औरंग्याचे ठाणे खादाडी धागे पाहून पिंपरी चिंचवडमधील ठिकाणांसाठी पण धागा असावे असे वाटल्याने इथल्या काही ठिकाणांची भर टाकत आहे. पिंपरी चिंचवडचे मिपाकर अजून काही ठिकाणांबद्दल लिहितीलच.
१. नाशिककर कॅन्टीन - एच ए कॉलनीत,
ह्याचं फरसाण खूप जबरदस्त. वडापाव पूर्वी खूप छान होता पण हल्ली सोडा जास्त मारतो. सामोसा आणि त्याबरोबर देत असलेली खोबर्याची चटणी मात्र अत्युत्तम. गुलाबजामपण खूप उत्कृष्ट. सकाळी ८ ते संध्याकाळी ५.३० / ६ पर्यंत चालू असतं.
२. करमरकर - चापेकर चौक, चिंचवड
साबुदाणा खिचडी, कोथिंबीर वडी खूप छान, पोहे, उपमा, मिसळ वगैरे मिळतात. किंचित महागडं पण दर्जेदार
३. मयुर मिसळ - चिंचवड स्टेशन
पिंचिंमधली सर्वात चांगली मिसळ इथेच खाल्लीय. बाकी चिंचवडगावात नेवाळे ( हा तिखटाचे डबेच्या डबे ओतत असावा रश्श्यात इतकी तिखट), लिंक रोडवर दे धक्का, पिंपरीगावात निसर्ग, अतिथी, जनता, दिप्ती असे मिसळीचे ठेले आहेत.
४. कुदळेची भेळ - पिंपरीगाव, नवमहाराष्ट्र शाळेच्या मागे.
मटकी भेळेसाठी प्रसिद्ध. भेळेची ताटली अगदी भरगच्च देतो. त्यवार मटकी आणि लिंबाच्या रसात वाफवलेल्या हिरव्या मिरच्या. अफाट लागतात.
५. महादेव पॅटिसवाला - पिंपरी कॅम्प
सकाळी ह्याच्याकडे खास सिंधी पक्वान मिळतं. दाल पकवान. आणि संध्याकाळी रगडा पॅटिस (सिंधी स्टाईलचं). दोन्ही वेळा भरपूर गर्दी असते. दालवडा, मिरचीवडा, भजी ह्या अजून काही खासियती.
६. गीता स्नॅक्स सेंटर - निगडी
पावभाजी आणि कॉल्ड कॉफीसाठी फेमस
७. गणेश स्वीट मार्ट - पिंपरी कॅम्प.
ह्याच्यासारखी रसमलई अगदी चितळे बंधू, काका हलवाईकडे देखील मिळत नाही. माफक गोड आणि चवीला प्रचंड सुंदर.
८. यशवंत स्वीट मार्ट - चिंचवडगाव
गुलाबजाम, बाकरवडी आणि इतर पदार्थ. गुलाबजाम जवळपास नाशिककरसारख्याच चवीचे.
९. कलादीप स्वीट मार्ट - चिंचवडगाव.
इथला ढोकळा खूप भारी आणि त्याच्याबरोबर मिळणारी पुदिन्याची चटणीपण खूप भारी. खूप लवकर संपतो ढोकळा इथला.
हाटेलं वगैरे मुद्दामच दिलेली नाहीत, मिपाकर अजून भर घालतीलच.
वाचने
38779
प्रतिक्रिया
202
मिसळपाव
प्रतिक्रिया
पक्षीदरीत का? :)
In reply to व्हय महाराजा. by अभ्या..
नको, ते बोगस आहे. वरून झगमग न
In reply to पक्षीदरीत का? :) by प्रचेतस
ए टांग बिंग दिली नव्हती बे.
In reply to व्हय महाराजा. by अभ्या..
मास्तरांच्या सामिष व्यासंगास
In reply to बिर्याणी आणि इतर नॉन व्हेज - by गणामास्तर
नाशीक फाट्याजवळचं
In reply to मास्तरांच्या सामिष व्यासंगास by कैलासवासी सोन्याबापु
नाशिक फाट्याचे हे तर..
In reply to नाशीक फाट्याजवळचं by नाखु
'द मराठा' प्युअर व्हेज आहे हो
In reply to नाशिक फाट्याचे हे तर.. by विनटूविन
नाशीक फाट्याजवळचं
In reply to 'द मराठा' प्युअर व्हेज आहे हो by गणामास्तर
मला कसला दंडवत घालताय बाप्पू
In reply to मास्तरांच्या सामिष व्यासंगास by कैलासवासी सोन्याबापु
मास्तर
In reply to मला कसला दंडवत घालताय बाप्पू by गणामास्तर
गणामास्तर
In reply to मला कसला दंडवत घालताय बाप्पू by गणामास्तर
पुरेपूर कोल्हापूर
In reply to मला कसला दंडवत घालताय बाप्पू by गणामास्तर
मटण थाळी ...
In reply to बिर्याणी आणि इतर नॉन व्हेज - by गणामास्तर
मस्त धागा
अरिहंत म्हणजे मोरया
In reply to मस्त धागा by आजानुकर्ण
अरिहंत हि बकवास जागा आहे
In reply to अरिहंत म्हणजे मोरया by प्रचेतस
अरिहंतची सांगली भेळ खूप छान
In reply to अरिहंत हि बकवास जागा आहे by देवांग
सागर भेळ
In reply to अरिहंतची सांगली भेळ खूप छान by प्रचेतस
तिथेचं बाजूला सावंतच्या गॅरेज
In reply to सागर भेळ by देवांग
हायला. जाउयात.
In reply to तिथेचं बाजूला सावंतच्या गॅरेज by गणामास्तर
जाऊ कि. मी कालचं आणल्या
In reply to हायला. जाउयात. by प्रचेतस
भारीच.
In reply to जाऊ कि. मी कालचं आणल्या by गणामास्तर
तिथेचं बाजूला सावंतच्या गॅरेज
In reply to सागर भेळ by देवांग
सांगवीत हाॅटेल जलसा
वरील सर्व ठिकाणी मिपाकट्टा
गोमंतक
मुनिवर, अन्नपूर्णा हॉटेल च्या
In reply to गोमंतक by कपिलमुनी
मालवण समुद्रने आता
In reply to मुनिवर, अन्नपूर्णा हॉटेल च्या by गणामास्तर
+१
In reply to मालवण समुद्रने आता by विनटूविन
व्हेज थाळी ?
रामदेव थाळ -निगडी चौक
In reply to व्हेज थाळी ? by कपिलमुनी
मयूर महाग आहे, पण
In reply to रामदेव थाळ -निगडी चौक by प्रचेतस
साधी
In reply to मयूर महाग आहे, पण by रुपी
या कुणालाही
In reply to रामदेव थाळ -निगडी चौक by प्रचेतस
अरे वा आमची जन्मभूमी
अरे एक ओळ राह्यली.
In reply to अरे वा आमची जन्मभूमी by लालगरूड
खिक्क
In reply to अरे एक ओळ राह्यली. by अभ्या..
हिंदुस्तान बेकरीच पॅटीस?
संपले, उद्या या. ;)
In reply to हिंदुस्तान बेकरीच पॅटीस? by रातराणी
=))
In reply to संपले, उद्या या. ;) by अभ्या..
=))
In reply to =)) by गणामास्तर
संपले, उद्या या. ;)
In reply to संपले, उद्या या. ;) by अभ्या..
हा उल्लेख करायचा राहिला.
In reply to हिंदुस्तान बेकरीच पॅटीस? by रातराणी
आधीचे गरमागरम खुसखुशीत, चविष्ट
In reply to हिंदुस्तान बेकरीच पॅटीस? by रातराणी
पिंचीकरांसाठी
In reply to आधीचे गरमागरम खुसखुशीत, चविष्ट by विनटूविन
वाखुसाआ.
एक नंबर उपयोगी धागा. मटन,
अजून काही
१०.
In reply to अजून काही by चाणक्य
बाबा रामदेव ढाबा:-
In reply to अजून काही by चाणक्य
नै हो
In reply to बाबा रामदेव ढाबा:- by महासंग्राम
रामदेव पेक्षा फक्कड डाल बाटी
In reply to नै हो by अनिरुद्ध.वैद्य
वाकड मध्ये कुठे?
In reply to रामदेव पेक्षा फक्कड डाल बाटी by महासंग्राम
सहमत.. प्रचंड निराशा झाली..
In reply to बाबा रामदेव ढाबा:- by महासंग्राम
९. तुम्हाला बहुतेक जगुबाई
In reply to अजून काही by चाणक्य
हो हो
In reply to ९. तुम्हाला बहुतेक जगुबाई by संपत
नुसतं मांसाहाराचंच बोलणार काय ?
mastach...
म्याप टाकाना लवकर नाहितर मलाच
कामिनी हॉटेल चुकून राहिलं का?
ते
In reply to कामिनी हॉटेल चुकून राहिलं का? by सतिश गावडे
मस्त
थंडा मामला , सोमाटणे फाटा
थंडा मामला मध्ये सब्जी लसुनी
In reply to थंडा मामला , सोमाटणे फाटा by इल्यूमिनाटस
थंडा मामला लै भारी आहे. तिथलं
In reply to थंडा मामला मध्ये सब्जी लसुनी by कैलासवासी सोन्याबापु
आम्ही तिथे फक्त भजीच खातो!
In reply to थंडा मामला लै भारी आहे. तिथलं by प्रचेतस
अजून काही वेगळी ठिकाणं.
पिंपरी कॅम्पतील वरलमल
In reply to अजून काही वेगळी ठिकाणं. by प्रचेतस
नाही.
In reply to पिंपरी कॅम्पतील वरलमल by संत घोडेकर
पिंपरी कॅम्पतील वरलमल
In reply to अजून काही वेगळी ठिकाणं. by प्रचेतस