Skip to main content

मला बाबा व्हायचं नाही!

लेखक तर्राट जोकर यांनी शनिवार, 20/08/2016 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
मुलाचे वडील तो दहावीत असतांना एका अपघातात गेलेले. आई मुंबईत सरकारी खात्यात नोकरीला. एकटीने वाढवले, मुलाला इंजिनीअर केले. एकुलता एक मुलगा प्रेमविवाहासाठी हट्ट धरुन बसला ते आढेवेढे घेत करुन दिले. मुलगी त्याच्याच वर्गातली समवयस्क. दोघांच्याही वयाच्या २४ व्या वर्षी हे लग्न झाले. लग्नाला आठ वर्ष होऊन गेलीत. अजून गुड न्यूज नाही. मध्यंतरी मुलीला गर्भाशयाचा आजार असल्याचे ऐकिवात आले. हे कुटूंब म्हणजे खरं तर मुलाची आई आपल्या गोष्टी बाहेर येऊ देत नाही, गुप्तता राखते. (त्याचवेळी इतरांच्या फाटक्यात पाय घालायला चवीचवीने पुढाकार घेते) त्यामुळे खरे काय ते काही कळत नव्हते. तसे आमच्या सर्व नातेवाईकांत बर्‍यापैकी मोकळेपणा, समजूतदारपणा असल्याने "बाप्रे, अजून पाळणा हलला नाही?" वाले कुत्सित टोमणे असे काही नाही. सर्व लोक नैसर्गिक उत्सुक असतात तेवढेच. सुरुवातीला वय कमी असल्याने असेल प्लानिंग म्हणून कोणी लक्ष दिले नाही. नंतर मुलाचे वय कमी असले तरी मुलीचे वय वाढत आहे ह्याने चिंता वाटायला लागली. पाच सहा वर्षे झाल्यानंतर मात्र कुतूहल वाढायला लागले. त्यात आम्हा लोकांत इतर सर्व बाबींबद्दल नियमित मोकळ्या चर्चा होतांना नेमकं ह्या जोडप्याच्या मूल प्रकरणाबद्दल काही विचारावे अशी परिस्थिती नव्हती. काही मदत (वैद्यकिय, सल्लामसलत, निव्वळ मनमोकळं करण्यासाठीही) लागल्यास करावी असे वाटूनही उपयोग नव्हता. कारण ह्याबाबतीत आपण काही विचारले तर त्यांच्या मनाला त्रास होईल म्हणून कोणीही हा विषय त्यांच्याकडे काढत नव्हते. अचानक आता एवढ्यात कळले की मुलाला 'वडील व्हायची इच्छाच नाही' म्हणून. ह्याबद्दल तो साय्कॅट्रीस्टकडे जातो आहे. आम्हा सर्वांना चांगलाच धक्का बसला. एखाद्याला वडील व्हायची का इच्छा नसावी हे काही कोणास झेपले नाही. त्याला लहान मुले सांभाळणे, ती अवतीभवती असणे, त्यांची जबाबदारी घेणे हे महाभयंकर दबावाचे वाटत आहे. हे काहीतरी अनाकलनीय आहे असे वाटले. थोडं आणखी विचार करता लक्षात आले की ह्याचे मूळ त्याच्या आईच्या वागण्यात आहे का असा प्रश्न आला. स्वतःचा मोठेपणा सिद्ध करण्याच्या नादात, मिरवण्याच्या नादात "मी एकटीने किती खस्ता खावू मुलाला मोठे केले" हे ती सतत प्रसारित करत होती. त्याचा मुलाच्या मनावर भयंकर परिणाम झाला असे वाटते. जेणेकरुन 'मुले वाढवणे' म्हणजे फार कठिण, दुष्कर गोष्ट आहे असे त्याच्या सुप्त मनाने धरुन ठेवले असावे. दुसरी गोष्ट अशी की आईच्या अतिलाडाने, अतिलक्ष देण्याने, आयुष्य परिटघडीचे ठेवल्याने मुलाला आखीवरेखीव आयुष्याची सवय लागली आहे. त्यात त्याला मुलांमुळे येणारा अव्यवस्थितपणा, घडी बिघडण्याची भीती, आपल्या इच्छांना मुरड घालून मुलांची उस्तरवार करायला लागण्याने स्वातंत्र्यावर येणारे बंधन ह्या सगळ्याचा त्याला धसका बसला असावा असे वाटते. ह्या सर्वात अतिशय केविलवाणी स्थिती झाली आहे ती मुलीची. तिला लहान मुलांची प्रचंड आवड आहे, मातृत्वासाठी ती आसुसलेली आहे. तिच्या आर्थोडॉक्स माहेराकडून काय ऐकून घेत असेल ते तिचे तिलाच माहिती. तिच्याबद्दल प्रचंड वाईट वाटत आहे. दोघांचेही एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे. पण आयुष्य असा प्रश्न घेऊन उभं राहिल असे कुणालाही स्वप्नात वाटले नसेल. मिपाकरांसमोर ही घटना मांडायचे कारण की असं काही तुमच्या बघण्यात आले आहे काय, ह्यावर काही उपाय आहेत का, किंवा एकंदर आपलं बहुमोल मत काय आहे? एखाद्याच्या व्यक्तिगत आयुष्यावर मिटक्या मारत ताशेरे ओढणे, उपदेश करणे, हा या धाग्याचा उद्देश नाही. एक महत्त्वाची केसस्टडी म्हणून ह्यावर गंभीर चर्चा घडावी ही इच्छा आहे. धन्यवाद.

वाचने 35178
प्रतिक्रिया 142

प्रतिक्रिया

:'(

महत्त्वाचे मुद्दे: १. तिला लहान मुलांची प्रचंड आवड आहे, मातृत्वासाठी ती आसुसलेली आहे. २. दोघांचेही एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे. माझं मत: त्या मुलीनं पुढाकार घेऊन, मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घेऊन, आईंना या कामात सहभागी करून घेऊन त्या मुलाचे समुपदेशन करावे. मुद्दा क्र. २ लक्षात घेता, आपल्या नवऱ्याचं मन वळवणं ही बाब एखाद्या स्त्रीसाठी इतकीही अवघड नसावी. पुरुषाला एखाद्या गोष्टीसाठी राजी करण्याचे अनंत मार्ग स्त्रियांकडे असतात/ असू शकतात.

In reply to by वामन देशमुख

प्रश्न फक्त मूल जन्माला घालायचा नाहीये. त्याची पुढची जबाबदारी घ्यायचाही आहे. जर या माणसाला आपला निर्णय किंवा विचार बरोबरच आहे असं वाटतंय तर समुपदेशन यशस्वी होण्याची शक्यता कमी आहे, कारण जर एखाद्याला आपल्याला समुपदेशनाची गरजच नाही असं वाटत असेल तर कितीही चांगला समुपदेशक असला तरीही तो काहीही करु शकणार नाही. शिवाय, मी आधी म्हटलंय तसं - मुलाला जेव्हा वडिलांची गरज असते तेव्हा या माणसाने ती जबाबदारी उचलायला नकार दिला तर? त्यावेळी समाजातले किंवा अजून पाळणा हलला नाही म्हणून कुत्सितपणे बोलणारे कोणीही येणार नाहीयेत.

की पुढील पिढीला त्या गोष्टीची दहशत बसावी....पण आता प्रत्यक्षात इतकी साधने उपलब्ध आहेत की दडपण जाणवत नाही.... मुळात ती गोष्ट स्वतः केल्यावरच कळतं की ते इतकं अवघड नाही.... ज्येष्ठांनी फक्त गरज असेल तिथेच मार्गदर्शन केल्यास हे प्रश्न उद्भवणार नाहीत... त्या मुलाच्या मनात विश्वास निर्माण करायला हवा आणि घरच्या लोकांनीही पाठिंबा देणे गरजेचं आहे....

एखाद्याला जर बाप व्हायचे नसेल तर त्यात धक्कादायक काय आहे हे मला समजले नाही. जगात अनेक जोडपी असतात जी मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतात. प्रश्न फक्त इतकाच की त्याने ही गोष्ट लग्नाआधीच बायकोला सांगितली की नाही? नसेल तर ती चूक. कारण सर्वमान्य प्रथा अशी की लग्न झाले म्हणजे एकतरी मूल असते. पण म्हणून मूल नको असणे हे काही घोर वगैरे पातक नव्हे.

In reply to by रविकिरण फडके

फडके साहेब, कोणीही बाऊ करत नाही आहे किंवा पातकही समजत नाही. मूल नको असणे हे भारतीय समाजात प्रचलित नाही. म्हणजे 'नॉर्मल' नाही. प्रश्न 'जगा'चा नसून भारतातला आहे. मला तरी तुम्ही म्हणताय तशी अनेक जोडपी काय, एकही जोडपं संपर्कात बघितलेलं नाही. तसेच हा जोडप्याचा 'निर्णय' नसून मुलाच्या 'मानसिकते'चा आहे. त्याची विचारसरणी, जीवनशैली इत्यादी तशी चाकोरीबाहेरची नाही. हा 'निर्णय' नसून मानसशास्त्रीय भाषेत भीती आहे. फोबिया. लग्नाआधी बायकोला सांगितले नाही याचे कारण कदाचित त्याला "आधीच" स्वतःला आपल्याला असे काही वाटते हे माहित नसेल. हा काही ठोस विचारांअंती घेतलेला निर्णय असता तर इथे टंकण्याचे कष्ट घेतले नसते हे नक्की. प्रतिसादासाठी धन्यवाद.

In reply to by रविकिरण फडके

प्रश्न आहे तो त्या मुलीच्या भावनांचा, तिला मूल हवे असेल तर ते तिला मिळायला हवे. यात पातक, धक्कादायक असं म्हणणं गैरलागू आहे.

In reply to by तर्राट जोकर

असंही कनेक्शन असतंय काय हल्ली??? ;) बाकी माझा संसार हा माझ्या मुलाच्या लग्नापर्यंत/चार वर्षं पुढं एवढाच असायला हवा. त्यानंतर रिले शर्यतीत देतात तसा बॅटन पुढच्याच्या हाती देऊन पुढची चार पावलं आपसुक ओव्हरलॅप होतात तसं करुन (मुलाच्या अपत्याचा पहिला वाढदिवस वगैरे) आनंदानं थांबावं. पुढचा जिंकला ठीक, नाही जिंकला तरी ठीक.

जाणीवपूर्वक मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला आहे. दोघेही काॅलेजमध्ये माझ्या वर्गात होते. तेव्हाच त्यांचं जमलं आणि नंतर त्यांनी लग्न केलं. Medically त्यांची काय परिस्थिती आहे आणि त्यांनी हा निर्णय का घेतला हे मला माहित नाही आणि मी विचारलेलंही नाही, विचारणारही नाही. त्यांनी दोन मुलं - एक मुलगी आणि मुलगा दत्तक घेतलेले आहेत. हे आम्हाला - आमच्या सगळ्या मित्रमंडळींना आणि कुटुंबियांना माहीत आहे. आम्ही अर्थातच हे कुणालाही सांगत नाही.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मानवी सहजप्रवृत्तीच्या विरोधात आहे. ते साम्य दिसलं. शिवाय त्यांनी जो निर्णय घेतला तो परस्पर सामंजस्याने घेतलेला आहे. त्यांना तो घेताना त्रासही झाला असणारच. तरीही ते त्यावर ठाम राहिले. हे सर्वात महत्वाचं. इथे या केसमध्ये मानवी सहजप्रवृत्तीविरुद्ध जाण्याचाच तर मुद्दा आहे. त्यामुळे बरेचसे मुद्दे वेगळे असले तरी मी हे उदाहरण दिलं.

In reply to by बोका-ए-आझम

तजोंच्या केस मध्ये "परस्पर सामंजस्य" सपशेल गैरहजर आहे, ज्यामुळे ती केस वेगळी होते, तुम्ही म्हणताय तसा एक पार्टनर हा अनैसर्गिक चॉईस जरी स्वतःहून घेतोय तर दुसरा पार्टनर (ती मुलगी) फरफटली जाते आहे, तिला इच्छा नाहीये हा अनैसर्गिक निर्णय घ्यायची, बरं बोल तिलाच लागणार आहेत.

In reply to by बोका-ए-आझम

माझ्याही पत्नीला वैद्यकीय त्रास आहे... तीला मूल होण्यात अडचणी आहेत.. मी तीला अनेक प्रकारे समजवायला प्रयत्न केला, मात्र तीला स्वतःचे मूल हवे आहे. आवड ही आहे, आणि दोन्ही घरचा वाढता दबावही आहे. मला मात्र ती या त्रासातून जावी, अशी अजिबात ईच्छा नाही. कारण आमच्या ओळखीतल्या एका जोडप्यांची केस पाहीली आहे. त्यांनी खूप प्रयन्त केले. शेवटी अती औषधोपचारामुळे, त्या वहीनींच्या किडण्या पूर्ण खराब झाल्यात. हे आमच्या घरच्यांनाही माहित आहे. मात्र ते आपला हेका सोडायला तयार नाहीत. मी मात्र दोन्हीकडून वाजवला जातोय. यावर काय मार्ग काढावा, हेच सुचत नाहीये.

In reply to by धडपड्या

तुमची समस्या येथे मांडल्याबद्दल खरंच मनापासून आभार. तुम्हाला तुमच्या प्रयत्नांत यश लाभो व घरच्यांनी तुम्हाला समजून घेवो अशी प्रार्थना करतो. अशाच समस्येतून जाणारी दुसरी एक जवळची व्यक्ती माहित आहे. त्यांच्या धिरोदत्तपणाला मी खरंच सलाम करतो. अनेक नातेवाईकांच्या थेट, सूचक बोलण्यातून, उपाय सुचविण्यातून, जो मानसिक त्रास होतो तो विचित्र असतो. अशावेळेला संयम ठेवून, न चिडता प्रत्येकाला त्यास समजेल अशा योग्य व प्रेमळ भाषेत साधीसोपी उत्तरे देतांना पाहून माझा त्या व्यक्तिबद्दलचा आदर वाढत जातो.

In reply to by धडपड्या

धडपड्या साहेब तुमच्या पत्नीला जर वैद्यकीय कारणांमुळे गर्भधारणा करणे शक्य नसेल तर तिचे स्त्री बीज आणि आपले पुरुष बीज एकत्र करून त्यातुन तयार होणार गर्भ दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात रोपं करून वाढवून नऊ महिन्यांनी आपल्याला आपले स्वतःचे गुणसूत्रे असलेले बाळ मिळू शकते. त्यांच्या बीजांडकोशात जर स्त्रीबीजे तयार होत नसतील( पण गर्भाशय व्यवस्थित असेल) तर त्यांना दुसऱ्या स्त्रीचे बीजांड आणि आपले शुक्राणू यातुन निर्माण होणार्या गर्भाचे त्याच्या गर्भाशयात रोपण करून त्यांना गरोदरपणाचा आणि मातृत्वाचा आनंद मिळवता येईल. या दोन्ही गोष्टींना ८-१० लाख रुपये खर्च होतो आणि बहुसंख्य मोठ्या शहरात (मुंबई पुण्यात) अशा सुविधा उपलब्ध आहेत. . अती औषधोपचारामुळे, त्या वहीनींच्या किडण्या पूर्ण खराब झाल्यात.या "औषधां"मुळे किडन्या खराब होण्याची शक्यता नाही. कारण हि औषधे तुमचे शरीरच तयार करणारी संप्रेरके आहेत. किडन्या खराब होण्याचे कारण दुसरे वाटते. आपल्याला काही शंका असेल तर मला व्यनि करा किंवा ९८१९१७००४९ वर फोन करा.

In reply to by किसन शिंदे

अ‍ॅडोप्शन हा पर्यायच नकोय का? म्हणजे सर्वसामान्याच्या दृष्टीकोनातून म्हणतोय हं मी. एवढ्या पैशात त्याचे कीती चांगले संगोपन होईल. स्वतःच्या रक्ताचाच पाहिजे हा हट्ट अशावेळी धरण्यात काय अर्थ आहे?

In reply to by अभ्या..

अभ्या सेठ स्वतःच्या रक्ताचे मूल असणे आणि दत्तक घेणे यात भरपूर फरक आहे. बाकी सोडा हो दुसऱ्याच्या मुलाला सात आठ लाख रुपये देणगी किंवा खर्चासाठी किती . पण आपली सर्व संपत्ती आई बाप, मुलांच्या नावे मेल्यावरच नव्हे तर अर्धी संपत्ती जिवंतपणी सुद्धा सहज करून देतात. ज्यांना मूल होतच नाही किंवा होत असताना सुद्धा विचारपूर्वक एखादे मूल दत्तक घेतात त्यांच्यासाठी सुद्धा हा निर्णय सोपा नाहीच. साधे ज्या पुरुषांना शुक्राणू तयार न होणे हा रोग असतो( azoospermia) त्यांना सुद्धा दुसऱ्याच्या शुक्राणूंपासून( sperm donor) स्वतःच्या बायकोला मूल होऊ देणे फार अवघड जाते. शेवटी स्वतःचे मूल असावे हि एक आंतरिक उर्मी(instinct) असते. प्राणी जगतात तर नर यासाठी जीवाचे युद्ध करतात किंवा अगोदरच्या नराची अपत्ये मारूनही टाकतात.

In reply to by सुबोध खरे

स्वतःच्या रक्ताचे मूल असणे आणि दत्तक घेणे यात भरपूर फरक आहे. डॉक्टरसाहेब.. हे वाक्य काय पटले नाही. माझ्या मित्रमंडळींमध्ये बरेच जण आहेत ज्यांनी पहिले मूल झाल्यानंतर दुसरे मूल दत्तक घेतले किंवा पहिलेच मूल दत्तक घेतले असे. असे करणारे अनेक लोक असतील, माझे मित्र लै भारी; जगावेगळे असे माझे म्हणणे नाही. पण त्या सर्वांचा या एका वाक्यातून अपमान होत आहे.

In reply to by मोदक

पण त्या सर्वांचा या एका वाक्यातून अपमान होत आहे. मोदक राव असे मुळीच नाही. आपण चुकीचा अर्थ लावलात. उलट स्वतःचे मूल असताना दत्तक घेणे ( माझ्या हि एका मित्राने हे केले आहे) किंवा मूल होण्याची शक्यता असूनही दत्तक घेणे हे फारच उदात्त कार्य आहे कारण तुम्ही तुमच्या जीवशास्त्रीय मूलभूत प्रेरणेच्यावर (basic instinct )उठून अतिशय पवित्र असे कार्य करीत आहेत. असेच दुसरे कार्य म्हणजे देशासाठी बलिदान करणे. कारण मृत्यू पासून दूर पाळणे हि आंतरिक प्रेरणा आहे त्यावर विजय मिळवून बलिदान देणे हे पवित्र कार्य आहे. तेंव्हा स्वतःचे मूल असताना दत्तक घेणे हे फारच थोर कार्य आहे. दुसऱ्याचे मूल स्वतःचे म्हणून वाढवणे त्याला प्रेम लावणे हि गोष्ट मुळीच सोपी नाही. अशा लोकांना माझा नक्कीच मनापासून दंडवत आहे. माझ्या मित्राला मी हे बोलून हि दाखवले आहे.

In reply to by मोदक

ज्यांना मुलेबाळे होत नाहीत त्यांच्यासाठी 'मुले दत्तक घेणे' हा एक चांगला पर्याय आहे आणि त्या जोडप्यांबद्दल साहानुभूति वाटते. अन्यथा सक्षम असताना पहिलेच मूल दत्तक घेणे म्हणजे घरातले सुग्रास जेवणाचे ताट सोडून हॉटेलमधून जेवणाचे पार्सल मागवल्यासारखे वाटते. पण वैयक्तिक निर्णायाचे स्वातंत्र्य असतेच. बाकी ते खरे काकांनी लिहिले ते देशासाठी बलिदान देणे आणि दत्तक विधान ही तुलना तर कैच्या कैच वाटली. व्यक्तिश: 'जर अपत्य नाही तर लग्न नाही' असे मत.

In reply to by अप्पा जोगळेकर

सक्षम असताना पहिलेच मूल दत्तक घेणे म्हणजे घरातले सुग्रास जेवणाचे ताट सोडून हॉटेलमधून जेवणाचे पार्सल मागवल्यासारखे वाटते. हे विधान अत्यंत चुकीचे आहे. आज अनाथाश्रमात अनेक मुले असतात. अनाथ, अर्थात आईवडीलांचे छत्र नसलेले अभागी असतात. त्यातील एखाद्याला आई-वडीलांचे छत्र मिळवून देणे हे एक थोर सामाजिक कार्य आहे. अनाथालयातील अभागी मुलांपैकी एकाचे भाग्य जरी आपल्याला उजळवता आले तरी उजळावे. माझी दुसरे मुल दत्तक घेण्याची इच्छा होती. तसे मी घरात बोलून दाखविल्यावर आईकडून आक्षेप घेण्यात आला. तिचे म्हणणेही असेच होते तुम्ही दोघे सक्षम असताना दत्तक घेऊ नये. असो. तो काळ ३० वर्षांपूर्वीचा होता आणि आंतरजातिय विवाह करून, जो आईच्या मर्जी विरुद्धच होता, मी आईला क्लेश दिलेच होते त्यामुळे पुन्हा मुद्दामहून क्लेश द्यावे असे वाटले नाही आणि मी तो विचार मनाच्या मागे ढकलला. पण त्यामुळे कुणा एका अनाथाचे आयुष्य उजळून निघाले असते ते राहिलेच. इतकी भावनिक गुंतागुंत आणि गुंतणूक ह्या विषयात असताना आपली उपमा कांही मनाला रुचली नाही. असो. ज्याचे त्याचे मत.

In reply to by सुबोध खरे

डिअर डॉक, फरक आहे हे कबूल पण वरच्या दोन गोष्टी वाचून मी तसे लिहिले. एका गोष्टीत ८-१० लाखापर्यंत खर्च येत आहे, दुसर्‍या ठिकाणी किडनीज फेल्युअर वगैरे लिहिलेय (अ‍ॅक्चुअली तसे होते का नाही मला माहीत नाही, फक्त फेटल शारिरिक त्रास हे कन्सीडर करुन) ह्या दोन्ही पर्यायापेक्षा अ‍ॅडोप्शन का नको असा प्रश्न पडला मला. बस्स. बाकी वंशसातत्य, आपले रक्त हे विषय जितके विचार करावे तितके गहन.

In reply to by अभ्या..

आपल्या सर्वांच्या आस्थेबद्दल धन्यवाद.. मी पण वंशसातत्य आणि आपले रक्त यातच रगडला जातोय. दत्तकासाठी मी पण प्रयत्न केले. किंबहुना दोन मुलींना माझी स्पाॅन्सरशीपही चालू आहे, ज्यांना मी दत्तक घेऊ शकतो. मात्र यालाही विरोधच होतोय. त्या वहिनींच्या किडण्या खराब होणे सत्य आहे... मात्र आता खरे सरांनी सांगितले तसे नेमके कारण शोधावे लागेल. माझ्या पत्नीवरही वर्षभरात जवळपास सव्वा लाख खर्च झालेत. मात्र प्रश्न पैशाचा नसून, भोगाव्या लागणार्या यातनांचा आहे. दर महिन्याला लागून राहणारी आशा, आणि त्या पाठोपाठ येणारी निराशा, या दुष्टचक्रातून सुटका व्हावी एवढीच अपेक्षा उरलेली आहे आता....

In reply to by सुबोध खरे

आपल्या प्रतिसादाबद्दल अनेक आभार.. लवकरच आपल्याला संपर्क करतो. या आभासी जगातही, असे आपुलकी दाखवणारे कोणी दिसले, की मन भरून येते...

जबाबदारी टाळायची म्हणून मूल नको हे पटत नाही. हा पळपुटेपणा वाटतो. पण काय नवल नाही .. या देशात ( धर्मात) लग्न न केलेले, साखरपुड्ञातून पळालेले, लग्नातून पळालेले, ब्रह्मचारी , लग्न न करता डोंगर, जंगल, समाधी , समुद्रातला दगड असे कुठेतरी बसणारे .. इ ना ग्लॅमर आहे. लग्नामध्ये धर्मे च अर्थे च कामे च मोक्षे च नातिचरामि असे एकमेकाना वचन द्यायचे असते म्हणे. काम शब्दात आनंद व संतती दोन्हींचा समावेश होतो ना ? लग्नाआधी मुलाने हे डिस्क्लोज केले असते तर मुलीने दुसरा नवरा निवडला असता. त्यामुळे खरी फरपट आता बायकोची होणार.. वचन मोडणारा व पळपुटा नवरा मात्र स्वातंत्र्य व संतत्व आनंदाने उपभोगणार !

In reply to by उडन खटोला

ते काय खोटं बोलत आहेत काय,सरळ सांगुण टाकावे की या माणसाचा प्रतिवाद करता येत नाही ते.

In reply to by चंपाबाई

प्रतिसाद पटला. :) -दिलीप बिरुटे

In reply to by चंपाबाई

बायकोने दिलेल्या त्रासाचा बदला हा जागो मोहन प्यारे उर्फ जामोप्या उर्फ हितेस उर्फ माईसाहेब कुरसुंदीकर उर्फ नानासाहेब नेफळे उर्फ टॉपगिअर्ड फिलॉसॉफर उर्फ मोगा उर्फ चंपाबाई उर्फ खालमुंडी पाताळ धुंडी उर्फ असे अनेक खोटे आयडी हा समस्त मराठी संकेतस्थळांवर गरळ ओकून काढत असतो.बायकोचा असल्याने हिंदू धर्मावर विशेष राग. टिम्ब टिम्ब मध्ये दम नसल्याने दुसऱ्या मध्ययुगीन आणि बऱ्याच अंशी रानटी आणि हिंदूंवर आक्रमण करणाऱ्या धर्माचे जीव तोडून समर्थन करत असतो. खरंच जर टिम्ब टिम्ब मध्ये दम असता तर एक विधी करून खुलेआम पणे त्या धर्मात प्रवेश केला असता, पण तेवढी हिम्मत नाही मग ही अशी गरळ ओकून बायकोवर आणि तिच्या धर्मावर सूड घेतल्याचे समाधान मिळते. कारण काय ? तर माझ्या बाबतीत काही चांगले झाले नाही मग मी जिथे तिथे जाऊन घाण करणार.

In reply to by चंपाबाई

जास्त ग्लॕमर 13 बायका करणार्यालाच आहे. 53 व्या वर्षी 7 वर्षाच्या मुलीशी लग्न करुन तिच्या ९ व्या वर्षी तिच्याशी संबंध ठेवण्याला सुदधा केवढे ग्लॕमर आहे 1500 वर्षे झाली तरीही .


मुलं होऊ न देण्यात काहीही वावगं नाही. बायकोला सांगायला हवे होते हे खरे; पण तिला चार-पाच वर्षांपासून आता माहित आहे तर तिने वय जाण्यापूर्वी निर्णय घ्यावा. घटस्फोट घेऊन दुसरे लग्न करता येईल.एखाद्याला मूल नको आहे म्हणून डायरेक्ट त्याला मनोरुग्ण ठरवायचं? कमाल आहे. करोडो लोक करतात म्हणून ती गोष्ट शहाणपणाची असं लॉजिक आहे का? अशा बाबतीत जबरदस्ती होऊ शकत नाही. मूल होऊ न देण्याचा निर्णय घेणारी भारतात अनेक जोडपी आहेत. तुमच्या आजूबाजूला नाहीत म्हणून ती सगळी मनोरुग्ण होत नाहीत. शिवाय अशीही असतात ज्यांना प्रयत्न करुनही होत नाहीत आणि दत्तक घ्यायची नसतात. काही जोडप्यांना झालेली मुले नंतर मरतात. ती माणसंही जुळवून घेत जीवन जगतात. अगदी भयंकर कुचंबणा व फरपट असं काही नसतं. त्या स्त्रीला पर्याय उपलब्ध आहेत.

In reply to by नगरीनिरंजन

मलातरी कोठेही त्या व्यक्तीला मनोरुग्ण ठरवलेले दिसले नाही, प्रत्येकाच्या काहींना काही मानसिक समस्या असतातच, त्याचे मूळ लहानपणच्या वागणुकीत, इतिहासात असते, मनोरुग्ण असणे आणि मानसिक समस्या असणे यात फरक आहे, एखाद्या गोष्टीची भीती बसली असेल तर ती दूर करणे यात गैर काय? मुलं हवी असणे ही नैसर्गिक प्रेरणा आहे, करोडो करतात म्हणून ती आयोग्यही ठरत नाही,

In reply to by संदीप डांगे

मला वाटलं सायकियाट्रीस्टकडे फक्त मनोरुग्णच जातात. असो. ज्यांना नैसर्गिक प्रेरणा आहे ते न सांगता मुलं जन्माला घालतातच. ज्यांना ती प्रेरणा नाहीय त्यांच्यावर जबरदस्ती कशाला?

In reply to by नगरीनिरंजन

मनोरुग्ण असणे आणि मानसिक समस्या असणे यात फरक आहे. मला वाटलं सायकियाट्रीस्टकडे फक्त मनोरुग्णच जातात. या दोन्ही प्रतिसादांसाठी -- आपल्याला शरीराची समस्या असेल उदा. टॉन्सिलला सूज अली तर कां नाक घसा तज्ञाकडे जातो तसेच मानसिक समस्या असेल तर मनोविकार तज्ञाकडे जायला काय हरकत आहे. मनोविकारा बद्दल समाजात गैरसमज आणि डागाळलेली प्रतिमा आहे याचे कारण मनोरुग्ण हे समाजापासून वाळीत टाकलेले/मनोरुग्णालयात वर्षानुवर्षे डांबून ठेवलेले आपण ऐकतो आणि त्याची भयंकर प्रतिमा सिनेमातून अजूनच भयानक करून दाखवली जाते. त्याला शॉक देणे इ. चे अवास्तव वर्णन यामुळे सामान्य माणूस गरज असूनही मनोविकार तज्ञाकडे जात नाही. हि शोकांतिका आहे. एखादा माणूस मला मूल नको हे "ठाम विचारांती" म्हणत असेल तर त्यात चुकीचे काहीच नाही. परंतु हेच जर "अतिरिक्त भीती"पायी(फोबिया) असेल तर त्यासाठी मनोविकार तज्ञाची मदत घेणे अजिबात चूक नाही. माझे यात एकच म्हणणे आहे कि लग्नाअगोदरच त्याला तसे वाटत असेल/ किंवा त्याचा निर्णय पक्का झाला असेल तर होणाऱ्या "जोडीदाराची संमती" आवश्यक आहे अन्यथा होणाऱ्या घटस्फोटाच्या प्रक्रियेतून जाणे हे दोन्ही बाजूनं फार क्लेशदायक जाते. जर नवरा बायको दोघांनी संमतीने असा निर्णय घेतला असेल तर त्यात वावगे काहीच नाही. पण एका बाजूने हा निर्णय दुसऱ्या बाजूवर लादला गेला तर आयुष्य फार क्लेशदायक असते. माझी वर्गमैत्रिण हिला मूल "नकोच" होते. परंतु तिने हा निर्णय आपल्या नवऱ्याला आधि सांगितला नाही. त्यामुळे वर्षभरातच खटके उडून परिणती घटस्फोटात झाली. आज ती एका अत्यंत प्रतिष्ठेच्या वैद्यकीय संस्थेत रेडियोलॉजीची विभागप्रमुख आहे.

In reply to by सुबोध खरे

वाढत्या लोकसंख्येमुळे संसाधनांवर ताण पडतो. रस्त्यांवर गर्दी, जास्तीचे अपघात, शाळाकॉलेजच्या अॅडमिशनला गर्दी, नोकर्‍यांसाठी मारामार, हॉस्पिटलमध्ये बेड मिळायला वेटिंग लिस्ट हे सगळं माहित असताना केवळ स्वतःची इच्छा व नैसर्गिक प्रेरणा म्हणून आणखी एका जीवाला जन्म देऊन विनाप्रयोजन आयुष्यात निरर्थक सुख-दु:खे भोगण्यासाठी जबरदस्ती करणार्‍यांना मानसोपचाराची गरज आहे की "अशा परिस्थितीत अपत्याला जन्म देऊन त्याचं/तिचं माहित नाही; पण मी त्याच्या/तिच्या जबाबदार्‍यांमुळे सुखी होऊ शकणार नाही" असं म्हणणार्‍यांना मानसोपचाराची गरज आहे हा वादाचा मुद्दा आहे. (खरंतर नाहीय; पण करोडो लोक..).

In reply to by नगरीनिरंजन

हे भोंगळ तत्वज्ञान आहे. हजारो वर्षांपूर्वी सत्यवतीने भीष्माला हेच शहाणपण शिकवले होत्व.... तू लग्न केलेस तर पोर होईल , ते माझ्या पोराशी स्पर्धा करेल. भीश्म बिचारा बिनलग्नाचा राहिला. सत्यवतीने मात्र दोन मुले पैदा केली व ती जे बोलली ते तिच्याच वारसांमध्ये झाले. ...... लोकसंख्येमुळे ताण येतो असे मत असलेल्यानी मुलाना जन्म घेण्यास रओखण्यापेक्षा स्वतः आत्महत्या केल्यास त्यांची मानवजातीबाबतची कळकळ खरी असल्याचे सिद्ध होइइल

In reply to by चंपाबाई

मानवजातीबद्दल यत्किंचितही कळकळ नाही. प्रत्येकाला स्वतःच्या सुखाची कळकळ असते. तुमच्यासारखे महाविचारवंत विरळा.

In reply to by गामा पैलवान

लोकसंख्येच्या विस्फोटाचे कारण सांगून ज्याला मानवजातीवर उपकार करायचे आहेत , त्यानी प्रायोप्वेशन , दधिची ध्यान वगैरे लावून स्वतः नष्ट व्हावे. अगदी सामान्य माणसाप्रमाणे गळफास लावला तरी चालेल. पण , पुढची जन्माला न घालण्याचे जस्टिफिकेशन देउ नये...

In reply to by चंपाबाई

चंपाबाई, कदाचित चंपाबाईंसारखं अपत्य असण्यापेक्षा नसलेलं बरं असं कुणाला वाटू शकतं की! त्याचा निसर्ग, लोकसंख्या वगैरेशी काही संबंध नाही. निव्वळ नॉशिया आल्यामुळेही होऊ शकतं.

In reply to by मराठी कथालेखक

अपत्य चंपाबाई होइइल की शोभा डे हे आधीच कसे समजेल ?

In reply to by चंपाबाई

चंपाबाई की शोभा डे म्हणजे इकडे आड आणि तिकडे विहीर. दोन्ही पर्याय तितकेच धोकादायक आहेत.

In reply to by चंपाबाई

चंपाबाई, आता हिशोब मांडाच म्हणतो मी. जर एकाने देहत्याग केला तर एकंच जीव कमी होईल. याउलट त्याने जिवंत राहून प्रबोधन केलं तर गेलाबाजार शंभरदीडशे जिवांची तरी बचत होईलंच ना? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

अगदी बरोबर. आणि हा प्रबोधनकार कधी ना कधी स्वर्गवासी होणारच. जो नवा जीव येईल तो त्याचे कार्य पुढे नेईल.

In reply to by नगरीनिरंजन

मूल न होण्याचा जोडप्याने निर्णय घेणे व फक्त नवर्‍याने निर्णय घेऊन बायकोवर त्या निर्णयाची जबरदस्ती करणे या भिन्न सिचुएशन्स आहेत.

In reply to by चंपाबाई

जर नवरा बायको दोघांनी संमतीने असा निर्णय घेतला असेल तर त्यात वावगे काहीच नाही. पण एका बाजूने हा निर्णय दुसऱ्या बाजूवर लादला गेला तर आयुष्य फार क्लेशदायक असते. हे वाचलं नाही का?

अश्या प्रकारच्या व्यक्तिसाठी psychologist ची अतिशय चांगली मदत होऊ शकते. Behavioural science मधे अतिशय चांगले उपचार उपलब्ध zalele आहेत, बोधात्मक वर्तनात्मक उपचार पद्धत यासाठी उपयुक्त ठरू शकते, psychologist हे वर्तन उपचार आणि psychotherapy वापरून मानसिक समस्या दूर करतात

In reply to by पक चिक पक राजा बाबू

ते सगळे सोडा मालक, आम्ही तुमच्या आयडीचेच तुफान पंखे झालेलो आहोत!! "पक चिक पक राजबाबू कर गया कोई जादू न राहा दिल पे काबू क्या कर गयी हसीना" अहाहा खल्लास गाणे!! राजा बाबू नंतरच आमच्या लाडक्या गोंद्याने नंबर वन धमाका सुरु केलता त्याचा !!