आज मिपावर पहिल्यांदाच पोस्ट करत आहे .
नमस्कार , मिसळपाव वर ही माझी पहिलीच पोस्ट आहे . तसं इथे खातं सुरु करून एक वर्ष तीन महिने झाले असले तरी सुरुवातीचं वर्ष मी इथे जवळजवळ कधीच फिरकले नव्हते . तेव्हा सगळा वेळ फेसबुकवर जायचा , तिथे सचिन परांजपे , स्मिता जोगळेकर , राज जैन , संजीव पालेकर , सर्जेराव जाधव , रुचिरा कुळकर्णी आणि अशा कितीतरी उत्तम लेखकांचं लिखाण वाचताना दिवस कधी सरायचा तेच समजायचं नाही . सकाळी ब्रश करायच्याही आधी , रात्री अंथरुणात पडून २- ३ वाजेपर्यंत आणि दिवसभरातले बरेच तास फेसबुकवरच जाऊ लागले जेव्हा आपण प्रचंड फेसबुक अॅडिक्ट झालो आहोत हा साक्षात्कार झाला आणि मनावर मोठ्ठा दगड ठेवून फेसबुक खातं डिलीट केलं . पण काहीतरी दर्जेदार वाचायची भूक स्वस्थ बसू देत नव्हती तेव्हा मिपाकडे वळणं झालं . साधारण गेल्या ३ महिन्यांपासून मी मिपावर सक्रिय आहे . इथे फेसबुकएवढा वेळ जात नाही आणि उत्कृष्ट पोस्ट्सही वाचायला मिळतात . इथल्या पोस्ट्स वाचत आहे . फक्त १० - १२ पोस्ट्सवर प्रतिसाद दिला आहे . इथल्या २-३ रेसिपीज ट्राय केल्या आहेत :) . स्वतःचं काही लिहिण्याएवढी प्रतिभा / उत्साह माझ्यात बहुधा नसावा , निदान सध्यातरी .
तर ही पोस्ट लिहिण्याचा प्रपंच करण्याचं कारण म्हणजे काल एका व्यक्तीने मला विचारणा केली की तुझा ब्लॉग आहे का ? मी नाही असं सांगितलं . त्यानंतर बऱ्याच वेळाने मला आठवलं कि अरेच्चा ! आपलाही एक ब्लॉग आहे की ! मिपावरच्या ज्या सदस्यांचे स्वतंत्र ब्लॉग्ज आहेत त्या ब्लॉग्जवर ते त्यांच्या मनातले विचार , सुचलेलं साहित्य - कथा / कविता , स्फुट / ललित असं काही काही लिहित असतात ... त्यामुळे बहुधा ब्लॉग आहे का या प्रश्नावर अशाच प्रकारचा ब्लॉग अशी विचारणाऱ्या व्यक्तीची कल्पना असावी असं वाटलं . आणि माझ्या ब्लॉगवर यातलं काही नाही म्हणून माझा ब्लॉग चटकन आठवला नसावा. शिवाय त्या ब्लॉगकडेही मी बरेच महिने फिरकलेले नव्हते . सुरुवातीला मोठ्या उत्साहात ब्लॉग सुरु केला खरा पण मग तो कंटीन्यू करायचा कंटाळा केला न काम स्टॉप केलं . ( गोष्टी अर्धवट सोडून देणं ही एक वाईट सवय मला आहे , एक दोन कथाही सुरुवात करून मग बंद केल्यात . सुधारण्याचा प्रयत्न चालू आहे ) तर या ब्लॉगची काल आठवण आली . ब्लॉगची प्रसिद्धी कशी वाढवायची याचं काडीइतकंही ज्ञान मला नसल्याने :( या ब्लॉगला फार कोणी भेटीही दिलेल्या नाहीत . स्वप्नील बांदोडकर या गायकाच्या ६५ गाण्यांचे लिरिक्स - शब्द आणि उपलब्ध असलेल्या गाण्यांच्या युट्युब व्हिडिओची लिंक आणि प्रत्येक गाण्याच्या ऑडिओची लिंक गाण्यासोबत दिली आहे .
http://swapnilsongs.blogspot.in/
मिपाकरांना नम्र विनंती कि एकदा या ब्लॉगला भेट द्या . कदाचित एखादं छानसं गाणं तुम्हाला आवडेलही .
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मिपावरचे प्रतिसाद वाचताना
हम्म