Skip to main content

मला आवडलेला विनोद

लेखक भंकस बाबा यांनी रविवार, 06/12/2015 23:33 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या विद्वानाच्या नगरितले नेते कृषिमंत्री होते तेव्हाचि गोष्ट. एकदा आपले माननीय नेते काही परदेशी सन्माननीय पाहुण्याना भारतातील शेतीशी आधारित जोडधंदे दाखवायला घेऊन गेले. शहराबाहेरील एका मोठ्याशा गोठ्यात शिरुन त्यांनी पाहुण्याना पशुधन दाखवायला सुरुवात केलि. समोर असलेल्या गवळिबुवाची अगदी आपला शाळकरी मित्र असल्याच्या थाटात चौकशी केली. गवळीबुवाच्या पायाला भलेमोठे प्लास्टर पाहून त्यांनी त्याचे कारण विचारले. गवळीबुवानी सांगितले की दूध काढ़ताना गाईने लाथ मारली. बस मग काय , कृषिमंत्र्याचे त्या गवळ्याचे बौद्धिक घेणे सुरु झाले. "अरे त्या गाईला पहल्यान्दा थोपटायचे असते. मग तिच्या मानेखाली थोड़े खाजवायचे, तिच्या बरोबर बोलायचा प्रयत्न करायचा , असे करताना तिच्या पाठीवर थाप मारायची. थोडेसे तिचे कान खाजवायचे. असे केल्याने जनावर कह्यात येते. मग आरामात दूध काढायचे." एवढे बोलून थांबतील तर ते कृषिमंत्री कसले. त्यांनी गवळ्याच्या हातातील बादली खेचून घेतली व् गवळीबुवा नाही नाही म्हणतांना दूध काढ़ायला बसले . परिणाम काय? एक सांणकन लाथ कृषिमंत्र्याना बसली. एका पायाने लंगड़ी घालत खजिल स्वरात ते गवळ्याला बोलल," गड्या काहीतरी चुकले बग" गवळी गालातल्या गालात हसत बोलला," तुम्ही समद बरोबर केले साहेब, फकस्त एकच चूक केलि , ते निवडल ते बैल होत राव!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 23553
प्रतिक्रिया 79

प्रतिक्रिया

ऑफिसमध्ये प्रमोशनसाठी मुलाखती सुरू असतात. बाळू पाटलाचा नंबर येतो..... बॉस : बाळू पाटील आपण सर्वात पहिली तुझी इंग्रजीची टेस्ट घेऊयात. मी जे शब्द बोलेन तु त्याच्या विरूध्दार्थी म्हणजे Opposite शब्द सांगायचास. बाळू पाटील : ओके सर. विचारा प्रश्न. बॉस : Good बाळू पाटील : Bad बॉस : Come बाळू पाटील : Go बॉस : Ugly बाळू पाटील : Pichhli. बॉस : Pichhli?? बाळू पाटील : Ugly. बॉस : Shut Up! बाळू पाटील : Keep talking. बॉस : Now stop all this... बाळू पाटील : Then carry on all that. बॉस : अरे गप्प बस..., गप्प बस... गप्प बस... बाळू पाटील : अरे बोलत रहा, बोलत रहा, बोलत रहा... बॉस : अरे यार... बाळू पाटील : अरे शत्रू... बॉस : Get Out. बाळू पाटील : Come In. बॉस : My God. बाळू पाटील : Your Devil. बॉस : shhhhhhh.... बाळू पाटील : hrrrrrr.... बॉस : माझ्या बापा..... गप्प बस जरा. बाळू पाटील : माझ्या मुला... बोलत रहा. बॉस : You are rejected. बाळू पाटील : I am selected. बॉस : देवा तुमचे चरण कुठे आहेत. बाळू पाटील : वत्सा माझे डोके इथे आहे. बॉस : बाप रे, कोणत्या वेड्याशी गाठ पडली माझी. बाळू पाटील : आई गं, कोणत्या हुशार व्यक्तीशी गाठ पडली तुझी. बॉस : साल्या, उचलून आपटेन तुला. बाळू पाटील : भावजी, पालथा करून उचलून घेईन तुम्हाला. मग बॉसने वैतागून बाळू पाटीलला एक झापड मारली. बाळू पाटीलने बॉसला दोन झापड मारल्या. बॉसने मग चार झापडा मारल्या..... मग तर बाळू पाटीलने बॉसला मारून मारून बेशुध्दच केले. त्यानंतर बाळू पाटील स्वतःशीच म्हणाला.......... साहेब उद्या शुध्दीवर आले की, त्यांना निकाल विचारतो. तसे तर त्यांच्या सर्वच प्रश्नांची उत्तरे मी बरोबर दिली आहेत असे मला वाटते.

बंटीच्या घरचा नळ गळत होता. त्याने त्यासाठी प्लम्बरला बोलावले. प्लम्बर आला,पण नेमके त्याचवेळी बंटिला जरूरी कामासाठी बाहेर जायचे होते. बंटिने प्लम्बरला सुचना दिली की काम करून तो निघुन गेला तरी चालेल फ़क्त घरातील कोणत्याही वस्तुला हात लावू नको, कारण घरात एक रोट्वीलर आहे. तो काहि करणार नाही, पण एखाद्या वस्तुला हात लावला तर फाडून खाइल. एरवी तो घराच्या एका कोपर्यात पडून राहील, पण हो घरात एक पोपट पाळलेला आहे , त्याच्याशी मात्र अजिबात बोलू नको. इतके बोलून बंटी जायला निघाला . जाताजाता परत एकदा त्याने वॉर्निग दिली की पोपटाशि अजिबात बोलू नको. थोड्या वेळाने प्लम्बरचे काम संपले. तो जायला निघाला. बंटिने सांगीतल्याप्रमाने रोट्वीलर अगदी शांत झोपुन होता. जाताना अचानक पोपट बोलला ए मिथुन. प्लम्बरने ते ऐकले व् बोलला माझे नाव मिलिंद आहे. तोच परत पोपट बोलला अरे गाढ़वा मिथुन आमच्या कुत्र्याचे नाव आहे. प्लम्बर चिडला व् बोलला मुर्ख पोपटा गप्प बस नाहीतर मुंडी पिरगळून टाकिन. आता पोपट चिडला व् बोलला 'कम ऑन मिथुन , कैच हिम'

एका घरात रात्री एक चोर घुसला, घरात कोणीच नव्हते ,चोराने एक मंद उजेडाचा टॉर्च लावला व् घरातील किमती सामान शोधू लागला, तोच एका कोनाडयातुन आवाज आला, "पांडुरंग सगळे बघत आहे" चोर घाबरला व् आवाजाच्या विरुद्ध दिशेला एका पलंगाआड लपला, थोडा वेळ सर्वत्र शांतता पसरली, चोराने अंधारात टॉर्च मारला, परत आवाज आला, "पांडुरंग सर्व बघत आहे" आता चोराने आवाजाच्या दिशेने टॉर्चचा उजेड फेकला, तिथे एक पोपट दिसला, चोराने विचारले की तू हे बोललास का? पोपट कर्कश आवाजात बोलला होय, आता चोर निर्धास्त होऊन बाहेर पडला व् बोलला "नाव काय तुझे" " मला आग्यावेताळ बोलतात" पोपटाने गुर्मीने उत्तर दिले, चोर हसत बोलला, " हे कोण मुर्ख लोक आहेत जे पोपटाचे नाव आग्यावेताळ ठेवतात?" पोपट कॉय कॉय करत बोलला, " हे तेच मुर्ख लोक आहेत जे घरात वाघ पाळतात,त्याला घरात मोकळा सोडतात, आणि त्याचे नाव पांडुरंग ठेवतात आणि गमतीची गोष्ट अशी की हि मुर्ख लोक आज पांडुरंगाला खायला घालायला विसरली आहेत"

एक बाई एका म्हातारीला- "आग बाई या वयात सुद्धा कपाळावर 'टिकली', नशीबवान आहात" म्हातारीचे मार्मिक उत्तर- "अगं टाकल्या टिकला म्हणून 'टिकली' टिकली!!"

गुरूजी : सुखकर्ता दु:खहर्ता ही आरती कोणी लिहिली आहे? बंड्या : दर्शन म्हात्रे. गुरूजी : काय?....... कशावरून? बंड्या : आरतीत स्पष्ट म्हटलंय..... दर्शन म्हात्रे मन कामनापुर्ती. : : गुरूजी अवाक.............. थोड्यावेळाने.... बंड्या : आता मला सांगा... दर्शन म्हात्रेच्या वडीलांचे नाव काय? गुरूजी : नाही माहिती... सांग तूच. बंड्या : हेळा. गुरूजी : कसं काय? बंड्या : पांडुरंगाची आरती.... दर्शन हेळा म्हात्रे तया होय मुक्ती जयदेव जयदेव..... : : : : गुरूजी आता पंढरपुरच्या वारीला गेलेत.