गोदो आला गोदो आला
गोदो आला गोदो आला
खेळखेळणी घेउन आला
गोदो आला गोदो आला
अहा हर्ष तो मनी दाटला!
गोदो आला गोदो आला
कसा दरबार पाहा सजला
स्वागत करण्या एक गलबला
हरहर गोदो निनाद झाला
गोदो आला गोदो आला
ओवाळावे पटकन त्याला
भेटवस्तु द्या माणिकमोती
त्रिशुलतलवार बरछ्याभाला
गोदो आला गोदो आला
जो जो बोले कुजबुजवाला
कोल्ह्यांची ती ऐकून कुई
हरिण बोलले सिंहच आला
गोदो आला गोदो आला
हिरवी राने हिरवा पाला
दुधात न्हाले गोकुळ सगळे
आनंदी त्या गोकुळबाला
गोदो आला गोदो आला
जलौघ वाहे अरण्यातला
तूतीवरचा रेशमकीड़ा
खुशीत आला अन् वळवळला!
गोदो आला गोदो आला
अंधास दिसे पंगु धावला
बहिरा ऐके मुक्यास वाचा
मंदबुद्धि तो पंडित झाला
गोदो आला गोदो आला
कोण पुसे त्या अंधाराला
ओढा त्यावर सफ़ेद वस्त्रे
ओहोटी का आनंदाला?
गोदो आला गोदो आला
कोण रडला नि कोण हासला?
रडणाऱ्यांचे मुसमुसणे ते
हसणाऱ्यांचा झिंगालाला!
गोदो आला गोदो आला
उन्मादाचा नाद टिपेला
गोदो आला जगणे झाले
देवकिनन्दन जय गोपाला
- स्वामी संकेतानंद
म्हातारबाबांना प्रचंड जास्त
म्हाताऱ्याचे आठवत नाही, पण
वेटींग फॉर गोदो नाटकाची आठवण
काहीच कळले नाही, हुच्च असावे
+१
प्लस वण टू पांडुब्बा.
प्लस वण टू पांडुब्बा.
प्लस टू.... टू
झकास
गोदो आला गोदो आला
आला का एकदाचा!
=))
गोदो आला गोदो आला
Are you for real ?
प्रचंड आवडली. आला का एकदाचा
गोदो चं स्पेलिंग चुकलंय.
स्वाम्या नवं काही लिहिलंय का?
नवनिर्माण सध्या बंद आहे.कारण
असू दे रे!
हे गोदो काय आहे?
गोदो म्हणजे मो दी ????
होप, नॉट. मोदी हा संदर्भही
गोदो आला गोदो आला
मस्तच
छान कविता
नाही. "ये रे घना"ची.
ळॉळ!
=))))
दुर्बोध वगैरे काय तरी म्हणतात
कविता आवडली.
मज्जा आली स्वामी!!!