Skip to main content

सेपेन (तिबेटियन तिखट चटणी)

लेखक केडी यांनी शनिवार, 27/08/2016 04:26 या दिवशी प्रकाशित केले.
Sepen साहित्य ८ ते १० सुक्या लाल मिरच्या १ मोठा कांदा, उभा चिरून ६ ते ८ लसणाच्या पाकळ्या २ माध्यम आकाराचे टोमॅटो, चिरून १ मोठा चमचा तेल १ मोठा चमचा व्हिनेगर १ मोठा चमचा सोया सॉस १ चमचा काळीमिरी पावडर १ चिमूट साखर मीठ, चवीनुसार कृती लाल मिरच्या २ ते 3 तास गरम पाण्यात भिजत घाला. बाहेर काढून, तुकडे करून, पाणी निथळून मग व्हिनेगर मध्ये अजून २ तास भिजत ठेवा पॅन मध्ये तेल गरम करून त्यात लसणाच्या पाकळ्या घाला. थोडा वेळ परतून मग त्यात उभा चिरलेला कांदा घाला. कांदा थोडा वेळ परतून झाला की मग त्यात चिरलेले टोमॅटो घालून मिश्रण परता. गॅस बारीक करून पॅन वर झाकण ठेवून टोमॅटो आणि कांदा मऊ शिजवून घ्या. Step1 Step2 भिजवलेल्या सुक्या मिरच्या, व्हिनेगर, सोया सॉस, काळीमिरी पावडर घालून मिश्रण एकजीव करा. चवीनुसार मीठ घालून गॅस बंद करा. एक चिमूट साखर घालून मिश्रण गार होऊ द्या. Step3 Step4 गार झालेले मिश्रण मिक्सर मधून बारीक करून घ्या. Step5 सेपेन चटणी स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीत भरून गरम गरम मोमोज सोबत खायला घ्या!

वाचने 11241
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

In reply to by पिलीयन रायडर

अर्थात कुठल्या मिरच्या घेताय त्यावर अवलंबून आहे. हि खास मोमोज बरोबर खायला देतात, त्यामुळे थोडी तिखट असते (मोमोज ची चव थोडी ब्लाँड (subtle) असते म्हणून.

In reply to by सामान्य वाचक

फ्रिज बाहेर टिकेल. पण दिलेल्या मापात केलेली चटणी मोमोज सोबत फार उरणार नाही :-)

केडी सर, सेपेनची अस्सल पहाडी तिबेटीयन चव हवी असल्यास तेल तिळाचे वापरावे असे सुचवतो मी,स्मोकिंग पर्यंत गरम करून (तिळाचे तेल) मग इतर कृती केली की अजून बहारदार खमंग अन जबरी तिखट सेपेन तयार व्हावी :)

खरच तोंपासु. करून बघायला हरकत नाही. बाबा पंखेश्वर

कांदा घातलाय. लगेच संपवायला लागणार ना ही? बाकी मोमोजबरोबर असली झणझणीत चटणी, रिपरिप पाऊस आणि मस्त रहस्यकथेचं पुस्तक पाहिजे. - उमर - ए - आझम.

( चटणीची कृती आपल्या वेब साईट वरून घेऊन ) गेल्याच आठवड्यात केले. ऑफिस मध्ये सर्वांना ( आणि अर्थातच मलाही) खूपच आवडले. स्टफींगचे फोटो काढले पण नंतर काढायची विसरले. मी स्टफींगमध्ये बारीक चिरून फरसबी आणि फ्लॉवरही घातला होता. :)

केदार सर, सदर रेसिपी मला, शेजवान सॉस ची जुळी बहीण वाटते. अवांतर, तुमचे मिपा नाम परत केदार दीक्षित करा, के डी, म्हटल्यावर खडकी-दापोडी डोळ्यापुढे येतं