Skip to main content

सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग ५

लेखक तर्राट जोकर यांनी रविवार, 08/05/2016 23:05 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या मालिकेचा चौथा भाग दोनशे प्रतिसाद पार करुन गेल्याने पाचवा भाग. माझा प्रश्नः एखाद्या लेखमालेचे आंतरजालासाठी लेखन करतांना किती शब्दमर्यादा असावी जेणेकरुन ती कंटाळवाणी वाटणार नाही, किंवा 'अरे हे काय संपला पण हा भाग' असे वाटणार नाही? तसेच दोन भागांमधे अंदाजे किती काळाचे अंतर असावे? शब्दमर्यादेचा प्रश्न ह्यासाठी की पीसी-मोबाईलवर वाचतांना अनेक व्यवधाने, व्यत्यय येतात. सलग खूप वेळ मिळणे शक्य नसते. किमान पंधरा मिनिटांत वाचून होईल इतपत भाग असावा असे माझे वैयक्तिक मत. बाकी लेखक-वाचकांच्या अनुभवसिद्ध उत्तरांच्या प्रतिक्षेत.

वाचने 108227
प्रतिक्रिया 265

प्रतिक्रिया

मिपाकरांनो.. तुमच्या एरियातला गणपती उत्सव काय म्हणतोय. आमच्याइथे हनी सिंगच्या लुंगी डॅन्स नंतर पोलीस सायरनचं म्युझिक लावलंय. अतिशय बिभत्स म्युझिक लागोपाठ सुरू आहे..4 वाजल्यापासून.. आता 5 तास झाले, साधारण अकरा वाजेपर्यंत अजुन सुरू राहील..तुमच्या इथला काय हालहवाल?

In reply to by सानझरी

मुंबई पोलिसांनी दिनांक ६ आणि १० तारखेला रात्री बारा म्हणजे बारा वाजता सर्व ढोल ताशे इ. कानठळ्या बसवणारे प्रकार बंद केले अन आज रात्री दहाच्या ठोकळ्याला सर्व मिरवणुकांचे ढोल ताशे बोंबले( लाऊड स्पीकर) इ बंद केले आहेत. मुंबई पोलिसांचे आभार मानावे तेवढे थोडेच. उद्या जमल्यास मुलुंड पोलीस स्टेशन ला जाऊन तेथल्या पोलिसांना धन्यवाद देणार आहे. एका गणेश मूर्ती बरोबर फक्त चार माणसे आणि दहा ढोल ताशे आणि बोंबले घेऊन हजारो लोकांच्या आरोग्याला धोका देणारे हे प्रकार केंव्हा बंद होतील हे त्या श्री गजाननालाच ठाऊक.

In reply to by सुबोध खरे

दहाला सगळे लाऊड स्पीकर बंद केले हे ऐकून आनंद झाला. आमच्या इथे काल अकरा वाजेपर्यंत सगळं सुरूच होतं.

मला 8 ते 5 या वेळात स्टडी साठी जागा हवी आहे फी असल्यास माफक असावी जागा शांत आणि हवेशीर असावी कृपया माहिती असल्यास सुचवावे

मंडळी , मी गोरेगाव मुम्बई येथे राहतो. ऑक्टोबर च्या शेवटच्या आठवड्यामध्ये सहकुटुंब ३ दिवसांची सहल काढू म्हणतो. बेसिकली , आराम करणे आणि चांगले सामिष (मासळीचे) भोजन करणे असा कार्यक्रम असेल. जवळपास काही टुरिस्ट स्पॉट असेल तर ठीक... किंवा समुद्र किनारा असेल तर उत्तमच. वडिलांचे वय (७५) लक्षात घेता बोरिवली ते डहाणू या मध्ये एखादा रिसॉर्ट शोधत आहे. कारण फार जास्त प्रवास करू इच्छित नाही. एखादा चांगला (फॅमिली साठी) रिसॉर्ट कोणी सुचवू शकेल का? धन्यवाद.

सोनी आय सी रेकॉर्डरमधून महत्वाच्या फाईल्स डिलीट केल्या आहेत चुकून. रिकव्हर करता येतील का?

In reply to by एकुलता एक डॉन

ऑर्डिनन्समार्फत कायद्यात बदल करून काहीही बदल ताबडतोब करता येतात. पण ऑर्डिनन्सचं आयुष्य सहा महिन्याचं असतं, त्यानंतर तो कायद्यात रूपांतरित करावा लागतो. (संसदेत/विधानसभेत चर्चा वगैरे करून, मतदान घेऊन.)

In reply to by आदूबाळ

आबा, सरकार कोणताही कर कधीही कमी करू शकते मात्र वाढवायचा असेल तर मात्र तो बजेट्मध्ये फायनान्स बील मध्येच शक्य असते. हे बरोबर आहे का?

In reply to by पुंबा

कराच्या दरात काही कमीजास्त करायचं असेल तर बजेट / फायनान्स बिलच लागतं असं नाही. राष्ट्रपतींच्या सहीने काढलेला ऑर्डिनन्सही चालतो. (राज्यघटनेच्या दृष्टीने बजेट हे "मनी बिल" असतं. आर्टिकल १२३ प्रमाणे संसद ज्या विषयांवर कायदा करू शकते अशा सर्व विषयांवर ऑर्डिनन्स काढायची पावर राष्ट्रपतींना असते. त्यामुळे मनी बिलही ऑर्डिनन्सच्या स्वरूपात आणता येतं.)
सरकार कोणताही कर कधीही कमी करू शकते
मला असा काही नियम असल्याचं ठाऊक नाही. पण मला नाही वाटत असं असेल. लॉजिकली विचार करता - सरकार बजेटचा प्रस्ताव मांडतं, त्यावर चर्चा होते आणि फा० बिलचा फा० अ‍ॅक्ट होतो. आता, त्यात लिहिलेला रेट मध्येच स्वतःच कमी करणं म्हणजे संसदेचा अवमान करण्यासारखं होईल. (पुन्हा हे राजकीय शस्त्र म्हणूनही वापरता येईल.)

मी स्टॅंडिंग डेस्क विकत विचार करतो आहे. मार्गदर्शन हवे आहे. वापारल्याचा अनूभव असाल्यास पाटदूख़ी मधे काही फरक जनावतो काय?

जर आपल्यापैकि कोणि फॅशन टेक्नोलॉजि / डिझायनिंग चा कोर्स केला असल्यास किंवा माहिति असल्यास ठाणे - डोंबिवलि परिसरात त्यासाठि चांगले कॉलेज किंवा ईन्स्टिट्युट सुचवा. कोर्स केल्यानंतर जॉब च्या संधि कश्या असतिल ? किंवा स्वतः च काहि छोटेखानि युनिट सुरु करता येईल का ? कोणाला काहि अनुभव किंवा माहिति असल्यास कृपया शेअर करा. धन्यवाद

माझ्या हपिसातल्या मुलाला १० हजार स्टेट बँकेच्या सीडीएम ला भरायला सांगितली. बँक टाइम संपला होता. तो भरत असताना नोटा ठेवल्यावर ड्रोवर शटर बंद झाले आणि सर्वर टाइमाऊट झाला. ट्रन्झॅक्शन झालेच नाही. (अकाउंटला जमा झालेच नाही) वॉचमनने एक रिटन कंप्लेंट लिहून घेतली फॉर्मवर. नंबर्/अकाउंट्/डिटेल्स. सकाळी मॅनेजरला बोलले असता त्याने २ दिवस लागतील असे सांगितले. दोन दिवसानी त्याने सांगितले मशीन सर्व्हिसिंग चार दिवसानी आहे. नंतर बँकेच्या सुट्ट्या लागल्या. आता म्हणतोय १५ दिवस लागतील. ह्याला काही नियम, भरपाई, कारवाई असु शकते का? एक कर्मचारी म्हणाला की सीडीएम ही तुम्हाला दिलेली फॅसिलिटी आहे. त्यावर भरपाई मिळत नाही. बँकेने देईल तेंव्हाच मिळतील. कसे करावे?

In reply to by अभ्या..

ब्यांका उपकार केल्यासारखी सेवा का देतात? Cdm ला Atm चा सात दिवस वाला नियम लागू असला पाहिजे असे वाटते,

मिसळपाव सारखी ईंग्रजी लेख वाचण्यासाठी कुठली वेबसाईट चांगली आहे .

In reply to by राघवेंद्र

छानच आहे. पण अलिकडे त्यात एक गंमत अनुभवली. मी परदेशात रहातो, तेथून मी ते वापरायला लागलो. तेव्हा कुठल्याही विषयावर उत्तरे देणारे बहुराष्ट्रीय असत. मध्यंतरी मी भारतात गेलो असतां, तेथून कोराला लॉग- इन केल्यावर त्याच विषयांवरील बहुसंख्य उत्तरे भारतांतील भारतीयांनी दिलेलीच येऊ लागली. मी स्वतः हे काही बदलू शकलो नाही. नंतर मी माझ्या देशात आल्यावर फीड पूर्ववत झाला. आता येथे भारतातील भारतीयांनी दिलेली उत्तरे दिसत नाहीत. आणि मी तसा प्रयत्न करूनही ती माझ्या फीडमधे येत नाहीत.

आठवड्या पूर्वीच्या पावसामुळे आतील भिंत ओली झाली आहे, त्यावर रंग मारायचा आहे, रंगारी भिंत वाळू द्या म्हणतो, भिंत लवकर सुकेल यासाठी काही उपाय आहेत काय?

ऑक्टोबर हीटने वाळेल भिंत. हा प्रयोग करुन बघा. आठवडाभराने ओल नसलेल्या व ओलवाल्या भिंतीचा एक छोटा भाग पॉलिश पेपरने घासून घ्या व त्यावर पत्र्याने वॉल पुट्टी लावा. २४ तासानंतर दोन्ही भिंतींच्या पुट्टीत काहीही फरक दिसत नसेल तर रंगकाम करायला हरकत नाही.

1. टोपली कारवी रायरेश्वर पठारावर फुलली आहे का? 2. तिचा बहर कधीपर्यंत टिकतो साधारण? नोव्हेंबर पर्यंत असू शकेल का 15-20 दिवसात संपेल?

मुंबई डोमेस्टिक एअरपोर्टवर पुणे इथे जाण्यासाठी चार्टर्ड कॅब मिळतात का ? या कॅबची उपलब्धता कशी असते ? भाडे किती घेतात ?

माझ्या अँड्रॉइड फोने वरचे सर्व काँटॅक्टस हे G-mail account वर सेव्ह झाले आहेत, सिम कार्ड वर नाही, त्यामुळे मी सिम कार्ड change करून दुसऱ्या फोन वर टाकले तर सर्व काँटॅक्टस गायब होतात, ते gmail चे सीम कार्ड वर परत कसे आणायचे?

In reply to by साधा मुलगा

कॉन्टॅक्टस>म्यानेज कॉन्टॅक्टस > इंपोर्ट/ एक्सपोर्टस कॉन्टॅक्टस > एक्स्पोर्ट टु सिम कार्ड. आशा प्रकारे तुमी कॉन्टॅक्टस चा बॅकअप मेमरी कार्ड वर पण घेऊ शकता.

एखाद्या अंध व्यक्तीला नेत्रदानाने दृष्टी लाभली असेल तर अशी व्यक्ती मृत्युपश्चात नेत्रदान करु शकते का ? जर उत्तर हो असेल तर असे किती वेळा एखादे नेत्र दान केले जावू शकते ?

In reply to by मराठी कथालेखक

अंदाजाने उत्तर देतेय: शरीरातील प्रत्येक अवयव एक्सपायरी डेट घेऊन येत असणार. त्यामुळे डोळे खराब होणार. परतपरत वापरता येणार नाही. + दुसर्या व्यक्तिचा अवयव सूट होणं हे बऱ्यापैकी अवघड असणार. त्यामुळे नेत्रदान केले तरी त्याचा उपयोग कोणालातरी होईलच अशी खात्री नाही.

In reply to by कंजूस

नेत्रदान हा एक प्रकारे चुकीचा शब्द (मिसनोमर) आहे. नेत्रदानातून मिळालेल्या संपूर्ण डोळ्याचे (आयबॉल) रोपण केले जात नाही, तर केवळ डोळ्यातील समोरच्या पारदर्शक पडद्याचे (स्वच्छमण्डल, कॉर्निया) रोपण केले जाते.  (चित्र जालावरून साभार) अर्थातच, १. कॉर्नियातील दोषामुळे (ती अपारदर्शक असणे/होणे, तिच्या वक्रतेत/गोलाईत खूप दोष असणे/होणे, इ) दृष्टीदोष असल्यास नवीन कॉर्नियाचे रोपण करून फायदा होऊ शकतो. २. डोळ्याच्या इतर भागांच्या... उदा. दृष्टि तन्त्रिका (ऑप्टिक नर्व्ह), नेत्र/दृष्टी-पटल (रेटिना), डोळ्याचे भिंग (लेन्स), इत्यादींच्या... आजारांवर कॉर्नियाचे रोपण हा उपाय होऊ शकत नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बरं पण कार्नियाचे रोपण एकाकडून दूसर्‍याकडे होते.. मग दूसर्‍याकडून तिसर्‍यकडे आणि पुढे असे होवू शकते का

In reply to by हस्तर

अशी आहे. समजा N एवढे विधानसभा सदस्य असतील तर जास्तीत जास्त N-2 एवढे उपमुख्यमंत्री होऊ शकतील.

In reply to by हस्तर

सत्तेत नसलेल्या पक्षाच्या किंवा विरोधी पक्षाच्या किंवा अपक्ष आमदाराला उपमुख्यमंत्रीपपद किंवा फॉर दॅट मॅटर कोणतंही मंत्रीपद देणं घटनाबाह्य नसावं. त्यामुळं आतासुद्धा देवेंद्रफडणवीस अजित पवार, धनंजय मुंडे यांना उपमुख्यमंत्री बनवू शकतात.