Skip to main content

एक अतूट नातं

लेखक ज्योति अळवणी यांनी बुधवार, 10/08/2016 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
समुद्र आणि मी एक अतूट नातं शब्दांच्या अलिकडचं.... भावनांच्या पलीकडचं... समुद्र आणि मी एक अतूट नातं भरतीच्या लाटांचं ते उचंबळून येणं नात्यातली गुंतवणूक वाढवून जाणं समुद्र आणि मी एक अतूट नातं खिन्न मनाने आकाशात टक लावणं तेव्हाच नेमकं ओहोटीचं मन स्पर्शून जाणं समुद्र आणि मी एक अतूट नातं अनेक आयुष्य त्याने सामावलीत स्वतःत अनेक नात्यांची आंबट-गोड चव .....माझ्या मनात म्हणूनच जाणवतं त्याचं माझं एकत्व समुद्र आणि मी एक अतूट नातं
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1700
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

वरील कमेंट करताना शब्दांची अदलाबदल करून काही वेगळा अर्थ पकडता येतो का हे पाहत होतो.भावनांना शब्दरूप देताना शब्दांच्या पलिकडे असलेल आणि भावनांच्या अलिकडे असण हे नेमकी अवस्था दाखवते.असो.

मला नेमकं उलट म्हणायचं होतं. शब्द सुचत नाहीत भावना सांगायला आणि भावना तर अनावर होतात... असं मला म्हणायचं होत