Skip to main content

क्षण...

लेखक राघव यांनी शुक्रवार, 05/08/2016 23:09 या दिवशी प्रकाशित केले.
क्षण कोवळ्या उन्हाचा लेवून नीळकंठी.. अवकाश व्यापणारी दृष्टी कुठून येते? जन्मांत गांठ जुळण्या क्षणमात्रही पुरेसा.. मग रुक्ष भावनांची गर्दी कुठून येते? स्वप्नांस जागवी जो.. क्षण तोच अंतरंगी निमिषात सर्वव्यापी ऊर्मी कुठून येते? अवशेष संस्कृतीचे दिसतात जागजागी.. क्षणात शेवटाची प्रगती कुठून येते? -- एका क्षणात सारे लाघव्य संपलेले.. शब्दांस धार माझ्या इतकी कुठून येते? राघव
लेखनविषय:

वाचने 1516
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

सुरेख!

मस्तच! आवडली कविता! Sandy

प्रतिसादांबद्दल सगळ्यांचे आभार!:) संपादक, कृपया शेवटून दुसर्‍या कडव्यात झालेला टायपो दुरुस्त करावा ही विनंती.