Skip to main content

सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग ५

लेखक तर्राट जोकर यांनी रविवार, 08/05/2016 23:05 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या मालिकेचा चौथा भाग दोनशे प्रतिसाद पार करुन गेल्याने पाचवा भाग. माझा प्रश्नः एखाद्या लेखमालेचे आंतरजालासाठी लेखन करतांना किती शब्दमर्यादा असावी जेणेकरुन ती कंटाळवाणी वाटणार नाही, किंवा 'अरे हे काय संपला पण हा भाग' असे वाटणार नाही? तसेच दोन भागांमधे अंदाजे किती काळाचे अंतर असावे? शब्दमर्यादेचा प्रश्न ह्यासाठी की पीसी-मोबाईलवर वाचतांना अनेक व्यवधाने, व्यत्यय येतात. सलग खूप वेळ मिळणे शक्य नसते. किमान पंधरा मिनिटांत वाचून होईल इतपत भाग असावा असे माझे वैयक्तिक मत. बाकी लेखक-वाचकांच्या अनुभवसिद्ध उत्तरांच्या प्रतिक्षेत.

वाचने 108227
प्रतिक्रिया 265

प्रतिक्रिया

double door refrigerator घ्यायचा आहे साधारण २५००० पर्यंत.... कुठला घ्यावा?

In reply to by सिरुसेरि

Samsung चे मॉडेल सुध्दा चांगले आहेत. वीज खर्च कमी येतो.

एलजी चे मॉडेल सांगू शकाल का? अजुन काय ऑप्शन आहेत?

वडगाव कांदळी, ता, जुन्नर जिल्हा पुणे येथे एक मजेदार घटना रोज घडते. दोन वेळेला याचा साक्षीदार मीच होतो. ह्यावेळेला रेकॉर्ड केले. जेव्हा मशीदीतून अजान सुरु होते तेव्हा गावातली कुत्री भेसूर आवाजात साथ द्यायला सुरुवात करतात... =)) https://soundcloud.com/sandeep-daange/dogs-barking-while-ajaan

कुत्रे मागच्या जन्मात मुमा असतील. २०% डिस्काउंट कशावर आहे? =))))

तुम्ही कुठल्याही कथा कादंबरीत विशेषतः लेखात वगैरे असा उल्लेख ऐकलेला आहे का ? १- एका गावात एक गरीब शुद्र/वैश्य/क्षत्रिय राहत होता. २- एका गावात एक विद्वान शुद्र्/वैश्य्/क्षत्रिय राहत होता. ३- रत्नागिरीत कोल्हापुरात त्याकाळी एक शुद्र्/वैश्य्/क्षत्रिय कुटुंब राहत असे. ४- त्याकाळी तिथे शुद्र/वैश्य्/क्षत्रियांची चारच घरे संपुर्ण गावात होती.

एक्सटर्नल हार्ड डिस्क क्रॅश झाली आहे. घरच्या घरी डेटा एक्सट्रॅक्ट करायचा आहे. मुख्य म्हणजे फोटो आणि चांगले जमा केलेले हिंदी आणि इंग्लीश पिक्चर! बेसिक पासून माहिती हवी आहे. मला कंप्यूटरविषयी टेक्निकल माहिती अजिबात नाही.

In reply to by सन्जय गन्धे

हार्ड डिस्क ची अनेकदा केस आणि सर्किट जाते आणि आतली हार्ड डिस्क ठीक असते हार्ड डिस्क चे केसिंग विकत मिळते त्यात ती घालून बघा कधी काडी जुने केसिंग चाकू ने खोळावे लागते किंवा तोडावे लागते . कोठल्या प्रकारची हि हार्ड डिस्क आहे SATA कि PATA ( जुन्या प्रकारची) 2.5 इंच ( छोटी लॅपटॉप ची ) कि 3.5 इंच ( ( डेस्कटॉप ची )

गेट डेटा बॅक , स्टेलार फीनीक्स, आय डेटा केअयर, इजअस तस्सम डेटा रीकोवरी अअ‍ॅप्स डेटा परत मिळवुन देतिल. अधीक डीटेल्लः युसबी हार्ड डिस्क उघडुन तीच्या साटा इन्टर्फेस ला केबल ने मदर्बोड ला कन्नेक्ट करा. वींडोज एक्सप्लोरर मध्ये जाउन काही दीसते का बघा, नाही दीसल्यास. रन मध्ये compmgmt.msc टाइप करुन एंटर करा. एक वींडो ओपेन होइल त्यात disk management शोधा. त्यात physical volume दीसतील. त्यात तुमची क्रॅश झालेलि हार्ड डिस्क दीसते का बघा. दीसत असेल तर वरिल पैकि कोणतेही एक अ‍ॅप डाउन लोड करुन रन करा. दिसत नसल्यास मात्र डीस्क क्लोन करुन r & D करा. फोटो होतील पण मुवी चि खात्री नाही. आणी मुवी झाल्या तरी दोन मुवीच्या फ्रेम एक मेकांत मिक्स होतील. (हे फार भयंकर, आधीच्या जुन्या मुवीज च्या फ्रेम पण दीसतात मधेच) मराठी पटापट टाइप करता येत नसल्याने इथेच थांबतो.

चिंचवडमधील माझ्या फ्लॅटमध्ये FM Radio अनेक मोबाईल / निटसा चालत नाही. माझ्याकडे एक म्युजिक सिस्टीम होती तीवर नीट चालत नव्हता, काही मोबाईल्सवर पण नीट चालत नाही. पण एका पाहूण्यांच्या samsung मोबाईल वर बर्‍यापैकी चालला, एका sansui मोबाईल वर पण बरा चालला. तरी सर्वात उत्तम प्रकारे कोणत्या मोबाईल वर चालेल असा स्वस्तातला मोबाईल घ्यायचा आहे (फक्त FM Radio साठी ..मोबाईलचा स्पीकर फार उत्तम नसला तरी चालेल कारण मी मोबाईल म्युजिक सिस्टीमला जोडणार आहे) किंवा दुसरा पर्याय म्हणजे नुसता रेडिओ..पण नुसत्या रेडिओचीसुधा खात्री हवी की नीट वाजेल.. मोबाईल गाजराची पुंगी असेल अगदीच worst case fm नीट चालले नाहि तरी मोबाईल घरात कुणाला वापरायला देता येईल (ज्यांना स्मार्ट फोन नकोय अशा कुणाला) samsung, nokia, sansui अशा पर्यांयाचा विचार करतो आहे

In reply to by मराठी कथालेखक

माझ्याकडे आहे सॅमसंग हिरो. चालतो बऱ्यापैकी रेडू त्याच्यावर (चिंचवड मध्येच). फक्त जरा मोबाईल उंचीवर ठेवावा लागतो. हे मॉडेल बंद झाले असेल पण आता. तरी सॅमसंग लाच द्या प्राधान्य

In reply to by इल्यूमिनाटस

अहो पण त्याचा FM कसा वाजतो...सिग्नल्स नीट पकडतो का याबद्दल माहिती हवीये. अ‍ॅमेझॉन वर विकत मिळतो हे तर माहीत आहे हो ;)

In reply to by इल्यूमिनाटस

धन्यवाद. पण मी मोबाईल ४.१ म्युजिक सिस्टीमला जोडेन त्यामुळे मोबाइलच्या स्पीकरचे जास्त महत्व नाहि, तरि बहूधा याच मॉडेलचा विचार करेन.

In reply to by मराठी कथालेखक

तुम्ही रेडियो साठी antenna चा विचार केला का. आम्ही कॉलेज ला असताना टेरेस वरून एक वायर घेऊन रेडियो च्या antenna ल जोडायचो. तुम्ही DTH च्या डिश ला वायर जोडून त्याच्याच केबल बरोबर खाली आणा. असा काहितरी जुगाड बघा नवीन मोबाईल घेण्यापेक्षा.

In reply to by शलभ

आधीच्या म्युजिक सिस्टिमला १०० रु चा एक अँटेना बसवून पाहिला होता, पण फारसा उपयोग झाला नाही.

In reply to by मराठी कथालेखक

गाना च्या अ‍ॅप वर ऑनलाईन रेडिओ ऐकता येईल. आकाशवाणी ऐकायचं असेल तर बर्‍याच DTH वर दिल्ली प्रसारण उपलब्ध आहे. (Dish TV चं channel no 2400 or 2401.) .

In reply to by सानझरी

धन्यवाद. gaanaa बघतो. माझ्याकडे Airtel dth आहे , त्यात FM channels नाहीत. शिवाय मला स्थानिक म्हणजे पुण्यातली प्रसारणे (विशेषतः मिर्ची आणि रेड ) ऐकण्यात रस आहे.

In reply to by अभ्या..

हो. ते पण. ते ही ऐकतो. तेच म्हणायचय की स्थानिक प्रसारण ऐकायचेत. सकाळी सकाळी रेडिओ ऐकायला बर वाटतं

In reply to by मराठी कथालेखक

१)मोबाइलातला रेडिओसाठी सॅमसंग गुरू आहेच,रेकॅार्डींगही होते m4a (mp4)format मध्ये. पण स्क्रीन 128x196 - 1.8inch फार ताण देते. २)इंटर्नल एंटेनावाले मोबाइल आता येत नाहीत,हेडफोन वायर लावावी लागतेच. ३)स्पाइसचे मोबाइलात एक एंटेना असायची. ४)माझ्याकडे ट्रान्झिस्टरला १०वाटचा फिलिप्स स्पिकर जोडलेला आहे.दणाणा वाजतो.दोन सेल दोन महिने पुरतात. ५)इंटरनेट रेडिओ म्हणजे तासाला साठ एमबी डेटा उडतो,चारपाच जिबी डेटा महिन्याला लागेल. ६) माझ्याकडे कार्बनचा बटणवाला मोबाइल दोनवर्षांपुर्वी घेतलाय.१८०० एमेच ब्याटरी पाच दिवस जाते.१६०० रु K20+, एफेम रेकॅार्डींग wavमध्ये/amr होते. ७) एफेम रेकॅार्डींगवालाच घ्या. ८) म्यु सिस्टमला मोबाइल कसा जोडणार?ते कळलं नाही

In reply to by कंजूस

धन्यवाद मोबाईलला ३.५ mm output असते, त्याच्याने तो music system ला जोडू शकतो, bluetooth चा ही पर्याय आहेच. internal antenna च हवी अस काही नाही, मला फक्त fm नीट ऐकायला मिळावे इतकीच इच्छा आहे internet वर पुण्यातले live प्रक्षेपण सापडले नाहित. gaana.com वर पण नाही. (इकडे साधा रेडिओ लावला आणि तिकडे internet रेडिओ वर तोच स्टेशन वाजवला तर एकच कार्यक्रम ऐकाय्ला मिळावा, पण असं कुठे सापडलं नाही. बाकी broadband असल्याने data usage बद्दल काहि अडचण नाही.

In reply to by मराठी कथालेखक

वाइरलेस एँटेनावाले फोन I ball कंपनीचे बाजारात आले आहेत १५००च्या आसपास किंमत आहे.रेकॅार्डींगही आहे.चारपाच हँडसेटस पैकी दोघांत कॅाल रेकॅार्डींगही आहे.अशा रेडियोत चार्जरची /हेडफोनची वायर लावलेली असल्यास रेडियो जोरदार वाजतो असा अनुभव आहे. Iball feature phones Neon, skipper,leader,biggy,tarang.

In reply to by मराठी कथालेखक

एफेम रेडीओसाठी मी पाह्यलेला सर्वोत्तम फोन. नोकीया एक्स२-०२. साधा बेसिक फोन आहे ड्युएल सिमचा. आवाज एकदम पत्थरफोड आहे. वजन कमीय, कव्हरेज चांगले पकडतो, बॅटरी लाईफ जबरा. विदाउट वायर एफेम वाजतो. अगदी क्लीअर. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्याला एफेम ट्रान्समीटर पण आहे. त्याच्यावर बरेच प्रयोग केले पण ते काय असते अजून कळले नाही. बहुधा आपण स्वतंत्र एफेम चालवू शकू असे माझ्या भाबड्या मनाला वाटलेले. :(

In reply to by अभ्या..

खरंय त्यावेळी २०११ मध्ये तीन फोन आलेले X2 00/01/02 परंतू स्पेसि वाचल्यावर कळलं की नोकियाने प्रत्येकात काही विशेष दिलंय तर ते दुसय्रातून गाळलंय. 00 - 5 mp camera,flash,wireless fm. 01 - full big keypad पण कॅम्रा 2 mp,128video 02 - wireless fm. radio trans, fm recording,पण कॅम्रा 2 mp,128video मी 00 घेतला आणि अजून अफलातून फोटो देतो.

In reply to by मराठी कथालेखक

विंडोज मोबाईलसाठी 'ऑल इंडिया रेडिओ' (AIR) म्हणून एक अँप आहे. त्यावर विविध भारती, आकाशवाणी मराठी ह्या वाहिन्यादेखील आहेत. अँड्रॉइड साठी देखील असेच एखादे अँप असावे.

स्वप्नरेखा नावाचे एक पुस्तक याचे काही भाग आहेत. हे पुस्तक काही वर्षांपूर्वी एका लायब्ररीतून आणून वाचले होते. ह्यात प्रमुख पात्र त्रिशला नावाची छोटी मुलगी आहे. सध्या हे पुस्तक कुठे मिळेल??

नाही.स्त्री लेखिका आहेत. पूर्ण पुस्तक या त्रिशला वर आधारित आहे. छोटी साधारण २-५ वयापर्यंतचा कालखंड आहे.

आवर्जुन दखल घ्यावे असे मधूर गाणे ..पण 9x झकास पलीकडे फारसे पोहोचले असे वाटत नाही. म्हणून इथे देत आहे. रसिकांनी आनंद घ्यावा,

उद्या व परवा नवी मुंबई-भंडारदरा-अमृतेश्वर मंदिर- रंधा दबदबा-शिवनेरी किल्ला- भीमाशंकर- नवी मुंबई अशी बुलेट राईड करायचे योजले आहे. 1) ओन द व्हे आणि भंडारदरा च्या आजूबाजूला बगण्यासारखी ठिकाणे कोणती? 2)भंडारदरा ते भीमाशंकर रोड कसा आहे? या रोड वर निवासाची सोय कुठे होईल? एकटा आसल्यामुळे कुठेही निवास करू शकतो. कृपया मदत करा...

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

११०० पाह्यला बाप्पू आज, ८०० रु. ला आहे शॉपक्ल्युजला. म्युझिक एक्स्प्रेस सिरिजमधला पण एक दिसला. त्याच्यासाठी आधी लै मरमर केलेली. आता बघू पण वाटेना. ३३१० चा हातोडा काय दिसला नाही.

परवा तळ्यात पोहायला उतरलेल्या व्यक्तीचा पाण्यात सोडलेल्या इलेक्ट्रिक मोटार मुळे पाण्यात सप्लाय येऊन शॉक लागून मृत्यू झाला अशी बातमी वाचनात आली. त्यावरून मनात असा प्रश्न आला कि तळ्याच्या पाण्यात हा इलेक्ट्रिक शॉक लागण्याचे क्षेत्र केवढे असेल. आणि ते कशावर अवलंबून असेल. कारण त्या तळ्यातील पाण्याला जे जे स्पर्श करतील त्याना शॉक लागायला हवा पण तसे होत नाही कृपया जाणकारांनी खुलासा करावा

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

डॉण्गल नाही, वायफाय हॉट्स्पॉट आहे. जियोडॉटकॉम ला विजिट करा.

दात किडलाय पुण्यात कोणता डेंटिस्ट्स आहे जो रूट कॅनॉल ना सांगता व्यवस्थित सल्ला देईल ?

In reply to by वाल्मिक

डॉ. जोशी, झांबरे पॅलेस, चव्हाण नगर, सातारा रोड माझी दाढ किडुन पूर्ण पोकळ झाली होती, सिरॅमिकने भरुन दिली त्यांनी. २ वर्ष झालेत, नंतर कधिच काही प्रॉब्लेम नाही आला. हवा असेल तर त्यांचा मोबाईल नंबर व्यनि करते.

मागे ह्या बद्दल एका धाग्यात उल्लेख झाला होता पण मला सापडत नाहीये. तर कोणी ऑनलाईन पद्धतीने फर्निचर मागवले आहे का ?कितपत विश्वासार्ह आहे ? pepperfry बद्दल काय मत आहे? कोणी विकत घेतले असल्यास कळवावे , तसेच खर्च कितपत असतो, हिडन चार्जेस असतात का काही, गॅरंटी बद्दल कसे काय असते? रिटर्न पोलिसी वगैरे. हे पण सांगितल्यास बरे होईल. तसेच खराब लाकूड (वाळवी अथवा बोअरर लागलेले) असे फर्निचर नाही हे कसे बघावे? जेवढी शक्य होईल तेवढी माहिती द्यावी हि विनंती.धन्यवाद. -तेजस आठवले.

In reply to by अभिदेश

पेपरफ्रायचे अनुभव मीच लिहिलेले आधीच्या धाग्यात. चांगला होता अनुभव. स्वस्त मिळाला बेड, मार्केट पेक्षा. मटेरिअल अत्युत्तम आहे. इथले डिलर त्याला नाके मुद्दामुन मुरडतात. मिस्त्रीने चेक करुन सांगितले. त्याचे बोर्ड पार्टिकल असले तरी डेन्सिटी उत्तम आहे. मज्बूत काम आहे. अगदी प्युर वूडचा बेड सद्य काळात परवडणार नाही, मेन्टेनन्स जमत पण नाही. पेपरफ्रायन्ने फ्री डिलिव्हरी दिली. फेस्टिइव्ह ऑफर असतात. पुण्यात तर घरी येऊन फिट करुन देतात. अर्बन लॅडर पण चेक करायला हरकत नाही. मला एकदम भारी ऑफिस चेअर्स १७०० ला एक अशा मिळाल्या. फ्री डिलिव्हरी. (इथे मार्केटात त्या ३००० च्या खाली नव्हत्या) . (टीपः माझा पेपरफ्रायशी झैरात संदर्भात कोणताही करार नाही अथवा ही जाहिरात ऑर पेड रिव्ह्यु नाही)

In reply to by अभ्या..

धन्यवाद श्री अभ्या जी, जर ती लिंक देऊ शकत असाल तर बरे पडेल, एकदा नजरेखालून घालतो. व्यनि मधून कळवलीत तरी चालेल. धन्यवाद. -तेजस आठवले.

In reply to by तेजस आठवले

पेपरफ्रायचा अनुभव चांगला आहे. फक्त वेळ लागतो. अगदी त्याच आठवड्यात मिळत नाही.

बरेच स्वस्त आणि स्टाइलिश फर्निचर भुस्सा बोर्ड पासून बनवतात शिवाय त्यात सांधा नसतो.दुकानाचे इंटिअरिअर जे वाटरप्रुफ प्लाइचे सांधे मारून सन माइका लावून करतात त्या कामाशी या स्वस्त फर्निचरची तुलना होऊ शकत नाही.

In reply to by कंजूस

सहमत आहे काका, स्वस्त फर्निचर खर्‍या लाकडापासून बनवलेल्या फर्निचरच्या एक तृतीयांश किंमतीत मिळते पण आयुष्य अगदी काही महिन्यांचे असू शकते. तसेच आजकाल पार्टिकल बोर्ड हे इतके प्रगत झाले आहेत की सहजासहजी फरक लक्षात येत नाही.

मिपावर कालपासून नवीन लेख प्रकाशित करायचा प्रयत्न करतोय. पण "this website has encountered a problem " अशी error येत आहे. कृपया मदत करावी.