प्रो कबड्डीचा ४ था मोसम आज २५ जुन २०१६ रोजी सुरु झाला. अती क्रिकेटचा कंटाळा आल्या नंतर मी दुसर्या खेळांचा दर्शक होण्याचा प्रयत्न करत होतो. फुटबॉल कडे मन आकर्षित होत होते आणि अचानक प्रो कबड्डीची सुरुवात झाली. साधारण दुसर्या सिझनपासून खेळातला रस वाढत गेला. मुंबईकर असल्यामुळे घरची टीम म्हणून 'यु मुंबा' चा नैसर्गीक समर्थक आणि नंतर चाहता बनलो. 'यु मुंबा' ने दुसर्या सिझनचे विजेतेपद पटकावल्यानंतर त्यांचा वाट्याला आलेले प्रेम वेगवेगळ्या ठिकाणी दिसून आले. ३ र्या सिझनच्या अंतिम फेरीतील निसटता पराभव मनाला काही काळापुरता टोचत राहिला.
या सगळ्या पार्शभुमीवर ४ था सिझन फार लवकर घोषीत झाला तेव्हा कबड्डीचे ही क्रिकेट होणार काय ही शंका मनाला चाटून गेली. काय होते ते पुढे कळेलच मात्र प्रो. कबड्डीमुळे कबड्डीला वलय लाभतेय व मातीतल्या रांगड्या खेळाडूंना चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत हे पाहून मनास आनंद देखील होत आहेत.
अनुप कुमार, राकेश कुमार, रिशांक देवाडिगा, मनजित चिल्लर, नरवाल आडनावबंधु, निलेश शिंदे, फजल अत्रांचली (इराण), जां कुं ली (कोरिया) (नाव लिहिण्यात चुकले असल्यास दुरुस्ती सुचवावी) आणि इतर खेळाडुंनी प्रेक्षकांना भरभरुन आनंद दिलाय.
या सिझनमधे यु मुंबाचे बरेच तगडे खेळाडू इतर संघांनी खरेदी केले आहेत. जवळपास ५०% संघ नवीन आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरु नये. या खेळात मिनिटामिनिटाला रंग बदलत असल्यामुळे शेवटपर्यंत रंगतदार लढती होत आहेत. त्यामुळे यावेळचे विजेते कोण असतील याचा अंदाज लावणे सद्यातरी अवघड आहे. यंदा पहिल्यांदाच महिला संघ देखील खेळत आहेत. माझ्या माहितीप्रमाणे केवळ दोनच संघ असून एकच सामना होईल. अधिक माहितीसाठी प्रो कबड्डीची अधिकृत वेबसाईट बघता येईल.
प्रो कबड्डी सिझन्सचे आत्तापर्यंतचे विजेते याप्रमाणे.
सिझन १ : जयपुर पिंक पँथर्स
सिझन २ : यु मुंबा
सिझन ३ : पटना पायरेटस
===================================================
प्रो कबड्डी सिझन ४ चे संघ खालीलप्रमाणे (कंसात माझ्या आवडत्या खेळाडूंची नावे)
१. बंगाल वॉरीयर्स (निलेश शिंदे /जां कुं ली / सुरजित नरवाल / विशाल माने / महेंद राजपूत)
२. बंगळूरु बुल्स ( मोहित चिल्लर / सुरिंदर नाडा)
३. दबंग दिल्ली ( काशिलींग आडके)
४. जयपुर पिंक पँथर्स ( शब्बीर बाप्पू / राजेश नरवाल / रण सिंग)
५. पटना पायरेटस ( फजल अत्रांचली / बाजीराव होडगे / प्रदिप नरवाल)
६. पुणेरी पलटण ( मनजित चिल्लर / अजय ठाकूर / दिपक निवास हुड्डा)
७. तेलुगु टायटन्स (संदिप नरवाल / राहुल Chaudhari)
७. यु मुंबा (अनुप कुमार / राकेश कुमार / रिशांक देवाडीगा / जीवा कुमार)
यंदा एकूण संघांमधला मराठी टक्का देखील लक्षणीय रित्या वाढलेला आहे.
सात संघ आणि जवळ जवळ ३५ दिवस हे सामने रंगणार आहेत.
तर चला, आपल्या मातीत जन्मलेल्या या खेळाचा आनंद घेऊ या आणि चर्चा करत राहूया.
==================================================
वर्गीकरण
वाचने
35894
प्रतिक्रिया
147
मिसळपाव
प्रतिक्रिया
दिवस १ ला - सामना क्र. १ पुणेरी पलटण वि. तेलुगु टायटन्स
अहाहा प्रो कबड्डी सुरु!!!,
खूप छान धागा मित्रा
दिवस २ रा
मजा येते बघायला,
ओढ रं मर्दां.
In reply to मजा येते बघायला, by दिग्विजय भोसले
काशिलिंग अडके!! जबऱ्या रेडर
In reply to मजा येते बघायला, by दिग्विजय भोसले
काशिलिंग अडके!! जबऱ्या रेडर आहे गडी
In reply to काशिलिंग अडके!! जबऱ्या रेडर by कैलासवासी सोन्याबापु
मस्त धागा
कालचा सामना एकदम बेक्कार होता
दिवस ३ रा
दिवस ४ था
मस्त धागा
दिवस ५ वा
पटना पायरेट्स वि. वि. यु मुंबा
In reply to दिवस ५ वा by धर्मराजमुटके
त्याला आक्रमणाला पाठवले तर बचाव अजून दुबळा पडेल.
In reply to पटना पायरेट्स वि. वि. यु मुंबा by विअर्ड विक्स
दिवस ६ वा
अभिलाषा , ललिताचा खेळ उत्तम
In reply to दिवस ६ वा by धर्मराजमुटके
महिला कब्बडीपटू अंतिम
आजचा सामना कोण जिंकणार ..
मुंबई जिंकणार पहिल्या
In reply to आजचा सामना कोण जिंकणार .. by पाटील हो
सचिन रिटायर झाल्या पासून
आहे जीवा तरी खातायत शिव्या
In reply to सचिन रिटायर झाल्या पासून by पी. के.
मजा येतय..
दिवस ७ वा
शब्बीर बापू
In reply to दिवस ७ वा by धर्मराजमुटके
दिवस ८ वा
मुटके साहेब, प्रो कबड्डीच्या
आभार !
In reply to मुटके साहेब, प्रो कबड्डीच्या by कैलासवासी सोन्याबापु
यु मुंबा सावरली ......
यस्सार !
In reply to यु मुंबा सावरली ...... by विअर्ड विक्स
दिवस ९ वा
दिवस १० वा
धुल कायम आवडत आलाय, चणीने
In reply to दिवस १० वा by धर्मराजमुटके
दिवस ११ वा
ठाण्याचे खेळाडु
होय !
In reply to ठाण्याचे खेळाडु by रघुनाथ.केरकर
तस म्हणायल्ला हरकत नाही
In reply to होय ! by धर्मराजमुटके
मीस्सिन्ग
दुरुस्ती
केरकरांशी सहमत!,
तसंही समालोचनात
In reply to केरकरांशी सहमत!, by कैलासवासी सोन्याबापु
दबंग दिल्ली
दिवस १२ वा
"बदली खेळाडू विक्रम साळुंखे
In reply to दिवस १२ वा by धर्मराजमुटके
सहमत
In reply to "बदली खेळाडू विक्रम साळुंखे by रघुनाथ.केरकर
यु मुंबा
दिवस १३ वा
जिंकलो
अभिनंदन !
In reply to जिंकलो by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दिवस १४ वा
खुप धन्यवाद हा धागा चालू
प्रतिसादाबद्दल धन्यावाद !
In reply to खुप धन्यवाद हा धागा चालू by शिद
नाही hotstar.com वर सुद्धा
In reply to प्रतिसादाबद्दल धन्यावाद ! by धर्मराजमुटके
जुनचं दुखणं
In reply to नाही hotstar.com वर सुद्धा by शिद
नक्कि महिति नाही
In reply to नाही hotstar.com वर सुद्धा by शिद
युट्यूबवर शोधून पाहीलं होतं
In reply to नक्कि महिति नाही by मी-सौरभ
एखादी प्रॉक्झी एक्स्टेंशन क्रोम वर टाकून सामना बघता येईल.
In reply to नाही hotstar.com वर सुद्धा by शिद
झक्कास्स्स्स....काम फत्ते.
In reply to एखादी प्रॉक्झी एक्स्टेंशन क्रोम वर टाकून सामना बघता येईल. by मोग्याम्बो
दिवस १५ वा
सोबत
In reply to दिवस १५ वा by धर्मराजमुटके
दिवस १६ वा
दिवस १७ वा
काल झालेली पुणे वि .
दिवस १८ वा
लै माज दिसत होता जयपूरला.
लै माज दिसत होता जयपूरला.
In reply to लै माज दिसत होता जयपूरला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दिवस १९ वा
वाचतोय.
In reply to दिवस १९ वा by धर्मराजमुटके
+१
In reply to वाचतोय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे