सध्या माझ्या आजूबाजूला काहीतरी विचित्रच घडायला लागलेय
प्रसंग एक : संध्याकाळचे डोंबिवली स्टेशन , मी पार्किंग मधून बाईक काढतोय, अचानक समोरून गडबड गोंधळ , ३ (सुस्वरूप कॉलेजवयीन )मुली आणि १ मुलगा धावत माझ्या दिशेने.. मी आजूबाजूला घाबरून पाहिले काय झाल?? काही विशेष नव्हते , परत नजर समोर घोळका अजून जवळ आलेला, आता ते मला बोलवत पण होते , हे बाब्बासॉर, जल्दी
ओ मी बाबाब्सोर नाही हो मी.. मी .. म्हणेपर्यंत सगळे बाईक वर कोसळलेच, काहीतरी हातात मोबाईल वर त्यांना मिळाले , मग अजून गोंधळ करत तो ग्रुप उडत दुसरीकडे गेला.
माझी बाईक जवळपास आडवी झालेली होती. समोरचा पण टपरी वाला ह्या ह्या करत हसत होता. कशीबशी बाईक सरळ केली आणि मार्गाला लागलो
प्रसंग दोन: घाटकोपर आणि विक्रोळीच्या मध्ये .. दोन तरुण, साला ये ट्रेन को आजी इतना फास्ट जानेका था?
मेर्को रोज ये सर्कल मे रेअर पोकेमोन दिख्ते बट साला ये ट्रेन ( ऑ, आता लोक ट्रेन हळू जावी म्हणून प्रार्थना करायला लागले ? ये क्या हो राहा हे ?
प्रसंग तीन : ऑफिस लंच टाईम : बॉस:ए प्रसु . कल्याण डोंबिवली म्हणजे जंगल ना फुल ?
मी : आ ? का ?
बॉस : नाही रे मी ऐकलय तिथे भारी पोकेमोन फाईंड होतात. यायचं आहे रे , साला इकडे तेच तेच परत दिसतात
मी : ?????
प्रसंग चार : ए तू ट्रेक ला जातोस तर जिथे ३ जी असेल तिथेच प्लान करत जा रे.गाव साइड फुल्ल कलेक्सन अस्ते.
प्रसंग पाच : रात्री १० नंतर एरियात हातात मोबाईल आणि मुंडी खाली असा जमाव इकडे तिकडे पळताना दिसतो . बर्यापैकी भीतीदायक दृश्य असते
नक्की आजूबाजूला सुरु काय आहे कोणी सांगेल काय ?
वाचने
15617
प्रतिक्रिया
91
मिसळपाव
प्रतिक्रिया
खतरनाक!
एक दोघे गाडीखाली आले की फॅड
ऑ!! अच्चं झालं तर !
मी खेळंत नाहीये तर ....
हे सर्व काय चाललंय हे समजत
विमे ची आठोण आली ;)
In reply to हे सर्व काय चाललंय हे समजत by मराठमोळा
काही खास वाटला नाही,
In reply to हे सर्व काय चाललंय हे समजत by मराठमोळा
काल थोडक्यात वाचलो
टोपी संभालो कांचासेठ...हवा बहुत तेज चलता है
In reply to काल थोडक्यात वाचलो by जगप्रवासी
आजच संध्याकाळी cnbc awaaz
अनियंत्रित गेमिंग इंड्स्ट्रीचा अजून एक
डेंजर हाय
In reply to अनियंत्रित गेमिंग इंड्स्ट्रीचा अजून एक by चतुरंग
ऑ!!आँच्च जाँल्ल झालं तर !
ओके आंची
In reply to ऑ!!आँच्च जाँल्ल झालं तर ! by आंबट चिंच
खि खि खि. तु पोकेमोन पकडत
In reply to ऑ!!आँच्च जाँल्ल झालं तर ! by आंबट चिंच
रोचक खेळ आहे. ऑगमेंटेड
मी माझी ट्रु जी.पी.एस
हा गेम राष्ट्रीय सुरक्षेच्या
महामूर्खपणा आहे हा. लोकांच्या
देशाच्याही सुरक्षेला धोका??
कॅमेरा चालू असतो डाटा अपलोड
In reply to देशाच्याही सुरक्षेला धोका?? by हेमन्त वाघे