Skip to main content

प्रो कबड्डी - सिझन ४

लेखक धर्मराजमुटके यांनी शनिवार, 25/06/2016 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
प्रो कबड्डीचा ४ था मोसम आज २५ जुन २०१६ रोजी सुरु झाला. अती क्रिकेटचा कंटाळा आल्या नंतर मी दुसर्‍या खेळांचा दर्शक होण्याचा प्रयत्न करत होतो. फुटबॉल कडे मन आकर्षित होत होते आणि अचानक प्रो कबड्डीची सुरुवात झाली. साधारण दुसर्‍या सिझनपासून खेळातला रस वाढत गेला. मुंबईकर असल्यामुळे घरची टीम म्हणून 'यु मुंबा' चा नैसर्गीक समर्थक आणि नंतर चाहता बनलो. 'यु मुंबा' ने दुसर्‍या सिझनचे विजेतेपद पटकावल्यानंतर त्यांचा वाट्याला आलेले प्रेम वेगवेगळ्या ठिकाणी दिसून आले. ३ र्‍या सिझनच्या अंतिम फेरीतील निसटता पराभव मनाला काही काळापुरता टोचत राहिला. या सगळ्या पार्शभुमीवर ४ था सिझन फार लवकर घोषीत झाला तेव्हा कबड्डीचे ही क्रिकेट होणार काय ही शंका मनाला चाटून गेली. काय होते ते पुढे कळेलच मात्र प्रो. कबड्डीमुळे कबड्डीला वलय लाभतेय व मातीतल्या रांगड्या खेळाडूंना चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत हे पाहून मनास आनंद देखील होत आहेत. अनुप कुमार, राकेश कुमार, रिशांक देवाडिगा, मनजित चिल्लर, नरवाल आडनावबंधु, निलेश शिंदे, फजल अत्रांचली (इराण), जां कुं ली (कोरिया) (नाव लिहिण्यात चुकले असल्यास दुरुस्ती सुचवावी) आणि इतर खेळाडुंनी प्रेक्षकांना भरभरुन आनंद दिलाय. या सिझनमधे यु मुंबाचे बरेच तगडे खेळाडू इतर संघांनी खरेदी केले आहेत. जवळपास ५०% संघ नवीन आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरु नये. या खेळात मिनिटामिनिटाला रंग बदलत असल्यामुळे शेवटपर्यंत रंगतदार लढती होत आहेत. त्यामुळे यावेळचे विजेते कोण असतील याचा अंदाज लावणे सद्यातरी अवघड आहे. यंदा पहिल्यांदाच महिला संघ देखील खेळत आहेत. माझ्या माहितीप्रमाणे केवळ दोनच संघ असून एकच सामना होईल. अधिक माहितीसाठी प्रो कबड्डीची अधिकृत वेबसाईट बघता येईल. प्रो कबड्डी सिझन्सचे आत्तापर्यंतचे विजेते याप्रमाणे. सिझन १ : जयपुर पिंक पँथर्स सिझन २ : यु मुंबा सिझन ३ : पटना पायरेटस =================================================== प्रो कबड्डी सिझन ४ चे संघ खालीलप्रमाणे (कंसात माझ्या आवडत्या खेळाडूंची नावे) १. बंगाल वॉरीयर्स (निलेश शिंदे /जां कुं ली / सुरजित नरवाल / विशाल माने / महेंद राजपूत) २. बंगळूरु बुल्स ( मोहित चिल्लर / सुरिंदर नाडा) ३. दबंग दिल्ली ( काशिलींग आडके) ४. जयपुर पिंक पँथर्स ( शब्बीर बाप्पू / राजेश नरवाल / रण सिंग) ५. पटना पायरेटस ( फजल अत्रांचली / बाजीराव होडगे / प्रदिप नरवाल) ६. पुणेरी पलटण ( मनजित चिल्लर / अजय ठाकूर / दिपक निवास हुड्डा) ७. तेलुगु टायटन्स (संदिप नरवाल / राहुल Chaudhari) ७. यु मुंबा (अनुप कुमार / राकेश कुमार / रिशांक देवाडीगा / जीवा कुमार) यंदा एकूण संघांमधला मराठी टक्का देखील लक्षणीय रित्या वाढलेला आहे. सात संघ आणि जवळ जवळ ३५ दिवस हे सामने रंगणार आहेत. तर चला, आपल्या मातीत जन्मलेल्या या खेळाचा आनंद घेऊ या आणि चर्चा करत राहूया. ==================================================

वाचने 35894
प्रतिक्रिया 147

प्रतिक्रिया

In reply to by रघुनाथ.केरकर

धन्यवाद! भेटु...................विश्वचषकाला

कब्बडी हा खेळ ऑलिम्पिक मध्ये आला तर आपलं एक पदक नक्की होईल. पण ऑलिम्पिक मध्ये हा खेळ येण्याचे श्यक्यता आहे का? आणि काय निकष असतात एखादा खेळ ऑलिम्पिक मध्ये सामील करण्यासाठी. एंटरटेनमेंट दर्जा आणि खेळातली चुरस ह्या बाबतीत तरी हा खेळ सरस आहे, भारतात कब्बडीची लोकप्रियता पण वाढतआहे. हल्लीच वाचलेल्या बातमीनुसार गोल्फ आणि कुठलातरी(नाव विसरलो) खेळ ऑलिम्पिक मध्ये सामील करण्यात आले आहेत.

In reply to by पक्षी

कबड्डी तसा बराच लोकप्रिय खेळ आहे, राज्यस्तरीय सोडाच पण साध्या चौरंगी सामन्याला पण पब्लीक तोबा गर्दी करतं फ़ायनल ला तर तुफ़ान गर्दी असते. पावसाचे चार महिने सामने नसतात. ह्या चार महिन्यात असोसिएशन्सनी इन्डोर सामने भरवले पाहीजेत. जेणेकरुन मुलांचा म्याट वर पण सराव होईल. सध्या सगळीकडे सराव हा मातीवरच होतोय.

In reply to by रघुनाथ.केरकर

अतिशय छान माहिती, पण कबड्डीचं ऑलिम्पिक मध्ये समावेश होण्याच्या शक्यतेचं काय
ऑलिम्पिक मध्ये हा खेळ येण्याचे श्यक्यता आहे का? आणि काय निकष असतात एखादा खेळ ऑलिम्पिक मध्ये सामील करण्यासाठी.

कबड्डीवर एखादा सविस्तर लेख येउ द्या तुम्ही या लेखात बरिच माहिती दिली आहे. कबड्डी आणि खेळाडुंची आणखी माहिती जाणुन घेण्यास खुप ऊत्सुक आहे.