✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

<चला कंडोम घाला रेऽऽऽ........>

र
राजेश घासकडवी यांनी
गुरुवार, 08/18/2016 - 07:28  ·  लेख
लेख
काही ही हां ... उभाकर साहेब थोड्याच वेळा पूर्वी बातम्या पाहिल्या , कंडोम परिधान केलेल्यांनाच् डान्सबारमध्ये किंवा आपल्या घरामध्ये प्रवेश मिळणार , उभाकर घालतेंचा आदेश. काय म्हणावे याला , कंडोमसक्ती साठी काय नवीन नवीन शक्कल लढवली जाते यापेक्षा सार्वजानिक व्यवहार कसा समक्ष यासाठी अशी शक्कल का लढवत नाही घालते साहेब ??? मुळातच कंडोम अत्यंत जरुरी आहे पण त्यासाठी सक्ती कशा साठी करता..आणि कंडोमही पूर्णपणे सुरक्षित आहे का , कुठेतरी मंध्यतरी अपघाताने कंडोमधारक दोन जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाली मग यास जबाबदार कोण. कंडोमपेक्षाही महत्वाचे आहे आपल्या आवेगावर नियंत्रण आणि संयम व सक्षम नियंत्रण प्रणाली. मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक! हे राहिले बाजूला आणि कंडोम सक्ती करता ,आधी हे सांगा पुण्यात ३० लाख पुरुष आहेत तितके कंडोम उपलब्ध आहेत का ??? मग कुठल्या निकषा वर करता अशी कंडोम सक्ती. (या लेखात अनेक ठिकाणी शुद्धलेखन दुरुस्त करणं, योग्य ठिकाणी प्रश्नचिन्हं किंवा उद्गारचिन्हं घालणं वगैरेचा मोह झाला होता. कितीतरी ठिकाणी स्वल्पविरामाअलिकडची स्पेस काढावीही वाटलं होतं. पण विडंबन करायचं म्हटल्यावर मूळ लेख अनाघ्रात ठेवावा लागतो. काय करणार? किती ठिकाणी काय काय घालणार?)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विडंबन
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
16814 वाचन

💬 प्रतिसाद (71)

प्रतिक्रिया

पहाट कि लाट? ;-)

नावातकायआहे
गुरुवार, 08/18/2016 - 14:02 नवीन
पहाट कि लाट? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भोळा भाबडा

अगदी ! लोकांनी प्रतिसादाच्या

इष्टुर फाकडा
Fri, 08/26/2016 - 01:59 नवीन
अगदी ! लोकांनी प्रतिसादाच्या नावावर आव पाडून घेतली आहे. आव आव इधर आव ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे

द सो कॉल्ड व्हतेव्हर इज अम्मळ

उडन खटोला
गुरुवार, 08/18/2016 - 14:49 नवीन
द सो कॉल्ड व्हतेव्हर इज अम्मळ गंडयाक्स.
  • Log in or register to post comments

नै वो

पगला गजोधर
गुरुवार, 08/18/2016 - 15:23 नवीन
इज अम्मळ गंडयाक्स
नै वो, थोड्याच वेळात, १३००+ वाचने व ३०+ प्रतिक्रिया ला, अम्मळ गंडयाक्स म्हणण्यास, "अय दोस्त, तुने गाडी चलाईचच नै" (अर्थात हेल्मेट न घालता) असे म्हणावेसे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उडन खटोला

अपघात होतात.

उडन खटोला
गुरुवार, 08/18/2016 - 16:28 नवीन
अपघात होतात. बाकी प्रतिसाद संख्या आणि वाचनांवर दर्जा ठरत नसतो पग भौ. तुम्ही तुमच्याच त्या कथेवर अन्याय का करताय असं म्हणून?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

व्हाय सो सिरीयस ?

पगला गजोधर
गुरुवार, 08/18/2016 - 16:52 नवीन
सर, दंगा घालायचा धागा आहे हो, हा .... एन्जॉय... दंगा करा ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उडन खटोला

दंगा घालावा असं वाटलं नाही.

उडन खटोला
गुरुवार, 08/18/2016 - 16:54 नवीन
दंगा घालावा असं वाटलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

हेल्मेट घातलं की असंच होतं...

तर्राट जोकर
गुरुवार, 08/18/2016 - 16:58 नवीन
हेल्मेट घातलं की असंच होतं... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उडन खटोला

हेल्मेट घातलं की असंच होतं...

पक्षी
गुरुवार, 08/18/2016 - 17:42 नवीन
हेल्मेट घातलं की असंच होतं... =))
अगदी अगदी, मी तर म्हणतो, हेल्मेट घालून गाडी चालवण्यापेक्षा हातगाडी चालवलेलं काय वाईट. आणि हो, हातगाडी साठी ना लायसन्स लागतं ना हेल्मेट...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

चला घाला रे वाचून ते सामुहिक

सूड
गुरुवार, 08/18/2016 - 17:36 नवीन
चला घाला रे वाचून ते सामुहिक कार्य असल्यासारखं वाटतंय! =))
  • Log in or register to post comments

मग, तुम्ही दोन गाड्यांवर बसून

राजेश घासकडवी
गुरुवार, 08/18/2016 - 17:45 नवीन
मग, तुम्ही दोन गाड्यांवर बसून एकमेकांशी गप्पा मारत जाणारे लोक पाहिलेले नाहीत का? अशा प्रसंगी तर अॅक्सिडेंटची शक्यता खूपच जास्त असते. तेव्हा सामुहिक करा की कसंही, पण हेल्मेट घाला बुवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

तेव्हा सामुहिक करा की कसंही,

सूड
गुरुवार, 08/18/2016 - 19:13 नवीन
तेव्हा सामुहिक करा की कसंही, पण हेल्मेट घाला बुवा.
पण आपलं हेल्मेट आपणंच घालायचं की त्यासाठी एखादी व्यक्ती नियुक्त करायची? पूजेच्या पथ्यांप्रमाणेच काहीतरी येऊ द्या!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

पण आपलं हेल्मेट आपणंच घालायचं

राजेश घासकडवी
गुरुवार, 08/18/2016 - 19:34 नवीन
पण आपलं हेल्मेट आपणंच घालायचं की त्यासाठी एखादी व्यक्ती नियुक्त करायची?
अरे बापरे! आळशीपणाचा इतका कहर! 'असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी' या म्हणीला एक वेगळाच आयाम प्राप्त झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

शिव शिव शिव

झपाटलेला फिलॉसॉफर
गुरुवार, 08/18/2016 - 18:38 नवीन
शिव शिव शिव अब्रह्मण्यम आहे हों धागां घासु गुर्जी म्हणजे अंमळ चावटच आहेत बुवा कधी पॉर्न विषेशांक तर कधी हेल्मेट कॉन्डोम छे छे आता मज पुनश्च स्नान करणें आलें
  • Log in or register to post comments

राम कॄष्ण हरि

संन्यस्त खड्ग
गुरुवार, 08/18/2016 - 18:49 नवीन
वासुदेव हरि
  • Log in or register to post comments

भंपक आणि भिकार विडंबन

सुबोध खरे
गुरुवार, 08/18/2016 - 18:50 नवीन
भंपक आणि भिकार विडंबन उगाचच हेल्मेट सक्तीशी तुलना करून दोन्ही विषयांचा विचका मात्र केला. "उभाकर घालतें" साहेबांचे नाव सक्ती करताना कंडोम घातला आहे कि नाही हे कसे समजणार? प्रत्येक पुरुषाला नग्न करून? कुठेतरी मंध्यतरी अपघाताने कंडोमधारक दोन जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाली मग यास जबाबदार कोण?.कंडोम १०० % सुरक्षित आहे असे कोण म्हणाले ? आपल्या आवेगावर नियंत्रण आणि संयम व सक्षम नियंत्रण प्रणाली हे जर असते तर अर्धे बलात्कार झालेच नसते. पुण्यात ३० लाख पुरुष आहेत तितके कंडोम उपलब्ध आहेत का ??? नक्कीच आहेत किती ठिकाणी काय काय घालणार?) असे कमरेखालचे विनोद करण्यात काय मिळवले हे समजले नाही. एक तर कंडोम वर सरळ स्पष्ट धागा काढा. उगाच चावट आणि द्वयर्थि लिहून काय मिळवले ते समजले नाही. त्यावर लोकांनी तसेच प्रतिसाद दिले. यात नवल काय?
  • Log in or register to post comments

कंडोम

रमेश आठवले
गुरुवार, 08/18/2016 - 19:51 नवीन
मला कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशन चे कंडोम असे संक्षिप्त रूप वाचताना यात काहीतरी बदल असावा असे वाटते.
  • Log in or register to post comments

कंडोमपा

आनंदयात्री
गुरुवार, 08/18/2016 - 20:22 नवीन
ते बहुदा कंडोमपा कल्याण डोंबिवली महानगर पालिका असे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

ऐसी अक्षरे च्या पोर्न विशेषांकापेक्षा नक्कीच

बोका-ए-आझम
Fri, 08/19/2016 - 23:20 नवीन
चांगला आहे हा लेख. त्यात आदूबाळांची कथा सोडली तर अानंदच होता. घासुगुर्जी आपलं चांगलं लिखाण शेवटी मिपावरच करतात हे बघून ब्रे वाटले!
  • Log in or register to post comments

एका पेक्षा जास्त प्राइवेट

पक चिक पक राजा बाबू
Sun, 08/21/2016 - 13:04 नवीन
एका पेक्षा जास्त प्राइवेट आणि सार्वजानिक गाड्या चालवणाऱ्या लोकानी हेल्मेट घातलेच पाहिजे.म्हणजे सर्वजण सुरक्षित राहतील
  • Log in or register to post comments

राजेश घासकडवी,

गामा पैलवान
Sun, 08/21/2016 - 13:32 नवीन
राजेश घासकडवी, >> बाकी राहिला द्वयर्थी लिखाणाचा मुद्दा - तुम्ही सभासद होण्याआधीही हे चालू होतं, यापुढेही चालू राहील. >> त्याचा आनंद घेणं हे काही हीन अभिरुचीचं लक्षण नाही. मग खरे डॉक्टरांचं वचन द्वयर्थी आहे असं समजा आणि घ्या पाहू आस्वाद! खरंतर आस्वाद घ्यायची तुम्ही सुरवातही केली आहेच. मग घोडं अडलं कुठं? गाडी पळंना शिरेटोप तिरपं वाटतं? Image removed. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा