..थाबा जरा.
In reply to ठाणे डोंबोलीकरांसारखे जाहिरातबाजही नाहित.... by मुक्त विहारि
कधी बी करा
In reply to पिंचीमध्ये कट्टा by कपिलमुनी
मागील पानावरुन पुढे चालू..
रच्याकने ते यशवंत लै लै जुनं
In reply to मागील पानावरुन पुढे चालू.. by गणामास्तर
आकूर्डी येथे.....
हे एक बर झालं
पिंपरी क्यांप मधील घनश्याम धाबा येथील
बिर्याणी आणि इतर नॉन व्हेज -
गणा, गणा, अरे गणा, मला
In reply to बिर्याणी आणि इतर नॉन व्हेज - by गणामास्तर
तू लगा अचानक उगवणार रात्रि
In reply to गणा, गणा, अरे गणा, मला by अभ्या..
व्हय महाराजा.
In reply to तू लगा अचानक उगवणार रात्रि by गणामास्तर