Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by राजेश घासकडवी on गुरुवार, 08/18/2016 - 07:28
लेखनविषय (Tags)
विडंबन
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा
काही ही हां ... उभाकर साहेब थोड्याच वेळा पूर्वी बातम्या पाहिल्या , कंडोम परिधान केलेल्यांनाच् डान्सबारमध्ये किंवा आपल्या घरामध्ये प्रवेश मिळणार , उभाकर घालतेंचा आदेश. काय म्हणावे याला , कंडोमसक्ती साठी काय नवीन नवीन शक्कल लढवली जाते यापेक्षा सार्वजानिक व्यवहार कसा समक्ष यासाठी अशी शक्कल का लढवत नाही घालते साहेब ??? मुळातच कंडोम अत्यंत जरुरी आहे पण त्यासाठी सक्ती कशा साठी करता..आणि कंडोमही पूर्णपणे सुरक्षित आहे का , कुठेतरी मंध्यतरी अपघाताने कंडोमधारक दोन जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाली मग यास जबाबदार कोण. कंडोमपेक्षाही महत्वाचे आहे आपल्या आवेगावर नियंत्रण आणि संयम व सक्षम नियंत्रण प्रणाली. मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक! हे राहिले बाजूला आणि कंडोम सक्ती करता ,आधी हे सांगा पुण्यात ३० लाख पुरुष आहेत तितके कंडोम उपलब्ध आहेत का ??? मग कुठल्या निकषा वर करता अशी कंडोम सक्ती. (या लेखात अनेक ठिकाणी शुद्धलेखन दुरुस्त करणं, योग्य ठिकाणी प्रश्नचिन्हं किंवा उद्गारचिन्हं घालणं वगैरेचा मोह झाला होता. कितीतरी ठिकाणी स्वल्पविरामाअलिकडची स्पेस काढावीही वाटलं होतं. पण विडंबन करायचं म्हटल्यावर मूळ लेख अनाघ्रात ठेवावा लागतो. काय करणार? किती ठिकाणी काय काय घालणार?)
  • Log in or register to post comments
  • 16814 views

प्रतिक्रिया

Submitted by आनन्दा on गुरुवार, 08/18/2016 - 09:24

Permalink

शेवटी स्टीव जॉब्स ने जे घातले

शेवटी स्टीव जॉब्स ने जे घातले तेच घालणे आपल्या हातात आहे असे दिसतेय.
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on गुरुवार, 08/18/2016 - 09:39

Permalink

=)) भारी!

=)) भारी!
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on गुरुवार, 08/18/2016 - 09:39

Permalink

अमेरिकन का तुम्ही...मग चालूदे

अमेरिकन का तुम्ही...मग चालूदे
  • Log in or register to post comments

Submitted by साती on गुरुवार, 08/18/2016 - 10:04

In reply to अमेरिकन का तुम्ही...मग चालूदे by अनुप ढेरे

Permalink

विरोध कि प्रतिसाद

आपला या सक्तिला विरोध आहे कि पाठिंबा?
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on गुरुवार, 08/18/2016 - 10:06

In reply to विरोध कि प्रतिसाद by साती

Permalink

कंडोम होता म्हणून एकच अपत्य

कंडोम होता म्हणून एकच अपत्य झालं. नसतं तर क्रिकेट टीम झाली असती.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on गुरुवार, 08/18/2016 - 10:05

Permalink

कशी नssशिब्बानं थट्टा

कशी नssशिब्बानं थट्टा मांssडली तुमची गुरुजी नssशिब्बानं थट्टा मांssडली??
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 08/18/2016 - 10:20

Permalink

ऐसी अक्षरे वरील लेख चुकून इथे

ऐसी अक्षरे वरील लेख चुकून इथे आला काय?
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on गुरुवार, 08/18/2016 - 13:15

In reply to ऐसी अक्षरे वरील लेख चुकून इथे by सुबोध खरे

Permalink

संदर्भ काही कळला नाही डॉक्टर

संदर्भ काही कळला नाही डॉक्टर साहेब :/
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on गुरुवार, 08/18/2016 - 17:19

In reply to ऐसी अक्षरे वरील लेख चुकून इथे by सुबोध खरे

Permalink

त्याचं काय आहे सर, आम्ही

त्याचं काय आहे सर, आम्ही जिथली हेल्मेटं तिथेच घालतो.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on Sun, 08/21/2016 - 13:28

In reply to त्याचं काय आहे सर, आम्ही by राजेश घासकडवी

Permalink

=))

ज्जे बात! :) -(सुजाण हेल्मेटधारी) सोकाजी
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 08/18/2016 - 10:22

Permalink

सक्ती वाईट.

मला हेल्मेट आवडत नाही. मला हेल्मेट घालून गाडी चालवायला आवडत नाही. बाकी चालू द्या...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by पक्षी on गुरुवार, 08/18/2016 - 11:27

In reply to सक्ती वाईट. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

बिरुटे सरांशी सहमत ....

बिरुटे सरांशी सहमत .... मला पण हेल्मेट घालून गाडी चालवायला आवडत नाही ... हेल्मेट घालून गाडी चालवायला मजा नाही राव :-)
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on गुरुवार, 08/18/2016 - 11:35

In reply to बिरुटे सरांशी सहमत .... by पक्षी

Permalink

पक्षांचे हेल्मेट म्हणल्यावर

पक्षांचे हेल्मेट म्हणल्यावर स्टुअर्ट लिटल आणि मार्गलो आठवले.
  • Log in or register to post comments

Submitted by खालीमुंडी पाताळधुंडी on गुरुवार, 08/18/2016 - 13:01

In reply to सक्ती वाईट. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

मला हेल्मेट आवडत नाही. मला

मला हेल्मेट आवडत नाही. मला हेल्मेट घालून गाडी चालवायला आवडत नाही.
सेम हिअर!!! पण धागा वेगळ्याचा आशयावर आहे, बाकि चालू द्या! - खामु चिरूटे
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on गुरुवार, 08/18/2016 - 14:24

In reply to मला हेल्मेट आवडत नाही. मला by खालीमुंडी पाताळधुंडी

Permalink

धाग्यावरचाच प्रतिसाद

त्यांनी जुन्या संदर्भाने एन्क्रिप्ट केलाय, नाहीतर प्रतिसादावर घाला पडायचा!
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त on गुरुवार, 08/18/2016 - 10:59

Permalink

हेलमेट???

माननीय डॉ बिरूटेसाहेब. लेख कंडोम विषयी आहे. हेलमेट कुठून आणले मधे?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 08/18/2016 - 13:02

In reply to हेलमेट??? by मुक्त

Permalink

सॉरी हं चूक झाली.

=)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by पक्षी on गुरुवार, 08/18/2016 - 13:08

In reply to सॉरी हं चूक झाली. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

सॉरी हं चूक झाली.

सॉरी हं चूक झाली.
खिक्क, किती तो साळसूद प्रतिसाद!
  • Log in or register to post comments

Submitted by जावई on गुरुवार, 08/18/2016 - 11:04

Permalink

प्रतिसाद चुकून इकडं आला..

प्रतिसाद चुकून/चुकवून इकडं आला..हेल्मेटच्या धाग्याचा.बाकी चालूद्या.
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on गुरुवार, 08/18/2016 - 11:44

Permalink

काही ही हां ... उभाकर साहेब

काही ही हां ... उभाकर साहेब
आता 'उभाकर' हे आडनाव आहे ? की जॉब डिस्क्रिप्शन ? असो
हेल्मेट घालून गाडी चालवायला मजा येत नाही राव :-)
अस कस, तुम्ही काय मजा म्हणून गाडी चालवताय कि काय ? पक्षी साहेब ? ;) पण आता सक्ती आहे ..... तुम्ही हेल्मेट घातले नाही, तर टाकीत नोझल घुसवू देणार नाहीये सरकार, पेट्रोल भरण्यासाठी ओ..., कायदा आहे तसा.
  • Log in or register to post comments

Submitted by पक्षी on गुरुवार, 08/18/2016 - 12:50

In reply to काही ही हां ... उभाकर साहेब by पगला गजोधर

Permalink

अस कस, तुम्ही काय मजा म्हणून

अस कस, तुम्ही काय मजा म्हणून गाडी चालवताय कि काय ? पक्षी साहेब ? ;)
आम्ही तर मज्जा म्हणूनच गाडी चालवतो बुवा, उगा कशाला पेट्रोल फुकट घालवा, इच्छा नसतांना... हाकानाका.
तुम्ही हेल्मेट घातले नाही, तर टाकीत नोझल घुसवू देणार नाहीये सरकार, पेट्रोल भरण्यासाठी ओ..., कायदा आहे तसा.
अर्रे वाह अस कसं, टाकी आमची (I mean आमच्या गाडीची), नोझल आमचं, सरकार कोण आहे आम्हाला रोखणारं. आणि सरकारला कस कळणार आम्ही हेल्मेट घातलं आहे कि नाही
  • Log in or register to post comments

Submitted by खालीमुंडी पाताळधुंडी on गुरुवार, 08/18/2016 - 13:02

In reply to अस कस, तुम्ही काय मजा म्हणून by पक्षी

Permalink

आम्ही तर मज्जा म्हणूनच गाडी

आम्ही तर मज्जा म्हणूनच गाडी चालवतो बुवा, उगा कशाला पेट्रोल फुकट घालवा
ठ्ठो ठ्ठो ठ्ठो
  • Log in or register to post comments

Submitted by माम्लेदारचा पन्खा on गुरुवार, 08/18/2016 - 12:01

Permalink

एकच प्रश्न आहे......

हेल्मेटसक्ती लागू करायला नाक्यानाक्यावर पोलिस उभे करू शकतं सरकार.... इथे काय होईल ?
  • Log in or register to post comments

Submitted by बटाटा चिवडा on गुरुवार, 08/18/2016 - 12:33

Permalink

ह घ्या नि सोडा..

स्थळ पुणे. दोन युवक, कुशल बसवे आणि निपुण काडतरे. अतिशय आनंदात. तिसरा मित्र भेटतो. मित्र: काय रे? आज एकदम एवढे खुश ? बसवे: अरे तुला सांगणारच होतो फोन करून, आम्हाला दोघांना नोकरी लागली. मित्र: दोघांना एकदम? काडतरे: एकदम सोड. एकाच ठिकाणी. एकाच हनिमून रिझॉर्टवर. मित्र: वा. मस्त. गम्मत आहे नाही ! बसवे : काम पण सोपं आहे. हा एंट्रन्स ला कंडोम देतो.कस्टमर पैसे भरतो. आणि मी, झालं की त्या कस्टमर कडून एक्झिट ला ते कलेक्ट करतो.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on गुरुवार, 08/18/2016 - 12:54

In reply to ह घ्या नि सोडा.. by बटाटा चिवडा

Permalink

कुछ जम्या नै.

कुछ जम्या नै. रिसायकलेबल नाहिये हेल्मेट सारखं.
  • Log in or register to post comments

Submitted by वटवट on गुरुवार, 08/18/2016 - 12:55

In reply to ह घ्या नि सोडा.. by बटाटा चिवडा

Permalink

कैच्याकै

कैच्याकै
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 08/18/2016 - 17:35

In reply to ह घ्या नि सोडा.. by बटाटा चिवडा

Permalink

मी, झालं की त्या कस्टमर कडून

मी, झालं की त्या कस्टमर कडून एक्झिट ला ते कलेक्ट करतो.
यक्क!!
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 08/24/2016 - 02:21

In reply to मी, झालं की त्या कस्टमर कडून by सूड

Permalink

+१

=)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by जावई on गुरुवार, 08/18/2016 - 13:00

Permalink

मी हेल्मेट वापरत नाही..

आपुन काय हेल्मेट वापरत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on गुरुवार, 08/18/2016 - 13:14

Permalink

अर्रर्रर्रर्रर्रर्र!!!!

अर्रर्रर्रर्रर्रर्र!!!! कॉमेंट्स करत्या समस्तांसी बालके बापुसाहेबचा शिरसाष्टांग प्रणाम!! नव्हे प्रणिपात!!
  • Log in or register to post comments

Submitted by जावई on गुरुवार, 08/18/2016 - 14:16

In reply to अर्रर्रर्रर्रर्रर्र!!!! by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

अजून आपल्याकडं गाडीच आली नाही....

हेल्मेटचा प्रश्न येतोच कुठं मग..
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on गुरुवार, 08/18/2016 - 14:21

In reply to अजून आपल्याकडं गाडीच आली नाही.... by जावई

Permalink

:)

'जावई' म्हणवून घेता आणि गाडी नाही ? असं कसं ? :)
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on गुरुवार, 08/18/2016 - 14:34

In reply to :) by पगला गजोधर

Permalink

दुसर्‍याची गाडी विना लायसन्स

दुसर्‍याची गाडी विना लायसन्स चालवत असतील... शेताकडच्या आतल्या रस्त्यांमधून.
  • Log in or register to post comments

Submitted by पक्षी on गुरुवार, 08/18/2016 - 14:45

In reply to दुसर्‍याची गाडी विना लायसन्स by तर्राट जोकर

Permalink

Welcome back

आलात का पिऊन परत???
  • Log in or register to post comments

Submitted by जावई on गुरुवार, 08/18/2016 - 15:52

In reply to दुसर्‍याची गाडी विना लायसन्स by तर्राट जोकर

Permalink

त जो काका...तस काही नाही.

यंदा दिवाळीत स्वतःची गाडी नक्की.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on गुरुवार, 08/18/2016 - 15:56

In reply to त जो काका...तस काही नाही. by जावई

Permalink

बरं बरं. मग काय दुसर्‍याच्या

बरं बरं. मग काय दुसर्‍याच्या गाडीवर प्रेक्टीस?? हेल्मेट घालूनच करताय ना? उगा आक्षिडण व्हायचा...
  • Log in or register to post comments

Submitted by जावई on गुरुवार, 08/18/2016 - 15:47

In reply to :) by पगला गजोधर

Permalink

असच हाय....

शेतकऱ्यांच्या पोरांना गाडी देत नाहीत हल्ली शोरुमवाले.मी आपला मोकळ्यात जावई..
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on गुरुवार, 08/18/2016 - 16:59

In reply to असच हाय.... by जावई

Permalink

गाडी देत नाहीत ......

गाडी देत नाहीत ...... .मोकळ्यात जावई.....
हम्म, तुम्ही स्वतःची सायकल चालावा मग, अन स्वतःच्याच ताकतीवर, दामटा हवी तेव्हडी.... हवी तेव्हा... हवी तिथे.... त्याला हेल्मेट पण नको ;) सायकल चालवून थकायला झाल्यावर/ जास्ती घाम गाळल्यावर की मस्त लिंबू सरबत हाणायचं... हो स्वतःचीच सायकल असल्यामुळे जरा बेतानं, नाहीतर रोज सकाळ संध्याकाळ दामटाल
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 08/18/2016 - 17:33

In reply to गाडी देत नाहीत ...... by पगला गजोधर

Permalink

अरे आवरा रे पब्लिकला.

=)) आवरा रे पब्लिकला. लय दिसांनी धागा इंजॉय करतोय. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 08/18/2016 - 18:19

In reply to अर्रर्रर्रर्रर्रर्र!!!! by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

बापूसाहेब

बापूसाहेब आता कळलं का? मी काय म्हणालो ते. झगा आणि हॅट घालून एखादी पाववाली चर्च ऐवजी तुळजा भवानीच्या मंदीरात गेली तर कसे वाटेल?
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on गुरुवार, 08/18/2016 - 18:24

In reply to बापूसाहेब by सुबोध खरे

Permalink

मिसळपाव म्ह्णजे तुळजाभवानी

मिसळपाव म्ह्णजे तुळजाभवानी मंदिर?? आम्हाला तर असे समजले होते की मिसळपाव हा सर्व प्रकारच्या अभिव्यक्तीसाठी खुले व्यासपीठ आहे म्हणून..? हे सोवळं-ओवळं कधीपासून सुरु झालं डॉक्टरसाहेब?
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 08/18/2016 - 18:27

In reply to मिसळपाव म्ह्णजे तुळजाभवानी by तर्राट जोकर

Permalink

सोवळ्या ओवळ्याचा संबंध नाही.

सोवळ्या ओवळ्याचा संबंध नाही. ती फक्त उपमा झाली.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Fri, 08/19/2016 - 22:07

In reply to बापूसाहेब by सुबोध खरे

Permalink

ऐसी अक्षरे वरील लेख चुकून इथे

ऐसी अक्षरे वरील लेख चुकून इथे आला काय?
झगा आणि हॅट घालून एखादी पाववाली चर्च ऐवजी तुळजा भवानीच्या मंदीरात गेली तर कसे वाटेल?
या प्रतिसादांकडे दुर्लक्ष केलेलं होतं, पण पुन्हा वाचून बघितल्यावर त्यावर काहीतरी बोलण्याची गरज आहे हे जाणवलं. मला सुबोध खरेंबद्दल आदर आहे. त्यांचं लेखन मी आनंदाने वाचलेलं आहे. मात्र या लेखावर अशा कॉमेंट करणं खटकलं हे नोंदवावंसं वाटतं. ऐसी अक्षरे आणि मिसळपाव ही दोन स्वतंत्र संस्थळं आहेत. मी दोन्ही ठिकाणी लिखाण करतो. त्यामुळे हा अमुक आयडी कुठूनतरी बाहेरून येऊन आपलं मिसळपावचं मंदीर बाटवतो यासारखी टिप्पणी अप्रस्तुत आणि बिनगरजेची वाटली. गवि, आदूबाळ, अभ्या, सुनील आणि इतरही अनेक मान्यवर आयडी कुठचाही आपपरभाव न बाळगता दोन्ही संस्थळांवर वावरतात. आणि ते करावंसं वाटत नसेल तर निदान पोलरायझेशन करण्याचा तरी प्रयत्न करू नये ही विनंती. मिपा हे तुमच्या दृष्टीने मंदीर वगैरे असेल, पण सर्वांसाठी ते आख्खं गाव आहे. तिथे शाळा आहे, गप्पाटप्पा करण्याची चावडी आहे, उत्तम काही सादर करण्याचा मंच आहे, आणि शिट्या मारण्यासाठी लावणीचा बोर्डही आहे. इथे विद्वान आहेत तसेच टवाळही आहेत. या बहुविध लोकांनी बनलेल्या गावाकडे मोकळेपणाने बघावं ही विनंती. बाकी राहिला द्वयर्थी लिखाणाचा मुद्दा - तुम्ही सभासद होण्याआधीही हे चालू होतं, यापुढेही चालू राहील. त्याचा आनंद घेणं हे काही हीन अभिरुचीचं लक्षण नाही. किमानपक्षी मिपाचं मंदीर इतक्या क्षुल्लक गोष्टीन बाटण्याइतकं मिपा लहान नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by मैत्र on Mon, 08/22/2016 - 21:26

In reply to ऐसी अक्षरे वरील लेख चुकून इथे by राजेश घासकडवी

Permalink

तिरकसपणा

आपल्या अभ्यासपूर्ण लेखमाला वाचल्या आहेत. तुमच्या विदागाराबद्दल आदर आहे. द्व्यर्थी लिखाण मिपावर झालं आहे आणि होईल त्याला या विडंबनाने काही बिघडत नाही या आपल्या मताशी मात्र सहमत आहे? पण आपल्या मिपावरच्या लिखाणात, प्रतिसादात कुठलाही मुद्दाम आणलेला खवचटपणा किंवा तिरकसपणा अजिबात नसतो असं आपला दावा आहे का? आदूबाळ वगैरे सारखं अनबायस्ड लिखाण प्रत्येक वेळी असतंच का? आणि मधली काही वर्षे आपण मिपावरून अदृश्य झाला होता काही विशेष कारणाशिवाय. आता लिहीत आहात. त्यामुळे पोलरायझेशनचा मुद्दा काढण्यात अर्थ नाही. तुम्हाला खटकलं तर ठीक आहे. ते तुमचं मत आहे आणि त्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे. त्याबरोबर डॉ. खरेंना त्यांच्या मताचं स्वातंत्र्य आहे. ऐसीच्या श्रेणी पद्धतीतला बेसलेस आणी बेमुर्वत भ्रष्टाचार बघता कोणाच्या मताला अप्रस्तुत म्हणणे हे बळंच आहे. दोन स्वतंत्र संस्थळे आहेत, दोन्हीकडच्या कल्चर मध्ये, माहितीच्या सखोलते मध्ये, वादविवादात आणि त्याच बरोबर ललित लेखनात फरक आहेत. बरेच जण दोन्हीकडे सदस्य आहेत. आपापली मते आणि लिहिण्याची पद्दत.. त्यामुळे पुढे चला (अर्थात मूव्ह ऑन.. )
  • Log in or register to post comments

Submitted by मैत्र on Mon, 08/22/2016 - 21:29

In reply to तिरकसपणा by मैत्र

Permalink

प्रश्नचिन्ह

सहमत आहे नंतर प्रश्नचिन्ह चुकून पडलं आहे . खरंच सहमत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Tue, 08/23/2016 - 07:51

In reply to तिरकसपणा by मैत्र

Permalink

आणि मधली काही वर्षे आपण

आणि मधली काही वर्षे आपण मिपावरून अदृश्य झाला होता काही विशेष कारणाशिवाय. आता लिहीत आहात.
कुठची वर्षं? अहो, असले काही आरोप करण्याआधी जरा माझं लिखाण तपासून पाहा. आणि तुम्ही मिपापासून किती काळ दूर होतात हेही तपासून पाहा. आणि मिपावरच्या लिखाणातला खवचटपणा, तिरकसपणा हा सुरुवातीपासूनच आहे. अगदी नवीन सदस्य असतानाही मी संपादक, संस्थापक यांची टिंगल केलेली आहे. ऐसीवर लिखाण करताना मिपाबद्दल तक्रार न करण्याची दक्षता घेतलेली आहे. मिपावर लिखाण करताना मी मिपाकर म्हणून वावरतो. सुबोध खरेंनी कारण नसताना ऐसी विरुद्ध मिपा असा मुद्दा इथे मांडला. त्याबद्दल मी जे लिहिलं आहे त्याचं त्यांनीच उत्तर देणं योग्य ठरेल.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Tue, 08/23/2016 - 10:40

In reply to आणि मधली काही वर्षे आपण by राजेश घासकडवी

Permalink

राजेश साहेब

राजेश साहेब आपले लिखाण मला आवडते. ते अभ्यासपुर्ण आणि माहिती पूर्ण असते. पण आपले हे विडंबन जरा पातळी सोडून झाले आणि ते हेल्मेट सारख्या गंभीर विषयाबद्दल झाले ते अस्थानी आहे असे वाटले म्हणून कदाचित अशी टोकाची प्रतिक्रिया दिली गेली. )हेल्मेट शिवाय गाडी चालवल्यामुळे कित्येक तरुण आयुष्ये अकाली नष्ट झालेली मी सिटी स्कॅन करत असताना पाहिलेली आहेत यामुळे हा विषय माझ्यादृष्टीने जास्त गंभीर आहे.) असो. मला आपल्या बद्दल वैयक्तिक कोणताही आकस किंवा राग नाही. चूक झाली असल्यास क्षमस्व.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Tue, 08/23/2016 - 21:46

In reply to राजेश साहेब by सुबोध खरे

Permalink

धन्यवाद. लेखन कोणाला आवडतं

धन्यवाद. लेखन कोणाला आवडतं कोणाला आवडत नाही, ते ठीकच. मात्र गरज नसताना ऐसी अक्षरेचा उल्लेख ओढूनताणून केलेला वाटला इतकीच तक्रार होती. तुमच्या बाकीच्या मताविषयी आदर आहेच. खरं सांगायचं झालं तर या विषयावर विडंबन करण्यामागचं कारण असं होतं की मूळ धाग्यात जितक्या तीव्रपणे 'माझं डोकं आहे, फुटलं तर फुटलं, पण माझी तत्त्वं इतकी महत्त्वाची आहेत की मी सक्ती चालवून घेणार नाही' असं मत होतं. काहींनी हेल्मेटसक्तीविरोधात पुणेकर उभे राहातात आणि त्यांचा विजय ठरलेला आहे असंही प्रौढीने सांगितलं. तुमच्या आणि इतरांच्या अनुभवांवरून हा सगळा मूर्खपणा आहे हे उघड आहे. काही वेळा मूर्खपणाची टिंगल करणं हा उपाय असतो. म्हणून 'हेल्मेटविरुद्ध उभे राहाता तसे कंडोमविरुद्धही उभे राहाणार का?' असा प्रश्न मी हे विडंबन लिहून करत होतो. विडंबन हे वरवर थिल्लर वाटलं तरीही त्यामागे काही विचार असतो. त्यामुळे ती कुठल्या विचारसरणीची चेष्टा आहे हे समजून घ्यावं लागतं.
  • Log in or register to post comments

Submitted by वामन देशमुख on Tue, 08/23/2016 - 10:25

In reply to ऐसी अक्षरे वरील लेख चुकून इथे by राजेश घासकडवी

Permalink

आदर अनादराचा मुद्दा

मला सुबोध खरेंबद्दल आदर आहे.
मलाही सुबोध खरेंबद्धल आदर आहेच, in fact, हा आदर अनादराचा मुद्दा नाहीच.
मात्र या लेखावर अशा कॉमेंट करणं खटकलं हे नोंदवावंसं वाटतं.
या धाग्याचं खेळीमेळीत्व / मौजमजेत्व / leg_pullingत्व लक्षात घेता खरेंचा
झगा आणि हॅट घालून एखादी पाववाली चर्च ऐवजी तुळजा भवानीच्या मंदीरात गेली तर कसे वाटेल?
हा प्रतिसाद हा तीक्ष्ण ओरखडा नसून केवळ एक चिमटा / मस्करी / टिंगल आहे असे मला वाटतं. म्हणूनच,
सुबोध खरेंनी कारण नसताना ऐसी विरुद्ध मिपा असा मुद्दा इथे मांडला.
असं न म्हणता,
या बहुविध लोकांनी बनलेल्या गावाकडे मोकळेपणाने बघावं ही विनंती.
असं मलाही वाटतं.
सर्वांसाठी ते (मिपा) आख्खं गाव आहे.
माझ्या मनातलं बोललात!
  • Log in or register to post comments

Submitted by भोळा भाबडा on गुरुवार, 08/18/2016 - 13:19

Permalink

. काय करणार? किती ठिकाणी काय

. काय करणार? किती ठिकाणी काय काय घालणार?)
मिपावर परिवर्तनाची पहिली लाट.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com