✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कायदे पाळणे हा मूर्खपणा आहे का ?

म
माम्लेदारचा पन्खा यांनी
Fri, 07/29/2016 - 14:04  ·  लेख
लेख
http://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/relief-for-digha-illegal-buildings-before-2015-to-be-regularised/articleshow/53440561.cms आज ही बातमी वाचून हसावं की रडावं तेच कळेना राव ! आयुष्यभर झगडून एक एक पै जोडून घर विकत घेण्यासाठी १७६० कायदे पाळणारा माणूस मूर्ख असतो काय ? हे कुठंतरी थांबायला हवं.... हेच करायचं होतं तर इतका आटापिटा का केला आधी ? लोकांचा अजून किती अंत पाहणार ? नुसते प्रश्न प्रश्न आणि प्रश्न !
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8417 वाचन

💬 प्रतिसाद (33)

प्रतिक्रिया

अगोदर पाडलेल्या सहा इमारती या

कंजूस
Fri, 07/29/2016 - 14:16 नवीन
अगोदर पाडलेल्या सहा इमारती या निर्णायप्रमाणे पाडल्या असल्याने त्याची भरपाई सरकार बहुतेक देणार नाही. जेव्हा रहिवाशांना पंधरा वर्षांपुर्वी नोटिस आली होती की "तुमची इमारत स्थानिक सिडकोच्या परवानगीशिवाय आहे" तेव्हाच सरकारकडे एक रीतसर अर्ज करून ठेवायला हवा होता की आमचा विचार करा आणि मार्ग काढा.प्रकरण सरकारकडे गेले असते आणि कोर्टात न गेल्यामुळे काहीच निर्णय झाला नसता.
  • Log in or register to post comments

स्टॅम्प ड्युटी + रजिस्ट्रेशन चार्जेस कसे घेतात

जगप्रवासी
Fri, 07/29/2016 - 14:23 नवीन
पण एक कळत नाही की जर अनधिकृत जागेवर बांधकाम केलेली इमारत आहे तर त्यावर स्टॅम्प ड्युटी + रजिस्ट्रेशन चार्जेस कसे घेतात. आणि बांधकाम चालू असतानाच का नाही थांबवत. हे अनधिकृत जागेवर बिनधास्त राहणार आणि आपण अधिकृत जागेवर टीचभर घर घेण्यासाठी आयुष्यभर राबणार.
  • Log in or register to post comments

रजिस्ट्रेशन कुठचे

पैसा
Fri, 07/29/2016 - 14:27 नवीन
ऑक्युपन्सी सर्टिफिकेट सुद्धा नसते. बँकेच्या ऑफिसरला गोडाऊनमधे कोंडून घालून सँक्शनवर सह्या घेतात. हे बिहारमधे नव्हे तर माझ्या वर्गमित्राच्या बाबत मुंबईत झाले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जगप्रवासी

महसूल विभागाच्या अखत्यारीत

संदीप डांगे
Fri, 07/29/2016 - 15:06 नवीन
महसूल विभागाच्या अखत्यारीत जमिनीची वैधता तपासणे येत नाही, ते फक्त नोंदणी करतात, पुढे काहीही झोल झाले तर हात वर करतात असा अनुभव आहे,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जगप्रवासी

बरोबर..आणि हेच लोकांना माहित

अमितदादा
Fri, 07/29/2016 - 15:17 नवीन
बरोबर..आणि हेच लोकांना माहित नसते...आज ही माज्या माहितीतले लोक आस बोलतात कि सरकार ने फी घेतलीय नोंद करून घेतलीय म्हणजे कायदेशीर असणारच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

रिकामी जागा (निवासी / शेतकी)

सौंदाळा
Fri, 07/29/2016 - 15:21 नवीन
रिकामी जागा (निवासी / शेतकी) घेताना जमिनीची वैधता कशी तपासावी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

गावातल्या सगळ्या जमिनीच्या

संदीप डांगे
Fri, 07/29/2016 - 15:31 नवीन
गावातल्या सगळ्या जमिनीच्या कुंडल्या ज्याच्या हातात तो तलाठी!!! शहरात कोण ते माहिती नाही, पण रीतसर इतिहास काढता येतो, अगदी दोनशे तीनशे वर्ष जुन्या नोंदीही तपासून बघता येतात, सामान्यपणे मोठ्या बॅंक्स यासाठी मदत करतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

शहरात कोण - नझुल कार्यालय ,नप

कैलासवासी सोन्याबापु
Sat, 07/30/2016 - 08:09 नवीन
शहरात कोण - नझुल कार्यालय ,नप, मनपा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

बांधकाम चालू असतानाच का नाही थांबवत

NiluMP
Sat, 07/30/2016 - 15:05 नवीन
हि बांधकामे स्थानिक नेते, पोलिस, प्रशासन यांच्या आशिर्वादाने झालेली आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जगप्रवासी

हो

पैसा
Fri, 07/29/2016 - 14:25 नवीन
कायदे पाळणे हा कुठेही शुद्ध मूर्खपणा असतो. तुम्ही जर कायदे मोडणार्‍यांकडे दुर्लक्ष केले तर तो तुमचा दुबळेपणा समजला जातो. एव्हाना आदर्श सुद्धा नियमित झाले असेल. सलमानच्या पोलीस अंगरक्षकाचे काय झाले आठवा. पण तरीही कायदे पाळणे रक्तात भिनले आहे. ते झटकून टाकता येत नाही. याबद्दल स्वतःचाच भयंकर राग येतो.
  • Log in or register to post comments

दुर्दैवाने हे खरं आहे.....

माम्लेदारचा पन्खा
Fri, 07/29/2016 - 21:34 नवीन
दिवाभीतासारखं जगणं सोडून दिलं पाहिजे आता !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

लेखकाच्या भावनेशी सहमत। कायदा

अमितदादा
Fri, 07/29/2016 - 14:38 नवीन
लेखकाच्या भावनेशी सहमत। कायदा कठोरपणे आणि सगळ्यांना समान राबावाय हवा। पण कधी कधी अनधिकृत बांधकामाचा विचार केल्यास त्यातील एक अगतिक बाजू दिसून येते. काही लोकांना इमारत अधिकृत आहे की नाही हेच मुळात माहित नसते, हि जरी त्यांची चुकी असली तरी फक्त बिल्डर च्या चुकीची किमंत ह्या लोकांच्या आयुष्याची पुंजी नष्ट करून कशी चुकवायची. ग्रामीण भागात घर शेतजमिनीवर बांधताना NA कॉलेक्टर ऑफिस मध्ये करून घ्यावा लागतो, पण आपण कलेक्टर ऑफिस मध्ये सामान्य लोकांना काय किंमत दिली जाते हे जाणतोच, तसेच गावातून कचेरी मध्ये चकरा मारून लोक वैतागून जातात आणि घर बांधून टाकतात. हि घर फक्त आधी परवानगी घेतली नाही म्हणून बेकायदेशीर ठरतात. सरकार ने पहिली व्यवस्था सुधारली पाहिजे आणि कडक अंमलबजावणी केली पाहिजे, तसेच लोकांना समजेल उमजेल अशी कायदेशीर प्रक्रिया कराय हवी. अनेक उदाहरण आहेत महाराष्ट्रात आज अशी. काही चुकले असल्यास दाखवून कृपया सांगावे.
  • Log in or register to post comments

मध्ये एक बातमी वाचलेली..

टवाळ कार्टा
Fri, 07/29/2016 - 15:12 नवीन
मध्ये एक बातमी वाचलेली...सरकारकडे रजिस्ट्रेशन करताना त्याच घरावर आधी रजिस्ट्रेशन झाले आहे की नाही हे चेक करायची व्यवस्था नाहीये
  • Log in or register to post comments

एवढ्यातच एका महान माणसाबद्दल

संदीप डांगे
Fri, 07/29/2016 - 22:15 नवीन
एवढ्यातच एका महान माणसाबद्दल कळले होते, पठ्ठ्याने एकाच फ्लॅटवर दोन ब्यान्केकडून एकाच वेळी कर्ज काढले, नंतर तोच फ्ल्याट एकाच वेळी तीन जणांना विकलाही. हा पैसे घेऊन फरार आणि ते 'पाच मालक' आपसात भांडत आहेत की मालकी नक्की कोणाची. ही आत्ता आत्ताची गोष्ट आहे गेल्या तीनेक वर्षातली. कायदे-बॅकग्राउंड चेक कडक असूनही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मी टेलिव्हिजन क्षेत्रात असताना

बोका-ए-आझम
Fri, 07/29/2016 - 22:28 नवीन
माझे एक बाॅस होते असे. त्यांनी एक इक्विपमेंट ३ बँकांकडे गहाण ठेवली होती. नंतर स्वतः अ शिवाजी पार्क भागातला Flat ही तशाच पद्धतीने गहाण ठेवायचा प्रयत्न केला. ते अंगाशी आलं.सध्या साहेब कोर्टाकडून absconder म्हणून घोषित झालेले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

अशा केसेस बद्दल एक शंका आहे.

अंतु बर्वा
Sat, 07/30/2016 - 01:46 नवीन
अशा केसेस बद्दल एक शंका आहे. ब्यांक ओरिजिनल अ‍ॅग्रीमेंट घेतल्याशिवाय लोन डिसबर्स करत नाहीत. मग ही लोकं बाकीच्या दोन ब्यांकांना तारण म्हणुन काय देत असतील? जनरल मोडस ऑपरेंडी समजुन घ्यायचा प्रयत्न करतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

एखाद्या बँकेच्या आतुन सहकार्य

कानडाऊ योगेशु
Sat, 07/30/2016 - 14:56 नवीन
एखाद्या बँकेच्या आतुन सहकार्य असेल. शेतकर्यांच्या कर्जमाफीबाबत असे प्रकार ऐकले आहेत. एवीतेवी कर्ज माफ होणारच आहेत म्हणुन बँकेतला एखादा करप्ट अधिकारी डमी शेतकरी उभे करुन कर्ज लाटतात. ख.खो.दे.जा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतु बर्वा

साहेब तूमच आपलं काही तरीच हां

झेन
Fri, 07/29/2016 - 16:00 नवीन
पाळणा-याची आजकाल किव करतात. नो एनट्री/राँग साईड नी दूचाकी वरून तीघे जण गेल्यावर चौकातल्या पोलीसांच्या नजरेत वेगळाच आदर दीसतो(काही दिवसांनी सँल्यूटपण मारतिल). कुठल्याही कर विभागात कर बुडवणा-या लोकांना सन्मान देण्यासाठी दर काही वर्षांनी एखादी योजना निघतेच, सध्या आयकर विभागाची चालू आहेच. मानव अधिकार सुध्दा जेवढा गून्हा मोठ्ठा तेवढे जास्त. उगीच नाही कुणी शिलाई यंत्र वाटंत. साहेब तूमच आपलं काही तरीच हां.
  • Log in or register to post comments

कायदा पाळणे मूर्खपणा नाहि...

अर्धवटराव
Sat, 07/30/2016 - 02:25 नवीन
पण कायद्याची ताकत ऑव्हरएस्टेमेट करणं हा गुन्हा आहे. शेवटी कायदा हा इंटरप्रिटर आणि अंमलदारांच्या मर्जीवर अवलंबून असतो, व ते आम आदमीच्या मतदानावर.
  • Log in or register to post comments

वाह!! प्रिसाईज पण थेट!! जियो

कैलासवासी सोन्याबापु
Sat, 07/30/2016 - 08:12 नवीन
वाह!! प्रिसाईज पण थेट!! जियो बॉस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

कहर!!! नेमकेपणा अत्यंत आवडला.

असंका
Sat, 07/30/2016 - 08:55 नवीन
कहर!!! नेमकेपणा अत्यंत आवडला...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

समजा असे अनधिकृत कामे अधिकृत

एकुलता एक डॉन
Sat, 07/30/2016 - 14:39 नवीन
समजा असे अनधिकृत कामे अधिकृत करू नये म्हणून PIL टाकली तर ?
  • Log in or register to post comments

हि बातमी वाचल्यावर मी ठरवले

NiluMP
Sat, 07/30/2016 - 15:09 नवीन
हि बातमी वाचल्यावर मी ठरवले आहे आपणही झोपडपटटीत घर घ्यावे कारण कोणतेही सरकार येउन देत त्यांना हात लावण्याची कोणाचीच हिंमत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन

अगदी बरोबर!

चलत मुसाफिर
Sun, 07/31/2016 - 08:52 नवीन
काही वर्षांपूर्वी मी ठाण्यातील एका पांढरपेशा भागात गुंतवणुकीसाठी फ्लॅट शोधत होतो तेव्हा एका एजंटने मला हा "पर्याय" सुचवला होता. म्हणतो कसा, "साहेब, पन्नास लाखाचा फ्लॅट घेण्याऐवजी पंधरा लाखाची खोली घ्या अमक्या झोपडपट्टीत. रेशनकार्ड बनवून घ्या. ती पुनर्विकासाला येणार आहे लवकरच. मग तिथे फ्लॅट मिळेल, तो विका पाचपटीने". आम्ही हात जोडून बाहेरचा रस्ता पकडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: NiluMP

असले एजन्ट आजकाल मिळत नाहीत

एकुलता एक डॉन
Sun, 07/31/2016 - 14:21 नवीन
असले एजन्ट आजकाल मिळत नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चलत मुसाफिर

..

चंपाबाई
Sun, 07/31/2016 - 18:23 नवीन
लोकानी झोपडप्टीएत ५ वर्षापुर्वी पत्र्याच्या खोल्या घेतल्या होत्या तीन लाखाला. आता त्या १५ लाखाला विकून पनवेलात फ्लॅट घेतलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन

एकदा दिल्लीला या. इथल्या ७०

विवेकपटाईत
Sat, 07/30/2016 - 15:29 नवीन
एकदा दिल्लीला या. इथल्या ७० टक्के वासाहिती बेकायदेशीर आहेत. लोकांकडे रजिस्ट्री सुद्धा नसते. तरीहि जमीन किंवा घरे कित्येकदा विकली जातात. बाकी हम करे सो कायदा हीच दिल्लीकरांची वृत्ती आहे.
  • Log in or register to post comments

म्हणजे दिल्लीत नेहेमीच आम आदमीची सत्ता असते म्हणा कि...

अर्धवटराव
Sun, 07/31/2016 - 01:43 नवीन
:ड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

एकदा दिल्लीला या. इथल्या ७०

विवेकपटाईत
Sat, 07/30/2016 - 15:29 नवीन
एकदा दिल्लीला या. इथल्या ७० टक्के वासाहिती बेकायदेशीर आहेत. लोकांकडे रजिस्ट्री सुद्धा नसते. तरीहि जमीन किंवा घरे कित्येकदा विकली जातात. बाकी हम करे सो कायदा हीच दिल्लीकरांची वृत्ती आहे.
  • Log in or register to post comments

...

चंपाबाई
Sun, 07/31/2016 - 05:25 नवीन
हेच काँग्रेसने केले असते तर मिसळपाववर प्रचंड गदारोळ झाला असता... काँग्रेस भ्रष्ट आहे ते आमच्यासारख्या ट्याक्स पेयरचे पैसे पाणी वीज हे लोक पळवतात इ सगळे मुद्दे इथे डिस्कस झाले असते... पण हे चर्चिष्ट लोक आता गायब झालेत.
  • Log in or register to post comments

हे थांबायला हवं,कडक कायदे

टर्बोचार्जड फिलॉसॉफर
Sun, 07/31/2016 - 17:04 नवीन
हे थांबायला हवं,कडक कायदे असल्याशिवाय व त्या कायद्यांची अंमलबजावनी झाल्याशिवाय हे थांबणार नाही.अश्या केसेससाठीसुद्धा जलदगती दिवाणी न्यायालये असायला हवीत.
  • Log in or register to post comments

लेखातील शीर्षकाशी आणि भावनेशी पूणर्तः सहमत आहे.

साधा मुलगा
Mon, 08/01/2016 - 23:10 नवीन
लेखातील शीर्षकाशी आणि भावनेशी पूणर्तः सहमत आहे. कायद्याने चालणाऱ्या माणसांची आज काळ थट्टाही केली जाते, पण हि थट्टा करत असताना आपण लॉंग टर्म मध्ये काय गमावून बसणार आहोत याचे कुणाला भान नसते. कायदा मोडणारी बिनदिक्कतपणे कायदा मोडतात पण आपण मात्र काही करू शकत नाही. मी जे काही पेपरात वाचले आहे आणि लोकांकडून ऐकले आहे त्यातून आपण अधिकृतपणे राहतो याची कीव वाटायला लागली आहे. अधिकृत इमारत असेल धोकादायक इमारतच्या नावाखाली नवा छळ मांडला आहे. नको त्या अनेक इमारतींना गरज नसताना धोकादायक बनवून २४ तासात इमारत खाली करण्याचे आदेश देणे वगैरे चालते, यात बिल्डर, राजकारणी, महानगर पालिकेचे अधिकारी या सर्वांचा समावेश असतो. मागच्या वर्षी ठाण्यात जी बिल्डिंग पडली ती महानगर पालिकेने धोकादायक म्हणून खरेतर जाहीर केलीच नव्हती. त्यानानातर जागे झालेल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अनेक अश्या सो called धोकादायक इमारती खाली करून तिथे राहणाऱ्या रहिवाश्यांना निवासी शिबिरात हलविले पण तिथे गेल्यावर आगीतून फुफाट्यात गेल्यासारखे झाले. तिथे न धड पाण्याची सोय, आजूबाजूच्या खोल्यांमध्ये दारुडे आणि त्यांची सगळी घाण असा सगळा मामला होता. यात एकटे राहणाऱ्या वयस्कर लोकांचे फार हाल झाले. बाकी जागा जाईल म्हणून कोणी राहती जागा सोडायलाहि तयार नवते. मालकाला आणि डेवलोप करणाऱ्या बिल्डरला तर असे भाडेकरू नकोच असतात. खरोखर कठीण आहे परिस्थिती. दिघ्याच्या बाबतीत तरी अनधिकृत/ अधिकृत पेक्षा मला हि केस फसवणुकीची वाटते. एका अर्थाने हा निर्णय दिघावासायांसाठी वरदान आहे, लोक रस्त्यावर यावीत यासारखी वाईट गोष्ट नाही, पण यामुळे कायदा मोडणाऱ्यांना अधिक बळ मिळेल आणि त्याचे दुष्परिणाम आपल्यासारख्यांना directly/indirectly भोगावे लागतील.
  • Log in or register to post comments

दिघावासायांसाठी वरदान आहे

NiluMP
Mon, 08/01/2016 - 23:51 नवीन
My Dear Friend, There are other way to give justice to victims, like catch the builder, who have build these building, Municipal officer who supplied water, recover the money from them & give back to victims. Make a law that the electricity supplying company wont provide electricity to such building. Make accountable to ward officer, ward police officer and corporator if illegal construction & encroachment happen in their ward the will loose their jobs. Finally i don't understand why only government land are grabbed for encroachment and none of the mastermind get punished for this. And the Biggest joke, government is going to legalize all illegal construction till 2015 without giving guarantee that there will be no illegal construction & encroachment going to happen moving ahead.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा