Skip to main content

इसिसमध्ये सामील होणारे युवक/युवती

लेखक श्रीगुरुजी यांनी बुधवार, 03/08/2016 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
सिरिया व इराक मध्ये इसिसचा उदय झाल्यापासून विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक देशातील मुस्लिम तरूण, तरूणी इसिसमध्ये सामील होऊन इस्लामसाठी लढून हुतात्मा होण्यासाठी सिरीयामध्ये जात आहेत अशा बातम्या येत आहेत. भारतातील केरळमधील व महाराष्ट्रातील काही मुस्लिम युवक, युवती आधीच इसिसमध्ये भरती झाल्याच्या बातम्या झळकल्या आहेत. गर्भवती मुस्लिम तरूणींनी सिरिया/इराकमधील इसिसच्या अधिपत्याखालील इस्लामच्या पवित्र प्रदेशात येऊन मुलांना जन्म द्यावा असे इसिसने आवाहन केल्याचे २-३ दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाले होते. इसिसमध्ये भरती होण्यासाठी निघालेल्या काही मुस्लिम युवकांना संशयावरून विमानतळावरच अडवून परत घरी पाठविण्यात आल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झालेल्या आहेत. इसिस आपल्या प्रचारासाठी आंतरजालाचा प्रभावी वापर करते असे दिसते. आंतरजालाच्या माध्यमातून मुस्लिम युवक/युवतींवर प्रभाव टाकून त्यांना आपल्या जाळ्यात ओढायचे प्रयत्न सुरू असतात असे माध्यमे सांगतात. जे युवक/युवती इसिसच्या तत्वज्ञानाने भारून इराक/सिरियाला निघाले आहेत त्यांना बळजबरीने अडवून परत घरी पाठविणे चुकीचे आहे असे आमचे मत आहे. त्यांना इसिसमध्ये सामील होऊन न देता बळजबरीने भारतात डांबून ठेवले तरी ते आंतरजालाच्या माध्यमातून इसिसच्या संपर्कात राहतीलच आणि इसिसमध्ये सामील होता न येता इथेच रहावे लागल्याच्या रागातून इथेच दहशतवादी कारवायात सामील होऊन जास्त उपद्रव देतील अशी शक्यता वाटते. त्यांना इसिसमध्ये जाऊन न देता अडविणे म्हणजे रोगापेक्षा उपाय भयंकर अशी परिस्थिती येऊ शकते. त्यामुळे इसिसमध्ये सामील व्हायला निघालेल्यांना बळजबरीने न अडविता त्यांना जाऊन द्यावे. त्यांना इसिसमध्ये सामील होऊन द्यावे. त्यांना धर्माकरिता युद्ध वगैरे करायचे असेल तर ते त्यांना इराक/सिरियाच्या भूमीवर करता येईल. भारताला त्याचा त्रास नाही. त्यातले बहुतेकजण तिथे युद्धात मारले जातीलच व मृत्युनंतर त्यांना स्वर्गात प्रवेश मिळून त्यांना ७२ कुमारी अप्सरांचा लाभ होईल. चुकूनमाकून त्यातले कोणी परत आलेच तर त्यांना आयुष्यभर तुरूंगात ठेवावे. एकंदरीत आपला उपद्रव कमी करण्यासाठी त्यांना न अडविता इसिसमध्ये जाऊन द्यावे.

वाचने 26681
प्रतिक्रिया 134

प्रतिक्रिया

एकंदरीत आपला उपद्रव कमी करण्यासाठी त्यांना न अडविता इसिसमध्ये जाऊन द्यावे. बर्र.. हे पत्र कुणाकुणाला पाठवले आहे? तुम्ही पण गुरूजी.. कशाला असल्या धाग्यात वेळ वाया घालवत आहात...?

त्यांना स्फोटक धागे काढल्याशिवाय स्वस्थ बसवत नाही मोदक साहेब. धुरळा स्वतःच उडवायचा आणि म्हणायचं डोळ्यात माती गेली.

श्री गुरुजी अमर धागा कर्ते चे रेकॉर्ड करणार बहुतेक

"मृत्युनंतर त्यांना स्वर्गात प्रवेश मिळून त्यांना ७२ कुमारी अप्सरांचा लाभ होईल.". 1)वरील वाक्याचे संदर्भा सहित स्पष्टीकरण द्या? 2) ७२ च का?

In reply to by पी. के.

सैनिकाना ताबडतोब स्वर्गप्राप्ति होते, व् त्यांच्या सेवेला 72 हूर(पऱ्या) मिळतात हेच सांगून तरुणाना घातपाती कार्यासाठी उकसले जाते, त्यासाठी कुराणाचा संदर्भ देखिल दिला जातो.

In reply to by चंपाबाई

गीता वाचून आजमितीस दहशतवाद करणारे कुणी असतील तर ठीके, नायतर हा फक्त चाटिझम आहे. कशाचा चाटिझम ते स्पष्ट दिसतंच आहे.

In reply to by बॅटमॅन

पुस्तकात लिहिलेले आहे. आता ते वाचून कुणी फॉलो नसतील करत तर तो एक वेगळा मुद्दा आहे. आवडतं पुस्तक फॉलो करायलाही गट्स लागतात. फाटिझम होउन शेपूट घालणार्‍यांचे ते काम नव्हे.

In reply to by चंपाबाई

ब्वॉर

In reply to by चंपाबाई

चंपाबाई, अगदी समर्पक बोललात. तुम्ही शरिया का अनुसरत नाही ते कळलं. आ.न., -गा.पै.

प्रतिसाद वाचून गंमत वाटली. कदाचित् यांच्या बुडाखाली फटाके फुटले नाहीत अद्याप! हा विषय विनोदाचा खचित नाही, जी मुले सामिल होण्यासाठी जात आहेत त्यांचे ब्रेनवॉश झालेले आहे. त्याना आता त्यांचा जीव प्यारा नाही,त्यामुळे ही एक ज्वालाग्रही वस्तु बनली आहेत. जर ह्यांची ऊर्जा दाबायचा प्रयत्न केल्यास ते इथेच घातपात करून दाखवतील. त्यांना रोखण्यात काय हशील आहे? उलट त्यांच्यावर नजर ठेवण्यास आपल्या गुप्तचर खात्याची दमछाकच् होईल.

Tel- waat ghala.dhaga petavA

जितकी वाटते तितकी मोठी समस्या नाहीये ही, इसिसची ताकद नगण्य आहे पण त्याचे ओवरप्रेझेंटेशन मिडीयावाले करतात. बादवे, यावर मागे तुडतुडींना धागा काढला होता, तुम्ही आता स्वयंघोषित गोरक्षकांवर धागा काढा. आणि गाय का मारू नये? मग शेळी मारली तर का शिक्षा नाही? मग प्राण्यांमध्ये सुद्धा भेदभाव का? मग पूर्वी आर्य गोमांस खात होते का? ऋग्देवात तसे उल्लेख आहेत का? याची डिट्टेल चर्चा करा.

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

जितकी वाटते तितकी मोठी समस्या नाहीये ही, इसिसची ताकद नगण्य आहे पण त्याचे ओवरप्रेझेंटेशन मिडीयावाले करतात.
=))

संघवाले वर्षानुवर्षे नुसत्या हवेत काठ्याच फिरवत बसलेत.... शिका काहीतरी

खालीमुंडी पाताळधुंडी,
>> जितकी वाटते तितकी मोठी समस्या नाहीये ही,
जगातले मोठे प्रश्न सोडवायची सर्वोत्तम वेळ म्हणजे ते छोटे असतांनाची. आयसिसची समस्या मोठी होण्यापूर्वीच सोडवलेली बरी, नाहीका? आ.न., -गा.पै.

त्यामुळे इसिसमध्ये सामील व्हायला निघालेल्यांना बळजबरीने न अडविता त्यांना जाऊन द्यावे. त्यांना इसिसमध्ये सामील होऊन द्यावे. त्यांना धर्माकरिता युद्ध वगैरे करायचे असेल तर ते त्यांना इराक/सिरियाच्या भूमीवर करता येईल. भारताला त्याचा त्रास नाही.
हे उपरोधीक असेल तर ठीक, अन्यथा माझ्या देशातल्या कुठल्याही व्यक्तीचं असं वाकडं पाऊल पडत असेल तर त्याला वेळीच थांबवणे माझ्यासाठी गरजेचे आहे. प्रतिबंध कसे लावायचे हा स्वतंत्र मुद्दा आहे, पण "मरु देत त्यांना, मला काय त्याचे" असं म्हणुन मला जबाबदारी झटकता येणार नाहि.

In reply to by अर्धवटराव

ज्यांना मरायचं त्यांना मरुद्या पण जाणाऱ्यांना थांबवणं आवश्यक वाटतंय कारण ते तिथं जाऊन इथले आणखी लोकं रिक्रुट करतील त्याचं काय?

In reply to by आजानुकर्ण

तथाकथित हौतात्म्याच्या आत्मघाती विचारांनी प्रेरीत झालेल्यांना बळजबरीने इथे थांबून ठेवले तर ते रागारागाने इथेच दहशतवादी कृत्ये करण्याची शक्यता आहे. त्यापेक्षा त्यांना जाऊन द्यावे. इथे राहिले तरीही ते आणखी माणसे रिक्रूट करण्याचा प्रयत्न करणारच.

खूप मोठी समस्या आहे पण हे लोक का जातात इसिस माडे करणे शोधून काडली पाहिजे जास्त करून बेरोजगार गरीब घरातले युवक युवती तेथे जात आहेत आणि इसिस चे आंतर्जालावरच्या सर्व माहिती विभाग ,जाहिराती पूर्ण पाने नाश्ता केल्या पहीजेत आणि मुस्लिम विचारवंतांनी सुद्धा यात लक्ष घालून गरजवंताची मदत केली पाहिजे तसं इसिस चे जास्त लक्ष यूरोप कडेच आहे

In reply to by सतोश ताइतवाले

>> बेरोजगार गरीब घरातले युवक युवती तेथे जात आहेत च्यायला यांना नेट चा बैलन्स मारायला पैसे कुठुन मिळतात ?

In reply to by सतोश ताइतवाले

>> बेरोजगार गरीब घरातले युवक युवती तेथे जात आहेत च्यायला यांना नेट चा बैलन्स मारायला पैसे कुठुन मिळतात ?

In reply to by सतोश ताइतवाले

>> बेरोजगार गरीब घरातले युवक युवती तेथे जात आहेत च्यायला यांना नेट चा बैलन्स मारायला पैसे कुठुन मिळतात ?

नै मला एक शंका आहे. जर बाबा युद्धात मेला तर त्याला 72 हूर मिळणार, अन बाई युद्धात मेली तर तिला पण 72 हुरच मिळणार का? मग ती बाई त्या 72 हूर घेऊन करणार काय? (अवांतर:-श्रीगुरूजी हघ्या.) कानाचे फ्यूज उडालेला बाबा योगीराज.

In reply to by बाबा योगिराज

+11 बाई ला कुठलं एवढ भाग्य, ती मेली कि त्या 72 मध्ये सामील होणार. तिथं भी शोषणच. ( हलके घ्यावे.)

भारतात नव्याने पेरण्यात आलेल्या मुस्लिमद्वेषाच्या चष्म्यापलिकडे, मध्यपूर्व व युरोप यांत जिहाद अन क्रुसेड्स हे ख्रिश्चन वि. मुस्लिम असे प्रकरण फार पूर्वीपासून सुरू आहे हे आपण विसरतो. आपल्याकडे बेसिकली भारत-पाकिस्तान भांडण आहे, अन भारत वपाकिस्तानातल्या बहुतेक मुसलमानांना 'खरे' मुसलमान अर्धे काफीरच समजतात. सूफी वगैरे तर टोटल कचराच जणू. जागतिक, व मुख्यत्वे इसिसला क्रूसेड/जिहाद पार्श्वभूमी आहेच, प्लस, मधेच उपटलेली व जगाला शहाणपण शिकवायला जाणारी अमेरिका, हे ↓ करीतच असते. अफगाणीस्तान, इराक, इतिहास आठवा. कशाला बोटं घालतात कुणास ठाऊक :-s अधिकाधिक युवक इसिसमधे सामिल होण्याचे हे एक मोठे कारण आहे, असे मला वाटते.

In reply to by आनंदी गोपाळ

आगो, >> भारतात नव्याने पेरण्यात आलेल्या मुस्लिमद्वेषाच्या चष्म्यापलिकडे, ... मुस्लिमद्वेष हा काय प्रकार आहे? भारतात कोण करतो मुस्लिमांचा द्वेष? नव्याने पेरणी म्हणजे काय? जरा इस्कटून सांगा बरं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

आन्गापै, कित्ती तो निरागसपणा! ब्रायटनात असलं काय नस्तं ना? मग खुष र्‍हावा. ;)

In reply to by आनंदी गोपाळ

आगो, आहेच मी निरागस. त्याबद्दल प्रश्नंच नाही. आता तुम्हाला 'मुस्लिमद्वेषाची नव्याने पेरणी' म्हणजे काय हे सांगता येत नसेल तर नका सांगू. काय सांगू, अहो, माझीही थोडीफार अशीच अवस्था आहे. स्वत:ला मुस्लिम म्हणवणारे आपापसांत इतका पराकोटीचा द्वेष बाळगून आहेत की भारतात मुस्लिमद्ववेषाचा जास्तीचा रतीब घालायची आजिबात गरज पडू नये. आ.न., -गा.पै.

In reply to by आनंदी गोपाळ

अन भारत वपाकिस्तानातल्या बहुतेक मुसलमानांना 'खरे' मुसलमान अर्धे काफीरच समजतात.
भारतातल्या रिक्रूट्सना स्वच्छतेच्या कामगिरीवर (बोले तो लट्रीन डुटीवर) लावतात आयसीसवाले असं वाचलं होतं कुठेशी. किंवा म क्यानन फॉडर म्हणून.

लोकहो, आयसिस आपल्या दाराशी येऊन ठेपली आहे. परभणीत मुस्लीम दहशतवाद्याने आयसिसच्या संपर्कात येऊन चक्क बॉम्ब तयार केला आहे. आधी माहिती : http://www.esakal.com/Tiny.aspx?K=MA5ZFE ज्यांना ही आजूनही छोटी समस्या वाटते त्यांनी आपल्या मताचा कृपया नव्याने विचार करावा. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

आयसिसच्या जन्माच्या आधीपासून भारतातील इस्लामी अतिरेकी भारतात बॉम्ब तयार करून वापरत होतेत.

मान्य केले तर मग कितीही बाटवाबाटवी झाली, कत्तली झाल्या तरी आपण बांग्लादेशी, पाकिस्तानी हिंदूंबद्दल शष्प संवेदना ठेवायचे काम नाही, हे पोटकलम सुद्धा मान्य व्हावे म्हणे मी , कारण जसे ह्या आयसिसेच्छूक लोकांना भारताशी काही घेणे देणे नाही तसेच त्या हिंदूंनाही कधीच नव्हते! जेव्हा मौका होता तेव्हा आले नाहीत मग आता आपण कश्याला रडावे!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

इकडच्या मुस्लिमांना तिकडच्या बद्दल ममत्व चालत नाही पण इकडच्या हिंदूंनी तिकडच्या हिंदूंबद्दल उमाळे काढले तर ते चालतं, तिथे राष्ट्रप्रेम विसरून मुस्लिमांसारखे आपणही फक्त धर्मप्रेमी आहोत हे सोयीस्कर विसरायचे, असो, ह्या धाग्यावर पहिला नि शेवटचा प्रतिसाद

In reply to by संदीप डांगे

इकडच्या मुस्लिमांना तिकडच्या बद्दल ममत्व चालत नाही पण इकडच्या हिंदूंनी तिकडच्या हिंदूंबद्दल उमाळे काढले तर ते चालतं डांगे साहेब.. तिकडचे किती हिंदू इकडे येवून २६/११, मुंबई स्फोट, कोईंबतूर किंवा संसदेवर हल्ला सारखे प्रकार प्रत्यक्ष / अप्रत्यक्षपणे करतात..? ..आणि असल्या प्रकारात इथल्यांचेच जनाजे उठत असतील तर इथल्यांनी तिकडच्यांबद्दल का ममत्व बाळगावे..? आता प्लीज दहशतवादाला धर्म नसतो असे शोभाडे, बरखा दत्त टाईप सोयीस्कर विचार सांगू नका.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

हेच म्हंतू! मोदकराव, पाकिस्तान चे हिंदू असो व किरस्ताव, का आदिवासी, मला कोनाविषयीही ममत्व नाही, ट्रोजन हॉर्स पासून सावध तितके बरे! तिथल्या हिंदूंवर अत्याचार होतात म्हणून इथल्या मुस्लिमाबद्दल द्वेष तयार करण्यासाठी त्यांचा वापर काही लोक करतात, बाकी दांभिक भूमिका मला पटत नाहीत ते वेगळं! असो!

In reply to by संदीप डांगे

मोदकराव, पाकिस्तान चे हिंदू असो व किरस्ताव, का आदिवासी, मला कोनाविषयीही ममत्व नाही, ट्रोजन हॉर्स पासून सावध तितके बरे! बर्र.. तिथल्या हिंदूंवर अत्याचार होतात म्हणून इथल्या मुस्लिमाबद्दल द्वेष तयार करण्यासाठी त्यांचा वापर काही लोक करतात, याला सपशेल असहमत. हिंदू मुस्लीम दंगलींचा खरा इतिहास, मदरशांमध्ये चालणारे ब्रेनवॉशिंग, दहशतवादी हल्ल्यात नेहमीच आढळणारी मुस्लिम नावे, अल्पसंख्यांक अल्पसंख्यांक असा कांगावा करत उपटलेले फायदे आणि सर्वसाधारणपणे राष्ट्रनिष्ठेपेक्षा धर्मनिष्ठा मोठी अशी अनेक कारणे असताना "तिकडच्या भाईजानवर अत्याचार होत असल्यामुळे हिंदूत्व खतरेंमें" अशा आरोळ्या देण्याची आवश्यकता भासेल असे वाटत नाही. तिथे राष्ट्रप्रेम विसरून मुस्लिमांसारखे आपणही फक्त धर्मप्रेमी आहोत हे सोयीस्कर विसरायचे कोणीही स्वधर्मप्रेमी असण्याला कोणाचाच आक्षेप नसावा. "तुमचा धर्म माझ्या धर्माप्रमाणे चालत नाही म्हणून तुम्ही काफिर" ही थिअरी कशी मान्य करणार..?

In reply to by मोदक

अल्पसंख्यांक अल्पसंख्यांक असा कांगावा करत उपटलेले फायदे आणि सर्वसाधारणपणे राष्ट्रनिष्ठेपेक्षा धर्मनिष्ठा मोठी म्हणजे नेमके काय काय फायदे लुटले आहेत??

In reply to by संदीप डांगे

पाकिस्तान चे हिंदू असो व किरस्ताव, का आदिवासी, मला कोनाविषयीही ममत्व नाही, ट्रोजन हॉर्स पासून सावध तितके बरे!
पाकिस्तानातील सर्व मुस्लिमेतरांविषयी मला सहानुभूती वाटते.
तिथल्या हिंदूंवर अत्याचार होतात म्हणून इथल्या मुस्लिमाबद्दल द्वेष तयार करण्यासाठी त्यांचा वापर काही लोक करतात,
भारताप्रमाने जगभर सर्वत्र मुस्लिमांचा द्वेष केला जातो. त्याची कारणे अगदी उघड आहेत. तिथल्या हिंदूंवर अत्याचार होतात या एकाच कारणासाठी भारतात मुस्लिमांचा द्वेष होत नसून त्यासाठी इतर असंख्य कारणे आहेत. मुस्लिमांचा द्वेष करण्यासाठी काहीच प्रयत्न करण्याची गरज नाही. त्यांचे वर्तन त्यासाठी पुरेसे आहे.

In reply to by श्रीगुरुजी

अ‍ॅज अ ब्लॅकेट स्टेटमेण्ट या वाक्याशी तीव्र असहमत. ढोबळ मानाने मुस्लीम शब्दाचे आध्यात्मीक, सांस्कृतीक आणि राजकारणी असे तीन पदर आहेत. त्यातले आध्यात्म आणि संस्कृती अत्यंत गोड आणि श्रीमंत आहे. मुस्लीम राजकारणात काहि कालबाह्य तत्वे रुजल्यामुळे हा एक पदर इतर पदरांना खायला उठलाय. पण म्हणुन असा सरसकट मुस्लीम द्वेष तर अधीक घातक आहे.

In reply to by अर्धवटराव

त्यातले आध्यात्म आणि संस्कृती अत्यंत गोड आणि श्रीमंत आहे.
मुस्लीम अध्यात्म जे दिसते ते म्हणजे पूर्णपणे बाह्य अवडंबर आहे. पुरूषांनी दाढी ठेवायची, आखूड पायजमा वापरायचा, महिलांनी बुरखा वापरायचा, निष्पाप प्राण्यांना एका विशिष्ट पद्धतीने कापायचे, वेगळ्या पद्धतीने कापले तर ते हराम, . . . यात काय गोड व श्रीमंत आहे ते समजले नाही. मुस्लिम संस्कृती म्हणजे नक्की कोणती संस्कृती? सौदी अरेबियातील संस्कृती का अफगाणिस्तानातील संस्कृती का पाकिस्तानातील संस्कृती का भारतातील संस्कृती का सुदानमधील संस्कृती का मलेशिया/इंडोनेशियातील संस्कृती का अजून कोणत्या तरी प्रदेशातील संस्कृती? मुस्लिमांमध्ये सर्वत्र पुरूषप्रधान संस्कृती आहे. मुख्य म्हणजे इतर धर्मियांच्या संस्कृतीबद्दल अजिबात आदर न ठेवता जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे इतरधर्मियांची संस्कृती उद्ध्वस्त करणे हेच आजतगायत दिसून आले आहे.

In reply to by श्रीगुरुजी

मुस्लीम अध्यात्म जे दिसते ते म्हणजे पूर्णपणे बाह्य अवडंबर आहे. पुरूषांनी दाढी ठेवायची, आखूड पायजमा वापरायचा, महिलांनी बुरखा वापरायचा, निष्पाप प्राण्यांना एका विशिष्ट पद्धतीने कापायचे, वेगळ्या पद्धतीने कापले तर ते हराम, . . . यात काय गोड व श्रीमंत आहे ते समजले नाही.
ड्रेस कोड, चालिरीती, सणवार साजरा करण्याच्या पद्धतीत अध्यात्म शोधतो म्हटलं तर मग कठीण आहे गुर्जी. असु द्या. जानवं, शेंडी, धोतर, पुरणपोळीचा नैवेद्य या सगळ्यांचा ज्ञानदेव सांगितलेल्या सच्चिदानंद चिद्विलासाशी संबंध लावणं म्हणजे... असो.
मुस्लिम संस्कृती म्हणजे नक्की कोणती संस्कृती?
अगदी सुरुवात करायची म्हटलं तर जयंतरावांची इब्न बतूत सिरीज चाळण्याचा सल्ला देतो. ते ही असो. आपल्यासारख्या अनेक महाभागांशी संवाद साधायचं भाग्य लाभलय मला. त्यामुळे आपल्या विचारांचं आश्चर्य नाहि वाटलं, खेद जरुर वाटतो. असो.

In reply to by अर्धवटराव

ड्रेस कोड, चालिरीती, सणवार साजरा करण्याच्या पद्धतीत अध्यात्म शोधतो म्हटलं तर मग कठीण आहे गुर्जी. असु द्या. जानवं, शेंडी, धोतर, पुरणपोळीचा नैवेद्य या सगळ्यांचा ज्ञानदेव सांगितलेल्या सच्चिदानंद चिद्विलासाशी संबंध लावणं म्हणजे... असो.
मुस्लिम अध्यात्म कसं गोड आणि श्रीमंत आहे हे सांगण्याऐवजी तुम्ही थेट हिंदू धर्मावरच घसरलात. मुस्लिम अध्यात्माच्या गोडव्याची व श्रीमंतीची काही उदाहरणं द्याल असं वाटलं होतं. आता जानवं, शेंडी, धोतर, पुरणपोळीचा नैवेद्य इ. चा हिंदू धर्माच्या अध्यात्माशी संबंध आहे असं तुम्हाला म्हणायचं असावं. मुळात जानवं, शेंडी इ. बाह्य अवडंबरं हिंदूंमधील एका अत्यंत अल्पसंख्या असलेल्या जातीशी संबंधित होती. ही बाह्य चिन्हे बहुसंख्य हिंदू वापरत नव्हते. जे वापरत होते त्यातील अनेकांनी या बाह्य चिन्हांचा त्याग केला आहे. हिंदू अध्यात्म हे या बाह्य चिन्हांवर कधीच अवलंबून नसते. एका विशिष्ट दिशेला तोंड करून, विशिष्ट वेष परीधान करून, विशिष्ट प्रकारे उपासना केली तरच ते अध्यात्म आणि तसं नसेल तर ते अध्यात्म नाही असं बंधन हिंदूंवर कधीच नव्हतं. हिंदू धर्मात परमेश्वरप्राप्तीचे असंख्य मार्ग सांगितले आहेत. कोणताही मार्ग अवलंबताना बाह्य अवडंबर असलेच पाहि़जे असे बंधन नाही. अगदी शूचिर्भूत असावे हे सुद्धा बंधन नाही. आता हीच तुलना मुस्लिम पद्धतीशी करा आणि फरक बघा. त्यात काही गोड आणि श्रीमंत असेल तर सांगा.
अगदी सुरुवात करायची म्हटलं तर जयंतरावांची इब्न बतूत सिरीज चाळण्याचा सल्ला देतो. ते ही असो.
सिरीजची लिंक असेल तर द्या. नक्की वाचेन.
आपल्यासारख्या अनेक महाभागांशी संवाद साधायचं भाग्य लाभलय मला. त्यामुळे आपल्या विचारांचं आश्चर्य नाहि वाटलं, खेद जरुर वाटतो.
चालायचंच. काही जणांचे जे गैरसमज आहेत त्याबद्दल मला सुद्धा खेद वाटतो.

In reply to by श्रीगुरुजी

हो का ? सनातनची पुस्तके वाचा. तिथेही हे मिळेल. आर्यानीही द्रविडांच्या मुंड्या मुरगाळूनच आपले बस्तान बसवले. मार ही त्राटिका .... आठवते का ?

In reply to by चंपाबाई

काहीही हं चंपाबाई! म्हणे आर्यांनी द्रविडांच्या मुंड्या मुरगळल्या!! एकतरी युद्ध दाखवा ज्यात एक आर्य आणि एक द्रविड अशा दोन पार्ट्या एकमेकांशी लढताहेत. आ.न., -गा.पै.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मान्य केले तर मग कितीही बाटवाबाटवी झाली, कत्तली झाल्या तरी आपण बांग्लादेशी, पाकिस्तानी हिंदूंबद्दल शष्प संवेदना ठेवायचे काम नाही, हे पोटकलम सुद्धा मान्य व्हावे म्हणे मी , कारण जसे ह्या आयसिसेच्छूक लोकांना भारताशी काही घेणे देणे नाही तसेच त्या हिंदूंनाही कधीच नव्हते! जेव्हा मौका होता तेव्हा आले नाहीत मग आता आपण कश्याला रडावे! बापूसाब.. याच न्यायाने तुम्ही अप्रत्यक्षपणे "एक धर्म एक राष्ट्र" या थिअरीला किंवा "हिंदूराष्ट्र" या संकल्पनेला पाठिंबा देत आहात असे वाटत आहे. तरीपण मेन मुद्दा मिस झाला असेल तर तो काय ते प्लीज सांगा.

In reply to by मोदक

मेन मुद्दा क्र.१
जसे आयसीसेतच्छूक भारतीय मुसलमानांस देशाशी घेणे देणे नाही, तसेच पाकिस्तानात राहिलेल्या हिंदूंना सुद्धा नाही, का नाही? तर साक्षात फाळणीच्यावेळीही हिंदूंचे शिरकाण पाहून देखील ज्यांना धर्म, नवा हक्काचा लोकशाही देश ह्यांच्याप्रती ममत्व न राहता जन्मस्थानाशी (भौगोलिक) घट्ट इमानदार राहायची इच्छा होती, त्यांच्यावर आज भरोसा ठेवायचे कारण नाही असे वाटते, आज पाकिस्तान मध्ये हिंदू कापत आहेत म्हणून ही माणसे गळा काढणार, मग आपल्याकडली काही धर्मप्रेमी गाढवे त्यांची उष्टी खरकटी काढायची बात करणार, हे झाले, ते सगळे भारतात आले, अन उद्या जर पाकिस्तान ने त्यांना इन्सेंटिव्ह किंवा किमान सुरक्षा देऊन परत बोलावले तर ?? ती किती मोठी रिस्क असेल हे आपण इमॅजिन करू शकता का? बरं ते ही जाऊ द्या, इस्लामचं तत्व हे "दार उल हरब" ला "दार उल इस्लाम" मध्ये कन्व्हर्ट करणे आहे, हे तरी आपण मानाल न? इतके असूनही, पाक बघा, भारतात मुसलमान असुरक्षित आहेत हे कोकलतो कायम पण भागलपुर ते 2002 गुजरात किती भारतीय मुसलमानांस त्यांनी सन्मानाने बोलवून नागरिकत्व दिले आहे?? असल्यास मला जरूर सांगाल, मूहाजीर संकल्पनेबद्दल मी तुम्हाला सांगु नये!
बापूसाब.. याच न्यायाने तुम्ही अप्रत्यक्षपणे "एक धर्म एक राष्ट्र" या थिअरीला किंवा "हिंदूराष्ट्र" या संकल्पनेला पाठिंबा देत आहात असे वाटत आहे. अजिबात नाही, मी अतिशय अग्रेसीव अश्या "भारतीयत्व" आधारित देशाची भलामण करतोय, जो भारतीय तो आमचा, जो भारतात राहून भारताला सुरुंग लावायच्या गप्पा करतोय तो "आमचा" गुन्हेगार, त्याला त्याच्या सीरियन मित्रांकडे जाण्यापासून रोखुन तसेच जायची इच्छा असलेल्या त्याच्या मित्रांसमोर त्याचे एक "उदाहरण" बनवणे हे ही "आमचेच कार्य" त्यांना outsource करायचे काम नाही, अमेरिका इस्राएल बघा, त्यांच्या माणसाने बाहेर जाऊन 1000 खून केले तरी आटापिटा करून त्याला परत मायदेशात आणतील मग वाटल्यास फासावरही देतील, पण जे आहे ते घरात, असे बाहेर जाऊ द्या रोकु नका करून नाही. रच्याकने, आता हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व वगैरे म्हणू नका, कारण हिंदुत्ववादी गाढवे तीच आहेत ज्यांनी दलितांना मारू नका मला गोळ्या घाला म्हणणाऱ्या मोदींचा निषेध केला कोर्टात जायची भाषा केली अन मोदीसारख्या एका सच्च्या भारतीयाला घरचा आहेर देऊन मान खाली घालायला लावली आहे. Hope I am clear.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

जो भारतीय तो आमचा, जो भारतात राहून भारताला सुरुंग लावायच्या गप्पा करतोय तो "आमचा" गुन्हेगार इथेच मुद्दा क्लीयर झाला आणि आपण एकाच पानावर आहोत ते कळाले. तरीपण आणखी शंका असल्यास सवडीने प्रतिसादेन. लोभ आहेच.. तो वाढवत ठेवावा. :)

In reply to by संदीप डांगे

कुठले उमाळे ?! हे वाचा : http://indianexpress.com/article/india/india-news-india/perception-abou… अगदी हिंन्दू येतात त्यांना सुद्धा "पाकिस्तानी" म्हणून नोकऱ्या मिळत नाहीत. हिंदूंची तेव्हाची आणि आत्ताची टक्केवारी हि फक्त "इथे आम्ही तुम्हाला छळत नाही, तिकडल्या लोकांसारखे नाही आम्ही" हे दाखवण्याचा दाखला आहे. तिकडली टक्केवारी राहावी / वाढावी तसेच त्यांना त्रास होऊ नये हा उद्देश फार छोटा आहे.

In reply to by sagarpdy

इथे आम्ही तुम्हाला छळत नाही, तिकडल्या लोकांसारखे नाही आम्ही" हे दाखवण्याचा दाखला आहे खरेतर ती एक गर्भित धमकी आहे असं म्हणू शकतो,

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

जर का गुर्जी म्हणतात तसे मान्य केले तर मग कितीही बाटवाबाटवी झाली, कत्तली झाल्या तरी आपण बांग्लादेशी, पाकिस्तानी हिंदूंबद्दल शष्प संवेदना ठेवायचे काम नाही, हे पोटकलम सुद्धा मान्य व्हावे म्हणे मी , कारण जसे ह्या आयसिसेच्छूक लोकांना भारताशी काही घेणे देणे नाही तसेच त्या हिंदूंनाही कधीच नव्हते! जेव्हा मौका होता तेव्हा आले नाहीत मग आता आपण कश्याला रडावे!
स्वातंत्र्यानंतर जवळपास ६९ वर्षे उलटली. गेल्या ६९ वर्षात पाकिस्तानचा हिंदूद्वेषी, रक्तपिपासू व क्रूर चेहरा अनेक वेळा दिसूनसुद्धा इथल्या निर्धमांधांना पाकिस्तान हा लाडाने थोडासा बिघडलेला धाकटा खोडकर भाऊ वाटतो. भारत-पाकिस्तान मधील जनतेमध्ये वैर नसून त्यांच्यात अत्यंत प्रेमळ भाव आहेत व काश्मिर, दहशतवाद इ. प्रश्न हे दोन्ही देशातील राजकारण्यांनी निर्माण केले असून सामान्य जनतेचा त्याला पाठिंबा नाही असे उच्चरवाने सांगून स्वतःची व सर्वांचीच फसवणूक करण्यात हे निधर्मांध आघाडीवर आहेत. आपण चुकून पाकिस्तानी जनतेबद्दल वाईट बोललो तर आपली धर्मनिरपेक्षतेची, उदारमतवादीपणाची, मानवतावादाची पदवी रद्द होऊन आपल्याला जातीयवादी, बुरसटलेल्या, फॅसिस्ट विचारांचे समजले जाईल अशी भीति त्यांना वाटत असते. जर ६९ वर्षानंतर सुद्धा इथल्या काही जणांचे डोळे उघडले नसतील तर १९४७ मध्ये फाळणी झाल्यानंतरसुद्धा आपण पाकिस्तानी भागात सुखाने राहू, देश सोडून भारतात जायची गरज नाही, स्थानिक मुस्लिम आपले शेजारी आहेत व आपली काळजी घेतील या भ्रमात तत्कालीन बांगलादेशातील व पाकिस्तानमधील हिंदू राहिले असतील यात नवल वाटायचे कारण नाही. भारतात न येता तिथले काही हिंदू पाकिस्तानमध्येच राहिले याला कारण त्यांना भारताशी काही घेणेदेणे नव्हते हे कारण नसून जरी पाकिस्तान निर्माण झाला तरी आपल्याला त्रास होणार नाही या गैरसमजूतीतून ते तिथे राहिले असावेत. गेल्या ६९ वर्षात तिथल्या स्थानिक मुस्लिमांचा क्रूर चेहरा अनेकदा पूर्ण उघड झाला आहे. १९४७ मध्ये पाकिस्तानमध्ये २४% हिंदू होते. २०१६ मध्ये त्यांची संख्या २% पेक्षाही कमी आहे. बांगलादेशाची थोडीफार अशीच परिस्थिती आहे. स्थानिक मुस्लिमांच्या भरवशावर राहून तेथील हिंदूंचा पूर्ण भ्रमनिरास झाला आहे. स अशा परिस्थितीत भारत हे त्यांचे एकमेव आशास्थान आहे. त्यामुळे तिथल्या हिंदूंबद्दल सहानुभूती असायलाच हवी. त्यांना भारतात स्थलांतर करून नागरिकत्व हवे असल्यास ते लगेच देण्यात यावे. इस्राईल मध्ये जगातील कोणत्याही देशातील कोणत्याही वर्णाच्या ज्यू जनतेला नागरिकत्व मिळते कारण इस्राईल ही ज्यूंची एकमेव भूमी आहे. तसेच भारत ही जगभरातील हिंदूंसाठी एकमेव आशास्थान आहे.

In reply to by श्रीगुरुजी

भारतात न येता तिथले काही हिंदू पाकिस्तानमध्येच राहिले याला कारण त्यांना भारताशी काही घेणेदेणे नव्हते हे कारण नसून जरी पाकिस्तान निर्माण झाला तरी आपल्याला त्रास होणार नाही या गैरसमजूतीतून ते तिथे राहिले असावेत. अहो, फाळणी पासून कैक कोस दूर असलेल्या तुमच्या आमच्यासारख्या मराठी जनतेला जर आज इतक्या वर्षानंतरही जेव्हा फाळणीचा भेसूर चेहरा दिसतो, जाणवतो, तो त्याकाळी स्वतःच्या घराच्या मागल्या बोळात साक्षात घडताना पाहूनही लोकांना "गोड गैरसमज" झाला असेल, हे आपण कसे म्हणु शकता?? इतके पाहूनही तिथेच राहिलेत देवा ते, माझ्यालेखी त्यांचा धर्म कुठलाही असो, ते भरवश्याचे नाहीत, तुम्ही वरतीच भारतात असलेल्या निधर्मांध लोकांबद्दल माहिती दिली आहेत, आधीच दुथडीभरून वाहत असलेल्या गाढव गोठ्यात दूरदृष्टी नसलेली अन ते सिद्ध केलेली अजून गाढवे आणून बांधणे तुम्हाला रुचत असेल, आम्हाला नाही.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मोदी म्हणतात त्याप्रमाणे संविधन ला भारताचं धर्मग्रंथ मानलं तर बाहेरील हिंदू ना भारतात प्रवेश देता नाही येणार, पण ही झाली थियरी। आता आपण प्रॅक्टिकल जगात येवूया, जगात कोणत्याही धर्मातील लोकांवर अन्याय होत असेल तर अश्या लोकांना स्वीकारायला अनेक देश तयार असतात, मुस्लिम निर्वासितांना मुस्लिम देश आश्रय देतात, ख्रिश्चन लोकांना युरोप मध्ये आश्रय मिळतो, ज्यू लोकांना इस्राईल मध्ये आश्रय मिळतो, मग अन्याय ग्रस्त हिंदू , शीख, बुद्ध, मुस्लिम अहमादी लोकांनी जायचं कूट? बरं त्यांच्या पूर्वजांनी भारतात न येण्याचा निर्णय घेतला त्यांना थोडाच माहित होत कि आजचा पाकिस्तान उद्या नापाक होईल। म्हणजे हे आस म्हणण्यासारखं झालं की मुलीने प्रेमविवाह करून सासरी गेल्यानंतर, सासरी छल झाला तर तिच्या बापानं आस म्हनाय हवं कि त्यावेळी तू निर्णय घेतला आता भोग माज्या घरी येऊ नको। भारत हा पूर्वीपासून हिंदू आणि बुद्ध धर्मियांना आश्रय देतो आहे। नाहीतर बांगलादेश च्या सीमेवर कुंपण आणि लेसर भिंती बांधणारा भारताने हिंदू नेपाळ शी मोकळ्या सीमा ठेवल्या नसत्या। तिबेट मधील बुद्ध धर्मियांना आश्रय दिला नसता। थोडक्यात काय भारताने अन्याय ग्रस्त हिंदू, बुद्ध, शीख, मुस्लिम अहमादी,मुस्लिम दाऊद बोहरा यासारख्य लोकाना आश्रय देण्यासाठी योग्य पोलिसी बनावाय हवी।

In reply to by अमितदादा

निर्वासितांचे धर्म बघून आश्रय दिला जात नाही, आंतराष्ट्रीय संकेतानुसार, तसेच भारत काही अधिकृतपणे हिंदू देश नाही

In reply to by संदीप डांगे

निर्वासितांना आश्रय देणे बंधनकारक नाही. २-३ वर्षांपूर्वी सिरिया व इराकमधील बरेचसे नागरिक युरोपमध्ये कायदेशीर्/बेकायदेशीर आश्रय घेण्याच्या प्रयत्नात होते. जर्मनी, फ्रान्स इ. देशांनी त्यांना अधिकृत आश्रय दिला परंतु आम्ही एकही निर्वासित घेणार नाही असे सांगून हंगेरीने आपल्या सीमेवर कडेकोट बंदोबस्त ठेवून एकाही निर्वासिताला देशात घुसून दिले नव्हते. इस्राईल धर्म बघूनच आश्रय देतो. भारत अधिकृतरित्या हिंदू असो वा नसो, जगात भारत हा हिंदूंचाच देश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे भारताने पाकिस्तान/बांगलातील फक्त हिंदूंनाच आश्रय देण्याचे ठरविले तर कोणीही आरडाओरडा करू शकणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

कशाला द्यायचा पण मी म्हणतो भारताने पाकिस्तान/बांगलातील हिंदूंना आश्रय? सोन्याबापू म्हणतात त्याप्रमाणे जेव्हा संधी होती तेव्हा आले नाहीत मग आता आपण कश्याला नसत्या उचापत्या वाढवत बसाव्या. इथं घरचं झालं थोडं अन व्याह्यानं धाडलं घोडं अशी गत व्हायची.

In reply to by गणामास्तर

आपली इथे वाट लागेल हे दुर्दैवाने त्यांच्या त्यावेळी लक्षात आले नव्हते. स्थानिक मुस्लिमांवर भोळसटासारखा त्यांनी विश्वास ठेवला आणि त्यांचा विश्वासघात झाला. इथल्या निर्धमांधांचे २०१६ मध्ये सुद्धा डोळे उघडलेले नाहीत. मग ६९ वर्षांपूर्वी सर्वसामान्यांना तिथे राहण्यात असलेले धोके लक्षात आले नसावेत यात आश्चर्य ते काय? त्यांच्यावर तिथे ते हिंदू असल्याने अन्याय होत आहे. म्हणजे धर्म मुस्लिम नसल्यानेच त्यांना अन्यायाला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत भारताने त्यांच्या पाठीशी उभे रहायलाचा पाहिजे. १९४७ मध्ये फाळणी होताना लोकसंख्येची संपूर्ण अदलाबदल केली असती तर हे प्रश्न निर्माण झाले नसते. त्यावेळी केलेल्या चुकांची भरपाई भारताने करायलाच हवी.

In reply to by श्रीगुरुजी

बरं, भरपाई एकट्या भारतानेच करावी काय? मुस्लिम तेतुका मेळवावा वर पाकिस्तान स्थापन झालाय न? द्या मग एक ऑफर पाकला, तुमच्याकडले सगळे हिंदु द्या अन आमच्याकडली सगळी मुसलमानं घ्या, जमतंय का बघा प्रकरण जमतंय का! जमले तर आमच्याइतके आनंदी कोणी नसेल! भेंडी नोकरी धरली सीमसुरक्षेकरता अन दंगली झाल्या का आवरत फिरायला लागतंय तिच्यायला घरातल्याच!