Skip to main content

जेवण

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 21/08/2016 07:18 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळी घरी आल्यानंतर हातपाय धुतल्यावर नेहमीप्रमाणे विचारू नकोस की जेवण तयार आहे का.. आज मी जेवण तयार केलं नाही.. आज मूड नाही रे... महाबळेश्वर हून आपण आणलेल्या सा~या स्ट्रा बेरी मी टेबलवरच्या ग्लास बाऊल मध्ये ठेवल्या आहेत.. त्या मूठभर मी तोंडात घेणार आहे.. अन तू तुझ्या ओठांनी त्याचा सारा रस चोखून घ्यायचा आहे.. होय मला माहीत आहे ओठातून सारा रस वक्षावर अन ओटी पोटावर ओघळतोय, पण तो तू ओठांनी हळुवार पणें टिपून घ्यायचा आहेस.. ह्या बेधुंद संध्याकाळी. आज, थोडं वेड्या सारखं वागायचं आहे.. सा~या स्ट्रा बेरी आपण अशाच संपवणार आहोत... संध्याकाळी घरी आल्यानंतर हातपाय धुतल्यावर नेहमीप्रमाणे विचारू नकोस की जेवण तयार आहे का..
लेखनविषय:

वाचने 3604
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

कविता ?????

आयडिया आयडियाने लिहित राहा, अंदाज पाहुन बरं का ! बाकी, काय चाललंय ? पाऊस असा उघडला की जसा पावसाळ्याचा त्याचा काही संबंधच नाही. पाऊस नसला तर कुठून यायच्या स्ट्रॉब-या ? ;) -दिलीप बिरुटे

In reply to by बोका-ए-आझम

बेरी विना स्ट्रॉने आस्वादायच्या असतात असं काहीस्म असेल. अता श्रीराम असते तर त्यांनी दिवे(टे) नक्की लावले असते, असा कयास आहे. वाचक नाखु

In reply to by अत्रुप्त आत्मा

होय गुर्जी, ही "श्रुं गारीक" जिलबी वाचून उगाच "गार्लिक जिलबी" खायला लागली तर जसे होईल तसे तोंड झाले होते आमचे

>>>होय मला माहीत आहे ओठातून सारा रस वक्षावर अन ओटी पोटावर ओघळतोय तुम्ही स्ट्रॉबेऱ्या बघून घेतल्या नाहीयेत. ताज्या अशा चिकचिकित होऊन ठिपकत नाहीत. तुम्ही घेतलेल्या जास्त पिकलेल्या असणार. बाकी आता सिझन नसताना (स्ट्रॉबेरीचा म्हणतोय मी) कसं काय ब्वा???

>>>होय मला माहीत आहे ओठातून सारा रस वक्षावर अन ओटी पोटावर ओघळतोय तुम्ही स्ट्रॉबेऱ्या बघून घेतल्या नाहीयेत. ताज्या अशा चिकचिकित होऊन ठिपकत नाहीत. तुम्ही घेतलेल्या जास्त पिकलेल्या असणार. बाकी आता सिझन नसताना (स्ट्रॉबेरीचा म्हणतोय मी) कसं काय ब्वा???