Skip to main content

काश्मीर - वल्गना आणि वास्तव.

लेखक संदीप ताम्हनकर यांनी गुरुवार, 21/07/2016 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
काश्मीर मध्ये पुन्हा आझाद कश्मीरच्या घोषणा निनादू लागल्यापासून उथळ राष्ट्रवाद्यांना चेव चढला आहे. मोदी सरकारची ही कसोटीची वेळ आहेच पण त्याहूनही अधिक मोदी समर्थकांची जणू इज्जत पणाला लागली असल्याचे चित्र समाजमाध्यमातून उमटते आहे. ह्या अतिराष्ट्रवाद्यांना असे वाटत होते की एवढी वर्ष मुस्लिम तुष्टीकरण करणारे काँग्रेसचे सरकार कडक भूमिका घेत नव्हते त्यामुळे काश्मिरातील मुसलमान शेफ़ारलेत आणि पाकिस्तानच्या पाठिंब्यावर स्वतंत्र काश्मीर मागतायत. काँग्रेसने जी कडक भूमिका घेतली नाही ती आता अतिराष्ट्रवादीमेरुमणीमोदी लगेच घेतील आणि माजलेल्या काश्मिरींना तात्काळ वठणीवर आणतील. यामध्ये एकंदर सूर असा आहे की एकदा सैन्याला मोकळे सोडले की सैन्य सगळे प्रश्न एक झटक्यात सोडवेल आणि एकदम इस्त्री मारलेल्या कापडासारखा काश्मीर प्रश्न सुरळीत होऊन जाईल. ही भावना व्यक्त करणारे स्क्रिप्ट लिहून शूटिंग केलेले व्हिडीओ, ज्यामध्ये एक ताव भरलेल्या मिशांचा, फौजी असल्याचा आव आणणारा नाटकातला खोटाखोटा सैनिक गुरगुरत आणि अभिनिवेशाने हातवारे करत धमक्या देताना दिसतो की आमचे बांधलेले हात सोडा आणि बघा जेएनयू पासून काश्मीर पर्यंतचे तमाम देशद्रोही कसे सुतासारखे सरळ करतो ते. याउप्पर इंडियन जेम्स बॉन्ड श्री. अजित डोवाल आहेतच आणि ते कसे ७२ तासात शांतता प्रस्थापित करतील अश्या वल्गना करणाऱ्या पोस्टही फिरत आहेत. हे सगळे अपरिपकव वर्तणूक या सदरात मोडते आणि म्हणूनच हास्यास्पदही आहे. स्वतः मोदींचे निवडणूकपूर्व भाषण आणि आवेश असाच होता जो आता भक्तांमधून झिरपतोय. जुन्या काळाच्या पद्धतीप्रमाणे एखाद्या प्रांतात बंडाळी झाली तर राजांनी दरबारातील एखाद्या सरदाराची नेमणूक करावी किंवा एखाद्याने विडा उचलावा आणि स्वारीवर जाऊन त्याने मोठ्या शौर्याने गनिमांचा बिमोड करून शांतता आणि विजयश्री दरबारात पेश करावी असे आत्ताही होईल असा अनेक भक्तांचा भाबडा समज होता. पण काश्मीरमधील परीस्थितीचे आकलन जसे-जसे प्रत्येकाच्या वकुबाप्रमाणे होत गेले तसतसा उन्माद कमी होऊ लागला. आता नेहरूंनीच कसा काश्मीर प्रश्नाचा मुळातच विचका करून ठेवला आणि कसे गांधीजी त्यावेळी गप्प राहिले हे दळण दळणाऱ्या पोस्ट समाजमाध्यमातून फिरू लागतील हे नक्की. ज्या राज्यांमध्ये गेली अनेक वर्षे 'सैन्यदले (विशेष अधिकार) कायदा १८५९ - AFSPA 1958' लागू आहे आणि जेथे मूलभूत अधिकार खुंटीला टांगून ठेवलेले आहेत आणि कधीही, कोणालाही, कुठूनही अटक करून कितीही दिवस तुरुंगात डांबण्याचा सैन्याला हक्क आहे अश्या ठिकाणच्या नागरिकांनी हे सगळे देशहिताच्या दृष्टीने गपचूप सहन करावे अशी उर्वरित नागरिकांची अपेक्षा असेल तर ती नक्कीच चुकीची आहे. अशी वेळ माझ्यावर आली तर माझी काय प्रतिक्रिया असेल हे प्रत्येकाने स्वतःला विचारून बघावे. अशी कल्पना करणे सोपे जावे म्हणून केवळ पुण्यात घडलेला पुढील प्रसंग आठवावा. पुण्यात संभाजी उर्फ लकडी पुलावरून सकाळी ७ ते रात्री ९ या वेळात दुचाकी वाहनांना जायला बंदी आहे. दिनांक ३१ जानेवारी २०१२ रोजी रात्री ८ च्या सुमारास सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालय (CME) दापोडीचे दोन सैनिक विद्यार्थ्यांना नो एंट्री मधून आल्याबद्दल अलकाटॉकीजच्या चौकात वाहतूक पोलिसांनी अडवले. सैनिकांनी पोलिसांशी वाद घातला आणि दंड भरण्या ऐवजी फोन करून आपल्या साथीदारांना बोलावले. अर्ध्याच तासात सैन्यदलाच्या तीन गाड्या भरून सैनिक तेथे आले. पोलिसांना न जुमानता हुल्लडबाजी करत, नागरिकांना धमकावत, गाड्यांच्या काचा फोडत, पत्रकारांचे कॅमेरे हिसकावून घेत जणू संपूर्ण चौक ताब्यात घेऊन ओलीस ठेवला. सुमारे पाऊण तास सैनिकांचा हा धिंगाणा चालू होता. नंतर सैन्यातील आणि पोलिसातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना येणे भाग पडून त्यांच्या मध्यस्तीने सगळं गोंधळ थांबला. पुणेकरांनी सैनिकांची ताकद आणि त्यातून येणारी दहशत काय असते याची छोटीशी चुणूक तासाभरासाठी अनुभवली आणि कशी सार्वत्रिक भयभीतावस्था आणि असहाय्यतेची भावना निर्माण होते हे ही अनुभवले. १ फेब्रुवारी २०१२ चे सगळे पेपर काढून पाहिले तर हा सगळा अनुभव आजही पुन्हा घेता येईल. आता मुद्दा असा आहे की शांत अशा पुण्यासारख्या सुशिक्षित शहरात काही मोजके निःशस्त्र सैनिक छात्र कायद्याच्या विरुद्ध जाऊन सगळी यंत्रणा वेठीला धरून दहशत निर्माण करू शकतात तर काश्मीर सारख्या अशांत (Hostile) प्रदेशात कायद्याचे पाठबळ असलेले, प्रचंड संख्येने उपस्थित असलेले सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल? आणि एक नागरिक म्हणून जर रोजच तुम्हाला हे सहन करावे लागत असेल तर तुमची प्रतिक्रिया काय होईल? प्रत्येक सुजाण नागरिकाने स्वतःची लोकशाहीची व्याख्या अधिक प्रगल्भ करण्यासाठी स्वतःला हे विचारून बघावे ही विनंती.

वाचने 65007
प्रतिक्रिया 271

प्रतिक्रिया

हा 'ऐसी'वर शोभणारा लेख चुकुन इथे टाकलेला दिसतोय. 'ऐसी'वर या लेखात ओकलेल्या गरळीचे समर्थन करणारे आतापर्यंत किमान १००० प्रतिसाद आले असते.

In reply to by अनुप ढेरे

अनुपजी, हे पटलं नाही.

1

सुरुवातीला वाटले रात्रीच्या नशेत लिहिलाय हा लेख..... पण नंतर बघीतलं...चक्क दुपारी पोस्टलाय हा लेख??? ऑ .... दुपारी दुपारीच असं कसं ब्वॉ???

दखलपात्र प्रतिक्रियां संबंधी: - 'इंडियन जेम्स बॉन्ड श्री. अजित डोवाल' - हे मी लिहिलेले नाही. अशा पोस्ट समाजमाध्यमातून जोरात फिरत आहेत. कोण पुढे पाठवतं ते सगळे जाणतातच. प्रत्यक्ष रस्त्यावर जे सैन्य असते ते एवढ्या बौद्धिक क्षमतेचे असते का? आणि सैन्याला विशेषाधिकार दिले की त्याचा अतिरेक होतो ही जगभरातील वस्तुस्थिती आहे. भारतात अनेक राज्यात १९५८ पासून आफ्स्पा लागू आहे, त्या मणिपुरी मानवाधिकार कार्यकर्त्या आरोम चानू शर्मिला गेली अनेक वर्षे सत्याग्रह करतायत तो का आणि कसा ते जरा वाचा. काश्मिरी उपास करत नाहीत तर दगड फेकतात. श्री डोवाल यांची काशिरातील कामगिरी काय हे अजून समोर यायचंय. तोपर्यंत संघ परिवारातला माणूस म्हणून ज्यांना त्यांच्या आरत्या करायच्यात त्यांनी जरूर कराव्या. काश्मिरात पाक पुरस्कृत अशांतता आणि दहशतवाद आहे यात कोणाचेच दुमत नाही. प्रश्न कसे हाताळावे हा मुद्दा आहे. केवळ सैन्याच्या बळावर काश्मीर प्रश्न सोडवता येईल असे वाटणारे मुर्खांच्या नंदनवनात वावरतायत हे नक्की. याबाबत अतिराष्ट्रवाद्यांचा अभिनिवेश हास्यास्पद आहे. अश्याने खरे नंदनवन हातातून निसटून जाईल. आर्मीने, अर्ध-सैन्यबलांनी केलेले अत्याचार आणि बळाचा अतिरिक्त वापर यावरही बरेच मटेरिअल आंतरजालावर उपलब्ध आहे. मी स्वतः काश्मिरात ३ वेळा स्वताःच्या गाडीने, स्वताः गाडी चालवत बऱ्याच ठिकाणी फिरलोय, स्थानिकांशी अजूनही संपर्कात आहे. तसेच इतर अभ्यासाच्या आधारावर मूळ पोस्ट लिहिल्येय. सध्याच्या अशांततेच्या, दंग्याच्या, गोळीबाराच्या, पॅलेट गनच्या कमरेच्या वर चालवण्याच्या अनेक स्टोरीज आंतरजालावर आहेत. बहुतेकवेळा कॅमेरा सैन्याच्या (बाजूने) समोरील आंदोलकांचे चित्रण करतो. या चित्राची दुसरी बाजूसुद्धा आहेच. दहशतवादाचे पीक पेरण्यासाठी जमिनीची मशागत भारतीय सैन्यदले पाकिस्तानला फुकटात करून देतायत, असे चित्र आहे. बाकी टवाळखोरांचे सगळे मटेरिअल साभार परत.

In reply to by संदीप ताम्हनकर

आयला... अजित डोवाल आणि आरएसेंस संबंध.... नवीनच ब्वॉ... (दादा.. दुसर्या बाजूचेपण व्हिडीओ उपलब्ध आहेत... जमल्यास ते बघा...) असो... पण एक खरंय... तुमच्यासारखे विचारवंत असतील तर आर्मी काही फार चांगले करू शकेल असे वाटत नाही.... खेद ह्याच गोष्टीचा आहे कि तुमच्या काश्मीरमधल्या वास्तव्यात काश्मिरी पंडितांना कधी भेटू वाटलं? त्याबद्दल लिहायचा प्रयत्न करा.. आणि जमल्यास आर्मीमधल्या लोकांशी पण बोला जे तिथे आहेत... साली ही देशातली कीड आधी संपली पाहिजे. बाहेरचे लोक मारणे खूप सोपे... पण हे असले साप.... अतिभयंकर... (खरं तर मी एव्हढं भडक कधीच बोलत नाही... पण वस्तुस्तिथीचे योग्य आकलन नं करता जर कोणी अकलेचे तारे नां..... सटकते राव...)

In reply to by संदीप ताम्हनकर

अतिराष्ट्रवाद्यांना म्हणजे काय? ह्याचे उत्तर दिलेत तर उपकृत होईन ताम्हनकर साहेब, दुसरे म्हणजे, माझा रास्वसंघ विरोध हा मिपावर बरेच जणांना माहिती आहे, त्याला माझी काही वैयक्तिक कारणे आहेत, अन ती बदलावीत असे सकारात्मक संघाने राजकीय आघाडीवर काही केलेले मला आजवर दिसलेले नाही, पण तो भाग वेगळा, ते तुमच्यासमोर मी सिद्ध करावे ही ऑथॉरिटी मी वैयक्तिकरित्या तुम्हाला देत नाहीये, अजून जर विषय संबंधित बोलायचे झाले तर डोवल हे रास्वसंघसंलग्न आहेत हे मला माहिती होते/आहे, पण फक्त ते संघ संबंधित होते म्हणुन त्यांची इंटेलिजन्स ब्युरो मधील कारकीर्द जर तुम्ही नाकारत असाल किंवा त्याची हुर्यो उडवत असाल तर संघडले अन तुमच्यात फरक तो काय उरणार न? की मग १. तुम्ही स्वतः आयबी मध्ये नोकरी करत होतात म्हणून तुम्हाला डोवल ह्यांचे उदात्तीकरण माहिती आहे? २. का ते फक्त संघाशी संबंधित होते म्हणून त्यांचे मीठ तुम्हाला अळणी आहे? उरता उरला काश्मीरचा प्रश्न तर, माझ्या नोकरीत (मला दरवेळी उल्लेख करायला आवडत नाही तरीही) अर्धसैनिकबल असलेल्या एका संघटनेचा एक अधिकारी म्हणून माझ्या पाहणीत आलेले अनुभव हे भयानक अन अतिशय सेन्सिटिव्ह श्रेणीतील असल्यामुळे मी ते इथे मांडू शकत नाहीये, फक्त टाळी एका हाताने कधीच वाजत नसते इतके सांगतो. पटले तर घ्या नाहीतर आम्हालाही गाढवात काढा :)

In reply to by संदीप ताम्हनकर

'इंडियन जेम्स बॉन्ड श्री. अजित डोवाल' - हे मी लिहिलेले नाही. अशा पोस्ट समाजमाध्यमातून जोरात फिरत आहेत. कोण पुढे पाठवतं ते सगळे जाणतातच.
यात काही सत्य आहे का नाही हे समजण्याएव्ढी तुम्हाला बुद्धी आहे का नाही? इथे ते टाकण्याआधी सारासार विचार केला होता का? कशाला इतरांच्या आड लपता? मी कायअप्पावर अनेक गटांचा सदस्य आहे. असली पोस्ट आजतगायत कोणत्याही ग्रुपवर आलेली नाही. या असल्या उपसाहात्मक पोस्ट्स तुमच्यासारख्या निधर्मांधांच्या डोक्यातून बाहेर पडत असतात.
प्रत्यक्ष रस्त्यावर जे सैन्य असते ते एवढ्या बौद्धिक क्षमतेचे असते का? आणि सैन्याला विशेषाधिकार दिले की त्याचा अतिरेक होतो ही जगभरातील वस्तुस्थिती आहे. भारतात अनेक राज्यात १९५८ पासून आफ्स्पा लागू आहे, त्या मणिपुरी मानवाधिकार कार्यकर्त्या आरोम चानू शर्मिला गेली अनेक वर्षे सत्याग्रह करतायत तो का आणि कसा ते जरा वाचा. काश्मिरी उपास करत नाहीत तर दगड फेकतात.
अत्यंत निर्बुद्ध वाक्य! अतिरेक्यांशी, दंगलखोरांशी लढायला सैन्य पाठवितात ते काय निर्बुद्ध सैनिक असतात का? भारतात फक्त काश्मिर, मणिपूर इ. मोजक्या ठिकाणीच सैन्य का आहे व सैन्याला विशेषाधिकार का द्यावा लागला आहे हे समजण्याइतकी बुद्धी आहे का? सैन्याला विशेषाधिकार दिले की त्याचा अतिरेक होतो म्हणे. सैन्याने काय आणि किती वेळा अतिरेक केला? काश्मिरमध्ये आणि देशात इतरत्र एके ४७ आणि ग्रेनेड्स घेऊन अतिरेकी हल्ले करतात, गोळ्या घालून व बॉम्बस्फोट करून निष्पापांना जीवानिशी मारतात, काही जणांना जन्माचे अपंग करतात, या क्रूर नरभक्षक जनावरांना काही स्थानिक लोक पाठिंबा देतात, लहान मुलांच्या आडून सैन्यावर दगडफेक होते, जमावात मागे उभे राहून सैनिकांच्या दिशेने ग्रेनेड फेकतात, त्यात सैनिक जखमी होतातच पण जमावात पुढे असलेली लहान मुलेही जखमी होतात, एका पोलिसाला जमावाने घेरून मारहाण करून त्याचे डोळे फोडले, अजून एका पोलिसाला जमावाने त्याच्या वाहनासकट नदीत फेकून दिले . . इ. क्रूर कृत्यांबद्दल चकार शब्द नाही. ही कृत्ये होत असताना सैन्याने काय गुलाबाची फुले वाटून शांततेचे आवाहन करायचे का? अशा कृत्यांना विरोध करून अतिरेक्यांशी लढताना सैन्याला जे जे करावे लागते ते क्षम्य आहे. त्यात कोणताही अतिरेक नाही. अतिरेक वाटत असला तर तो होणारच. संचारबंदी जाहीर झालेली असून रस्त्यावर अतिरेक्यांशी लढण्यासाठी सैन्य असताना अतिरेकी बुर्‍हान वाणीच्या मृत्युचा निषेध करण्यासाठी संचारबंदी मोडून रस्त्यावर उतरलेल्या व सैनिकांवर व पोलिसांवर हल्ले व दगडफेक करणार्‍या वाणीच्या समर्थकांना आपल्या दुष्कृत्यांची शिक्षा भोगावी लागणारच. बुर्‍हान वाणी हा काही साधुसंत नव्हता. तो अतिरेकी होता आणि त्याच्या समर्थनासाठी संचारबंदी असतानाही रस्त्यावर उतरलेले सुद्धा साधुसंत नव्हते. ते घराबाहेर पडले नसते तर बाकी प्रश्न उद्भवलेच नसते.
श्री डोवाल यांची काशिरातील कामगिरी काय हे अजून समोर यायचंय. तोपर्यंत संघ परिवारातला माणूस म्हणून ज्यांना त्यांच्या आरत्या करायच्यात त्यांनी जरूर कराव्या.
अत्यंत बेताल वाक्य. डोवाल संघ परिवारातले कधीपासून झाले? ते १९८४ च्या आधीपासून कार्यरत आहेत. त्यांच्या कोणीही आरत्या ओवाळत नाही. ते आपके काम करताहेत. ते संघ परिवारातले आहेत म्हणून त्यांच्या आरत्या केल्या जाताहेत हे अत्यंत मूर्खपणाचा आरोप आहे.
काश्मिरात पाक पुरस्कृत अशांतता आणि दहशतवाद आहे यात कोणाचेच दुमत नाही. प्रश्न कसे हाताळावे हा मुद्दा आहे. केवळ सैन्याच्या बळावर काश्मीर प्रश्न सोडवता येईल असे वाटणारे मुर्खांच्या नंदनवनात वावरतायत हे नक्की. याबाबत अतिराष्ट्रवाद्यांचा अभिनिवेश हास्यास्पद आहे. अश्याने खरे नंदनवन हातातून निसटून जाईल. आर्मीने, अर्ध-सैन्यबलांनी केलेले अत्याचार आणि बळाचा अतिरिक्त वापर यावरही बरेच मटेरिअल आंतरजालावर उपलब्ध आहे.
सैन्याला व सरकारला एकवेळ नसेल कळत काश्मिर प्रश्न कसा हाताळायचा ते, पण तुम्हाला आहे का अक्कल काश्मिर प्रश्न हाताळायची? असली तर सैन्याला व सरकारला जाऊन सांगा. तुम्हाला इथे बसून समजतंय का काश्मिर प्रश्न कसा हाताळायचा ते. आंतरजालावर बरेच काही असते. ते काय सगळे खरे असते का? अतिरेक्यांनी केलेल्या निष्पापांच्या हत्या, सौरभ कालिया सारख्या पकडलेल्या सैनिकांचे लिंग कापून केलेले हालहाल, भारतीय सैनिकांची कापलेली मुंडकी इ. सुद्धा बरेच मटेरिअल आंतरजालावर आहे. ते वाचलंय का? बुर्‍हान वाणीसुद्द्धा आंतरजालाच्या माध्यमातून लोकांना भडकावत होता. इसिस आणि जाकीर नाईक सुद्धा आंतरजालाच्या माध्यमातून लोकांना भडकावतात.
मी स्वतः काश्मिरात ३ वेळा स्वताःच्या गाडीने, स्वताः गाडी चालवत बऱ्याच ठिकाणी फिरलोय, स्थानिकांशी अजूनही संपर्कात आहे. तसेच इतर अभ्यासाच्या आधारावर मूळ पोस्ट लिहिल्येय.
काश्मिरात सैन्य नसते तर पहिल्याच भेटीत पैगंबरवासी झाला असता हे लक्षात येतंय का? का स्वतःला जेम्स बाँड समजता? सैन्यामुळेच तिथे ३-३ वेळा निर्वेध फिरू शकलात आणि त्याचमुळे इथे येऊन मूर्खासारख्या पोस्ट्स टाकू शकलात याची जाणीव आहे का? ३ वेळा काश्मिरात फिरून सुखरूप परत आलात याचे श्रेय सैन्याला देऊन कृतज्ञ राहण्याऐवजी कृतघ्नपणे सैन्यावरच दुगाण्या झाडताना शरम कशी वाटत नाही?
सध्याच्या अशांततेच्या, दंग्याच्या, गोळीबाराच्या, पॅलेट गनच्या कमरेच्या वर चालवण्याच्या अनेक स्टोरीज आंतरजालावर आहेत. बहुतेकवेळा कॅमेरा सैन्याच्या (बाजूने) समोरील आंदोलकांचे चित्रण करतो. या चित्राची दुसरी बाजूसुद्धा आहेच.
सैन्यावर व पोलिसांवर हल्ले होत असताना जगातील कोणतेही सैन्य हात बांधून स्वस्थ बसणार नाही. गोळीबारात जे लोक जखमी झाले आहेत ते स्वतःच्या चुकीमुळे जखमी झालेले आहेत. संचारबंदी सुरू असताना त्यांनी घरात बसणे अपेक्षित आहे. ते न करता मेलेल्या अतिरेक्याच्या समर्थनार्थ रस्त्यावर येऊन सैन्यावर हल्ले करण्याची ही किंमत द्यावी लागत आहे. सैन्याच्या गोळ्या खायच्या नसतील तर संचारबंदी सुरू असताना घरात बसा किंवा रस्त्यावर आलात तर शांततेने निदर्शने करा. पोलिसांवर व सैनिकांवर हल्ले केलेत तर प्रत्त्युत्तर मिळणारच.
दहशतवादाचे पीक पेरण्यासाठी जमिनीची मशागत भारतीय सैन्यदले पाकिस्तानला फुकटात करून देतायत, असे चित्र आहे.
परत एकदा मूर्खपणा. पाकिस्तान हा सुरवातीपासून दहशतवादी निर्माण करणारा देश आहे. जगातल्या अनेक देशात, जिथे भारतीय सैन्याचा काहीही संबंध नाही, त्या देशात सुद्धा पाकिस्तानने दहशतवादी हल्ले केलेले आहेत. भारतात सुरू असलेल्या दहशतवादाचे खापर भारतीय सैन्यावर फोडणे हा पराकोटीचा मूर्खपणा आहे.
बाकी टवाळखोरांचे सगळे मटेरिअल साभार परत.
तुम्ही कोणाचेही मटेरिअल साभार परत करा. तो तुमचा प्रश्न आहे. पण अत्यंत बेताल व मूर्खपणाचे लेख लिहिणार्‍या तुमच्या सारख्यांना आम्ही अजिबात सोडणार नाही.

In reply to by संदीप डांगे

धन्यवाद! मूळ लेख वाचल्यावर निधर्मांधांची नेहमीचीच मतलबी आरडाओरड अशी समजूत करून दुर्लक्ष केले होते. परंतु लेखकाचा नंतर आलेला प्रतिसाद वाचल्यावर संताप आला आणि म्हणून प्रतिसाद दिला.

In reply to by श्रीगुरुजी

100 टक्के सहमत हा देश या देशावर प्रेम करणाऱ्या आणि देशाला आपले मानणाऱ्या सगळ्यांचा आहे मग तो कुठल्याही जात, धर्म, वय, पंथ, विचारधारेचा असो आणि त्याचे जर देशावर प्रेम नसेल, तर तो कुठल्याही जात धर्म पंथाचा असेल तरी तो देशद्रोही च आहे

In reply to by संदीप ताम्हनकर

तुम्ही अरुन्धती रॉयचा चश्मा वापरता काय? काश्मिरी पण्डिताचा उल्लेख टाळून लेख पाडलाय म्हणुन विचारले. काश्मिरी जनतेची फारच कीव आलेली दिसत आहे तुम्हाला, काय उद्योगधंदे आहेत हो यांचे. आज सेनेच्या नियंत्रणामुळे कश्मीर दिल्ली आणि पाकिस्तानमधे बफर स्टेट बनून राहिलय , नाहीतर आज जसे अफगनिस्तानात हल्ले होत आहेत ते पार जम्मू , पंजाब , दिल्ली पर्यन्त पोचले असते. आमचे राजनाथसिंग भले सर्टिफिकेट देत फिरतील की भारतीय मुस्लमान आईएससारख्या अतिरेकी संघटनेची कास नाही पकडणार, मग आता ही कनेक्शन निघत आहेत ती काय भारतीय गुप्तचर विभागाची कारस्थानं आहेत? काश्मीरबाबत तुर्तास इतकेच बोलू शकतो की 'नजर हटी तो दुर्घटना घटी' रच्याकने ते काश्मिर हिंसाचाराचे अगदी पब्लिकमधुन काढलेल्या क्लिप्स बघितल्या आहेत.

In reply to by संदीप ताम्हनकर

... प्रत्यक्ष रस्त्यावर जे सैन्य असते ते एवढ्या बौद्धिक क्षमतेचे असते का ? असा प्रश्ण विचारुन तुम्ही आपल्याच देशाच्या सैन्याला कमी लेखताय व त्यांचा अपमान करताय याचे जरा भान ठेवा. भारतीय सैन्याचा इतिहास काय व कसा आहे याविषयीचा तुमचा अभ्यास शुन्य दिसतोय म्हणुन आपल्याला असलेल्या लिहिण्याच्या स्वातंत्र्याचा असा दुरुपयोग करताय. तुम्ही या दुव्यावर ( https://www.facebook.com/Presstitues/videos/1239597949407107/ ) जा म्हणजे तुमच्या प्रश्णांची उत्तरे तुम्हाला मिळतील. ह्या सैनिकाच्या प्रश्णावर उत्तर द्या किंवा स्वता गणवेश घालुन एक सैनिक म्हणुन एकदाच काश्मिरला जाउन या म्हणजे मग समजेल घरी बसुन मिपावर कळफलक बडवुन जिल्ब्या टाकणे व तिकडे काश्मिरात एक सैनिक म्हणुन रस्त्यावर ठामपणे उभे राहुन आन्दोलकांचे दगड खाणे यातला फरक. ... मी स्वतः काश्मिरात ३ वेळा स्वताःच्या गाडीने, स्वताः गाडी चालवत बऱ्याच ठिकाणी फिरलोय, स्थानिकांशी अजूनही संपर्कात आहे. तसेच इतर अभ्यासाच्या आधारावर मूळ पोस्ट लिहिल्येय. म्हणजे काश्मीरचा प्रश्ण आपल्याला जितका समजला तितका तो इतर कुणालाच समजला नाही अस तुमचा गैरसमज झालेला दिसतोय. 'मी स्वतः काश्मिरात ३ वेळा स्वताःच्या गाडीने जाउन आलोय' म्हणजे तो केवळ मलाच समजला असा तुमचा समज झालेला दिसतोय. जे इतर तिकडे आपल्या गाड्या घेउन जात नाहीत त्यांना त्यातले काहीच कळत नाही, समजला तो केवल मला आणि मलाच असा तुमचा एकुण अभिनिवेश दिसतोय ह्या वाक्यातुन. आता भारत सरकारने काश्मिरचा तुमचे मार्गदर्शन घेउन सोडवावा असे तुम्हाला सुचवायचे आहे का ?? फक्त एकच सांगा ही जिलबी तुम्ही कोणत्या उद्देशाने / हेतुने इथे टाकलीत ?? ह्या लेखातुन तुम्हाला कोणाबद्दल नेमके काय सुचवायचे आहे ??

In reply to by संदीप ताम्हनकर

एवढा प्रचंड काळ कोणत्याही प्रदेशात 'आस्फा'सारखे कायदे लागू असणं अमानुष आणि असं‌वेदनशील वाटतं. हा तुमचा मुद्दा आधीच पटलेला आहे, पण लेख आवडला असं म्हणवत नाही; मतं काय हे नीट न समजल्यामुळे मतांशी सहमती असंही म्हणवत नाही. अशासारख्या लेखनात जर उग्र भाषा वापरायची असेल तर त्यात विनोदी तिरकस-खवचटपणा असावा किंवा सरळ, साध्या भाषेत लिहावं. इतरांची उद्धृतं देताना तसा स्पष्ट उल्लेख हवा. अन्यथा अजित डोवालांना जेम्स बाँड म्हणण्याबद्दल जसे गैरसमज झालेले आहेत तसे होतात. पुलेशु

अन हो, एक राहिलेले म्हणजे, एखादा मनुष्य आर्मीची बाजू घेतोय म्हणजे तो संघिष्ट असला पाहिजे असा तुमचा ग्रह असल्यास तो तात्काळ डोक्यातून काढून टाकावा आपण, ही नम्र विनंती, आर्मी कोणाचीच नसते पण सगळ्यांसाठी असते, जमल्यास एखादी चक्कर एखाद्या बटालियनच्या एमएमजी स्थल उर्फ मंदिर मस्जिद गुरुद्वारा स्थलला नक्की द्या!!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सैन्य कोणाचंही (राजकीय विचारधारेचं) नसतं, नसावं हे मान्यच. तसे सावरकर, भगतसिंग, सरदार पटेल हे लोकही संघाचे नव्हते, पण मरणोपरान्त त्यांचं संघीकरण झालेलं आहे. राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम ह्या गोष्टीही संघ (आणि संघाच्या भावंडांनी) पळवायला आणि त्यावर जणू आपलाच अधिकार आहे असं म्हणायला सुरुवात केलेली आहे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

जसं की...?? म्हणजे सरदार पटेल, भगतसिंग, सावरकर हे संघाचेच झाले हे केव्हापासून मानायला लागलात आपण? तसेच राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम ह्या गोष्टी संघाने कुठून पळवल्या तेही सांगावे. काँग्रेसने गांधीघराण्याचा उदो उदो करण्यापासून थोडी सवड काढली असती तर उपरोल्लिखित किमान दोन महापुरुषांना असं ह्याचं त्याचं झाले म्हणायची सोय राहिली असती का? किमानपक्षी भारतीय जनता ह्यावेळी असे काही मानते का? डाव्यांचे राष्ट्रप्रेम जगजाहिर आहे. डाव्यांकडून राष्ट्रवाद पळवला असे म्हणायचे असेल तर तो त्यांच्याकडे केव्हा होता हे ही कळावे? मी बालक अज्ञानी आहे, माझी समज-आकलन अर्थातच तुमच्या सारख्या दिग्गजांपेक्षा फारच कमी आहे. त्यास्तव तुमच्या विधानांचे स्पष्टीकरण मागण्याची जुर्रत करत आहे. उत्तरे मिळतील अशी अपेक्षा करतो. कारण तमाम भारतीयांचे आदराचे, श्रद्धेचे, राष्ट्राभिमानाचे प्रतिक जर 'ह्याचे झाले त्याचे झाले' असे आपण बोलत असाल तर मजसारख्या सामान्य भारतीयाचे मन विचलित होते. ते होऊ नये, बुद्धीभेदाचे डावपेच दोन्ही बाजूंकडून अजिबात सफल होऊ नयेत असे मजसारख्याला वाटते, तस्मात हा प्रतिसादप्रपंच...

In reply to by संदीप डांगे

मी बालक अज्ञानी आहे, माझी समज-आकलन अर्थातच तुमच्या सारख्या दिग्गजांपेक्षा फारच कमी आहे.
अय्या, मी पण हेच लिहायला आले होते! असो. १. राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम ह्या गोष्टी संघाने कुठून तरी पळवल्या => म्हणजे त्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, २. काँग्रेसने सरदार पटेल, भगतसिंग, सावरकर ह्यांच्यापैकी कोणीतरी दोन लोकांची व्यक्तीपूजा करायला हवी होती ३. संघिष्ठ नाहीत म्हणजे डावेच असं काही तुम्ही समजता असं मला समजलं. असं समजत नसाल तर माझ्या आकलनातली चूक. मी आळशी बाई आहे आणि रिअॅक्शनरी लिहिण्याचा हल्ली खूप कंटाळा येतो. तुमचे विचार समजले. उत्तराबद्दल आभार.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मला काय समजलं नाय समजलं किंवा तुम्ही आळशी आहात किंवा तुम्हाला कंटाळा येतो हा विषय तुर्तास बाजूला असू देत. निम्नलिखित आपलीच विधाने आहेत. सावरकर, भगतसिंग, सरदार पटेल हे लोकही संघाचे नव्हते, पण मरणोपरान्त त्यांचं संघीकरण झालेलं आहे. राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम ह्या गोष्टीही संघ (आणि संघाच्या भावंडांनी) पळवायला आणि त्यावर जणू आपलाच अधिकार आहे असं म्हणायला सुरुवात केलेली आहे. हे आपण कोणत्या आधारावर, संदर्भासहित लिहिले आहे तेवढं फक्त विचारलंय मी. तुमच्यासारख्या दिग्गजांनी असले विचार ठेवले म्हणजे नक्की काहीतरी आधार असेलच अशी मज भाबड्या पामराची समजूत होती. अन्यथा तत्सम पिंका टाकायला दोन रुपयाचा मावाही खायला लागत नाही असे निरिक्षण आहे. बाकी 'संघिष्ठ नाहीत म्हणजे डावेच' असलं काहीही मी तरी म्हटलेलं नाही. तसं असतं तर तुमच्या प्रतिसादाला फाट्यावर मारुन पुढे गेलो असतो. पण डावेही नाही किंवा संघिष्ठही नाही म्हणून काहीही लिहायचे व त्यावर कोणी स्पष्टीकरण मागितले तर आळसाचे किंवा कंटाळ्याचे सोयिस्कर पळपुटेपणाचे कारण द्यायचे हे काही पटलं नाही, बघा आता कसं ते..?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

यातील खरी गंमत ही आहे - सैन्य कुठल्याही विचारधारेच नसाव असे तुम्ही म्हणता पण त्याच वेळी सैनिकांना मतदानाचा हक्क असतो हे विसरता. सैनिक शेवटी माणूसच असतो आणि त्यालाही राजकीय विचारधारा असते. हे खरे मानले तर सैन्य कोणत्याही विचारधारेचे नसते असे म्हणणे जरा धाडसाचे होईल. हां सध्या बर्‍यापैकी समतोल आहे असे म्हणता येईल पण तो तसाच राहील असे मानणे भाबडेपणा होईल.... :-) राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम या भावना कोणीही भारतीयांनी पळवाव्यात व त्यावर अधिकार सांगावा या मताचा मी आहे.... :-)

@आता मुद्दा असा आहे की शांत अशा पुण्यासारख्या सुशिक्षित शहरात काही मोजके निःशस्त्र सैनिक छात्र कायद्याच्या विरुद्ध जाऊन सगळी यंत्रणा वेठीला धरून दहशत निर्माण करू शकतात तर काश्मीर सारख्या अशांत (Hostile) प्रदेशात कायद्याचे पाठबळ असलेले, प्रचंड संख्येने उपस्थित असलेले सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल? ››› लेखक महोदय, आपणास अकाली दीर्घजीवी मती-मंदत्व प्राप्त झालेले आहे... असा निर्वाळा देऊन , मी माझे वाक्य संपवितो.

काश्मिरात पाक पुरस्कृत अशांतता आणि दहशतवाद आहे यात कोणाचेच दुमत नाही. प्रश्न कसे हाताळावे हा मुद्दा आहे. अरे मग ६० वर्ष काय करत होते, सरकार आणी लोक ? जम्मु आणी कश्मिर सरकारच्या जोरावर ३ लाख काश्मिरी पंडीतांना काश्मिर मधुन रातोरात हाकलले गेले , कित्येक पंडित त्यांच्या बायकांना आपला जीव हकनाक गमवावा लागला, कित्येक बायकांना शिकार केले गेले त्यावेळेला केंद्र सरकारने हा प्रश्न कसा काय हाताळला ? त्यावेळेला सैन्य नव्हत ? का हिंदु पंडीत मरताहेत मग मरु दे, म्हणुन काँग्रेस सरकारला काहीच करावस वाटल नाही ?

In reply to by डँबिस००७

प्रश्न कश्मीर भारतात ठेवणे/राहणे हा आहे की, काश्मिरी पंडित?? काश्मिरी पंडित ह्या मुद्द्यावर आमचे मत आमचे अत्यंत लाडके नेतृत्व अन इलिनॉइस राज्यातले धडाडीचे लोकाभिमुख नेते, स्प्रिंगफिल्ड खुर्दचे अब्राहमदादा लिंकन म्हणत असत तसे आहे "सगळे गुलाम मुक्त करून, सगळे गुलाम गुलाम ठेऊन, गुलामगिरी नष्ट करून, अबाधित ठेऊन, काय वाटेल ते करून, देश अभंग राहायला(च) हवा" ह्यात गुलाम शब्द काढून पंडित, सुन्नी, मुसलमान, दलित, ब्राह्मण, शीख, तामिळ काय वाटेल ते भरा! For, the union must persist :)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बाप्पूसाहेब! या प्रतिसादाची प्रिन्टऔट काढून रोज नजरेपुढे राहावी अशी व्यवस्था करावी म्हणतो. बाकी, तुमच्या संतुलित प्रतिसादासाठी तुम्हाला एक काहवा, एक पटियाला लस्सी, एक बैदा पाऊच, एक प्लेट फरसाण, एक प्लेट सोँदेश,एक म्हैसूर डोसा, एक बिसिबेल्ली भात अन एक चेट्टीनाड चिकन!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बापू, तुमचे सारे प्रतिसाद संतुलीत आणि अत्यंत प्रगल्भ आहेत. त्यांच्यामुळे अनेक प्रश्नांचा सांगोपांग विचार करता आला. धन्यवाद. प्रस्तुत धागालेखकाने सांगितलेली पुण्याची घटना ठाऊक नाही परंतू अशाच प्रकारची घटना नाशीकला घडली होती. तिथे अ‍ॅकॅडमीत शिकणार्या आर्मी कॅडेटसच्या १००-१५० जनांच्या टोळक्याने सबंध पोलीस स्टेशनमध्ये तोडफोड केली होती त्यात बरेच पोलीस जखमीदेखील झाले होते आणि त्यंच्यावर कसलीही कारवाई झाल्याचे नंतर वाचले नाही(झालेली असू शकते, ठऊक नाही.). मला असे विचारायचे आहे की अश्या घटना घडल्यानंतर या विद्यार्थ्यांवर काही कारवाई होऊ शकते का? किंवा पोलीसांवर हात उचलला असे चार्जेस लावून खटला चालवला जातो का? सैन्यात जाण्याच्या आधीच विद्यार्थी ईतक्या मुजोरपणे कायद्याला न जुमानता मनमानी करु शकतात हे सैन्याचे(किंवा एकूनच आपल्या समाजाचे आणि कायद्यांचे) अपयश वाटते मला. इथे काश्मीरबद्दल आजीबातच भाष्य करायचे नाही तिथे अफस्पा सारख्या कायद्यांची गरज आहेच.

प्रश्न कश्मीर भारतात ठेवणे/राहणे हा आहे की, काश्मिरी पंडित?? काश्मिरी पंडित ह्या मुद्द्यावर आमचे मत आमचे अत्यंत लाडके नेतृत्व अन इलिनॉइस राज्यातले धडाडीचे लोकाभिमुख नेते, स्प्रिंगफिल्ड खुर्दचे अब्राहमदादा लिंकन म्हणत असत तसे आहे "सगळे गुलाम मुक्त करून, सगळे गुलाम गुलाम ठेऊन, गुलामगिरी नष्ट करून, अबाधित ठेऊन, काय वाटेल ते करून, देश अभंग राहायला(च) हवा" ह्यात गुलाम शब्द काढून पंडित, सुन्नी, मुसलमान, दलित, ब्राह्मण, शीख, तामिळ काय वाटेल ते भरा! For, the union must persist :)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

टाळ्या आणि वंदन सुद्धा ! परवा श्री अजित डोवल पुण्यात बोलाताना नेमेके हेच म्हणाले. राष्ट्र हे पिढ्या- पिढ्यांचे असते , सरकार येते आणि जाते देखील !

असले लेख लिहायला आपल्याला आपल्या भारतदेशात मुभा आहे हीच आपल्या राष्ट्राच्या राज्यघटनेची थोरवी आहे असे मी समजतो. आपल्या सरकारबद्दल, सैन्याबद्दल जर कांहीं चांगले लिहिता येत नसेल वा लिहायचे नसेल तर गप्प बसावे, विरोधात लिहून आणखी आग भडकवू नये! आपल्याला भाषण व लेखनस्वातंत्र्य आपल्या राज्यघटनेने दिले आहे ते वापरावे. फलिहिलेलीमी नुकतीच लिहिलेली माझी पोस्ट वाचावी हीच नम्र विनंती. तो लेख बराच लांब आहे व इंग्रजीमध्ये आहे म्हणून इथे पूर्ण देत नाहीं. पण तो वाचावा अशी मी ताम्हनकर-जींना विनंती करतो.

असले लेख लिहायला आपल्याला आपल्या भारतदेशात मुभा आहे हीच आपल्या राष्ट्राच्या राज्यघटनेची थोरवी आहे असे मी समजतो. आपल्या सरकारबद्दल, सैन्याबद्दल जर कांहीं चांगले लिहिता येत नसेल वा लिहायचे नसेल तर गप्प बसावे, विरोधात लिहून आणखी आग भडकवू नये व आपल्या सेनादलाच्या मनोधैर्यावर घाव घालू नयेत! आपल्याला भाषणस्वातंत्र्य व लेखनस्वातंत्र्य आपल्या राज्यघटनेने दिले आहे ते जरूर वापरावे पण गैरवापर करू नये. फेसबुकवर मी नुकतीच लिहिलेली माझी पोस्ट वाचावी हीच नम्र विनंती. ही पोस्ट बरीच लांब आहे व इंग्रजीमध्ये आहे म्हणून इथे पूर्ण देत नाहीं. पण ती वाचावी अशी मी ताम्हनकर-जींना विनंती करतो.

In reply to by सुधीर काळे

ती घटना, हिंदुराष्ट्र म्हणून नाही तर

सोवरीन सोसिअलिस्ट सेक्युलर डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ इंडिया

म्हणून लिहिली गेली आहे, आता ह्या वर उल्लेखलेल्या भारताच्या अधिकारीक नावातील बहुतेक शब्द आपणाला खटकत असतील तर तो आपला प्रश्न आहे, त्याला उत्तर म्हणून प्राचीन शिल्पकलेचे अविष्कार असणारी मंदिरे आपण पेढे अन ऑइल पेंट फासून विकृत करतो तसे घटनेवर अमुक एक रंग मारून विकृत करणे मी वैयक्तिकरित्या निषेधार्ह मानतो :)

माझी "Sun, 24/07/2016 - 00:38" ही पोस्ट काधून टाकावी कारण त्याची सुधारित आवृत्ती मी स्वतः त्या खालीच दिलेली आहे. (Sun, 24/07/2016 - 00:44) धन्यवाद

ताम्हनकर, 1. सैन्याला विशेषाधिकार दिल्यानं ते त्याचा अतिरेक करत असतील तरी सुद्धा आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. 2. काश्मीर ची जमीन आमचं सरकार कधीही सोडणार नाही. त्यासाठी कितीही काश्मिरी मुसलमानांना ठार मरावं लागलं तरी ते केलं जाईल. 3. सैन्य विरुद्ध बोलणाऱ्या इथल्या अस्तनीच्या निखाऱयांना एक तर एन्काउंटर करून संपवलं जाईल किंवा अगदीच शक्य नसेल तर "आत" घातलं जाईल. 4. सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल त्याची अर्थातच आम्हाला काही पर्वा नाहीये. 5. "अपरिपकव", "हास्यास्पद" वगैरे काहीही बोललं तरी जमिनीवरची परिस्थिती बदलत नाही. सरकार, सैन्य आणि भारताची जनता अचानक केलेल्या या कटानं गोंधळून गेली होती. पण आता सरकार सावरलं आहे, सैन्यानं पुन्हा परिस्थिती चा ताबा घेतला आहे आणि भारताची जनता भक्कम पणे सरकारच्या पाठीशी उभी आहे. आता काश्मिरी मुसलमानांचा बदला घेतला जाईल आणि जाईलच. आता दहशत वादयांच्या नावे बांग दे किंवा सैन्याच्या नावानं शिमगा कर पण त्या पेलेट्स मध्ये जे जखमी झालेत त्यांना सैन्य शोधेल आणि मग ठोकेल.

In reply to by पिनाक

ओ साहेब, उगाच कट्टरपणा इज द न्यू कुल सिद्ध करायला काय वाटेल ते बोलू नका हो, आपण आर्मी सारख्या एका इंस्टिट्यूशन वर शिंतोडे उडवत आहात ह्याचे भान असू द्या, अन काय मुसलमानांचा बदला वगैरे लावले आहे मालक? आपली विकृती सैन्याच्या आडून आडून नका प्रदर्शित करू, उगाच काहीही लिहू नका ही विनंती

In reply to by पिनाक

ताम्हनकर साहेब, आपला प्रतिसाद "भारतिय सैन्याला पाठिंबा देणे किंवा त्याच्या उत्तम कामाची भलावण करणे" हे तर करत नाहीच पण; सैन्याने काय करावे याबाबत लेखकाचा अतिरेकी अजेंडा सैन्याच्या नावावर खपवून "शिस्तबद्ध आणि संयमित भारतिय सैन्याच्या किर्तीला डाग लावण्याचा विनोदी प्रयत्न" करणारा आहे. हे जर तुमचे खरोखरचे मत असेल तर... आपण या विषयावरचा आपला अभ्यास वाढवणे खूsssप जरूरीचे आहे !

In reply to by पिनाक

नेहरूंनी शेख अब्दुलांना गजाआड ठेवले होते तोपर्यंतच काश्मिरमधे शांतता नांदत होती. इंदिरा गांधीनी त्यांना मुक्त केले नसते तर आजही तिथे शांतता नांदत राहिली असती. काश्मिर पंडीतांची समस्या उभीच राहीली नसती. जिथे खूप सावध राहायला पाहिजे तिथेच नेमका विश्वास ठेऊन गाफील रहावयाची (पृथ्विराज चौहानापासून लागलेली) भारतीयांची खोड कधी जाणार आहे कोणास ठाऊक.

तुम्हाला अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत्येय. दोन्ही बाजूंच्या अतिशयोक्त दावे आणि विधानांचा आपण अत्यंत संयमाने समाचार घेत आहात. हे पाहून तुमच्याविषयी असलेला आदर दुणावला आहे. तुमचे अनेकानेक आभार!

In reply to by साती

खरोखर. सोन्याबापू नेहमीच अतिरेक टाळून वस्तुस्थितीनिदर्शक विधानं करीत असतात. आणि वस्तुस्थिती त्यांच्यापेक्षा अधिक चांगल्या तर्‍हेने इथे दुसरं कोण जाणणार?

जय संता आता बंता येउ द्या.

In reply to by विनायक प्रभू

लवकरच बंदी येणारे अशा जोकवर. सुप्रीम कोडताने म्हटलय तसं.

हा जोक नाहीये

खरे वास्तव हे आहे की, जनमतचाचणी घेतली तर काश्मीर दुसर्‍या दिवशी स्वतंत्र होईल आणि तिसरा दिवस उगवायच्या आंत, कायमचे पाकिस्तानच्या ताब्यात जाईल. शिवाय दहशतवाद थांबणार नाहीच तो अन्य भारताच्या आणखी जवळ येईल.

In reply to by तिमा

हे खरे नाही. जम्मू-काश्मिरने भारतातच रहायचे का पाकिस्तानात जायचे का स्वतंत्र देश म्हणून रहायचे या तीनपैकी एकाही पर्यायाला स्थानिक जनतेचा पुरेसा निर्णायक पाठिंबा नाही असे २०१३ साली चॅथम हाऊस या इंग्लंडमधील प्रसिद्ध संस्थेने केलेल्या एका जनमत चाचणीत दिसून आले आहे. या सर्व तीन पर्यायांना ५०% पेक्षा कमी जनतेने पाठिंबा दिलेला आहे. यापैकी कोणत्याच पर्यायाला ५०% किंवा अधिक मते मिळू शकलेली नाहीत. तसेच यावरील जनमत वेगवेगळ्या विभागानुसार वेगळे होते हेही दिसून आले आहे. काश्मिरमध्ये जनमत घेऊन निर्णय घेणे हे जवळपास अशक्य आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या १९४८ च्या ठरावानुसार भारतीय काश्मिर व पाकव्याप्त काश्मिर अशा दोन्ही भागातून दोन्ही देशांनी सैन्य काढून घेणे ही सार्वमताची पूर्वअट आहे. दोन्ही देश ही अट पाळणे अशक्य आहे. त्यामुळे सार्वमत घेता येणार नाही. हा ठराव १९४८ चा होता. त्यानंतर ६८ वर्षे उलटून गेली आहेत. त्यावेळची परिस्थिती आता पूर्ण बदलली आहे. त्यामुळे १९४८ चा ठराव आता जसाच्या तसा अंमलात आणणे अशक्य आहे. यासाठीच काही वर्षांपूर्वीच संयुक्त राष्ट्रसंघाने हा ठराव बॅकबर्नरवर टाकलेला आहे. काश्मिर मध्ये श्रीनगर खोरे, जम्मू व लडाख हे तीन वेगवेगळे भाग आहेत. श्रीनगरमध्ये मुस्लिमांची संख्या सर्वाधिक आहे. जम्मूमध्ये हिंदू मोठ्या प्रमाणात आहेत व लडाखमध्ये बौद्ध मोठ्या प्रमाणात आहेत. फुटिरतावादाला पाठिंबा मुख्यत्वेकरून श्रीनगरच्या खोर्‍यातून मिळतो. जम्मू व लडाखमध्ये फुटिरतावादाला कमी पाठिंबा आहे. जनमत घेतल्यास जम्मू व लडाख भारतात राहण्याच्या बाजूने कौल देतील तर श्रीनगरमधील जनमत तीन पर्यार्यांमध्ये विभागलेले असेल. संपूर्ण काश्मिरचा एकत्रित विचार करता येणार नाही. त्यामुळे जनमत घेऊनही फायदा नाही. भारत कधीही काश्मिरचा ताबा सोडणार नाही. काश्मिरमध्ये अनेक महत्त्वाची शिखरे आहेत. त्यांच्यावर पाकिस्तानला ताबा मिळाला तर पाकिस्तानी सैन्याला अ‍ॅडव्हांटेज मिळून उर्वरीत भारताची सुरक्षा धोक्यात येईल. त्यामुळे भारत कधीही काश्मिर हातचे जाऊन देणार नाही. काश्मिरला स्वतंत्र देश होऊन देण्यास पाकिस्तानचा जोरदार विरोध असेल. पाकिस्तानला काश्मिर स्वतःच्या देशात हवे आहे. पाकिस्तान काश्मिरला स्वतंत्र राहू देणार नाही. समजा काश्मिर एक स्वतंत्र देश झाला तर पाकिस्तान व चीन एकत्र येऊन ते काश्मिर ताब्यात घेतील कारण दोन्ही देशांच्या सैन्याच्या दृष्टीने तो अत्यंत महत्त्वाचा प्रदेश आहे. समजा काश्मिर प्रश्न पाकिस्तानला हवा तसा सुटला तरीसुद्धा पाकिस्तान गप्प राहणार नाही. त्यानंतर पाकिस्तान पंजाब सारख्या इतर राज्यांकडे वळेल व तिथे अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू होईल. पाकिस्तानला काश्मिरींविषयी काहीही देणेघेणे नाही. त्यांना फक्त भारताला त्रास द्यायचा आहे. सध्या त्यासाठी काश्मिर हे एक निमित्त आहे. हे निमित्त संपले तर ते दुसरे निमित्त शोधतील. वरील चाचणीतील काही परिच्छेद - The first-ever survey on both sides of Kashmir by Robert W Bradnock, a senior fellow at Chatham House, UK's most influential think-tank, has shown that only two percent of people in Jammu and Kashmir want to join Pakistan while 43 percent prefer independence. The survey 'Kashmir: Paths to Peace' has been sponsored by Libyan president Muammar Gaddafi's son, Dr Saiful Islam. It found preference for independence was fairly uniform across districts in PaK but it was uneven in J&K. In Kashmir valley division it was between 75 to 95 percent; none in Poonch, Rajauri, Udhampur and Kathua of Jammu division and in Jammu itself it was just one percent. In Ladakh division, it was 30 percent in Leh and 20 percent in Kargil”. “This poll, in common with two preceding polls in J&K shows that setting aside all other political obstacles, it is difficult to see how plebiscite proposed in UN resolutions of 1948/49 could play any part today in the resolution of the dispute. There is no clear majority in the prospect for independence either. In J&K there is a majority in favour of outright independence for entire Kashmir in only four districts, all in Kashmir valley division and in five other districts the support for independence is one percent or less”, reports the survey. http://www.milligazette.com/news/7376-survey-shows-preferences-across-k…

In reply to by श्रीगुरुजी

पुनश्च एकदा गुर्जींबर सहमती, आज गुर्जी पेटले आहेत! संदर्भ म्हणून चक्क 'मिल्लीगॅझेट'ची लिंक उचलून आणलीन!! =))

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

श्रीगुरुजींच्या सर्व मुद्याना सहमती. देशाच्या सुरक्षिततेच्या बाबतीत आपली सेना जे कर्तव्य बजावत आहे ते अतुलनीय आहे. काही छुटपूत घटनांचा उल्लेख करून बुद्धदीभेद करण्याचा मार्ग अश्लाघ्य असाच आहे

आता मूळ लेखाबद्दल -
काश्मीर मध्ये पुन्हा आझाद कश्मीरच्या घोषणा निनादू लागल्यापासून उथळ राष्ट्रवाद्यांना चेव चढला आहे. मोदी सरकारची ही कसोटीची वेळ आहेच पण त्याहूनही अधिक मोदी समर्थकांची जणू इज्जत पणाला लागली असल्याचे चित्र समाजमाध्यमातून उमटते आहे. ह्या अतिराष्ट्रवाद्यांना असे वाटत होते की एवढी वर्ष मुस्लिम तुष्टीकरण करणारे काँग्रेसचे सरकार कडक भूमिका घेत नव्हते त्यामुळे काश्मिरातील मुसलमान शेफ़ारलेत आणि पाकिस्तानच्या पाठिंब्यावर स्वतंत्र काश्मीर मागतायत. काँग्रेसने जी कडक भूमिका घेतली नाही ती आता अतिराष्ट्रवादीमेरुमणीमोदी लगेच घेतील आणि माजलेल्या काश्मिरींना तात्काळ वठणीवर आणतील. यामध्ये एकंदर सूर असा आहे की एकदा सैन्याला मोकळे सोडले की सैन्य सगळे प्रश्न एक झटक्यात सोडवेल आणि एकदम इस्त्री मारलेल्या कापडासारखा काश्मीर प्रश्न सुरळीत होऊन जाईल. ही भावना व्यक्त करणारे स्क्रिप्ट लिहून शूटिंग केलेले व्हिडीओ, ज्यामध्ये एक ताव भरलेल्या मिशांचा, फौजी असल्याचा आव आणणारा नाटकातला खोटाखोटा सैनिक गुरगुरत आणि अभिनिवेशाने हातवारे करत धमक्या देताना दिसतो की आमचे बांधलेले हात सोडा आणि बघा जेएनयू पासून काश्मीर पर्यंतचे तमाम देशद्रोही कसे सुतासारखे सरळ करतो ते.
अत्यंत मूर्खासारखे विचार! कोण आहेत हे उथळ राष्ट्रवादी आणि त्यांना चेव चढला आहे म्हणजे नकी काय होतंय? काश्मिरमधल्या फुटिरतावाद्यांना पाकिस्तानचा उघड पाठिंबा आहे ही वस्तुस्थिती आहे आणि पाकिस्तानने अनेकवेळा याची जाहीर कबुली दिली आहे. हे काही या तथाकथित अतिराष्ट्रवाद्यांचे स्वत:चे मत नाही. ही वस्तुस्थिती आहे. तिथे असलेले सैन्य काश्मिरच्या रक्षणासाठी व पर्यायाने उर्वरीत भारताच्या रक्षणासाठी आहे हे कळतंय का? काश्मिरसाठी पाकिस्तानने ४ वेळा युद्ध केले व अजूनही काश्मिर बळकावण्याचे प्रयत्न सुरू आहेतच. त्यामुळे तिथे सैन्य असणारच. आणि जेएनयू सारख्या संस्थातील देशद्रोह्यांना सरळ करण्यासाठी सैन्याची अजिबात गरज नाही व नव्हती. या देशातील न्यायालये त्यासाठी पुरेशी सक्षम आहेत. कन्हैयाकुमार २० दिवस तुरूंगार राहून आल्यावर लगेच टोन बदलून अफझल गुरूची आरती ओवाळण्याऐवजी दलित, मोदी इ. विषयांवर बरळायला लागला हे लक्षात आलं असेलच.
हे सगळे अपरिपकव वर्तणूक या सदरात मोडते आणि म्हणूनच हास्यास्पदही आहे. स्वतः मोदींचे निवडणूकपूर्व भाषण आणि आवेश असाच होता जो आता भक्तांमधून झिरपतोय. जुन्या काळाच्या पद्धतीप्रमाणे एखाद्या प्रांतात बंडाळी झाली तर राजांनी दरबारातील एखाद्या सरदाराची नेमणूक करावी किंवा एखाद्याने विडा उचलावा आणि स्वारीवर जाऊन त्याने मोठ्या शौर्याने गनिमांचा बिमोड करून शांतता आणि विजयश्री दरबारात पेश करावी असे आत्ताही होईल असा अनेक भक्तांचा भाबडा समज होता.
म्हणजे खरा राग मोदी समर्थकांवर दिसतोय. मोदी लोकशाही मार्गाने निवडून येऊन बहुमत मिळवून पंतप्रधान झाले हे अजूनही अनेकांना मान्य होत नाहीय्ये.
पण काश्मीरमधील परीस्थितीचे आकलन जसे-जसे प्रत्येकाच्या वकुबाप्रमाणे होत गेले तसतसा उन्माद कमी होऊ लागला. आता नेहरूंनीच कसा काश्मीर प्रश्नाचा मुळातच विचका करून ठेवला आणि कसे गांधीजी त्यावेळी गप्प राहिले हे दळण दळणाऱ्या पोस्ट समाजमाध्यमातून फिरू लागतील हे नक्की.
नेहरूंनी काश्मिरप्रश्नाचा कायमस्वरूपी विचका केला हे १९४८ पासून लिहिले जात आहे. ती वस्तुस्थिती आहे. त्यात काहीही असत्य नाही. हे आताच लिहिले गेलेले नवीन लेखन नाही.
ज्या राज्यांमध्ये गेली अनेक वर्षे 'सैन्यदले (विशेष अधिकार) कायदा १८५९ - AFSPA 1958' लागू आहे आणि जेथे मूलभूत अधिकार खुंटीला टांगून ठेवलेले आहेत आणि कधीही, कोणालाही, कुठूनही अटक करून कितीही दिवस तुरुंगात डांबण्याचा सैन्याला हक्क आहे अश्या ठिकाणच्या नागरिकांनी हे सगळे देशहिताच्या दृष्टीने गपचूप सहन करावे अशी उर्वरित नागरिकांची अपेक्षा असेल तर ती नक्कीच चुकीची आहे. अशी वेळ माझ्यावर आली तर माझी काय प्रतिक्रिया असेल हे प्रत्येकाने स्वतःला विचारून बघावे. अशी कल्पना करणे सोपे जावे म्हणून केवळ पुण्यात घडलेला पुढील प्रसंग आठवावा.
सैन्याला हा अधिकार फक्त काश्मिर, मणीपूर इ. मोजक्याच ठिकाणी का दिला गेला याची कल्पना आहे का? जेव्हा अतिरेकी निष्पापांची हत्या करायला लागतात, सर्वसामान्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होतो तेव्हा सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी सैन्याला पाचारण करावेच लागते. मुळात मी काही चुकीचे करीत नसेन, अतिरेक्यांना मदत करीत नसेन तर कशाला सैनिक मला अटक करतील? मी जर काही संशयास्पद कृत्ये करीत असेन, अतिरेक्यांना मदत करीत असेन हे दिसून आले तरच माझ्यामागे सैनिकांचा ससेमिरा लागेल.
पुण्यात संभाजी उर्फ लकडी पुलावरून सकाळी ७ ते रात्री ९ या वेळात दुचाकी वाहनांना जायला बंदी आहे. दिनांक ३१ जानेवारी २०१२ रोजी रात्री ८ च्या सुमारास सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालय (CME) दापोडीचे दोन सैनिक विद्यार्थ्यांना नो एंट्री मधून आल्याबद्दल अलकाटॉकीजच्या चौकात वाहतूक पोलिसांनी अडवले. सैनिकांनी पोलिसांशी वाद घातला आणि दंड भरण्या ऐवजी फोन करून आपल्या साथीदारांना बोलावले. अर्ध्याच तासात सैन्यदलाच्या तीन गाड्या भरून सैनिक तेथे आले. पोलिसांना न जुमानता हुल्लडबाजी करत, नागरिकांना धमकावत, गाड्यांच्या काचा फोडत, पत्रकारांचे कॅमेरे हिसकावून घेत जणू संपूर्ण चौक ताब्यात घेऊन ओलीस ठेवला. सुमारे पाऊण तास सैनिकांचा हा धिंगाणा चालू होता. नंतर सैन्यातील आणि पोलिसातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना येणे भाग पडून त्यांच्या मध्यस्तीने सगळं गोंधळ थांबला. पुणेकरांनी सैनिकांची ताकद आणि त्यातून येणारी दहशत काय असते याची छोटीशी चुणूक तासाभरासाठी अनुभवली आणि कशी सार्वत्रिक भयभीतावस्था आणि असहाय्यतेची भावना निर्माण होते हे ही अनुभवले. १ फेब्रुवारी २०१२ चे सगळे पेपर काढून पाहिले तर हा सगळा अनुभव आजही पुन्हा घेता येईल.
३१ जानेवारी २०१२ पूर्वी व त्यानंतर असे किती प्रकार झाले? जरा माहिती देता का? इतक्या वर्षात हा एकच अपवादात्मक प्रकार काही मोजक्या सैनिकांना केला असेल तर या एका प्रकारावरून संपूर्ण सैन्याला कायमस्वरूपी दोषी ठरवायचे?
आता मुद्दा असा आहे की शांत अशा पुण्यासारख्या सुशिक्षित शहरात काही मोजके निःशस्त्र सैनिक छात्र कायद्याच्या विरुद्ध जाऊन सगळी यंत्रणा वेठीला धरून दहशत निर्माण करू शकतात तर काश्मीर सारख्या अशांत (Hostile) प्रदेशात कायद्याचे पाठबळ असलेले, प्रचंड संख्येने उपस्थित असलेले सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल? आणि एक नागरिक म्हणून जर रोजच तुम्हाला हे सहन करावे लागत असेल तर तुमची प्रतिक्रिया काय होईल? प्रत्येक सुजाण नागरिकाने स्वतःची लोकशाहीची व्याख्या अधिक प्रगल्भ करण्यासाठी स्वतःला हे विचारून बघावे ही विनंती.
सैन्य धुमाकूळ घालत असेल? असे लिहायला जनाची नसली तरी निदान मनाची तरी लाज वाटायला हवी. सैन्याच्या जीवावरच आज आपण सर्वजण सुरक्षित आहोत. सैन्य नसते तर एका बाजूने चीनने व दुसर्‍या बाजूने पाकिस्तानने देशाचे लचके तोडले असते. कॅप्टन सौरभ कालिया व त्यांच्या ५ सहकार्‍यांना पाकड्यांनी किती हालहाल करून मारले हे माहिती आहे का? ३ वर्षांपूर्वी २ भारतीय सैनिकांना पकडून त्यांची मुंडकी कापलेली आठवतात का? रोज होणार्‍या गोळीबारात अनेक सैनिक प्राणांचे मोल देतात याची जाणीव आहे का? का उचलली जीभ आणि लावली टाळ्याला?

- कलम ३७० असताना, पलिकडे पाकिस्तान असताना काश्मीरी लोक सर्वार्थाने भारताला आपला देश मानतिल का? - पाकव्याप्त काश्मीरमधे आपल्या ३७० सारखे काही स्वतंत्र अधिकार देणारे काही आहे का ? जर तिथे काही नसेल तर इथे हे लाड का आणि कधिपर्यंत ? - जर भारत सरकारच्याअधिक्रूत भूमिकेनुसार सार्वमत हा मुद्दा जर टाईमबार/आऊटडेटेड झाला असेल तर अजून कलम ३७० हा मुद्दा अजून जिवंत का ? - जोपर्यंत संपूर्ण भारतीयांना समान न्याय/ अधिकार नसेल तोपर्यंत टीआरपी ची आवश्यकता असणारा मिडीया आणि "विद्वान" हे भारतीय लोकशाहीने दिलेल्या स्वातंत्र्याचा दूरूपयोग करणारच.

Mi kaay mhanato, udavatayat na bhangar lekh. Ase lekh shuddh deshdroh aahe. Sanghavarach sandhan sadhayche tar armyla kale kaun dakhavane nalayakpana aahe. Asha nalayak lekhanchi ithech Kay bharatat kuthehi garaj nahi. Please remove this thread. Sanghavarach raag kadhaycha asel tar special lekh lihana Tamhankar...

In reply to by संदीप डांगे

संदीपराव, एक विनंती करतो. हे असे मिंग्लिशमध्ये लिहिणे शक्य झाले तर टाळा. मिपा हे मराठी संकेतस्थळ असल्यामुळे बरेचसे मराठीत देवनागरी लिपीमध्ये लिहिणे ओघाने आलेच.बहुतांश सदस्य तसे करतातही. पण हे मिंग्लिश म्हणजे जेवताना घासाघासाला खडा आल्याप्रमाणे वाटते. गेल्या काही दिवसात बऱ्याच प्रतिसादांमध्ये असे मिंग्लिश तुम्ही वापरले आहे म्हणून हे लिहित आहे.

लेख जरा एकांगी वाटला. लेखकाशी अंशतः सहमत. काश्मीर भारतामध्ये राखण्यास तसेच तेथील दहशदवाद मोडून काढण्यात भारतीय आर्मी चा मोलाचा वाटा आहे यात शंकाच नाही. भारतीय जवानांच्या बलिदानामुळे काश्मीर अजून भारतात आहे याचे कायम भान राहील, मात्र भारतीय जवानांच्या कडून या 3 दशकात नक्कीच काही चुका घडल्या आहेत याचे भान राखाय हवे. काश्मीर हा प्रश्न हा फक्त मिलिटरी सोडवू शकणार नाही तर बरोबर पोलिटिकल अँप्रोच सुद्धा जरुरी आहे. जर भारत सरकार नागा बंडखोर, उल्फा बंडखोर यांचाबर संवाद साधत असेल तर काश्मीर फुटीरवाद्याबर बोलण्यात कसला आलाय कमीपणा हे कळत नाही. जर काश्मीर प्रश्न लवकर सुटला नाही तर खालील भीती वाटते 1. आतापर्यंत भारतीय मुस्लिम हे भारतीय सरकार च्या भूमिकेबद्दल कायम बरोबरीनं राहिलेत.भारतीय मुस्लिम प्रश्न आणि काश्मीर मुस्लिम प्रश्न नेहमी वेगळे राहिले आहेत.जर दोनी ठिकाणच्या radical लोकांची युती जाली तर दाहशवाद हा वानव्यासारखा भारतभर पसरेल. 2. पोलिटिकल इंडिसिव्हनेस ला कंटाळून जर PDP ने राजीनामा दिला तर भारताची काश्मीर वरील moral grip कमी होईल. आता सध्या कश्मीर मध्ये फक्त political पार्टी आणि पोलीस भारतीय सरकार चा भूमिकेशी प्रामाणिक आहेत, बाकी सर्वसामान्य जनता विरोधी आहे. टीप : google translate वापर्यामुळे भाषेत काही चुका राहतील. हि माझी भूमिका आहे एक्स्पर्ट ओपिनियन नव्हे.

In reply to by अमितदादा

माझ्यामते फुटीरतावाद्यांशी बोलायला भारताने नकार दिला असे नसावे. पण चर्चेत पाकिस्तानला सहभागी करून घेण्यास मात्र भारताचा कायमच नकार आहे, आणि तो योग्य देखील आहे.

In reply to by आनन्दा

माझ्यामते फुटीरवादी च काय पण पाकिस्तान शी सुधा चर्चा केली पाहिजे. एकवेळ फुटीरवादी राहूदे पण पाकिस्तान ची चर्चा केलीच पाहिजे, कारण आपला तोटा झाला तरी चालेल पण भारतच पण नुकसान झाल पाहिजे हि पाकिस्तान ची भूमिका आहे, तशी भूमिका भारत ठेवू शकत नाही कारण आपला मार्ग वेगळा आहे. म्हणून मला वाटते कि पाकिस्तान शी पण वेळ येयील त्यावेळी चर्चा करा, वेळ येयील त्यवेळी चार फटके द्या, पण ताठर आणि एगोइस्तिक भूमिका घेवू नका.