Skip to main content

कुणी सांगेल का ?

लेखक स्पा यांनी गुरुवार, 21/07/2016 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या माझ्या आजूबाजूला काहीतरी विचित्रच घडायला लागलेय प्रसंग एक : संध्याकाळचे डोंबिवली स्टेशन , मी पार्किंग मधून बाईक काढतोय, अचानक समोरून गडबड गोंधळ , ३ (सुस्वरूप कॉलेजवयीन )मुली आणि १ मुलगा धावत माझ्या दिशेने.. मी आजूबाजूला घाबरून पाहिले काय झाल?? काही विशेष नव्हते , परत नजर समोर घोळका अजून जवळ आलेला, आता ते मला बोलवत पण होते , हे बाब्बासॉर, जल्दी ओ मी बाबाब्सोर नाही हो मी.. मी .. म्हणेपर्यंत सगळे बाईक वर कोसळलेच, काहीतरी हातात मोबाईल वर त्यांना मिळाले , मग अजून गोंधळ करत तो ग्रुप उडत दुसरीकडे गेला. माझी बाईक जवळपास आडवी झालेली होती. समोरचा पण टपरी वाला ह्या ह्या करत हसत होता. कशीबशी बाईक सरळ केली आणि मार्गाला लागलो प्रसंग दोन: घाटकोपर आणि विक्रोळीच्या मध्ये .. दोन तरुण, साला ये ट्रेन को आजी इतना फास्ट जानेका था? मेर्को रोज ये सर्कल मे रेअर पोकेमोन दिख्ते बट साला ये ट्रेन ( ऑ, आता लोक ट्रेन हळू जावी म्हणून प्रार्थना करायला लागले ? ये क्या हो राहा हे ? प्रसंग तीन : ऑफिस लंच टाईम : बॉस:ए प्रसु . कल्याण डोंबिवली म्हणजे जंगल ना फुल ? मी : आ ? का ? बॉस : नाही रे मी ऐकलय तिथे भारी पोकेमोन फाईंड होतात. यायचं आहे रे , साला इकडे तेच तेच परत दिसतात मी : ????? प्रसंग चार : ए तू ट्रेक ला जातोस तर जिथे ३ जी असेल तिथेच प्लान करत जा रे.गाव साइड फुल्ल कलेक्सन अस्ते. प्रसंग पाच : रात्री १० नंतर एरियात हातात मोबाईल आणि मुंडी खाली असा जमाव इकडे तिकडे पळताना दिसतो . बर्यापैकी भीतीदायक दृश्य असते नक्की आजूबाजूला सुरु काय आहे कोणी सांगेल काय ?

वाचने 15617
प्रतिक्रिया 91

प्रतिक्रिया

मी खेळंत नाहीये तर मला पकडतील का हे लोकं? बहुतेक नाही. बरोबर? -गा.पै.

हे सर्व काय चाललंय हे समजत नसेल आणी समजल्यानंतर न आवडल्यास आपलं वय बरंच वाढलंय आणि अजूनही केला नसल्यास गृहस्थाश्रमात प्रवेश करण्याची वेळ आली आहे हे समजून घ्यावे.

In reply to by मराठमोळा

मिपा वरचा हा धागा पाहीला, अन लग्गेच पोकेमोन इंस्टाल केला, २ - ३ दीवस खेळुन पाहीला, पण ज्याप्रकारे नेट , टीव्हीवर पोकेमॉन ची चर्चा आहे तेवढा काही खास वाटला नाही, कात्रप, शीरगाव, हेन्द्रे पाडा , वाणीवली, एरंजाड, शिवाजी चौक अगदी बदलापुर गाव देखी पालथं घातलं पण मोजुन ४ ते ५ पोकेमॉन गावले. उगाच डिजेल, नेट आनी वेळ वाया गेला. काहिच थ्रिल वाटलं नाही.

काल एका ठिकाणी जायचं होत, एका मित्राला म्हटलं मला सोडशील का तिथे तर नेहमी नखरे करणारा मित्र लगेच तयार झाला. त्याच्या बाईक वरून जाताना त्याने भर रस्त्यात अचानक ब्रेक मारून गाडी थांबवली. मागून बेस्ट बस वाला हॉर्न मारतोय, मी त्याला शिव्यांची लाखोली वाहायला चालू केली तर हे महाशय पॉकेमॉन पकडत होते. जर बसच्या ड्रॉयव्हरने वेळेत ब्रेक मारला नसता तर आम्ही दोघे पण फोटोत जाऊन बसलो असतो. शुद्ध वेडेपणा आहे हा खेळ म्हणजे.

In reply to by जगप्रवासी

काळजी घ्यावी मालक ! सध्या नोकिया वापरणारे आता देवदूत म्हणून ओळखण्यात येत आहेत....

आजच संध्याकाळी cnbc awaaz tv18 चानेलवर दोन एपिसोड दाखवले पोकेमनवर छान होते.१) टेकगुरू -गेमिंग स्पेशल ,२)pokemania नेटवर चसेल तर पाहा. एक जाहिरातही दाखवली परदेशी त्यात हेल्मेट घालून पोकेमोन खेळा असा संदेश दिलाय.

आचरटपणा आहे! http://www.cartelpress.com/pokemon-go-major-highway-accident-man-stops-… हायवेवरती मधेच पोकेमॉन पकडायला गाडी थांबवणारे महाशय! ही फक्त सुरुवात आहे....

रोचक खेळ आहे. ऑगमेंटेड रियालिटी पुढे आणणारा. पण भारतात गेम रिलीज झालेला नसेल तर भारतातल्या भौगोलिक अक्षांशरेखांशांवर पोकेमॉन तरी कसे दिसतात? (मूळ कंपनीने फक्त जिथे गेम रिलीज करायचा तिथल्या प्रदेशातल्याच ठराविक जागीच आभासी पोकेमॉन सर्वर प्रोग्राममधे पेरले असणार असं गृहीत धरुन)

मी माझी ट्रु जी.पी.एस लोकेशन हाईड करुन फेक जी.पी.एस लोकेशन क्रियेट केली की जेणे करुन मला एका जागी बसुन वेगवेगळ्या ठिकाणांचे पोकेमॉन पकडता येतील किंव्वा पोकेस्टॉप विजिट करुन पोकेबॉल मिळवता येतील , बट इट डिडन्ट वर्क. पोकेमॉन गेम फेक जी.पी.एस लोकेशन डिटेक्ट करतंय :( Perhaps I was being to naive to assume that they would make such a simple mistake :P असे फेक जीप.पी.एस लोकेशन सिम्युलेट करता आले असते तर आपण मॅट्रिक्स चित्रपटासारखे संपुर्ण सिम्युलेटेड रियालिटी कन्सेप्टला फार जवळ आलो असतो . असो . थोडक्यात काय तर , स्वतःचे बुड हलवल्या शिवाय पोकेमॉन पकडता येणार नाहीत . उठा आणी चालायला लागा . त्या निमित्ताने व्यायाम :)))) अवांतर : अ‍ॅन्ड्रोईड गेम्स चे कोड स्वतःपुरते मॉडीफाय करता येतात का ? आणि तसे करणे लीगल असते का ?

In reply to by हेमन्त वाघे

कॅमेरा चालू असतो डाटा अपलोड होतो यामुळे गुगल मॅप्समधून जेवढी माहिती मिळणार नाही तेवढी कळेल.