मी आर्ची बोलत्येय.
काय मस्त सकाळ उजाडलीये अजुनही झोपुन राहावसे वाटतंय , पण आईने तरीही उठवलेच. नाही तर शाळेला उशीर झाला असता. सगळं लवकर आटोपले तेवढ्यात शैला, शारदा आल्याच. मग डबा दफ्तरात टाकुन तशीच पळाले शाळेला.
शाळेत जाता जाता वाटेत त्यांना काल आईकडे नागराजदादा आलेला सांगितले आणि कायतरी पिक्चर काढाणारे म्हणे तर मला काम करायला पाठवशील का हे विचारत होता. तशा "अय्या खरंच" दोघी एकदमच किंचाळल्या. "ए मग तु हिरोईन झलीस की आम्हाला नाही ना विसरणार? " आणि "हिरो कोण आहे ?" "काय नाव पिक्चरचं?" प्रश्नाचं मोहोळ माझ्या मागे लावले. अगं अजुन कशात काय नाही मलाच माहित नाही तर तुम्हाला काय सांगु.
पण मग माझं सिलेक्शन झालं आणि तुम्ही बघताच आहात की अवघा महाराष्ट्र सैराटमय झालाय. पण मग माझं आयुष्य बदललं त्याचं काय ?
तुम्हाला नाही माहित आताशा मला रोज प्रत्येक ठिकाणी शाळेत , शिकवणी, कुठे समारंभ असेल, कुठे उद्घाटन असेल तर माझ्या २ अंगरक्षांबरोबर जावे लागते.
खरं नुकसान तर माझं शाळेत झालंय आणी त्यानंतर येणारे महाविद्यालयीन जिवनात होणारे.
काय सांगु आणि कसं सांगु सातवी पर्यंत सगळे माझ्या मनासारखे होत होते. रोजचा दिवस चालु झाला की शाळेला मैत्रीणंबरोबर जायचे अभ्यास मस्ती, मैदानी खेळ, हारजीत झाली की मग ती चिडवा चिडवी सगळं संपलय.
बाकीच्या मैत्रीणींसारखं एखाद्या आवडत्या मुलाकडे चोरुन बघणे, मग त्याची नजरानजर झाल्यावर ती हृदयात उठणारी कळ (गुदगुल्या), वाढत जाणारी धडधड, पुढे चोरुन होणार्या गाठीभेटी हे सगळं माझ्या वाट्याला येणारच नाही. माझे आत्ता पर्यंत अनेक ठिकाणी सत्कार झालेत त्यात पुष्पगुच्छ मिळाले , कॉलेजच्या रोज-डे ला ही अनेक गुलाब येतील; पण गुपचुप "मला तु आवडतेस" म्हणणारा फक्त माझ्या प्रेमासाठीच असणारा एकच लाल गुलाब कदाचित पुढे येणारच नाही.
कारण आता ही मुले बिनधास्त माझ्याकडे एक हिरोईन म्हणुन बघतात, माझी सही घ्यायला पुढे येतात, माझ्या बरोबर फोटो काढुन फेसबुक, ट्वीटर, व्हॉट्साप्वर टाकतात आणि मी त्यांची मैत्रीण आहे हे सार्या जगाला अभिमानाने सांगत सुटतात. शिक्षाकांची ही वागणुक बदलली आहे. मला जास्त ओरडा बसत नाही, अभ्यास राहिला तरी सांगतात मैत्रीणींच्या वहीमधुन पुर्ण कर आणि उद्या दाखव असं सांगतात.
एकीकडे गजबजलेलं फिल्मी दुनियेच्या ग्लॅमरस जीवनाचा आनंद उपभोगत असताना दुसरीकडे सामान्य माणसासारखं मित्रमैत्रीणंच्या गराड्यात, हसत्या खेळत्या , मोकळ्या आनंदी जीवनाला मी मुकतेय.
माझ्या मनाची काय घालमेल होत्येय हे तुम्हाला काय आणि कशी सांगु?
तुमची आर्ची
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वा वा !!! एका किशोरवयीन
खरे तर असे व्हायला नको होते
आर्ची हे पात्राचे नाव आहे .
आँ, आँच्च जाँल्ल
ट्रॅक बदल आता जरा, जूने झालेय
त्यांची नवलेखकांना
असेल असेल!
माझ्या मनाची काय घालमेल
माझ्या मनाची काय घालमेल
छोटासा प्रयत्न
आ. न. र्हायलं वाट्टं..
कूच पाने के लिये कूच खोना भी
मला आर्चीला एकच प्रश्न
वयाचा आणि चित्रपटांत काम
+१