✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

रणथंभोर ची राणी

ल
लोनली प्लॅनेट यांनी
Sun, 08/21/2016 - 23:24  ·  लेख
लेख
राजस्थान मधील रणथंभोर राष्ट्रीय उद्यान १९९७ चा जुलै महिना, जंगलातील एका भागात एका वाघिणीने तीन बछड्यांना जन्म दिला, हि अतिशय आनंदाची घटना पाहण्यासाठी भारतीय व्याघ्र तज्ज्ञ डॉ वाल्मिक थापर व आयरिश माहितीपट निर्माता कॉलिन स्टॅफर्ड जॉन्सन हे दोघे गेले होते, त्यांनी पहिले कि तिन्ही बछडे मादी आहेत. काही दिवस त्यांनी बछड्यांचे निरीक्षण केले, तेंव्हा त्यांना दिसले कि एक मादी बछडा इतर दोन बछड्यांपेक्षा जास्त आक्रमक व खेळकर आहे. त्यांनी पहिले कि तिच्या चेहेऱ्यावर एक माशाच्या आकाराचा पट्टा आहे , कॉलिन नि वाल्मिक थापर ना विचारले FISH ला हिंदीतून काय म्हणतात ? ते म्हणाले " मछली " आणि अशा प्रकारे त्या गोड बछड्याला हे सुंदर नाव मिळाले. जगातील प्रत्येक प्राणिप्रेमीला हे नाव माहित आहे. तिचे सांकेतिक नाव होते T-16 1 2 मछली ने रणथंभोर च्या जंगलावर तब्बल दोन दशके राज्य केले. तेथील राजमहालावर किल्ल्यावर तलावावर तिचेच राज्य होते. त्यामुळे तिला "रणथंभोर ची राणी " लेडी ऑफ दि लेक्स" हि नावे सुद्धा मिळाली. तिने एकदा एका १४ फूट लांबीच्या मगरीची दीड तास झुंज देऊन शिकार केली. हि एक ऐतिहासिक घटना आहे, या आधी कोणत्याही वाघाने मगरीची शिकार केलेली कोणीही पाहिलेले नाही. डॉ वाल्मिक थापर यांनी सतत तिच्यावर लक्ष ठेवून तिच्या वास्तव्याचा मागोवा घेतला आहे. 3 मछली दोन वर्षे वयाची व्हायच्या आतच शिकार करू लागली. २००० साली बोंबु राम नावाच्या एक वाघापासून तिने दोन बछड्यांना जन्म दिला. कॉलिन स्टॅफर्ड जॉन्सन नि त्यांना नांवे दिली "Broken Tail" व "Slant Ear" सहसा पहिल्यांदा आई होणाऱ्या वाघिणीचे बछडे जिवंत राहत नाहीत परंतु मछली चे हे दोन्ही बछडे मोठे झाले. यावरून ती किती हुशार होती ते समजेल. यापैकी Broken Tail या तिच्या बछड्यावर कॉलिन स्टॅफर्ड जॉन्सन नी एक अतिशय सुंदर माहितीपट बनवला आहे "Broken Tail - a journey into the last days of a wild tiger" 4 5 मछली ने २००२ साली तीन बछड्यांना जन्म दिला त्यापैकी दोन मोठे झाले "झुमरी व झुमरू" त्यानंतर २००५ साली पुन्हा दोन बछडे " शर्मिली व बहादूर" चा जन्म झाला २००६ साली पुन्हा तीन बछडे त्यापैकी "सुंदरी" हि सुद्धा प्रसिद्ध वाघीण बनली. मछली ने एकूण ११ बछड्यांना जन्म दिला त्यापैकी ९ मोठे झाले. कोणत्याही वाघिणीचे जास्तीत जास्त निम्मेच बछडे जिवंत राहतात. यावरून ती इतर वाघिणीपेक्षा किती हुशार होती हे लक्षात येईल. रणथंभोर उद्यानातील ५०% वाघ आज तिचेच वंशज आहेत. शेजारच्या सारिस्का उद्यानातील वाघिणी हि तिच्याच मुली आहेत. 6 7 शांत स्वभावाच्या मछली ने कायम आपल्या बछड्यांची इतर शिकारी प्राण्यांपासून अतिशय कष्टाने सुरक्षा केली. इतर वाघ तिला घाबरून असत. ती जगातील सर्वात जास्त फोटोग्राफी केलेली वाघीण बनली. तिच्यावर अनेक माहितीपट बनले. नॅशनल जिओग्राफिक ने तिच्यावर "Tiger Queen" हि फिल्म बनवली आहे. यामुळे ती जगातील सर्वात लोकप्रिय वाघीण बनली. प्राणीप्रेमींनी तिचे फेसबुक पान सुरु केले. परदेशातून लोक रणथंभोर मध्ये फक्त तिला पाहण्यासाठी येऊ लागले. ती रणथंभोर ची शान बनली. २०१३ मध्ये भारत सरकारने तिला ऐतिहासिक आणि प्राकृतिक वारसा घोषित करून तिचे टपाल तिकीट काढून तिचा सन्मान केला आहे. तिने गेल्या १० वर्षात रणथंभोर राष्ट्रीय उद्यानाला तब्बल ६५ कोटी चे उत्पन्न मिळवुन दिले. तिने उद्यानातील वाघांच्या संख्येत लक्षणीय भर घातल्यामुळे तिला Life time achivement award ने गौरवण्यात आले आहे. अशा प्रकारे ती सुपरस्टार बनली. टपाल तिकीट 8 परंतु या १८ ऑगस्टला ती एका वेगळ्याच कारणाने प्राणीप्रेमींच्या चर्चेत आली निमित्त होते तिच्या मृत्यूचे. हे अपेक्षित होते पण तरीही दुःखद. मछली १९ वर्षाची झाली होती, वाघांचे सरासरी आयुष्य १४-१५ वर्षाचे असते पण ती १९ वर्षे जगली.राष्ट्रीय उद्यानाचे कर्मचारी व डॉक्टर तिची २ वर्षांपासून काळजी घेत होते. गेल्या ५ दिवसापासून तिने काहीही खाल्ले नव्हते. ती वयाने जगातील सर्वात मोठी वाघीण होती. २० व्या शतकात जन्म झालेली ती एकमेव जिवंत वाघीण होती. तिच्या मृत्यूची जगभरातील माध्यमांनी दखल घेतली बी बी सी, द टेलिग्राफ, न्यू यॉर्क टाइम्स भारतात टाइम्स ऑफ इंडिया, द हिंदू व अनेक. फेसबुक वर प्रतिक्रियांचा वर्षाव झाला. जगभरातील प्राणीप्रेमींनी दुःख व्यक्त केले.तिने वाघांच्या संरक्षणामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावली. रणथंभोर राष्ट्रीय उद्यानामध्ये आता तिची कमतरता जाणवणार आहे. तिच्याबद्दल माहिती असणारा प्रत्येक प्राणीप्रेमी म्हणतो “She Lived a Glorious Life” 9 REST IN PEACE MACHLI
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
11447 वाचन

💬 प्रतिसाद (35)

प्रतिक्रिया

छान लिहिलंय. रणथंभोर ची राणी

पद्मावति
Sun, 08/21/2016 - 23:32 नवीन
छान लिहिलंय. रणथंभोर ची राणी आवडली.
  • Log in or register to post comments

Tiger Queen

लोनली प्लॅनेट
Wed, 08/24/2016 - 11:19 नवीन
नॅशनल जिओग्राफिक च्या Tiger Queen या माहितीपटाच्या लिंक https://www.youtube.com/watch?v=7_gERPEAyFA
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति

मछली चा एक विडिओ

लोनली प्लॅनेट
Wed, 08/24/2016 - 11:20 नवीन
मछली चा एक विडिओ https://www.youtube.com/watch?v=TiGn7jvFJfU
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लोनली प्लॅनेट

मछली रणथंबोर की रानी है |

माम्लेदारचा पन्खा
Sun, 08/21/2016 - 23:42 नवीन
जीवन उसका इक कहानी है | लोगो के दिलों मे ये बस गई है | तस्वीरो में कैसे जच रही है |
  • Log in or register to post comments

वाह वाह...सुंदर लेख...

अमितदादा
Sun, 08/21/2016 - 23:46 नवीन
वाह वाह...सुंदर लेख...
तिच्याबद्दल माहिती असणारा प्रत्येक प्राणीप्रेमी म्हणतो “She Lived a Glorious Life”
Indeed!!!
  • Log in or register to post comments

फोटो दिसत नाय :(

महासंग्राम
Mon, 08/22/2016 - 00:09 नवीन
फोटो दिसत नाय :(
  • Log in or register to post comments

मस्त !

जव्हेरगंज
Mon, 08/22/2016 - 00:15 नवीन
मस्त !
  • Log in or register to post comments

झकास माहिती. फोटोच्या लिंका

मोदक
Mon, 08/22/2016 - 00:44 नवीन
झकास माहिती. फोटोच्या लिंका दुरूस्त करून घ्या..
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर लेख. 'मछली'ला

एस
Mon, 08/22/2016 - 08:25 नवीन
अतिशय सुंदर लेख. 'मछली'ला भावपूर्ण श्रद्धांजली!
  • Log in or register to post comments

मस्त माहिती....

मुक्त विहारि
Mon, 08/22/2016 - 10:14 नवीन
धन्यवाद... फोटो बाबतीत आमचा गणेशा झाला
  • Log in or register to post comments

सुरेख लेख. मछलीचे फोटो बघायला

यशोधरा
Mon, 08/22/2016 - 10:20 नवीन
सुरेख लेख. मछलीचे फोटो बघायला मिळाले असते तर...
  • Log in or register to post comments

फोटो कर्टसी : http:/

महासंग्राम
Mon, 08/22/2016 - 13:58 नवीन
Image removed. Image removed. Image removed. फोटो कर्टसी : http://miscethoughts.blogspot.in/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

फोटो दिसत नाहीत.

किसन शिंदे
Mon, 08/22/2016 - 14:59 नवीन
फोटो दिसत नाहीत.
  • Log in or register to post comments

छान!

कंजूस
Mon, 08/22/2016 - 15:28 नवीन
छान!
  • Log in or register to post comments

सुरेख! धन्यवाद!

असंका
Mon, 08/22/2016 - 15:34 नवीन
सुरेख! धन्यवाद!
  • Log in or register to post comments

फोटू दिसत नाहीयेत

जगप्रवासी
Mon, 08/22/2016 - 16:20 नवीन
फोटू दिसत नाहीयेत
  • Log in or register to post comments

गणेशा

इरसाल
Mon, 08/22/2016 - 16:39 नवीन
गणेशा. अरे हो हा वैयक्तिक प्रतिसाद नाही.
  • Log in or register to post comments

छान लेख

निओ
Mon, 08/22/2016 - 19:32 नवीन
छान लेख.
  • Log in or register to post comments

छान ओळख. या राणीला भेटायला

पिशी अबोली
Mon, 08/22/2016 - 21:22 नवीन
छान ओळख. या राणीला भेटायला हवं होतं असं वाटून गेलं..
  • Log in or register to post comments

वा!

स्वाती दिनेश
Mon, 08/22/2016 - 21:58 नवीन
रणथंबोरची राणी, मछली आवडली. स्वाती
  • Log in or register to post comments

लेख मस्तच. आवडला एकदम

मृत्युन्जय
Tue, 08/23/2016 - 12:39 नवीन
लेख मस्तच. आवडला एकदम
  • Log in or register to post comments

आवडली मच्छली... फोटो अप्रतिम

ज्योति अळवणी
Tue, 08/23/2016 - 20:40 नवीन
आवडली मच्छली... फोटो अप्रतिम
  • Log in or register to post comments

अप्रतिम !!!

सतिश गावडे
Wed, 08/24/2016 - 00:04 नवीन
शेवटचा फोटो पाहून गहीवरुन आले. :(
  • Log in or register to post comments

रणथंभोर ला भेट न देता

लोनली प्लॅनेट
Wed, 08/24/2016 - 11:40 नवीन
रणथंभोर ला भेट न देता आल्यामुळे हळहळ वाटत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

खुप आवड्ली , शेवतचा फोटु

पियुशा
Wed, 08/24/2016 - 11:09 नवीन
खुप आवड्ली , शेवतचा फोटु पहावत नाही :(
  • Log in or register to post comments

मस्त लिहिलय!

शान्तिप्रिय
Wed, 08/24/2016 - 11:28 नवीन
मस्त लिहिलय! शेवटचा फोटो सुन्न करतो!
  • Log in or register to post comments

फोटो दिसले...

मुक्त विहारि
Wed, 08/24/2016 - 11:57 नवीन
सगळे फोटो मस्त...
  • Log in or register to post comments

फोटो दिसताहेत.

एस
Wed, 08/24/2016 - 12:53 नवीन
फोटो दिसताहेत.
  • Log in or register to post comments

सुंदर फोटो..!!

मोदक
Wed, 08/24/2016 - 13:10 नवीन
सुंदर फोटो..!! शेवटचा फोटो सुन्न करतो :(
  • Log in or register to post comments

छान लेख आणि फोटु

इल्यूमिनाटस
Wed, 08/24/2016 - 16:25 नवीन
छान लेख आणि फोटु
  • Log in or register to post comments

छान!

संत घोडेकर
Wed, 08/24/2016 - 16:36 नवीन
छान!
  • Log in or register to post comments

सुरेख लिहिलंय

पैसा
Wed, 08/24/2016 - 16:59 नवीन
वाईट तर वाटलंच. गेल्या वर्षी मछली बरेच दिवस नाहिशी झाली तेव्हा बातमी आली होती. पण त्यानंतर ती परत आली आणि जवळपास एक वर्ष तिने काढले. आपल्याकडे प्राण्यांबद्दल जी अनास्था आहे त्या पार्श्वभूमीवर अजून अशा खूप मछलींचा मागोवा घेतला जावा.
  • Log in or register to post comments

अप्रतिम फोटो!

जव्हेरगंज
Wed, 08/24/2016 - 19:06 नवीन
अप्रतिम फोटो! पहिले दोनतर खल्लास !!!
  • Log in or register to post comments

छान जीवनपट उलगडून दाखवलाय

अभिजीत अवलिया
गुरुवार, 08/25/2016 - 02:58 नवीन
छान जीवनपट उलगडून दाखवलाय मछलीचा.
  • Log in or register to post comments

सुंदर लेखन सुंदर संकल्पना अन

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 08/25/2016 - 09:19 नवीन
सुंदर लेखन सुंदर संकल्पना अन त्याहून राजस सुंदर मछली!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा