✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जी नाईन

अ
अभ्या.. यांनी
Wed, 08/03/2016 - 17:28  ·  लेख
लेख
रस्त्यात कालवा इतका झाला की शंकर्‍या उठलाच. खाटेवर टेकलेल्या बूडाचा आधार घेउनच अशी गिरकी फिरली की पाय खाटेखालच्या बुटावर आले. स्लीव्हलेस टीशर्टाचे खांद्यावरचे दोन कोपरे बोटाच्या चिमटीत पकडले गेले. एक हिसका देऊन दोन्ही हात सवयीने कानावरच्या केसातून फिरले. हात फिरले म्हणण्यापेक्षा हात जागेवर राह्यले, मान पुढे मागे झाली. बुटाची चेन ओढली गेली. मोरीतल्या पाण्याचा हबका तोंडावर बसला तसे ते ओले हात परत एकदा केसावर फिरवून शंकर्‍या खोलीबाहेर पडला. रस्त्यावर नेहमीचाच सीन. मामाच्या कॅन्टीनसमोर एक अ‍ॅक्टीव्हा आडवी पडलेली. टिपटाप युनिफॉर्मातला एक गोमटा जीव मम्मी कशी रिक्षावाल्याशी भांडतेय हे पाहतोय. रिक्षावाला तर गल्लीतला सत्याच होता. गर्दीला आवडणारा परफॉर्मन्स अगदी बिनचूक पार पडला जात होता. शंकर्‍याने गर्दीत घुसताच आवाज दिला. "अय मॅडम, जरा तमीजसे बात करना. गरीब हुये तो भी इन्सान है हम" भांडून त्रासलेल्या अन शिव्याचा स्टॉक संपल्याने गोंधळलेल्या मॅडमने शंकर्‍याकडे पाहिले. गर्दीने हसायला सुरुवात केलीच होती ती आता नवीन सीनसाठी सरसावली. "अरे ये तो नीलम है. क्या मॅडम पहचाना की नही. अपुन शंकर. जीनाईन." "शंकर्‍या, सोड आता तरी मवालीगिरी. बघ ह्या रिक्षावाल्याने काय केलेय, त्यात अथर्वला स्कूलला लेट होतय" .......... "ए हटा, सब हटा. सत्या चल बे. फूट इथून. अपना पुराना वास्ता है" एवढे बोलत पडलेल्या अ‍ॅक्टीव्हाला शंकर्‍याने हात घातला. च्यायला जड होतं प्रकरण. का हाडं कटकटायली. जरा दम लावून उचलताच नीलमने हिसकावल्यासारखा ताबा घेतला. मम्मीने बटनस्टार्ट करायच्या आत पोरगं मागच्या सीटवरुन तिला बिलगलं. गर्दीचा इंटरेस्ट संपला होता. शंकर्‍या सत्याला घेउन कॅन्टींगात टेकला. "यार वो नीलम है. अपने साबकी. बहोत पुराना लफडा. कारसे आती थी इस्कूल. आपुन उदरीइच रुकता था उसके वास्ते" "बस कर बे, उठला आता बाजार तुझा आन तिचा पण. तिचं गाबडं दोन चार वरशात दहावीला येईल. तू आइघाल्या कवा आतनं शाळा तर पाह्यला का?" "सत्या, मेहनत करके रिक्षापे जीता है इसलिये माफ किया तेरेकू. साले कहा नोकरी करता तो नही छोडता मांकसम" "आता गप्पतो का भाऊ. तिच्यायला त्या मिथुननं हेंडगाळ लावलं जिंदगीला. ते बी सोडंना ठुमकं लावायचं. तुझी जवानी उतरना." "क्या बोलता? दादाकी नयी फिल्म? " "बस ना आता. रात्री आसतय टीव्हीवर. डॅन्सच्या शोला. केबलवर" "दादा का डॅन्स. मांकसम. पण सत्या टीव्ही नाय ना आपल्याकडे" "टीव्ही नाय, बीवी नाय, कुच बी नाय तुझ्याकडं गांडो. जिंदगी सगळी जीनाईन करत घाल त्या टेपमदी." "टेपला काय बोलायचं नाय बे सत्या. जिंदगी हाय अपनी. ते जौंदे. शंभर दे की जरा." "भाडखाव, भोनीचा पत्ता नाय ती तुझी बुढ्डी ठोकली सकाळ सकाळी. पैसे कुठनं आणू. आधीचे हजार दे परत. ग्यास भरायचाय" "चल माफ कर दिया. मामा, अपना दो चाय लिख देना खातेपे" "निघंय फुकन्या. इथून तिथून, सम्दं मिथुन. पुढं मागं कोन नाय तवा बोलंना तुला. न्हायतर कुत्रं इचारना तुला" मामा लैच कोकलायच्या आत शंकर्‍या रुमवर आला. कालच्या २० रुपड्याच्या भज्याचा पुडा तसाच पडलेला. टेपची कॅसेट अर्धवट बाहेर आलेल्या जिभेगत रेकॉर्डरच्या तोंडातून लोंबत होती. खाटखाट बटनं दाबत कॅसेट बसताच शंकर्‍यानं भजी घेउन ठिय्या मारला. जिहाले मस्ती मुकं ब रंजिश सुरु व्हायच्या आधीचा मॅडम बस चली जायेगी चा पुकारा शंकर्‍यानं जोरात केला पण आवाज साथ देईना. आवाज काय आख्खं शरीर तुटल्यासारखं झालेलं. सालं ह्या जिंदगीला आपली जरुरत नाय. दादा अजुन फॉर्मात हायेत. उटीला कायतरी हॉटेलं हायत म्हणं. इंडस्ट्रीको जरुरत है दादाकी. बस अपनी जरुरत नही किसिको. कळायला लागल्यापासून लागलेला नाद पिक्चरच. तवा बी आय होती, बाप नव्हता. रस्त्यावर सुध्दा डिस्को मारत जाणारा शंकर्‍या काहीही करुन जगत गेला. वाढत्या वयासोबत अक्कल मात्र मिथुनखाती गहाण पडत गेली. आय गेली ती शरीर वाढायची किल्लीच घेऊन गेली. भजीपाव भरुन अंगावर ना मांस भरणार होतं ना चमक. चमक राह्यली ती फक्त घोट्याच्या वर असलेल्या चेनच्या बुटाला. थेटर, व्हीडीओ जमंल तिथं शंकर्‍या मिथुनला डोळ्यात, मनात साठवत राह्यला. एकाच गोष्टीसाठी आईची आठवण काढत राह्यला ते म्हणजे ठेवलेले नाव शंकर. दादाच्या पिक्चरात हमखास असतंच. गरीबोंका दाता शंकर. बुराइका दुश्मन शंकर. साला शंकर शंकर शंकर. त्याआधी जिम्मी म्हणायचे यारदोस्त. नंतर जी नाईन झालं. जी नाईन. कमांडोतला मिथुनदा जी नाईन. त्या नावाबरोबर स्वप्नात मंदाकीनी दिसायली तेव्हा शंकर्‍याची जवानी सुरु झाली बहुतेक. एकदा मंदाकीनीचे घारे डोळे दिसले शाळेच्या युनिफॉर्मात. तेंव्हा शंकर्‍या सत्याची रिक्षा चालवत होता. दहावीची नीलम पीएसअयसाह्यबाची पोरगी आहे हे कळलं तसं शंकर्‍या खुलला. भ्रष्ट पोलीस अधिकारी बापाच्या तावडीतून नीलमला सोडवतोय अशी स्वप्ने तर कायमच पडायली. रात्री फुटकी फरशी रंगीत काचात बदलायची. पांढर्‍या उंच टाचाच्या बुटातला शंकर्‍या डिस्कोच्या तालावर स्वप्ने रंगवायचा. रुपाया रुपाय जोडून ड्रायरने सेटींग केलेले केस मिंटामिंटाला हाताने सेट करायचा. नीलमला बघायला शाळेच्या पायर्‍या झिजवून झाल्या. तिच्या घरासमोरचा कट्टा घासला. तिच्या बापाकडं ड्रायव्हरची नोकरीपण करुन झाली. नाचरे दिवस सरत गेले. नीलम कॉलेज बिलेज करुन सुखाने बोहल्यावर गेली. त्या लग्नात नाचायची सुपारी मात्र शंकर्‍याने नाकारली. इतक्या दिवसात शंकर्‍या पोराचा बाप्या झालेला. जीवापाड सांभाळलेल्या केसांनी साथ सोडायला सुरवात केली. फिटींगच्या पांढर्‍या पॅन्ट आणि लूज टीशर्ट विटले. उंच बुटांसोबत जिंदगीपण घासून सपाट झाली. लग्नकार्यात नाचून नायतर ऑर्केस्ट्रात नाईटवर मिळालेल्या पैशात टेप न कॅसेटी एवढीच इस्टेट जमा झालेली. खोली तर आयच्या नावावर. ती पण जाणारच अतिक्रमणात एक दिवस. "साला गरीबोंकी नही ये दुनिया. अपनी प्रेमप्रतिज्ञा ऐसेइच जायेंगी अपने साथ" "नीलमचं पोरगं मोठ्ठं झालं. अपना दादा बडा आदमी बन गया. अपना क्या? " "डॅन्स. बस्स डॅन्स." "आयामे डिस्को डॅन्सर." "नये लडकोंका डॅन्स जज करते है अपने दादा. अपुन जानेका क्या?" "जानेकाच. दादा समझ लेंगे अपनी जिंदगी" दुखर्‍या पाठीला अन भरुन आलेल्या पोटर्‍यांना सांभाळत डोक्याला रुमालाची पट्टी आवळून शंकर्‍याने टेपचा आवाज वाढवला. "जिंदगी मेरा गाना, मै कीसीका दिवाना. तो झूमो, तो नाचो, आ मेरे साथ नाचो गावो. आयमे डिस्को डॅन्सर" . . दुपारपर्यंत टेप वाजत राहिला. कॅसेट साईड बदलत राहिल्या. पाय थिरकत राह्यले. . . संध्याकाळी सत्या पैसे द्यायला आला. भजी अन तुटक्या कॅसेटीच्या राड्यात डॅन्स संपला होता. पत्र्याच्या त्या खोलीत जिवंत असलेला एकमेव जीव म्हण्जे तुटक्या रीळाच्या कॅसेटचा टेप फिरत होता.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
नृत्य
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
43841 वाचन

💬 प्रतिसाद (107)

प्रतिक्रिया

अफाट लिहिले आहेस!

यशोधरा
गुरुवार, 08/04/2016 - 07:28 नवीन
अफाट लिहिले आहेस!
  • Log in or register to post comments

भाषा छान जमली!

हेमंत लाटकर
गुरुवार, 08/04/2016 - 08:03 नवीन
भाषा छान जमली!
  • Log in or register to post comments

आयला

चांदणे संदीप
गुरुवार, 08/04/2016 - 08:05 नवीन
डोळ्यात पाणी आल ना दादा! :( __/\__ Sandy
  • Log in or register to post comments

क्या बात ! क्या बात !! क्या

गणामास्तर
गुरुवार, 08/04/2016 - 09:49 नवीन
क्या बात ! क्या बात !! क्या बात !!! तुझ्या लेखणी आणि प्रभुजी दोघांनाही सलाम.
  • Log in or register to post comments

अफाट व्यक्तिचित्रण !!!

चिनार
गुरुवार, 08/04/2016 - 10:06 नवीन
अफाट व्यक्तिचित्रण !!! लयच जबरा ना हो !!
  • Log in or register to post comments

भारी लैच भारी.... अप्रतिम.....

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 08/04/2016 - 10:55 नवीन
काय जबरदस्त लिहिलस. मजा आली वाचुन. आपला मिठुनदा आहेच जबरदस्त, काय डॅन्स काय स्टाईल आणि कसले एक एक भारी भारी ड्व्यायलॉक. मिठुनदा सिर्फ मिठुनदा. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

वा! आवडले

संत घोडेकर
गुरुवार, 08/04/2016 - 11:02 नवीन
वा! आवडले
  • Log in or register to post comments

आई गं. चटका लिहिलयस रे भावा.

मृत्युन्जय
गुरुवार, 08/04/2016 - 11:07 नवीन
आई गं. चटका लिहिलयस रे भावा. तु लिहितो तेव्हा भन्नाट असतंय बघ.
  • Log in or register to post comments

वाचण्यात आलेल्या ऑनलाईन

गवि
गुरुवार, 08/04/2016 - 11:14 नवीन
वाचण्यात आलेल्या ऑनलाईन लेखकांपैकी टॉपलिस्टमधे जाऊन बसला आहेस गेल्या काही ललित लिखाणांमुळे. अतिउत्कृष्ट.
  • Log in or register to post comments

मस्त

patilachaganya
Mon, 08/08/2016 - 17:06 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

भरून पावलो

सुमीत
गुरुवार, 08/04/2016 - 11:15 नवीन
वाचता, वाचता पहात होतो, दिसत होता जी ९ मना मध्ये. कित्येक दिवसांनी असा मनाला झोंबनारं व्यक्ती चित्रण वाचले, लाख लाख सलाम
  • Log in or register to post comments

गनमास्टर जी ९

सिरुसेरि
गुरुवार, 08/04/2016 - 12:19 नवीन
----आपला मिठुनदा आहेच जबरदस्त, काय डॅन्स काय स्टाईल आणि कसले एक एक भारी भारी ड्व्यायलॉक.-- +१०० "कोई शक ?" "पब्लिकके पास टाईम नहि"
  • Log in or register to post comments

धाग्याने अर्धशतक गाठल्या बद्दल....

मुक्त विहारि
गुरुवार, 08/04/2016 - 12:31 नवीन
अभ्या.. ह्यांना डान्स-डान्सची एक शी.डी. कसम पैदा करनेवाले की ह्या सिनेमाची व्हिडिओ कॅसेट आणि सुरक्षा सिनेमाची २ पिटातली तिकिटे देण्यात यायची व्यवस्था करायचा विचार आहे.
  • Log in or register to post comments

जबर्दस्त लिहिलय !

जाबाली
गुरुवार, 08/04/2016 - 12:31 नवीन
जबर्दस्त लिहिलय !
  • Log in or register to post comments

मस्त व्यक्तिचित्रण...

जिन्गल बेल
गुरुवार, 08/04/2016 - 14:47 नवीन
मस्त व्यक्तिचित्रण...
  • Log in or register to post comments

लई भारी बे अभ्या, असलं लिहिणं

५० फक्त
गुरुवार, 08/04/2016 - 15:06 नवीन
लई भारी बे अभ्या, असलं लिहिणं कुठंतरी आत जाउन चटका लावुन लगेच परत जातं.
  • Log in or register to post comments

असं नसतं म्हणायचं.

उडन खटोला
गुरुवार, 08/04/2016 - 15:38 नवीन
असं नसतं म्हणायचं. १.तुम्हाला कळवळा नाही. २.तुम्ही निष्ठुर आहात. ३.तुम्हाला भावना नाहीत. ४.तुम्ही मानसशास्त्रीय दृष्टीने बघत नाही. ५. कैच्या कै प्रतिसाद. ६. असं कसं असं कसं??? सध्या घाईत आहे म्हणून एवढं च.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

चाबूक लिखाण

जगप्रवासी
गुरुवार, 08/04/2016 - 15:21 नवीन
चाबूक लिखाण
  • Log in or register to post comments

काळजाला भिडली.

राही
गुरुवार, 08/04/2016 - 16:12 नवीन
मनाचा ठाव घेणारे व्यक्तिचित्रण. तुमचे लिखाण अतिशय आवडत आहे.
  • Log in or register to post comments

अप्रतिम

बोलबोलेरो
गुरुवार, 08/04/2016 - 17:17 नवीन
मनात उठलेली खळबळ व्यक्त करायला शब्द नाहीत. असंवेदनशील मनाला हडबडून जग होण्यास भाग पाडणारं लेखन. पुलेशु.
  • Log in or register to post comments

आवडलं

चलत मुसाफिर
गुरुवार, 08/04/2016 - 17:33 नवीन
एकेकाळी आम्हीही मिथुनचे पंखे होतो. पण ते सगळं ओसरलं
  • Log in or register to post comments

मस्त लेखन!!

मोहनराव
गुरुवार, 08/04/2016 - 18:26 नवीन
मस्त लेखन!!
  • Log in or register to post comments

जबरदस्त...

सुमीत भातखंडे
गुरुवार, 08/04/2016 - 19:49 नवीन
डोळ्या समोर उभा केलात शंकर्या.
  • Log in or register to post comments

:(

पिशी अबोली
गुरुवार, 08/04/2016 - 19:58 नवीन
:( चटका लावून जातात तुझ्या गोष्टी.
  • Log in or register to post comments

ओ मालक, आता जरा त्या airtel

संदीप डांगे
गुरुवार, 08/04/2016 - 22:48 नवीन
ओ मालक, आता जरा त्या airtel चं बघा काहीतरी.... ☺
  • Log in or register to post comments

कुणाला सांगताय?

उडन खटोला
Fri, 08/05/2016 - 00:06 नवीन
कुणाला सांगताय? अभिजीत,षेक की लाष???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

टाकू हो जमलं तर मालक. सध्या

अभ्या..
Fri, 08/05/2016 - 14:16 नवीन
टाकू हो जमलं तर मालक. सध्या काय ना कायतरी खरडत राहतोय हे काय कमी आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

सर्व वाचक आणि प्रतिसादक

अभ्या..
Fri, 08/05/2016 - 14:36 नवीन
सर्व वाचक आणि प्रतिसादक मंड्ळींचे मनापासून आभार मानतो. गविराज, राहीताई, फारेण्डराव, मृत्यो, ५०, आदूबाळा, संदीप, माऊली, बहुगुणी, जव्हेरभाव सारख्या मोट्ठ्या अन अनुभवी लेखकमंडळींनी आवडल्याची पावती दिली. बापूभाव आणि इतर मित्रपरिवार तर आमच्या पाठीशी असतोच. वल्ल्ल्या, किसन्या, यशोमैय्या, ज्योतीअलवणी, सुडक्या, स्पावड्या, पद्माक्का, राघव, मंदार, उखराव, नाखून्स, दोन सुमीत्, तिमा, रांचो, खेडूत, पटाईत, हेमंत, टक्या, बोलेरो, गणा, चिनार, मुसाफीर, पिश्या, रारा, सिरुसेरी, विखी, कंकाका, अभिरुप, निलू, नीमो, सुंड्या, जाबाली, जिंगल, राजाभाव, घोडेकर, गामा आनी नुसतेच पैलवान, कमवू, प्रवासी, मोहनराव आणि बट्टू अशा सर्वांनाच खूप खूप धन्यवाद. आगामी लेखनाबद्दल सूचना आणि काही मार्मिक मार्गदर्शन देणार्‍या वाचकांचे विषेष आभार. आमचे मार्गदर्शक प्राडॉ सर ह्यांची उणीव जाणवली धाग्यावर पण न जाणे कुठले कनेक्षन आणि लिकेज हुडकताहेत कुणास ठाउक. वेळ नसावा कदाचित त्यांना. :( असो. नेक्ष्ट इव्हेंट.
  • Log in or register to post comments

माझं नाव एड करा...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 08/05/2016 - 22:33 नवीन
लेखन आल्या आल्या वाचलं ना दादा. दाद द्यायची राहून गेली होती. आयाम सॉरी. लेखन जबरा करतूस राजा, कलाकारी आणि लेखन दोन्ही फसक्लास. लिखते रहो. -दिलीप बिरुटे (अभ्यादादाचा लेखन आणि कलाकारीचा फ्यान)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

सलाम

हेमन्त वाघे
Fri, 08/05/2016 - 15:19 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

भारी लिवलयं रे

कपिलमुनी
Fri, 08/05/2016 - 15:58 नवीन
डोक्यात असलेले वेड पैसे कमवून देणारा असेल तरच फायदा ! नायतर जिंदगी पोतेरा होते ( अशाच एका गरीबांच्या अर्नॉल्डची आठवण झाली )
  • Log in or register to post comments

क्या बात, क्या बात, क्या बात....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 08/05/2016 - 22:29 नवीन
अभ्या एक नंबर लेखन. मिथूनच्या फ्यानची गोष्ट निराळीच. आमचा एक मिथून फ्यान म्हणायचा मिथुनदाचं अपहरण झालं तर खेड्या पाड्यातून टेंपो भरु भरु जातील म्हणे शोधायला. बाकी, लेखनाची शैली सुंदर. मिथून दादाचा फ्यान थेट पोहोचला. लिहित राहा भो. धन्यवाद -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

सुंदर लिखाण..

इडली डोसा
Fri, 08/05/2016 - 23:45 नवीन
डोळ्यासमोर उभा राहिला हा जी नाईन.
  • Log in or register to post comments

भन्नाट

विप्लव
Fri, 08/05/2016 - 23:57 नवीन
भन्नाट
  • Log in or register to post comments

अभ्या भौ खतरा लिहिलय.

सचु कुळकर्णी
Sat, 08/06/2016 - 03:38 नवीन
अभ्या भौ खतरा लिहिलय. किन ऑबजर्वेशन लागत एव्हढ गहर लिहायला + खास तो अभ्या टच. असे खुप डाय हार्ड फॅन बघितलेयत मिथुन चे.
  • Log in or register to post comments

येस्स! सही लिहिलंयस!!

चतुरंग
Sat, 08/06/2016 - 11:33 नवीन
"इथून तिथून मिथून!" हे अगदी प्रसिद्ध होतं तेव्हा... असे बरेच केसांचं शिप्तर डोक्यावर घेऊन फिरणारे, कुठूनतरी पैदा केलेली लाल बील रंगाची जाकिटं आणि पांढरे चकचकीत बूट घालून फिरणारे बघितलेले आठवताहेत. त्याचा उगम असा मिथूनदाच्या सिनेमांमध्ये होता हे जरा उशीरा समजलं होतं. शंकर्‍याचा शेवट मात्र चटका लावून जाणारा :( काही गोष्टी अशा का याची संगती लावता येत नाही हेच खरं!
  • Log in or register to post comments

भन्नाट

मिसळलेला काव्यप्रेमी
Sat, 08/06/2016 - 11:38 नवीन
लगा कं लिवलय, कं लिवलय.. जियो...
  • Log in or register to post comments

पुन्हा पुन्हा वाचले. वाखु

यशोधरा
Sat, 08/06/2016 - 12:20 नवीन
पुन्हा पुन्हा वाचले. वाखु साठवली.
  • Log in or register to post comments

ब्बाप्रे अफाट लिहिलय, प्रसन्ग

पियुशा
Sat, 08/06/2016 - 13:08 नवीन
ब्बाप्रे अफाट लिहिलय, प्रसन्ग आला डोळ्या समोर अगदी :(
  • Log in or register to post comments

छान लिहिलंय. असेपण आपण फँन

भाग्यश्री कुलकर्णी
Sat, 08/06/2016 - 15:43 नवीन
छान लिहिलंय. असेपण आपण फँन आहोतच अभ्याशेठ यांच्या लेखनाचे.
  • Log in or register to post comments

जबरदस्त...

प्रभू-प्रसाद
Sat, 08/06/2016 - 17:19 नवीन
लेख खरच जबरद्स्त जमुन आलाय. सोलापुरात तर "जी ९ फ्यान्स असोसिएशन " पण आहे.
  • Log in or register to post comments

जबरदस्त!

स्वाती दिनेश
Sat, 08/06/2016 - 18:09 नवीन
शंकर्‍या डोळ्यासमोर उभा राहिला, स्वाती
  • Log in or register to post comments

झकास लिहीलंय..

सानझरी
Sat, 08/06/2016 - 18:28 नवीन
झकास लिहीलंय..
  • Log in or register to post comments

में तेरा फॅन हो गया .. अभ्या

लालगरूड
Sat, 08/06/2016 - 18:49 नवीन
में तेरा फॅन हो गया .. अभ्या
  • Log in or register to post comments

गरिबांचा अमिताभ विषयी थोडं,

संदीप डांगे
Sun, 08/07/2016 - 11:59 नवीन
गरिबांचा अमिताभ विषयी थोडं, बिगबी यांनी ज्या व्यक्तिरेखा सकारल्यात त्या सहसा सुटबुटातल्या, श्रीमंतीपैसा वाल्या होत्या, डॅशिंग पर्सनॅलिटी होती, त्यांची प्रतिमा लार्जर दॅन लाईफ अशी. सामान्यांना सहज अचिव होणार नाही अशी, त्यामुळे अमिताभाचे चाहते प्रचंड असले तरी ते स्वतःला त्या ठिकाणी बघू शकत नव्हते, ही गरज मिथुनने पुरवली, गरीब बस्ती वालोंके झोपडे पर बुलडोझर घेऊन येणाऱ्या सेठ, ठाकूर इत्यादींना त्यांच्यातलाच सामान्य रंगरूप पण धमक असणारा आडवा जातो ते बघून सामान्यांना आपला प्रतिनिधी दिसला... डॅशिंग पण गरीब म्हणजेच 'गरीबोका अमिताभ"
  • Log in or register to post comments

1+

बाबा योगिराज
Sun, 08/07/2016 - 14:11 नवीन
अभ्या भौ, येक लंबर लीवलंय. लै मस्तच बे. शेवट मात्र चटका लाऊन गेला बाबा योगीराज
  • Log in or register to post comments

क्या बात, क्या बात, क्या बात

अभिजीत अवलिया
Sun, 08/07/2016 - 19:53 नवीन
क्या बात, क्या बात, क्या बात ....
  • Log in or register to post comments

इतक्या प्रतिक्रियांनंतर कथा

निखिल निरगुडे
Mon, 08/08/2016 - 05:17 नवीन
इतक्या प्रतिक्रियांनंतर कथा आवडली हे वेगळं सांगण्याची गरजच नाही.. पण खरंच अप्रतिम लिहिलंय म्हणून संगितल्याशिवाय राहवत नाही... शेवटची ओळ तर काळजाला भिडल्याशिवाय राहत नाहीच!
  • Log in or register to post comments

अभ्याशेठ....

वटवट
Mon, 08/08/2016 - 13:39 नवीन
अभ्याशेठ.... मस्तंच लिहिलंय....तुमची लिहायची शैली चांगलीच भिडते.... वा... शेवटी चर्रर्र झालं... रात्री फुटकी फरशी रंगीत काचात बदलायची>>>> साष्टांग घ्या..
  • Log in or register to post comments

मस्तच

patilachaganya
Mon, 08/08/2016 - 17:08 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा