Skip to main content

रॉयल राइड... रॉयल एन्फ़िल्ड.... प्रश्नोत्तरी धागा

लेखक कैलासवासी सोन्याबापु यांनी गुरुवार, 02/10/2014 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा परीवारात बरेच रॉयल एन्फ़िल्ड उर्फ़ बुलेट चे चाहते अन मालक आहेत, ह्या धाग्याचा हेतु कुठल्या ही दुसर्या ब्रॅंड च्या बाईक ची खिल्ली उडवणे, किंवा पातळी उतरुन टिका करणे हा मुळीच नाही, फ़क्त स्टॅंड अलोन बायकिंग करण्यापेक्षा , एक ऑर्गनाईझ्ड बायकींग एफ़र्ट म्हणुन हा लेखन प्रपंच, मोदक ह्यांनी प्रथम ह्या धाग्याची कल्पना मांडली... इथे अपेक्षित काय आहे ?? आर .ई. उर्फ़ बुलेट मालक असाल तर आपले अनुभव, कथन, मेंटेनंस टिप्स, इत्यादी आदान प्रदान, नसाल अन रॉयल एन्फ़िल्ड मधे रस असेल तर इथे प्रश्नोत्तराची हक्काची जागा, विकत घेण्यात रस नसेल तर कुठे ह्या बाइक्स उत्तम कंडीशन मधे भाड्याने मिळतील, कुठ्ली एक्स्पिडीशन आर ई वर केली तर मजा , आराम अन ऍडव्हेंचर द्विगुणीत होईल ही चर्चा इथे आपण करुयात. तर श्रीगणेशा स्वरुप, काही योगदान माझे (मोदक ह्यांनी मला, आर ई ची ३५० च का घेतली, एकंदरीत अनुभव काय इत्यादी कथन करण्याची विनंती केली त्याला अनुसरुन) १. मी क्लासिक ३५० का घेतली ?? अ. उत्तम संगम, ३.५ रॉ ताकद अन त्यातल्यात्यात बरे माईलेज (माझ्या पेशात खुप फ़िरावे लागते) ब. जरासा ओल्ड वर्ल्ड चार्म, सदरहु मॉडेल हे रॉयल एन्फ़िल्ड ह्या अगदी सुरुवातीच्या डीझाईन्स वर आधारीत आहे क. रोबस्ट बिल्ड, कमी देखभालीचा खर्च २. क्लासिक ३५० चे फ़ायदे ?? अ. मजबुत तरीही जास्त जड नसणे ब. ट्रेडीशनल कार्ब्युरेटर टेक्नॉलोजी (बायकिंग मधे हे मला महत्वाचे वाटले, ई एफ़ आय मधे फ़्युल पंप वापरले जातात ते ही इलेक्ट्रॉनिक चिप्स ने कंट्रोल्ड, त्यात पेट्रोल ही जास्त जाते, अन आडवळणाला काहीही प्रॉब्लेम आला तर लोकल मेकॅनिक त्यात काहीच करु शकत नाही, ह्या उलट कार्ब्युरेटर असला तर अगदी मेकॅनिक नसला तरी जुजबी माहितीवर आपण स्वतः डॅमेज कंट्रोल करुन परत ती बाईक वर्कशॉप पर्यंन्त आणु शकतो) क. स्पेयर पार्ट्स ची निट अवेलेबिलिटी अन सर्विस सुलभ असणे, ९० मिनिट एक्स्प्रेस सर्विस मधे शोरुम ला हिची व्यवस्थित निगा घेतली जाऊ शकते. ड. उत्तम मायलेज (बायकींग ला हे असणे बरे असते) ई. उत्तम ट्रॅक रेकॉर्ड, शिवाय मायलेज उत्तम असल्याने सायलेंसर चेंज अन इतर अस्थेटीक मॉडीफ़िकेशन्स (हॅंडल बार चेंज, रीम व्हिल्स ) नंतर ही खिशाला काही विषेश चाट बसत नाही ३. क्लासिक ३५० चे तोटे ?? १. जास्तच पॉवर हवी असल्यास ती नाही, "भारताची कल्ट हार्ले सम बाईक" असली तरीही ३५० सी सी आहे. २. ८० किमी/ तास नंतर पुर्ण बाईक कंप पावते ३. कंपनी ने दिलेले टायर भंगार आहेत (बदलल्यावर काही प्रॉब्लेम नाही ड्राय अन वेट दोन्ही ट्रॅक्शन एन्वॉयरमेंट मधे) ४. कंपनी सायलेंसर साधा घेतला तर बरेचदा खड्ड्यातुन काढताना घासतो खालुन, ऑफ़ रोड घ्यावा तर कंपनी पॉलिसी मधे बाय बॅक किंवा एक्स्चेंज बसत नाही, दोन्ही बोकांडि बसतात सायलेंसर्स ५. कंपनी सायलेंसर चा आवाज ’बुले्ट आली बे’ अशी घोषणा करत नाही ६. फ़िटिंग्स अन बोल्ट्स मधे रस्टींग प्रॉब्लेम येतो ३-४ पावसाळ्यां नंतर मला तरी मायलेज हा फ़ायदा इतर तोट्यापेक्षा मोठा वाटला सो मी घेतली, सद्ध्या ३-४ महिनेच झालेत, १५०० किमी झाले आहेत. मोदक भाई, अन इतर , एकंदरीत हे फ़ायदे अन तोटे पाहुन मी क्लासिक ३५० घेतली आहे. :)

वाचने 150746
प्रतिक्रिया 648

प्रतिक्रिया

In reply to by भटकंती अनलिमिटेड

तरीच ब्लॅक पँथर चालवतोस दादा तू :P

In reply to by महासंग्राम

ऑरेंज डेव्हिल खुणावतोय. ब्लॅक पॅंथरही ठेवेन त्या वेळी. बघू नशीब आणि अकाउंट कसं साथ देतंय.

In reply to by भटकंती अनलिमिटेड

तुमच्या चित्त्याचा फोटो पाहिलाय चेपुवर, या ब्लॅक पँथर चा फोटू तरी दाखवा.

In reply to by जगप्रवासी

इथे आणि इथे. आणि बाकी हत्यारं

In reply to by भटकंती अनलिमिटेड

सांगितल्यावर लगेच फोटो अडकावल्याबद्दल. बाकी चित्त्याला अशा प्रकारे पार्क केलेलं पाहून डोळे पाणावले.

In reply to by जगप्रवासी

बाकी चित्त्याला अशा प्रकारे पार्क केलेलं पाहून डोळे पाणावले.
मग कसा करायचा ओ?

In reply to by भटकंती अनलिमिटेड

गाडी अर्धी बाहेर आलीये कंपाउंडच्या म्हणून म्हटलं

बुलेट म्हणजे राजा गाडी आहे भाऊ.. च्यामारी ते धड धड ऐकून लोक बघायला लागली का माणूस अजूनच कणा पिळगाळत अक्सेलेटरचा .. पण, शेवटी अव्हेंजरच घेतली, :) कारण :- 1) बुलेटचा रॉयल लूक एव्हढा आवडला नाही, ते चौकोनी डिजाईन पाहून कसेसे होते.. 2) एकदा बाइक घेऊन झोपलो आहे, त्यात मी सहसा 80 च्या खाली नसतोच स्पीडमध्ये. हे धूड अंगावर पडले तर काय होणार.. 3) अव्हेंजर आवडली, टी तिच्या बुटक्या लूक मुळे. सीट खाली असल्यामुळे रोडला धरून चालते, आणि क्रोम्स तर किलर आहेत. आताही बाजूला दुसरी अव्हेंजर आली का मान वळतेच. वर सांभाळायला सोप्पी आहे.. आज जवळपास 6 वर्षे झालीत पण त्रास नाही..

In reply to by ब़जरबट्टू

प्लेन हायवेला अ‍ॅव्हेंजर म्हणजे मर्सीडीझच्या तोडीचा कंफर्ट आहे :) पण जर टिपिकल भारतीय स्टँडर्डच्या रस्त्यावर चालवत असाल तर पाठीची हालत खराब होते

In reply to by टवाळ कार्टा

प्लेन हायवेला अ‍ॅव्हेंजर म्हणजे मर्सीडीझच्या तोडीचा कंफर्ट आहे :)
जुन्या अवेंजर चा अनुभव अतिशय वाईट आहे नवीन कलेक्शन चालवून पाहिलेले नाही

In reply to by टवाळ कार्टा

आता बापूंचा धागा हायजॅक केल्यासारखा होतोय .. :) अव्हेंजर हायवेला मक्खन आहे, 80-90 ला कसली स्मूथ चालते राव. पण याच स्पीड ला ब्रेक मारला का गोड्या कपाळात.. हॅन्डल लॉक होते सरळ, दुसरे डोके खाते ते हमखास कुठे पण घासणारे सायलेन्सर.. लो ग्राउंड क्लियरन्स असल्यामुळे ऑफ रोड ला मारा खातेच, पण टका, बुलेट तरी कुठे चांगली आहे कंट्रोल आणि सस्पेन्शनला ? :)

In reply to by ब़जरबट्टू

या धाग्याचं नाव बदलून "चर्चा बाइकांच्या" असं करावं या मताचा मी आहे. फारच जेनेरिक आणि सगळ्या ब्रॅंड्सबद्दल चांगली चर्चा होते आहे. नवनवीन माहिती मिळते आहे.

In reply to by ब़जरबट्टू

अव्हेंजर हायवेला मक्खन आहे, 80-90 ला कसली स्मूथ चालते राव.
+११११११११
पण याच स्पीड ला ब्रेक मारला का गोड्या कपाळात.. हॅन्डल लॉक होते सरळ
+११११११११
बुलेट तरी कुठे चांगली आहे कंट्रोल आणि सस्पेन्शनला ? :)
याबाबत माहीत नाही

In reply to by टवाळ कार्टा

बुलेट तरी कुठे चांगली आहे कंट्रोल आणि सस्पेन्शनला ? :) याबाबत माहीत नाही
नशीब :)

In reply to by टवाळ कार्टा

२.५ वर्ष वापरतोय अव्हेंजर पण अजूनही काही त्रास झाला नाही (लॉन्ग ड्राइव्ह + घर ते ऑफिस). घ्यायची बुलेट होती पण तेव्हा खिशाला परवडणारी नव्हती म्हणून सध्या तरी दुधाची तहान ताकावर भागवतोय. बुलेट घेण्याच्या विचारात असलेला जगप्रवासी

जाऊ द्या डांगे साहेब, आम्ही एक नवा एक्सकलुसिव्ह एन्फिल्डर्स धागा काढावा म्हणतो, ओन्ली फॉर सर्विस अँड अदर टिप्स एक्सचेंज, टूर अनुभव शेयर करायला वगैरे :)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बरोबरै... उगाच अनधिकृत बांधकामे नियमीत करायला नकोत. आहे हे असेच असूदे आणि नवीन ठिकाणी आणखी डिट्टेलमध्ये बोलूया :)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

काढाच बापूसाहेब. त्या धाग्यावर फक्त आणि फक्त बुलेटचीच चर्चा होइल. टीकाही चालेल पण फक्त बुलेटबद्दल.

In reply to by संदीप डांगे

मी राजपुताना कस्टम्स रेकमेंड करेल डांगे साहेब! अर्थाचे हा फक्त एक सल्ला आहे देवा, तुम्ही अभ्या वगैरे आर्टिस्ट मंडळी आहात, तुम्हाला आस्थेटिक सेन्स,कलर डेप्थ वगैरे जास्त कळते, पण एक रॉयल एन्फिल्ड लवर म्हणून सांगतो, वर्दे गाडीचे "एस्सेन्स" बदलून टाकतात बुआ, म्हणजे रस्टीक ओल्ड स्कुल लुक अन फील जातो, उरतो तो एकदम लास वेगास टाईप भगभगाट, एकदम ग्लॉस असलेला ग्लास फिनिश पण साला त्यात मजा नाय वाटत, एन्फिल्ड म्हणजे कशी? कमीत कमी आस्थेटिक कामे, त्यातही पेंटजॉब रगेड हवा, मॅट ब्लॅक, वर्ल्ड वॉर 2 जर्मन लुक, किंवा मॅट ग्रीन (बॉटल ग्रीन मॅट फिनिश) हे आमच्या हृदयाचा ठोका चुकवतात, त्यात समोरचे लेग गार्ड मस्त मशीन रोल्ड दोर गुंडाळले (एपॉक्सी अधेसीव्ह मध्ये बुडवून लेगगार्ड वर मशीन ने दोर लपेटलेला असतो, इंडिकेटर कप्स ब्लॅक (गाडी ब्लॅक असल्यास) हेड लाईट अन टेल लॅम्प अन इंडिकेटर वर ब्लॅक मॅट फिनिश व्हर्टिकल जाळ्या! बास्सस, अन हो उर्वरित क्रोम बफिंग करकरून चककणारे, न सायलेन्सर बदलायचे लफडे (असलीच तर हौस, बॉटल नेक ग्लासवूल उत्तम वाटतो) न और कूछ! राजपुताना वाले हे एस्सेन्स जपतात, अर्थात कस्टमरला हवं तसं ते पण मोडीफाय करून देतातच म्हणा

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

वा राव स्वप्नातील बुलेट उभी केलीत...

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बापू परफेक्त. वरदेची ला डेझर्ट लुकची मज्जा नाही. नेकेड बुलेट, मॅट कलर आणि क्रोम अथवा मॅट फिनिश. बस्स. इतना काफी है. त्यातल्या त्यात सिंगल सीट डिएस असली की बस्स.

In reply to by अभ्या..

आमच्या मागच्या सीट वर दावेदारीण आहे तुमची वहिनी, सिंगल सीट जमणार नाय देवा आम्ही गुपचिप 2 सीटाT ठेवतो

In reply to by संदीप डांगे

वर्दे पेक्षा पुण्यात माझा एक मित्र आहे, कॉनन फर्नांडिस म्हणून भारी बाईक्स मॉडिफाइड करतो हा माणूस आहे. त्याच 'गॅब्रिएल मोटरसायकल्स' म्हणून वर्कशॉप आहे नांदेड सिटी जवळ. वर्दे पेक्षा निश्चितच स्वस्तात मॉडिफाइड करतो तो आणि स्वतः बाईक चा चाहता असल्याने जीव ओततो कामात.

In reply to by महासंग्राम

गॅब्रिएल मोटरसायकल्स एक तर अफाट महाग आहे. दुसरा असा त्याचे बरेच पार्टस् कस्टम मेड असल्याने जर लॉंग टूरवर काही प्रॉब्लेम आला तर ते दुरुस्त होणार किंवा रिप्लेस होत नाहीत.

In reply to by कपिलमुनी

पण,वर्दे पेक्षा नक्कीच कमी महाग मुनिवर्य.
पार्टस् कस्टम मेड असल्याने जर लॉंग टूरवर काही प्रॉब्लेम आला तर ते दुरुस्त होणार किंवा रिप्लेस होत नाहीत.
तुमचे म्हणणे खरे असले तरी माझ्या ऐकण्यात आता पर्यंत कोणालाही असा प्रॉब्लेम आला नाही

In reply to by कपिलमुनी

आणि शेवटी बुलेट आहे चांगलं काम पाहिजे असले तेवढे दाम पण मोजावे लागतील हाकानाका

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

परफेक्ट कॅफे रेसर. अ‍ॅसॉल्ट आहे ही. ३५० सीसी.कॉमवरच पाह्यली. एक ३५० घेऊन आपण करु शकू अशी. बेस्ट ड्रीम प्रोजेक्ट. नायतर शेवटी काँटीनेंटल जीटी आहेच.

In reply to by अभ्या..

कॅफे रेसरच हवी असेल तर ओरिजनल कॅफे रेसरच घे...जास्त पॉवर आहे इंजिनात

In reply to by टवाळ कार्टा

असा लुक याया पाह्यजे बघ cr निदान असा तरी cr2 गेला बाजार हे बग. cr3 कसंय? हाय का भारी काम? करायचीच बघ. जरा पैशे आले की देख तमाशा ;)

In reply to by अभ्या..

सगळं चांगलंय पण पाण्यातून गेल्यावर मागे अंगावर पाणी/चिखल उडेल....

आरई जुना चेस्टनट कलर परत आणतेय. युट्युबवर सुरु आहेत डॉक्यु टाईप झैराती. शिवाय जुन्या हँड पेंटेड गोल्डन लाईन्सच्या आर्टिस्टची पण कलाकारी शो करतेय. नवीन सिल्व्हर क्लासिक वर कॉपर लाइनिंग आहे.

In reply to by टवाळ कार्टा

सुरुवातीचे मॉडेल बघितले होते, तेव्हा जास्त वाटली होती.

रॉयल एन्फिल्ड रायडर मॅनिया 2016 च्या तारखा आलेल्या आहेत. 18 ते 20 नोव्हेंबर. कुणी मिपाकर इच्छुक आहेत काय ?

एका इंडीकेटरचा ब्लिंक रेट दुसर्‍या इंडिकेटरपेक्षा बराच वाढला आहे. घरी काही करण्यासारखे आहे की मेकॅनिककडे जावे लागेल..?

In reply to by मोदक

वायरिंग चेक करा, रिपीटर रिले का कायसे असते एक डबी त्यात पाणी गेले असावे, ब्लोवर मारा ठीक होईल न झाल्यास mechanic!

In reply to by मोदक

एका दिशेच्या दोन इंडिकेटरपैकी (पुढला किंवा मागला) एक (किंवा त्याचा फ्युज) गेला असावा, म्हणून जो शिल्लक आहे तो डबल स्पीडने ब्लिंक करतो.

In reply to by भटकंती अनलिमिटेड

हाच्च प्रॉब्लेम आहे. मागचा इंडिकेटर बंद पडला आहे.

#brotherhood day#avenger FLG टॅग लाइन विडिओ मध्ये बजाज अव्हेंजरला रॉयल एन्फ़िल्डचा भाऊ दाखवायचा प्रयत्न केलाय ज्याची चेहरा पुस्तक वर जॅम खिल्ली उडवली जातेय. या दोन गाड्यात काय साम्य आहे का? बजाज अशी जाहिरात करू शकतो का?

In reply to by पी. के.

मी पण खुप हसुन घेतलं. किमानपक्षी थंडरबर्ड तरी घ्यायची होती. क्लासिकसे कंपॅरिझन म्हणजे हाईट्ट्ट्ट!!!

बजाज अव्हेंजर आणि रॉयल एन्फ़िल्ड या दोन्ही गाड्या क्रुझर बाईक आहेत.. एवढेच साम्य.. फरक खुप आहे... पण जर यातिल कुठलीच गाडी वापरली नसेल तर अव्हेंजर चान्गली आहे... एकदा रॉयल एन्फ़िल्ड वापरली तर मग कुठली गाडी हा प्रश्नच उरत नाही

In reply to by सत्याचे प्रयोग

सध्या थंडर्बर्ड ५०० आणि डेसर्ट-स्टॉर्म मधे जाम कन्फ्युस आहे. वापर आणि ergonomics पाहता थंडर्बर्ड ५०० सगळ्यात उत्तम आहे. पण डेसर्ट-स्टॉर्मच्या लुक्स वर जाम फिदा झालोय.

In reply to by जिन्क्स

पण डेसर्ट-स्टॉर्मच्या लुक्स वर जाम फिदा झालोय
जबरी आहे घ्याच.

In reply to by जिन्क्स

भाड्यानं घ्या चांगलं १०० १०० पळवुन बघा. अन ठरवा कोणती सुट होते ते? मला स्वतःला डेझर्टस्टॉर्म प्रचंड आवडायची. पण शेवटी थंडरबर्ड घेतली. ५०० सीसी विषेश आकर्षण? की निव्वळ दामटायची आहे? कारण ३५० इज मोअर दॅन इनफ.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

पुर्वी थंडर्बर्ड ३५० वापरुन पाहिली आहे २००९ च मॉडेल. एकदा ५०० सी सी चालवली की रानटी टॉर्कचं व्यसन लागत.