मुलाचे वडील तो दहावीत असतांना एका अपघातात गेलेले. आई मुंबईत सरकारी खात्यात नोकरीला. एकटीने वाढवले, मुलाला इंजिनीअर केले. एकुलता एक मुलगा प्रेमविवाहासाठी हट्ट धरुन बसला ते आढेवेढे घेत करुन दिले. मुलगी त्याच्याच वर्गातली समवयस्क. दोघांच्याही वयाच्या २४ व्या वर्षी हे लग्न झाले.
लग्नाला आठ वर्ष होऊन गेलीत. अजून गुड न्यूज नाही. मध्यंतरी मुलीला गर्भाशयाचा आजार असल्याचे ऐकिवात आले. हे कुटूंब म्हणजे खरं तर मुलाची आई आपल्या गोष्टी बाहेर येऊ देत नाही, गुप्तता राखते. (त्याचवेळी इतरांच्या फाटक्यात पाय घालायला चवीचवीने पुढाकार घेते) त्यामुळे खरे काय ते काही कळत नव्हते. तसे आमच्या सर्व नातेवाईकांत बर्यापैकी मोकळेपणा, समजूतदारपणा असल्याने "बाप्रे, अजून पाळणा हलला नाही?" वाले कुत्सित टोमणे असे काही नाही. सर्व लोक नैसर्गिक उत्सुक असतात तेवढेच. सुरुवातीला वय कमी असल्याने असेल प्लानिंग म्हणून कोणी लक्ष दिले नाही. नंतर मुलाचे वय कमी असले तरी मुलीचे वय वाढत आहे ह्याने चिंता वाटायला लागली. पाच सहा वर्षे झाल्यानंतर मात्र कुतूहल वाढायला लागले. त्यात आम्हा लोकांत इतर सर्व बाबींबद्दल नियमित मोकळ्या चर्चा होतांना नेमकं ह्या जोडप्याच्या मूल प्रकरणाबद्दल काही विचारावे अशी परिस्थिती नव्हती. काही मदत (वैद्यकिय, सल्लामसलत, निव्वळ मनमोकळं करण्यासाठीही) लागल्यास करावी असे वाटूनही उपयोग नव्हता. कारण ह्याबाबतीत आपण काही विचारले तर त्यांच्या मनाला त्रास होईल म्हणून कोणीही हा विषय त्यांच्याकडे काढत नव्हते.
अचानक आता एवढ्यात कळले की मुलाला 'वडील व्हायची इच्छाच नाही' म्हणून. ह्याबद्दल तो साय्कॅट्रीस्टकडे जातो आहे. आम्हा सर्वांना चांगलाच धक्का बसला. एखाद्याला वडील व्हायची का इच्छा नसावी हे काही कोणास झेपले नाही. त्याला लहान मुले सांभाळणे, ती अवतीभवती असणे, त्यांची जबाबदारी घेणे हे महाभयंकर दबावाचे वाटत आहे. हे काहीतरी अनाकलनीय आहे असे वाटले. थोडं आणखी विचार करता लक्षात आले की ह्याचे मूळ त्याच्या आईच्या वागण्यात आहे का असा प्रश्न आला. स्वतःचा मोठेपणा सिद्ध करण्याच्या नादात, मिरवण्याच्या नादात "मी एकटीने किती खस्ता खावू मुलाला मोठे केले" हे ती सतत प्रसारित करत होती. त्याचा मुलाच्या मनावर भयंकर परिणाम झाला असे वाटते. जेणेकरुन 'मुले वाढवणे' म्हणजे फार कठिण, दुष्कर गोष्ट आहे असे त्याच्या सुप्त मनाने धरुन ठेवले असावे. दुसरी गोष्ट अशी की आईच्या अतिलाडाने, अतिलक्ष देण्याने, आयुष्य परिटघडीचे ठेवल्याने मुलाला आखीवरेखीव आयुष्याची सवय लागली आहे. त्यात त्याला मुलांमुळे येणारा अव्यवस्थितपणा, घडी बिघडण्याची भीती, आपल्या इच्छांना मुरड घालून मुलांची उस्तरवार करायला लागण्याने स्वातंत्र्यावर येणारे बंधन ह्या सगळ्याचा त्याला धसका बसला असावा असे वाटते.
ह्या सर्वात अतिशय केविलवाणी स्थिती झाली आहे ती मुलीची. तिला लहान मुलांची प्रचंड आवड आहे, मातृत्वासाठी ती आसुसलेली आहे. तिच्या आर्थोडॉक्स माहेराकडून काय ऐकून घेत असेल ते तिचे तिलाच माहिती. तिच्याबद्दल प्रचंड वाईट वाटत आहे.
दोघांचेही एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे. पण आयुष्य असा प्रश्न घेऊन उभं राहिल असे कुणालाही स्वप्नात वाटले नसेल.
मिपाकरांसमोर ही घटना मांडायचे कारण की असं काही तुमच्या बघण्यात आले आहे काय, ह्यावर काही उपाय आहेत का, किंवा एकंदर आपलं बहुमोल मत काय आहे? एखाद्याच्या व्यक्तिगत आयुष्यावर मिटक्या मारत ताशेरे ओढणे, उपदेश करणे, हा या धाग्याचा उद्देश नाही. एक महत्त्वाची केसस्टडी म्हणून ह्यावर गंभीर चर्चा घडावी ही इच्छा आहे. धन्यवाद.
वाचने
35179
प्रतिक्रिया
142
मिसळपाव
प्रतिक्रिया
:'(
त्या मुलीनं पुढाकार घेऊन...
भयानक परिणाम होऊ शकतात याचे.
In reply to त्या मुलीनं पुढाकार घेऊन... by वामन देशमुख
खरं सांगायचं तर आधीची पिढी इतकं महाभयानक वर्णन करते
मानसोपचार तज्ञ
ह्यात एवढे बाऊ करण्याजोगे काय आहे ?
फडके साहेब, कोणीही बाऊ करत
In reply to ह्यात एवढे बाऊ करण्याजोगे काय आहे ? by रविकिरण फडके
प्रश्न आहे तो त्या मुलीच्या
In reply to ह्यात एवढे बाऊ करण्याजोगे काय आहे ? by रविकिरण फडके
ज्योतिष/कुंडलीत काय आहे?
ज्योतिष/कुंडलीत काय आहे?
ज्योतिषाने मानसोपचार तज्ञास
In reply to ज्योतिष/कुंडलीत काय आहे? by कंजूस
असंही कनेक्शन असतंय काय हल्ली
In reply to ज्योतिषाने मानसोपचार तज्ञास by तर्राट जोकर
या प्रतिसादासाठी
In reply to असंही कनेक्शन असतंय काय हल्ली by उडन खटोला
लैच लैच टाळ्या
In reply to या प्रतिसादासाठी by सामान्य वाचक
एका अत्यंत जवळच्या जोडप्याने
ही केस वायली ती केस वायली
In reply to एका अत्यंत जवळच्या जोडप्याने by बोका-ए-आझम
जाणीवपूर्वक मूल न होऊ देणं हे
In reply to ही केस वायली ती केस वायली by कैलासवासी सोन्याबापु
तजोंच्या केस मध्ये "परस्पर
In reply to जाणीवपूर्वक मूल न होऊ देणं हे by बोका-ए-आझम
.
In reply to एका अत्यंत जवळच्या जोडप्याने by बोका-ए-आझम
तुमची समस्या येथे
In reply to . by धडपड्या
त जो साहेब
In reply to तुमची समस्या येथे by तर्राट जोकर
धन्यवाद डॉक्टरसाहेब. आपले
In reply to त जो साहेब by सुबोध खरे
धडपड्या साहेब
In reply to . by धडपड्या
८ ते १० लाख खर्च?? बाब्बौ!!
In reply to धडपड्या साहेब by सुबोध खरे
अॅडोप्शन हा पर्यायच नकोय का?
In reply to ८ ते १० लाख खर्च?? बाब्बौ!! by किसन शिंदे
अभ्या सेठ
In reply to अॅडोप्शन हा पर्यायच नकोय का? by अभ्या..
स्वतःच्या रक्ताचे मूल असणे
In reply to अभ्या सेठ by सुबोध खरे
स्वतःच्या रक्ताचे मूल असणे आणि दत्तक घेणे यात भरपूर फरक आहे.डॉक्टरसाहेब.. हे वाक्य काय पटले नाही. माझ्या मित्रमंडळींमध्ये बरेच जण आहेत ज्यांनी पहिले मूल झाल्यानंतर दुसरे मूल दत्तक घेतले किंवा पहिलेच मूल दत्तक घेतले असे. असे करणारे अनेक लोक असतील, माझे मित्र लै भारी; जगावेगळे असे माझे म्हणणे नाही. पण त्या सर्वांचा या एका वाक्यातून अपमान होत आहे.पण त्या सर्वांचा या एका
In reply to स्वतःच्या रक्ताचे मूल असणे by मोदक
धन्यवाद..!!
In reply to पण त्या सर्वांचा या एका by सुबोध खरे
ज्यांना मुलेबाळे होत नाहीत
In reply to स्वतःच्या रक्ताचे मूल असणे by मोदक
सामाजिक कार्य.
In reply to ज्यांना मुलेबाळे होत नाहीत by अप्पा जोगळेकर
ओके. चुकीची उपमा
In reply to सामाजिक कार्य. by प्रभाकर पेठकर
डिअर डॉक,
In reply to अभ्या सेठ by सुबोध खरे
.
In reply to डिअर डॉक, by अभ्या..
.
In reply to धडपड्या साहेब by सुबोध खरे
..
हयाची कुणीतरी शांती करा रे!
In reply to .. by चंपाबाई
ते काय खोटं बोलत आहेत काय,सरळ
In reply to हयाची कुणीतरी शांती करा रे! by उडन खटोला
हाहा
In reply to .. by चंपाबाई
बायकोने दिलेल्या त्रासाचा बदला
In reply to .. by चंपाबाई
चंपाबाई ,सहमत.
In reply to .. by चंपाबाई
जास्त ग्लॕमर 13 बायका
In reply to .. by चंपाबाई
ग्लॅमर
मुलं होऊ न देण्यात काहीही
मलातरी कोठेही त्या व्यक्तीला
In reply to मुलं होऊ न देण्यात काहीही by नगरीनिरंजन
मला वाटलं सायकियाट्रीस्टकडे
In reply to मलातरी कोठेही त्या व्यक्तीला by संदीप डांगे
मनोरुग्ण असणे आणि मानसिक
In reply to मला वाटलं सायकियाट्रीस्टकडे by नगरीनिरंजन
वाढत्या लोकसंख्येमुळे
In reply to मनोरुग्ण असणे आणि मानसिक by सुबोध खरे
....
In reply to वाढत्या लोकसंख्येमुळे by नगरीनिरंजन
मानवजातीबद्दल यत्किंचितही
In reply to .... by चंपाबाई
पण आत्महत्या करणी पाप आहे ना? -गा.पै.
In reply to .... by चंपाबाई
आँ
In reply to पण आत्महत्या करणी पाप आहे ना? -गा.पै. by गामा पैलवान
पुळकेकरांनी खाणेपिणे थांबवावे.
In reply to आँ by चंपाबाई
तेच म्हणतोय
In reply to पुळकेकरांनी खाणेपिणे थांबवावे. by गामा पैलवान
चंपाबाई
In reply to तेच म्हणतोय by चंपाबाई
सहमत
In reply to चंपाबाई by आजानुकर्ण
...
In reply to सहमत by मराठी कथालेखक
चंपाबाई की शोभा डे
In reply to ... by चंपाबाई
खिक्क
In reply to चंपाबाई की शोभा डे by आजानुकर्ण
ते दोन्ही पर्याय आहेत
In reply to खिक्क by मृत्युन्जय
हिशोब मांडा पाहू ....
In reply to तेच म्हणतोय by चंपाबाई
हो.
In reply to हिशोब मांडा पाहू .... by गामा पैलवान
...
In reply to मुलं होऊ न देण्यात काहीही by नगरीनिरंजन
जर नवरा बायको दोघांनी संमतीने
In reply to ... by चंपाबाई
....
In reply to जर नवरा बायको दोघांनी संमतीने by सुबोध खरे
त्या स्त्रीला पर्याय उपलब्ध
In reply to .... by चंपाबाई
अश्या प्रकारच्या व्यक्तिसाठी
ते सगळे सोडा मालक, आम्ही
In reply to अश्या प्रकारच्या व्यक्तिसाठी by पक चिक पक राजा बाबू
शोला और शबनम आधी आला होता बापू!
In reply to ते सगळे सोडा मालक, आम्ही by कैलासवासी सोन्याबापु
अहो हिरो नंबर वन दूल्हेराजा
In reply to शोला और शबनम आधी आला होता बापू! by बोका-ए-आझम