लेखककेडीयांनी शनिवार, 27/08/2016 04:26 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य
८ ते १० सुक्या लाल मिरच्या
१ मोठा कांदा, उभा चिरून
६ ते ८ लसणाच्या पाकळ्या
२ माध्यम आकाराचे टोमॅटो, चिरून
१ मोठा चमचा तेल
१ मोठा चमचा व्हिनेगर
१ मोठा चमचा सोया सॉस
१ चमचा काळीमिरी पावडर
१ चिमूट साखर
मीठ, चवीनुसार
कृती
लाल मिरच्या २ ते 3 तास गरम पाण्यात भिजत घाला. बाहेर काढून, तुकडे करून, पाणी निथळून मग व्हिनेगर मध्ये अजून २ तास भिजत ठेवा
पॅन मध्ये तेल गरम करून त्यात लसणाच्या पाकळ्या घाला. थोडा वेळ परतून मग त्यात उभा चिरलेला कांदा घाला. कांदा थोडा वेळ परतून झाला की मग त्यात चिरलेले टोमॅटो घालून मिश्रण परता. गॅस बारीक करून पॅन वर झाकण ठेवून टोमॅटो आणि कांदा मऊ शिजवून घ्या.
भिजवलेल्या सुक्या मिरच्या, व्हिनेगर, सोया सॉस, काळीमिरी पावडर घालून मिश्रण एकजीव करा. चवीनुसार मीठ घालून गॅस बंद करा. एक चिमूट साखर घालून मिश्रण गार होऊ द्या.
गार झालेले मिश्रण मिक्सर मधून बारीक करून घ्या.
सेपेन चटणी स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीत भरून गरम गरम मोमोज सोबत खायला घ्या!
अर्थात कुठल्या मिरच्या घेताय त्यावर अवलंबून आहे. हि खास मोमोज बरोबर खायला देतात, त्यामुळे थोडी तिखट असते (मोमोज ची चव थोडी ब्लाँड (subtle) असते म्हणून.
केडी सर,
सेपेनची अस्सल पहाडी तिबेटीयन चव हवी असल्यास तेल तिळाचे वापरावे असे सुचवतो मी,स्मोकिंग पर्यंत गरम करून (तिळाचे तेल) मग इतर कृती केली की अजून बहारदार खमंग अन जबरी तिखट सेपेन तयार व्हावी :)
( चटणीची कृती आपल्या वेब साईट वरून घेऊन ) गेल्याच आठवड्यात केले. ऑफिस मध्ये सर्वांना ( आणि अर्थातच मलाही) खूपच आवडले.
स्टफींगचे फोटो काढले पण नंतर काढायची विसरले. मी स्टफींगमध्ये बारीक चिरून फरसबी आणि फ्लॉवरही घातला होता. :)
प्रतिक्रिया
अहाहाहाहाहा!!!
हो ....
In reply to अहाहाहाहाहा!!! by पिलीयन रायडर
:)
फ्रिज बाहेर
साधारण एक आठवडा
In reply to फ्रिज बाहेर by सामान्य वाचक
केडी सर,
तिळाच्या तेलात सगळं
In reply to केडी सर, by कैलासवासी सोन्याबापु
तोंपासु!
1+
भारी!! तिखट कितपत झेपेल याचा
मस्तं!
मस्तच!
केडीभौ
मोमोज आणि चटणी
वाह!
In reply to मोमोज आणि चटणी by इन्दुसुता
छान
छान रेसिपी
Rx,
In reply to छान रेसिपी by पगला गजोधर
वोक्के सार....
In reply to Rx, by कैलासवासी सोन्याबापु
धन्यवाद.लय भारी.
तेल कुठचं वापरायचं?