क्षण कोवळ्या उन्हाचा लेवून नीळकंठी..
अवकाश व्यापणारी दृष्टी कुठून येते?
जन्मांत गांठ जुळण्या क्षणमात्रही पुरेसा..
मग रुक्ष भावनांची गर्दी कुठून येते?
स्वप्नांस जागवी जो.. क्षण तोच अंतरंगी
निमिषात सर्वव्यापी ऊर्मी कुठून येते?
अवशेष संस्कृतीचे दिसतात जागजागी..
क्षणात शेवटाची प्रगती कुठून येते?
--
एका क्षणात सारे लाघव्य संपलेले..
शब्दांस धार माझ्या इतकी कुठून येते?
राघव
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1543
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा क्या बात!
व्वा क्या बात!
क्या बात! सुर्रेख!
क्या बात! सुर्रेख!
सुंदर
सुंदर
वा!
सुरेख!
छान
छान
सहीच!
मस्तच! आवडली कविता!
Sandy
प्रतिसादांबद्दल सगळ्यांचे
प्रतिसादांबद्दल सगळ्यांचे आभार!:)
संपादक, कृपया शेवटून दुसर्या कडव्यात झालेला टायपो दुरुस्त करावा ही विनंती.
व्वॉव!
व्वॉव!
छान आहे
छान आहे