Skip to main content

इसिसमध्ये सामील होणारे युवक/युवती

लेखक श्रीगुरुजी यांनी बुधवार, 03/08/2016 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
सिरिया व इराक मध्ये इसिसचा उदय झाल्यापासून विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक देशातील मुस्लिम तरूण, तरूणी इसिसमध्ये सामील होऊन इस्लामसाठी लढून हुतात्मा होण्यासाठी सिरीयामध्ये जात आहेत अशा बातम्या येत आहेत. भारतातील केरळमधील व महाराष्ट्रातील काही मुस्लिम युवक, युवती आधीच इसिसमध्ये भरती झाल्याच्या बातम्या झळकल्या आहेत. गर्भवती मुस्लिम तरूणींनी सिरिया/इराकमधील इसिसच्या अधिपत्याखालील इस्लामच्या पवित्र प्रदेशात येऊन मुलांना जन्म द्यावा असे इसिसने आवाहन केल्याचे २-३ दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाले होते. इसिसमध्ये भरती होण्यासाठी निघालेल्या काही मुस्लिम युवकांना संशयावरून विमानतळावरच अडवून परत घरी पाठविण्यात आल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झालेल्या आहेत. इसिस आपल्या प्रचारासाठी आंतरजालाचा प्रभावी वापर करते असे दिसते. आंतरजालाच्या माध्यमातून मुस्लिम युवक/युवतींवर प्रभाव टाकून त्यांना आपल्या जाळ्यात ओढायचे प्रयत्न सुरू असतात असे माध्यमे सांगतात. जे युवक/युवती इसिसच्या तत्वज्ञानाने भारून इराक/सिरियाला निघाले आहेत त्यांना बळजबरीने अडवून परत घरी पाठविणे चुकीचे आहे असे आमचे मत आहे. त्यांना इसिसमध्ये सामील होऊन न देता बळजबरीने भारतात डांबून ठेवले तरी ते आंतरजालाच्या माध्यमातून इसिसच्या संपर्कात राहतीलच आणि इसिसमध्ये सामील होता न येता इथेच रहावे लागल्याच्या रागातून इथेच दहशतवादी कारवायात सामील होऊन जास्त उपद्रव देतील अशी शक्यता वाटते. त्यांना इसिसमध्ये जाऊन न देता अडविणे म्हणजे रोगापेक्षा उपाय भयंकर अशी परिस्थिती येऊ शकते. त्यामुळे इसिसमध्ये सामील व्हायला निघालेल्यांना बळजबरीने न अडविता त्यांना जाऊन द्यावे. त्यांना इसिसमध्ये सामील होऊन द्यावे. त्यांना धर्माकरिता युद्ध वगैरे करायचे असेल तर ते त्यांना इराक/सिरियाच्या भूमीवर करता येईल. भारताला त्याचा त्रास नाही. त्यातले बहुतेकजण तिथे युद्धात मारले जातीलच व मृत्युनंतर त्यांना स्वर्गात प्रवेश मिळून त्यांना ७२ कुमारी अप्सरांचा लाभ होईल. चुकूनमाकून त्यातले कोणी परत आलेच तर त्यांना आयुष्यभर तुरूंगात ठेवावे. एकंदरीत आपला उपद्रव कमी करण्यासाठी त्यांना न अडविता इसिसमध्ये जाऊन द्यावे.

वाचने 26681
प्रतिक्रिया 134

प्रतिक्रिया

In reply to by गणामास्तर

तुम्ही फक्त हिंदू म्हणू नका म्हणजे गैरसमज दूर होतील। अन्यायग्रस्त हिंदू, शीख, बुद्ध, मुस्लिम धर्मतील लहान सेक्टर याना प्रवेश। जगातील सर्वच देश हे मानवतेच्या दृष्टिकोनातून दारवरशी लाख निर्वासित घेतात। बरं हिंदू लोकांना नको मग तिबेटी बुद्ध, श्रीलंकन तामिळ, नेपाळी हिंदू याना आतापर्यंत का आश्रय दिला? भारताची हि पोलिसी जुनीच आहे ती फक्त पाकिस्थान आणि या बांगलादेश ह्यांना apply नव्हती।

In reply to by अमितदादा

तिबेटी लोकांना आश्रय देणे ही उघड दृष्ट्या एक घोडचूक होती, अन गुप्तचर विभागाकरता ब्लेसिंग इन दिसगाईस, पाकिस्तानी हिंदू काय ऑफर करत आहेत ??

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बापू तुमचे मत समजत आहे, परंतु भारत बाहेरच जग हे भारताला जगातील हिंदू शीख लोकांचा रक्षणकर्ता म्हणून बगतो। हिंदू शीख बुद्ध धर्मीय वर होणाऱ्या अत्याचारांना भारताने रेस्पॉंड नाही केलं तर त्यांचं नाश झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणूनच माझं मत आहे की सगळ्यांना सरसकट घेऊ नका एक चांगली policy बनवा। भारत सरकार ला सुद्ध बहुदा हेच वाटतंय http://www.dawn.com/news/1252665 बाकी प्रश्न फक्त तिबेटी बौद्ध चा नाही, नेपाळी हिंदू आणि श्रीलंकन तामिळ याना सुद्धा भारताने आश्रय दिला आहे त्याच काय?

In reply to by संदीप डांगे

याची मला पूर्ण कल्पना आहे, म्हणूनच पोलिसी मध्ये सगळं धर्म समाविष्ट करा, मात्र मुस्लिम सुन्नी ना आश्रम नको कारण त्यांच्यावर धार्मिक अन्याय होणार नाही। मुस्लिम शिया हि एकवेळ चालतील। बाकी ह्या जगात कोणताही देश साळसूद नाही, भविष्य आणि स्वार्थ बगूनच पोलिसी बनवाव्या लागतील। जर्मनी मध्ये सीरिया तुन येणारे निर्वासित ख्रिश्चन धर्म स्विकारातयात कारण निर्वासित व्हिसा मिळण्याची श्यक्यता वाढतेय, ईशान्य भारतातील ज्यू इसराईल मध्ये निघून गेले। दोनी घटना आत्ताच्या आहेत। भारताने योग्य पोलिसी बनवायला हवीच, भारत हा पुस्तकी secular आणि प्रॅक्टिकाली हिंदू dominated राष्ट्र आहे हे वास्तव आहे।

In reply to by अमितदादा

मुस्लिम निर्वासितांना मुस्लिम देश आश्रय देतात, उदाहरण देता येईल का?? सीरिया मध्ये यळकोट झाला तेव्हा सौदी ने निर्वासित आत घेतले का इराण नं?

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

उदाहरण लिबिया येथील पाळून जाणारे निर्वासितांना इजिप्त आणि tunisia आश्रय देत आहे (आकडा 2 तो 4 लाख)। सीरिया मधून पाळू आलेल्या लोकांना तुर्कस्तान आश्रय देत आहे (आकडा 2.7 मिलियन). म्यानमार मधून पाळणाऱ्या rohingya मुस्लिम ना मलेशिया आणि इंडोनेशिया आश्रय देत आहेत।

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

जेव्हा मौका होता तेव्हा आले नाहीत मग आता आपण कश्याला रडावे!
नाही पटलं. जेव्हा मौका होता, १९४७ साली तेव्हा आत्ता ४०-५०-६० वर्षाचे लोक किती वयाचे असतील. जन्मले देखील नसतील हे लोक तेव्हा. त्यांच्या बापजाद्यांनी घेतलेल्या निर्णयाची शिक्षा त्यांना का द्यायची? आणि दुसरा मुद्दा. पाकिस्तानचं पद्धतशीरपणे रिग्रेशन घडवून आणलेलं आहे. तिथल्या हुकूमशहांनी असो वा धर्मगुरुंनी. १९४७ चा पाकिस्तान आत्ताच्या पाकिस्तान इतका वाईट नसेलही. सो चूक आता लक्षात आली किंवा आता परिस्थिती बदलली तरी ती दुरुस्तं करू द्यायची नाही?

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

होऊ दे की टू वे. जो न्याय तिथल्या हिंदूंना लागू तोच इथल्या मुस्लिमांना लागू आहे की. पण मला वाटत नाही की कोणी मुस्लीम तिकडे जाईल.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

syrian kid हा फोटू पाहून रडला असाल तर त्याच कारणासाठी.
मौका होता तेव्हा आले नाहीत
विमान पडत असताना स्वतःच्या सामानाची पर्वा करतात लोक, घरदार सोडून निघणं सोपं आहे का?
जर का गुर्जी म्हणतात तसे मान्य केले तर
हे लॉजिक काय झेपलं नाही.

In reply to by sagarpdy

विमान पडत असताना स्वतःच्या सामानाची पर्वा करतात लोक, घरदार सोडून निघणं सोपं आहे का? हे ही लॉजिक झेपले नाही! असो.

+१
थोडक्यात काय भारताने अन्याय ग्रस्त हिंदू, बुद्ध, शीख, मुस्लिम अहमादी,मुस्लिम दाऊद बोहरा यासारख्य लोकाना आश्रय देण्यासाठी योग्य पोलिसी बनावाय हवी।
अहमदी व बोहरा अजिबात नको. तेही तितकेच कट्टर असतात. बोहरांमधील बालवयात केला जाणारा मुलींची सुंता हा क्रूर प्रकार माहित असेलच. बाकी सगळे चालतील.

In reply to by मोदक

नक्कीच वागता येतं. इस्राईल फक्त ज्यूंनाच आत घेतात. अमेरिकेत नागरिकत्व मिळविण्यासाठी वेगवेगळ्या खंडांसाठी वेगवेगळे नियम आहेत. अरब देशांचे नागरिकत्वाचे स्वतःचे वेगळे नियम आहेत. नजीकच्या भविष्यकाळात विशेषतः युरोपिअन देश मुस्लिम नागरिकांना नागरिकत्व देण्याचे नियम अधिक कडक करतील अशी शक्यता आहे.

In reply to by श्रीगुरुजी

हे बघा.. आता माझा अभ्यास नाही म्हणून खरोखरी विचारत आहे. एकाच धर्मातला एक पार्ट हवा आणि एक नको असे कसे चालेल..? का तुम्ही नोंदवलेली मंडळी मुस्लीम छत्रीखाली येत नाहीत..?

In reply to by मोदक

मी कोठे असं म्हटलंय? मी म्हणतोय की मुस्लिमांचा कोणताच उपपंथ नको. मग ते अहमदी असोत वा बोहरी वा शिया वा सुन्नी.

In reply to by श्रीगुरुजी

सावरकर तर बोलायचे , अखंड हिंदुस्तानचे सगळे हिंदु मुसलमान एकाच हिंदुत्वाचे प्रवाह. कारण पितृभू एकच. .. मग पाकिस्तानी मुसल्मानाना त्यांची पितृभू नाकारणे , हा सावरकरांचा अपमान नव्हे काय?

In reply to by चंपाबाई

भारतीय मुस्लिम अजून भारतीय संस्कृती मानणारे आहेत, पाकिस्तान चे मुस्लिम आत अरबस्तान चे जाले आहेत। भारत बद्दल त्यांना एव्हडा द्वेष कि ते भारतीय आणि आपण हे एकाच बापाचे पोट्टे आहोत हे विसारलेत। त्याऐवजी त्यांनी अरबी बाप लाऊन किंवा मानुन घेतलाय

In reply to by चंपाबाई

मग पाकिस्तानी मुसल्मानाना त्यांची पितृभू नाकारणे चंपाबाई त्यांना मुळात "मातृभूमी किंवा पितृभूमी " हा विचारच अमान्य आहे. जे काही आहे ते सर्व "अल्लाच्या मर्जी" बद्दल आहे आपण जन्मतः डॉक्टर नव्हता. "प्रशिक्षणाने" झाला आहात. सत्तर वर्षे "भारत तेथील मुसलमानांवर अन्याय करीत आले आहेत" असेच प्रशिक्षण पाकिस्तानच्या मुलांना शाळांत इतिहासात शिकवले गेल्याने ते भारत द्वेष्टे झालेले आहेत. त्यातून त्या राष्ट्राची निर्मिती धर्माधारित आहे. आपला धर्म( सुन्नी मुसलमान) सोडला तर दुसरे सर्व लोक "जगण्याच्या लायकीचेच" नाहीत हे बाळकडू मदरश्यामध्ये बालकांना दिले गेल्यामुळे तेथील इतर मुसलमानांचे शिरकाण करणे हि अल्लाची सेवा आहे हे समजणाऱ्या लोकांना इथे कशासाठी आश्रय द्यायचा? पाकिस्तानच्या चारही प्रांतांमध्ये केवळ धर्म सोडला तर एकात्मता अजिबात नाही. त्यांच्यात एकच समान धागा आहे तो म्हणजे भारत द्वेष. तेंव्हा तेथील पूर्वग्रहदूषित मुसलमानांना आपण आपल्याकडे "सामावून" घेण्याचा प्रश्नच नाही. बाकी आपल्याला "सावरकरांचे विचार" आठवल्याचे( चुकीच्या कारणासाठी का असेना) पाहून डोळे पाणावले.

In reply to by सुबोध खरे

मुसलमानांना काय मान्य-अमान्य असेल ते असेल; सावरकरभक्तांना सावरकरांचे विचार मान्य आहेत की नाही? अखंड भारतवर्षाचं स्वप्न काय त्या त्या प्रदेशातले लोक "साफ" करुन साध्य करणार काय? सावरकर महान होते; पण सावरकरभक्त हा एक महाविनोदी प्रकार आहे आजच्या काळातला.

In reply to by नगरीनिरंजन

नगरीनिरंजन, वडाची साल पिंपळाला लावताय? पाकिस्तानातल्या जनतेने पाकिस्तान कधीच मागितला नव्हता. त्यामुळे तिथली साफसफाई करायचा प्रश्नंच उद्भवत नाही. कोणाची साफसफाई करायला हवीये ते सावरकरभक्तांना चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे चिंता नसावी. :-) आ.न., -गा.पै.

In reply to by श्रीगुरुजी

5 बाय 5 च्या लॉनला पाणी घालणे अन 5000 किमी बाय 5000 किमी अंतराच्या लॉनला पाणी घालणे ह्यातले अंतर तुम्हाला झेपत नाही हे स्पष्ट झाले गुर्जी, कारण तुम्ही फक्त लॉनची हिरवाई किंवा झूळवाहतं पाणी बघताय, कुठला कोण तो इस्राएल, अमेरिकेच्या जोरावर अन फक्त तेटरपणा करताच बातम्यात असलेल्या कोकणच्याही पावशेर असलेल्या देशाच्या पॉलिसी अन खंडप्राय प्रिय भारताच्या पॉलिसी ह्यात अंतर समजावे म्हणून आपणाला शुभेच्छा!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

"कुठला कोण तो इस्राएल, अमेरिकेच्या जोरावर अन फक्त तेटरपणा करताच बातम्यात असलेल्या कोकणच्याही पावशेर असलेल्या देशाच्या पॉलिसी..." इतक्या पटकन तुम्ही इस्राएलला झटकून टाकलंत. १९९९ साली 'ई. तिमोर' ह्या अगदी चतकोर प्रांताला इंडोनेशियापासून 'मुक्त' करून त्याचे बस्तान बसवण्याचा प्रयत्न करण्याचे महत्कार्य पश्चिमी राष्ट्रांनी उत्साहाने केले. ह्यात ख्रिश्चन धर्माच्या आस्थापनाचाही हात होता. अगदी सर्व प्रकारे (फायनॅन्शियल, अ‍ॅडमिन, इत्यादी) मदत मिळूनही नंतर त्या 'देशा'चे काय झाले? आपापसातील मारामार्‍या, राष्ट्रप्रमुखाच्या खुनाचा प्रयत्न, लाथाळ्या वगैरे सगळे तिथे सुरू झाले आहे. दोनेक वर्षांपूर्वी सुदानमधून फुटून निघालेल्या द. सुदानची काय परिस्थिती आहे? तेव्हा, नुसता एक प्रदेश टीचभर आहे, आणि त्याला महासत्तेचा पाठिंबा आहे, ह्याव्यतिरीक्तही त्या देशांतील जनतेची प्रगति करण्याची मानसिकता असणे जरूरी आहे.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

धन्य जाहलो तुमचे विचार वाचून, कोण कुठला इस्राईल, हा तोच इस्राईल आहे ज्याने अमेरिकन बैंकिंग व्यवस्था पोखरून ठेवली आहे, शत्रुशी लढण्याचे बळ मनगटात नाही तर मनात असावे लागते, इस्राइलने काय गांधी तत्वज्ञान वापरून आपली मान अरबांच्या हातात द्यावी काय?

In reply to by मोदक

काय संबंध?? गोरक्षक मुद्दा मांडलाय त्यांनी अन तो समसामयिक मुद्दा (करंट अफेयर) आहे भाऊ, तुम्ही डांगेंचे सरसकटीकरण करताय का? का मुद्दाम तिसरेच वळण देताय ?? डांगेबुआ किंवा आम्ही, आमचे लफडे एकच आहे, आम्हाला बाबू बजरंगी सुद्धा राष्ट्रद्रोही वाटतो अन तिस्ता सेटलवाड सुद्धा, आम्ही माया कोडणानीला सुद्धा शिव्या घालतो अन कविता कृष्णनला सुद्धा, फक्त बदल्यात आम्हालाही शिव्याच मिळतात (अर्थात आम्ही तो डबल बोनस समजतो, विकटीम नाही समजत स्वतःला), आपलं आयुष्याचं तत्व आहे "भारत....भारत अन फक्त भारतच" जो माणुस जी बाजु माजणार त्यांना मी शिव्याच घालणार.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

तुम्ही डांगेंचे सरसकटीकरण करताय का? का मुद्दाम तिसरेच वळण देताय ?? त्यांना पण आजादी हवी असेल असे वाटले.. किंवा किमान भारताचे तुकडे बिकडे व्हावे असे वाटत असेल तर स्टँड क्लियर असावा म्हणून विचारले. बादवे.. काड्या टाकल्यावर पण त्याला प्रत्युत्तर देवू नये असे काही अपेक्षित आहे का..?

In reply to by मोदक

त्यांना पण आजादी हवी असेल असे वाटले.. किंवा किमान भारताचे तुकडे बिकडे व्हावे असे वाटत असेल तर स्टँड क्लियर असावा म्हणून विचारले. ओके ठीक आहे, तुम्ही शिक्के मारलेच आहेत तर आता समजवणे वगैरे उपयोगाचे नाही, हॅपी पूर्वग्रह टू यु बॉस! डांगेंना कम्युनिस्ट समजणे किंवा त्यांना असले प्रतिसाद देणे ह्यातून तुमचे काही वैयक्तिक असले तर मला माहिती नाही किंवा डांगेंची वकिली ही मी करत नाही, फक्त जवळच्या मित्रमंडळीत कोणी जर stereotype करत असले तर मात्र ते मी बोलून दाखवतो बादवे.. काड्या टाकल्यावर पण त्याला प्रत्युत्तर देवू नये असे काही अपेक्षित आहे का..? बाय द वे, तुम्हाला गोरक्षक मुद्दा काडी का वाटावा म्हणे इथे??

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बाय द वे, तुम्हाला गोरक्षक मुद्दा काडी का वाटावा म्हणे इथे?? अहो त्यांनीच खाली लिहिले आहे की.. गोमूत्र वगैरे..

In reply to by मोदक

मोदकराव, मला आझादी हवी किंवा भारताचे तुकडे हवेत असे माझ्या कोणत्या प्रतिसादातून दुरान्वयेही ध्वनित होते आहे ते सिद्ध करावे, तुम्हाला वाट्टेल ते बोलण्याची मुभा उगाच मिळू शकत नाही. मला काय हवंय या बाबतीत तुम्ही तुमचा पूर्वग्रह माझ्यावर लादत आहात हे वरच्या प्रतिसादात स्पष्ट आहे, स्वतःच मेलेल्या गायीचे चामडे सोलायला बोलवायचे आणि मग कांगावा करत गावासमोर गोहत्येचा बोभाटा करायचा ह्या पद्धतीत आणि तुम्ही वर करत असलेल्या पद्धतीत तिळमात्र फरक नाही, कायम संतुलीतपणाचं तुणतुणे वाजवणाऱ्यांकडून हि अपेक्षा नव्हती, बादवे, काडी टाकली तर योग्य उत्तर द्याना, गोध्राचा काय संबंध? गौरक्षकांचा त्रास सर्वानाच (सर्वधर्मीय)होतोय, तुमच्या रोजच्या जीवनात बघत नसाल पण गौरक्षक मोदीसरकार आल्यापासून माजलेत हे मी तरी बघतोय, त्यांची बाजू घेऊ नका, जसे आईसीस वाले बिनडोक तसे हे हिंदुत्ववाले बिनडोक, आम्हाला हे दोन्ही बिनडोक आमच्या भारतात नकोत, मला मशिदीचे भोंगे नकोत कि गणपतीचे डीजे नकोत,आझादी हवीच आहे पण सर्वच धर्मातल्या धर्मांधांकडून... माझा स्टॅन्ड क्लिअर झाला असावा अशी अपेक्षा आहे, तसेच यापुढे कुणाला काय वाटत असेल याचे स्वतःच्या पूर्वग्रहानुसार आडाखे बांधू नका, त्यालाच सरसकटीकरण म्हणतात, जे तुम्हाला अजिबात आवडत नाही, नाहीतर पोटात एक ओठात एक असं दिसून हसं होऊ शकतं, ते टाळलं तर उत्तम, बाकी, शुभेच्छा!

In reply to by संदीप डांगे

हैला.. इतके काय चवताळताय..? धागा मागे पडत होता म्हणून मी पण थोडे गोमूत्र शिंपडायचा प्रयत्न केला हो. हलके घ्या की. बाकी या साद-प्रतिसादा मध्ये वेगळे काही अपेक्षित नव्हते. दहशतावाद्यांचे मानवाधिकार जिवापाड जपणारे दहशतवादाला बळी पडणार्‍यांचे मानवाधिकार सोयीस्करपणे विसरतात तसे तुम्ही काडी टाकल्यानंतर दुसराही तशीच काडी टाकू शकतो हे तुम्हाला पचवायला जड का गेले याची उत्सुकता आहेच. मी वैयक्तीक झालो असे म्हणणे असेल तर मी प्रतिसाद मागे घेतो. आपले बाकी मुद्द्यांवर कितीही मतभेद असले तरी तुम्हाला (किंवा आणखी कोणालाही) स्टिरीओटाईप करण्याची मला आवश्यकता भासणार नाही. तुम्हालाही शुभेच्छा..!!

In reply to by मोदक

शिक्क्यांचा राग आहे, इतकेच कारण पुरेसे आहे चवताळायला, जसा तुम्हाला सरसकटीकरनाचा आहे तसाच!

In reply to by संदीप डांगे

कळाले हो.. तुम्ही, डॉक्टर खरे, बोका, बापू ही सगळी शिनेर मंडळी.. तुमच्यावर शिक्के मारायची आगळीक आमच्याकडून होणे नाही.

In reply to by संदीप डांगे

त्यांना आश्रय देण्याचा प्रश्नच गैरलागू आहे. ते काही बाहेरून इथे येत नाहीत. ते इथलेच आहेत.

डांगे अण्णा / मास्तर गोरक्षक आणि दलित हा मुद्दा येथे कसा आला? धागा आयसिसचा आहे ना? का तुम्हालाहि चंपाबाई( कि बुवा) चा गुण लागला

सोन्याबापू, हे काय लिहिलंय तुम्ही? भयंकर गैरसमज झालेले दिसताहेत तुमचे. कृपया हे विधान पहा : १. >> तर साक्षात फाळणीच्यावेळीही हिंदूंचे शिरकाण पाहून देखील ज्यांना धर्म, नवा हक्काचा लोकशाही देश ह्यांच्याप्रती >> ममत्व न राहता जन्मस्थानाशी (भौगोलिक) घट्ट इमानदार राहायची इच्छा होती, त्यांच्यावर आज भरोसा ठेवायचे >> कारण नाही असे वाटते, हे तुम्हीच म्हणताय की इतर कोणी? बहुतेक तुम्हीच असं गृहीत धरतो. अ. पहिली गोष्ट म्हणजे भारत आणि पाकिस्तान आधी स्वतंत्र झाले आणि नंतर सीमारेषा ठरली. त्यामुळे आजच्या पाकिस्तानातल्या (विशेषत: लाहोरातल्या) हिंदूंना सगळं सोडून पळून जावं लागेल अशी शंकाही आली नाही. जेव्हा दंगली सुरू झाल्या तेव्हा पळून जाणं धोक्याचं होतं. जे हिंदू भारतात पळून आले ते नाईलाजाने आले आहेत. आ. पाकिस्तान हे सेक्युलर राष्ट्र राहावे अशी जिनांची इच्छा होती. त्यांनी असेंब्लीमधल्या पहिल्या भाषणात नि:संदिग्ध शब्दांत अशी ग्वाही दिली होती. (असं होतं तर पाकिस्तान वेगळा काढलाच कशाला हा प्रश्न उपस्थित होतो. पण त्यासाठी वेगळा धागा काढूया.) त्यामुळे दंगली संपल्यावर हिंदूंना पाकिस्तान सोडून जायचं कारण नव्हतं. इ. हिंदू जन्मस्थानाशी घट्ट इमानदार राहतात कारण अथर्ववेदात 'माता भूमि पुत्रोऽहं पृथिव्या' असं सूत्र आहे. केवळ राजवट बदलली म्हणून हिंदू भारताचा शत्रू होत नाही. ई. नेहरूंनी अंगिकारलेलं तत्कालीन धोरण शरणार्थींना सोयीचं नव्हतं. कन्हैय्यालाल तलरेजा सिंधमधून रातोरात भारतात पळून आले तेव्हा नेहरूंनी त्यांना परत पाठवायचं ठरवलं. शेवटी कित्येकांनी विरोध केल्यावर तलरेजांना भारतात राहायची कशीबशी अनुमती मिळाली. नेमकं हेच धोरण मोदी येईस्तोवर चालू होतं. अगदी तस्लिमा नसरीनला सुद्धा भारतात राहू दिलं गेलं नाही. कल्पना करा कोणी गरीब हिंदू शरणार्थी म्हणून भारतात आला आहे आणि भारत सरकार मोठ्या प्रेमपूर्वक रीतीने त्यास परत पाकिस्तानी सरकारच्या तावडीत सोपवत आहे. २. >> आज पाकिस्तान मध्ये हिंदू कापत आहेत म्हणून ही माणसे गळा काढणार, मग आपल्याकडली काही धर्मप्रेमी >> गाढवे त्यांची उष्टी खरकटी काढायची बात करणार, ... धर्मप्रेमी गाढवे? कुणाच्याही अध्यातमध्यात नसलेल्या हिंदूंना कापून काढण्याविरुद्ध निषेध करणारे गाढव आहेत? पाकिस्तानात २४% हिंदूंचं शिरकाण होऊन ते अवघ्या २% वर उतरलेत. तुम्ही त्या अभाग्यांना भारतात येऊ देऊ नका म्हणताय आणि वर त्यांच्या हालअपेष्टांचा निषेधही करायचा नाही म्हणून सांगताय? काय हे! ३. >> हे झाले, ते सगळे भारतात आले, अन उद्या जर पाकिस्तान ने त्यांना इन्सेंटिव्ह किंवा किमान सुरक्षा देऊन >> परत बोलावले तर ?? ती किती मोठी रिस्क असेल हे आपण इमॅजिन करू शकता का? गेल्या तेराशे वर्षात उलटी गंगा किती वेळा वाहिली आहे? काहीतरीच युक्तिवाद नका करू. असो. एकंदरीत सांगायचं झालं तर तुम्ही ज्याला भारतीय म्हणता त्यातलं भारतीयत्व हिंदूंमुळे जिवंत आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

काय बोलणार असो! तुम्हाला तुमची मते लखलाभ मला माझी, भारतीयत्व अन हिंदुत्व कधीच एक नव्हते नाही अन नसेल, ही मात्र काळ्या दगडावरली रेघ आहे :)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सोन्याबापू, मला तुमची मतं पटली नाही तरी तुमच्यावर माझी मतं लादणार नाही. केवळ वस्तुस्थिती सांगून तुमच्या सद्सद्विवेकबुद्धीवर सोडून देईन म्हणतो. हिंदूंमुळे भारतात सेक्युलारिझम टिकून आहे हे दिल्लीच्या जामा मशीदीचे इमाम बुखारी यांचं मत आहे. भाऊ तोरसेकरांच्या या लेखात याचा उल्लेख आहे : >> ‘राजकीय पक्षांना फ़क्त अल्पसंख्यांक आणि दुर्बळ समाज घट्काची मते मिळवणे तेवढे माहित आहे, पण त्या पक्षांनी >> अशा वर्गाच्या कल्याणासाठी काहीच केलेले नाही. देशामध्ये धर्मनिरपेक्षता टिकून राहिली असेल तर ती कुठल्या >> राजकीय पक्षामुळे नव्हेतर हिंदूंमुळे शिल्लक उरली आहे.’ मूळ इंग्रजी लेख इथ आहे : http://www.rediff.com/news/2006/oct/28bukhari.htm भारतात जिकडे हिंदू अल्पसंख्य झाले ते भाग भारतापासून तुटले. हेच भाग स्वत:ला भारत म्हणवून घेत नाहीत आणि नेमके तेच भाग आज दहशतवाद्यांच्या तावडीत सापडले आहेत. काश्मीरही त्याच मार्गाने चाललाय. तेव्हा माझ्या मते हिंदुत्व हेच भारतीयत्व आहे. मी इथे थांबतो. :-) आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

हिंदूंमुळे भारतात सेक्युलारिझम टिकून आहे. यात दुमत नाहीच इस्लामला लोकशाही "मान्यच" नाही. तेथे फक्त "धर्माधिष्ठित खलिफा"चेच राज्य असू शकते. त्यामुळे कोणत्याच इस्लामी राष्ट्रात लोकशाही नीट नांदू शकत नाही. मग धर्मनिरपेक्षता तर दूरच राहिली.

In reply to by सुबोध खरे

इस्लाम येण्यापुर्वी भारतात चारशे की कितीसे राज्ये की संस्थाने होती ... ते इक्ष्वाकु , यादव , भरतकुळ ..... जनतेला वतनदारी दिली की जनता माजते ! वतनदारी बंद ! पण छत्री मात्र माझ्याच घराण्यात राहील ... जी म्हाराज ! हे सगळं लोकशाहीचंच चित्रण का ? बायदवे , एका मुसुलमानाने बांधलेल्या लाल किल्ल्यावर परवा लोकशाही देशाचा झेंडा सालाबादप्रमाणे फडकणार आहे ... तुम्ही लेफ्फ्फ राइट्ट करत सलाम ठोकायला जाणार नै का ?

In reply to by चंपाबाई

मग आपलं म्हणणं काय? बामियान बुद्धाची मूर्ती तोफा डागून नष्ट केली तशी करावी काय? मी तर उलट म्हणेन एका मुसलमानाने बांधलेल्या किल्ल्यावर तिरंगा फडकतो आहे हि अभिमानाची गोष्ट आहे. जगभरात कुठेही कुठल्याही वास्तूवर(इस्लामाबादच्या संसदेवर असेल तर नक्किच) तिरंगा फडकणार असेल तर तिचा मला जरुर अभिमान आहे आणी वाटेल.

In reply to by चंपाबाई

तुम्हाला नाहि दिसला? शक्यता कमिच आहे म्हणा. ज्याच्याशी काहि घेणंदेणंच नाहि त्याच्याकडे बघावं तरी का... नाहि का?

In reply to by चंपाबाई

देशप्रेम?? हि काय भानगड म्हणायची? बद्धकोष्ठमुक्तीसोबत नशापाणि सुद्ध पुरवतं का एरंडेल ?

गुर्जी, आता "मिपासिस" होउ घातलेय त्यावर पण एक अमर धागा येउ द्यात.शिंपण करायला संडां आहेतच.

आयसिस वाले कितीका मेंबर गोळा करेनात. आमच्या भाजपाने मोदींच्या व शहांच्या मार्गदर्शनाखाली , मिस कॉल द्या अन मेंबर व्हा, असा मेंब (ढ) रं गोळा करायचा जागतिक विक्रम केलेला आहे. त्यामुळे आमि नै बै कुनाला घाबरत !

In reply to by चंपाबाई

बरोबर आहे बाईसाहेब ! तुमचं शौर्य बघून दस्तुरखुद्द आम्हीच तुम्हांस वचकून आहोत ! मग बाकी जगाची काय कथा !! आ.न., -गा.पै.

मुंबईतील ५ जणांनी आयसिसमध्ये जाण्यासाठी देश सोडला. http://www.loksatta.com/desh-videsh-news/mumbai-5-people-left-india-to-… त्यांना तिकडेच मरून द्यावे व तिथूनच स्वर्गात जाऊ द्यावे. त्यांच्या स्वर्गप्राप्तीच्या आड येऊ नये. Good riddance!

सोन्याबापू , तुमचा मुद्दा समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहे. फाळनीच्या काळात , १९४० च्या दशकात काय परिस्थिती होती, त्याचा विचार करुयात. आजचा भारत, आजचा पाक- बांग्लादेश असे दोन भूभाग होते. ह्या भूभागात चार लोक हहिंदू १. आजच्या भारतातले हिंदू/ गैरमुस्लिम २. आजच्या भारतातले मुस्लिम ३. आजच्या पाक-बांग्लादेशातले मुस्लिम ४. आजच्या पाक-बांग्लादेशातले हिंदू/ गैरमुस्लिम . . . ह्यातल्या हरेकापुढे काय पर्याय होते पाहू. १. आजच्या भारतातले हिंदू/ गैरमुस्लिम :- ह्यांनी पाकिस्तानात जायचा प्रश्नच नाही. पाकिस्तान धर्माधिष्ठित देश आहे. मुस्लिमांसाठी आहे. तेव्हा ह्यांनी आहे तिथेच रहायचं ठरवलं असावं. तसं न ठरवता, पाक- बाम्ग्ला देशात जातो असं जरी कुणी म्हटलं; तरी त्या म्हण्ण्याला अर्थ नाही. ते शक्य नव्हतं. ह्यांच्या मर्जीचा, हानीचा थेट प्रश्न तितकासा तीव्र नसावा ( तुलनेने) . . २. आजच्या भारतातले मुस्लिम भारत सरकारने हा देश फक्त हिंदूंचा असनार नाही. उपासना पद्धतीवर भेदभाव केले जाणार नाहित; जो इथलाच आहे, ज्याला इथेच रहायचय; त्यानं इथे रहावं. आमचे नागरिक म्हणून तुमची सुरक्षा आम्ही करु; असं आश्वस्त केलं होतं. दंगे झाले, तरी सरकारचं अधिकृत धोरण मुस्लिमांना दुय्यम नागरिक करुन सोडणं हलाखीचं जगायला लावणं हे नव्हतं. होता होइल तोवर सरदार पटेल व त्यांच्या गृहमंत्र्यांनी कायदा सुव्यवस्था राखायचा प्रयत्न केला. इथल्या मुस्लिमांची इथे राहयची इच्छा असेल तर ती पूर्ण झाली. जर एखाद्या भारतातल्या मुस्लिमाला वाटलं की भारतापेक्षा माझं, माझ्या कुटुंबाचं भलं पाकिस्तानात होणार आहे; तर त्याच्या स्वागताची भूमिका पाकिस्तान सरकारची होती. " मुस्लिमहो, या, इकडे या. एक नवा देश घडवू इथल्या मुस्लिमांसाठी. तुमची रहाय-खायची वय्वस्था आम्ही करु. न्निश्चिंत होउन या." असं जणू आवाहन होतं. ( नंतर 'मुहाजिर' आणि त्या प्रश्नाचं काय झालं; ते तूर्तास बाजूला ठेवू.) म्हंजे इथल्या मुस्लिमाला ऑप्शन होता की उद्योगधंदा इथे असेल तर इथेच रहावे. गरज पडल्यास सरकारकडे गार्‍हाणे मांडावे सुरक्षेचे. सरकार कटिबद्ध आहे. नैतर शेजारी देश आहेत. म्हणजे खरे ऑप्शन ह्यांना उपलब्ध होते. . . ३. आजच्या पाक-बांग्लादेशातले मुस्लिम :- ह्यांना आहे तिथेच राहिल्यास ...म्हणजेच पाकमध्ये राहिल्यास "अधिक प्राधान्याची वागणूक मिळण्याची शक्यता" दिसत होती. किम्वा निदान आहे तिथेच राहिल्यास दुय्यम न ठरण्याची ग्यारंटी होती. शिवाय जर त्यांनी भारतात यायचच ठरवलं काही कारणानं; तर त्यालाही तत्वतः भारत सरकारची ना नव्हती. संख्येने थोडे का असेनात, असेही काही मुस्लिम आलेत. काही चटकन आथवणारी उदाहरणं -- शाहरुख खानचे एक नातेवाइक ( काका की आजोबा ) आझाद हिंद फौजेत होते. त्यांना पाकिस्तान ही कल्पनाच पटेना. ( 'जमात -ए- इस्लामी हिंद' ह्या धार्मिक , मुस्लिम संघटनेने देखील फाळणीला विरोध केला होता. कारण ? देशाचा आधार समान धर्म नव्हे तर समान संस्कृती असावी; अशी त्यांची निदान अधिकृत भूमिका होती/आहे.) दिलीपकुअमार ऊर्फ युसुफ खान ह्यांचे जन्मगाव पेशावर. पण त्यांनीही फाळणीनंतर भारतात राहणे पसंत केले. . . ४. आजच्या पाकिस्तानातले गैरमुस्लिम्/हिंदू -- तुम्ही आजवर जिथे रहात आलेले आहात; तो भूभाग आता धर्माधिश्ठित मुस्लिम राष्ट्र म्हणून गणला जाणार आहे; हे त्यांना सांगण्यात आलं. आख्ख्या सरकारी यंत्रणेनं ह्यांचं अस्तित्व नाकारलं. "तुम्ही आता आमच्या पाकिस्तानात रहायचं नाही; असा प्रस्ताव आता फायनल झालेला आहे" असा चमत्कारिक संदेश जणू ह्यांना गेला. हे न्याय्य होतं काय ? आजपासून तुम्ही इथले नाहितच. असा थेट संदेश. वरील गटांकडे बघा. त्यांनी कुठे रहायचं ह्याचं त्यांना स्वतंत्र्य आहे. (गट क्र २ व गट क्र ३) गट क्र१ ला तसे स्वातंत्र्य नसले ; तरी तसे थेट फारसे काही नाही. ( गट क्र १. चे उदाहरण मह्णजे कर्नाटकातला हिंदू. त्या कर्नाटकातल्या हिंदूला जर सांगितलं की तुझा आजपासून पश्चिम पंजाब ,सिंध , पूर्व बंगाल प्रांताशी संब्म्ध नाही. तू तिथला फर्स्ट क्लास सिटिझन होउ शकत नाहिस. तर त्याची प्रतिक्रिया किती तीव्र असनार आहे ? त्यात भावनात्मक मूल्य जरुर असेल. अस्मितेचा प्रश्नही असेल. आपल्या देशाचे तुकडे पडताना पाह्णं हाच क्लेशदायक अनुभव.मान्य. पण थेट व्यावहारिक असं धर्मसंकट असण्याचे चान्सेस कमीच. तो फार तर खांदे उडवत किंचित नाराजीनं "ओके" म्हणेल.) गट क्र २ व गट ३ ला स्वातंत्र्य आहे. गट क्र १ ला स्वातंत्र्य नाही; पण त्रासही नाही. गट क्र ४ चे काय ? त्याने कुठे राहायचय हे बाकीच्या तीन गटातल्यांनी मिळून फायनल करुन टाकलेलं आहे. "तू आजवर कुठे राहत होतस, तुझे वाडवडिल काय करत होते, कशाचा काहीही संब्म्ध नाही. आम्ही ठरवलय. तुझं अस्तित्व शून्य. तुझं जे काही तिथे असेल, उद्योग धंदा, शेती वाडी, घर दार सगळं बर्‍या बोलानं सोड. आणि धावत सूट. जीव घेउन पळत सूट दिल्लीकडे. तिकडे आश्रय मिळेल. तिकडे निर्वासित म्हणून रांगेत उभा रहा आणि भिक्षा म्हणून जे मिळेल ते खा. हात पसरुन उभा रहा." हा संदेश त्याच्याकडे गेलाय. त्यानं कुठे रहायचं हा निर्णय आधीच केला गेला होता. फार फार मोठ्या प्रमाणावर ठेचला, चिरडला, भरडला गेलेला ,मुस्क्टफ्दाबी झालेला वर्ग हा आहे. जे दंगे झाले; त्यात उरलेल्या तीन गटांनीही बरच सोसलं. हिंसेत अनेकानेक जीव गेले. दहा वीस लाख )दोनेक मिलियन जीव गेले) असावेत. पण व्यवस्थेनं भक्कम पाठिंबा त्यांच्या शिरकाणास दिला नव्हता. . . बॉस, एकदा शांत डोक्यानं विचार करा. चौथ्या गटाकडे काय ऑप्शन होतं. घर दार सोडून येणं भाग होतं. )विकायची सोय नाही. विकायसाठी भागात स्थैर्य लागतं साहेब. जर सर्व पब्लिकला माहितित्ये की तुम्ही सगळं चंबु गबाळं आवरुन पळणारच आहात; तर तुमच्याकडून घर खरेदी करायची कोणालाच गरज नाही.) पाकिस्तान जेव्हा म्हणत होतं " या मुस्लिमहो इकडे या रहायला आम्ही तुमच्या रहायची खायची प्यायची वय्वस्था करु. बडदास्त ठेवू." तेव्हा ते अचानक हे सगळे " व्यवस्था " कशी अक्रणार होते ? " बडदास्त " कशी ठेवणार होते ? एक प्लान होता, अशा पळून गेलेल्या हिंदूंची घरं तिकडून करुन ; आलेल्या मुस्लिमांत वाटून टाकायचा! असो. अवांतर होतय. सिंधमधल्या हिंदू माणसानं काय करावं ? कुटुंबाचं काय करावं? लेकि बाळींची काळजी कशी घ्यावी? खाणार काय? . . ह्याचवेळी जिन्नांनी चमत्कारिक वाटेल अशी भूमिका मांडली " हे मुस्लिम राष्ट्र असले तरी प्रोग्रेविश असनार आहे. निधर्मी मुस्लिम राष्ट्र राहणार आहे." ( नंतर पाकिस्ताननं जिन्नांच्या ह्या इच्छेचं किती पालन केलं ; तो भाग वेगळा.) ह्या अशा वेळेला चौथ्या गटातल्या लोकांचा संभ्रम वाढला असू शकतो. बाहेर जाउन खायचे काय, ते माहित नाही, सध्या कसे बसे तगून राहूत. स्थानिकांच्या मदतीने काही दिवस दबून , लपत छपत काढून; परिस्थिती निवळल्यावर पुन्हा आपापला कामधंदा सांभाळूत ; असा विचार केला सणं अशक्य आहे का ? असा विचार करा. देव न करो पण उद्या पुन्हा माझ्या मायदेशावर असच संकट आलं तर ? आणी घोषित झालं की दक्षिणेतल्या चार राज्यांत काय ते तुम्ही हिंदू राहू शकता. बाकीच्यांनी इथून सटकावं. कल्पना करा. महाराष्ट्रात शेती करनारा माणूस केरळात समुद्र किनार्‍यावर जाइल ? त्यानं का जावं ? त्याच्या वतीनं परस्पर कुणी कसा काय निर्णय घेउ शकतं ? जिवंत राहन्याच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली होते आहे. . . फाळणी ही अशी झाली त्यावेळीच चमत्कारिक परिस्थिती घेउन झालेली आहे. त्यावर लागलिच तार्किक वाटेल अशी भूमिका घेउन "ते शत्रू देशाचे नागरिक आहेत" असं त्यांना ट्रीट केलं जावं का ? मुळात हे दोन वेगळे देश नव्हतेच. त्यांनी तुमच्या शत्रू राष्ट्रात राहून तिथले टॅक्स पेयर हॉण्याचा निर्णयही स्वतःहून घेतलेला नाही. तो प्रश्न अजूनही अर्धवट आहे. "तो प्रश्न संपलाय. तिथले नागरिक तिथलेच." असं प्लीझ म्हणू नका; ही कळकळिची विनंती. त्यांना तिथलं सरकार disown करतय. आणि ते तसं केलं जाण्याला इतर तीन गटांतले लोक जिम्मेदार आहेत. त्यांनी परस्पर केलेल्या वाटणीत धिंडवडे चौथ्या गटातल्या लोकांचे निघालेत. ही गुंत आहे; हे समजते आहे. प्रत्येक गटातल्या लोकांची आपली दु:खं , कन्सर्न असणार हे ठाउक आहे. पण तुमच्याविषयी संपूर्ण आदर ठेवूनही ही विनंती करतो ही भूमिका काहिशी निष्ठूरपणाची आहे त्यांच्याप्रती. हा प्रश्न एकरेषीय नाही. गुंतागुम्तीचा आहे. विचार करुन बघा. . . मुस्लिम हे शत्रू आहेत; किम्वा पाकडे कायमचे शत्रूच आहेत; किंवा भारत हिंदूंचाच आहे; ह्यातली एकही भूमिका मी मांडत नाहिये. इतिहासाच्या चाकच्या विचित्र कात्रीत अडकललेल्या समजाप्रती जरा कणव असू द्या; इतकच म्हणतोय.

In reply to by मन१

सांगायचा मुद्दा -- जमेल तितपत आहे तिथेच ह्यांनी जुळवून घ्यायचा प्रयत्न केला. एखाद दोन पिढ्यांपर्यंत हे जमलं. नंतर तिथली परिस्थिती अधिकाधिक भीषण होत चालली. म्हणून मग जीवाच्या भीतीनं शेवटी त्यांनी आपल्याकडे आश्रय मागितलाय. आश्रिताकडे आपण कसं पाहणार आहोत ? बाम्धवाकडे आपण कसं पाहणार आहोत? . . १९७१ ला भारतानं अनेकानेक रेफ्युजी कॅम्प्स उघडून पूर्व पाकिस्तानातल्या म्हंजेच बांग्लादेशातल्या लोकांना मानवी दृष्टीकोनातनं मदत केली. शरनार्थ्यांची होइल तित्पत काऴजी घेतली. अगदि हिंदू- मुस्लिम सर्वच शरणार्‍थ्यांकडे लक्ष दिलं. तेव्हा तर फाळणी होउन केवळ पंचवीस वर्ष झालं होती. जखमा ताज्या होत्या. तरी भारत माणुसकी विसरला नाही. बंधुभाव विसरला नाही. आज आपण शरणार्थ्याकडे काय म्हणून पाहणार आहोत ? सहिष्णुतेचा गौरव करणारा व परंपरा आंतरराष्ट्रिय व्यासपीठावर अभिमानानं सांगणारा हा देश आज एका अर्थानं आपल्याच नागरिकांकडे कसा पाहणार आहे?

In reply to by मन१

शांतपणे विचार केला, तुम्ही लिहिलेला प्रतिसाद नीट वाचला, काही भाग अदमासे आहेत पण ते चालण्यासारखे आहेत, कारण माझे ही काही मुद्दे अंदाजे किंवा अझ्युम्ड होतेच की, हेल्दी डिबेट मध्ये ते बेनेफिट समसमान हवेच तर, तुमचा मुद्दा पूर्ण जरी नाही तरी बव्हंशी पटला आहे, मी माझा मुद्दा मागे घेतो, अर्थात माझी मानसिकता अशी व्हायला काही करणे आहेतच, अर्थात ती कायमच जस्टिफाईड असावीत असा माझा दावा नाही, शुभेच्छा :) -बाप्या

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

इन जनरल भावना समजून घेतल्याबद्दल आभार. काही भाग अदमासे आहे (शिवाय मी आकडेवारी दिलेलीच नाही ) हे ही मान्य. पुनश्च आभार.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

इतक्यात मिपावर इतकं समंजसपणाने प्रतिसाद देण्याचं प्रमाण थोडं वाढलय असं जाणवतय. बरं आहे.

In reply to by अर्धवटराव

विशेषतः "नितएरंडेल प्राशन स्वमुख सुर्य पिचकारी सहित मानभावी मानवतावाद्प्रेमी, एककल्मी कारेक्रमप्रवीण मसीह्यांचा सक्रीय धुळवड सहभाग असूनही"
वाचकांचीच पत्रेवाला नाखु