काश्मीर मध्ये पुन्हा आझाद कश्मीरच्या घोषणा निनादू लागल्यापासून उथळ राष्ट्रवाद्यांना चेव चढला आहे. मोदी सरकारची ही कसोटीची वेळ आहेच पण त्याहूनही अधिक मोदी समर्थकांची जणू इज्जत पणाला लागली असल्याचे चित्र समाजमाध्यमातून उमटते आहे. ह्या अतिराष्ट्रवाद्यांना असे वाटत होते की एवढी वर्ष मुस्लिम तुष्टीकरण करणारे काँग्रेसचे सरकार कडक भूमिका घेत नव्हते त्यामुळे काश्मिरातील मुसलमान शेफ़ारलेत आणि पाकिस्तानच्या पाठिंब्यावर स्वतंत्र काश्मीर मागतायत. काँग्रेसने जी कडक भूमिका घेतली नाही ती आता अतिराष्ट्रवादीमेरुमणीमोदी लगेच घेतील आणि माजलेल्या काश्मिरींना तात्काळ वठणीवर आणतील. यामध्ये एकंदर सूर असा आहे की एकदा सैन्याला मोकळे सोडले की सैन्य सगळे प्रश्न एक झटक्यात सोडवेल आणि एकदम इस्त्री मारलेल्या कापडासारखा काश्मीर प्रश्न सुरळीत होऊन जाईल. ही भावना व्यक्त करणारे स्क्रिप्ट लिहून शूटिंग केलेले व्हिडीओ, ज्यामध्ये एक ताव भरलेल्या मिशांचा, फौजी असल्याचा आव आणणारा नाटकातला खोटाखोटा सैनिक गुरगुरत आणि अभिनिवेशाने हातवारे करत धमक्या देताना दिसतो की आमचे बांधलेले हात सोडा आणि बघा जेएनयू पासून काश्मीर पर्यंतचे तमाम देशद्रोही कसे सुतासारखे सरळ करतो ते.
याउप्पर इंडियन जेम्स बॉन्ड श्री. अजित डोवाल आहेतच आणि ते कसे ७२ तासात शांतता प्रस्थापित करतील अश्या वल्गना करणाऱ्या पोस्टही फिरत आहेत.
हे सगळे अपरिपकव वर्तणूक या सदरात मोडते आणि म्हणूनच हास्यास्पदही आहे. स्वतः मोदींचे निवडणूकपूर्व भाषण आणि आवेश असाच होता जो आता भक्तांमधून झिरपतोय. जुन्या काळाच्या पद्धतीप्रमाणे एखाद्या प्रांतात बंडाळी झाली तर राजांनी दरबारातील एखाद्या सरदाराची नेमणूक करावी किंवा एखाद्याने विडा उचलावा आणि स्वारीवर जाऊन त्याने मोठ्या शौर्याने गनिमांचा बिमोड करून शांतता आणि विजयश्री दरबारात पेश करावी असे आत्ताही होईल असा अनेक भक्तांचा भाबडा समज होता.
पण काश्मीरमधील परीस्थितीचे आकलन जसे-जसे प्रत्येकाच्या वकुबाप्रमाणे होत गेले तसतसा उन्माद कमी होऊ लागला. आता नेहरूंनीच कसा काश्मीर प्रश्नाचा मुळातच विचका करून ठेवला आणि कसे गांधीजी त्यावेळी गप्प राहिले हे दळण दळणाऱ्या पोस्ट समाजमाध्यमातून फिरू लागतील हे नक्की.
ज्या राज्यांमध्ये गेली अनेक वर्षे 'सैन्यदले (विशेष अधिकार) कायदा १८५९ - AFSPA 1958' लागू आहे आणि जेथे मूलभूत अधिकार खुंटीला टांगून ठेवलेले आहेत आणि कधीही, कोणालाही, कुठूनही अटक करून कितीही दिवस तुरुंगात डांबण्याचा सैन्याला हक्क आहे अश्या ठिकाणच्या नागरिकांनी हे सगळे देशहिताच्या दृष्टीने गपचूप सहन करावे अशी उर्वरित नागरिकांची अपेक्षा असेल तर ती नक्कीच चुकीची आहे. अशी वेळ माझ्यावर आली तर माझी काय प्रतिक्रिया असेल हे प्रत्येकाने स्वतःला विचारून बघावे. अशी कल्पना करणे सोपे जावे म्हणून केवळ पुण्यात घडलेला पुढील प्रसंग आठवावा.
पुण्यात संभाजी उर्फ लकडी पुलावरून सकाळी ७ ते रात्री ९ या वेळात दुचाकी वाहनांना जायला बंदी आहे. दिनांक ३१ जानेवारी २०१२ रोजी रात्री ८ च्या सुमारास सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालय (CME) दापोडीचे दोन सैनिक विद्यार्थ्यांना नो एंट्री मधून आल्याबद्दल अलकाटॉकीजच्या चौकात वाहतूक पोलिसांनी अडवले. सैनिकांनी पोलिसांशी वाद घातला आणि दंड भरण्या ऐवजी फोन करून आपल्या साथीदारांना बोलावले. अर्ध्याच तासात सैन्यदलाच्या तीन गाड्या भरून सैनिक तेथे आले. पोलिसांना न जुमानता हुल्लडबाजी करत, नागरिकांना धमकावत, गाड्यांच्या काचा फोडत, पत्रकारांचे कॅमेरे हिसकावून घेत जणू संपूर्ण चौक ताब्यात घेऊन ओलीस ठेवला. सुमारे पाऊण तास सैनिकांचा हा धिंगाणा चालू होता. नंतर सैन्यातील आणि पोलिसातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना येणे भाग पडून त्यांच्या मध्यस्तीने सगळं गोंधळ थांबला. पुणेकरांनी सैनिकांची ताकद आणि त्यातून येणारी दहशत काय असते याची छोटीशी चुणूक तासाभरासाठी अनुभवली आणि कशी सार्वत्रिक भयभीतावस्था आणि असहाय्यतेची भावना निर्माण होते हे ही अनुभवले. १ फेब्रुवारी २०१२ चे सगळे पेपर काढून पाहिले तर हा सगळा अनुभव आजही पुन्हा घेता येईल.
आता मुद्दा असा आहे की शांत अशा पुण्यासारख्या सुशिक्षित शहरात काही मोजके निःशस्त्र सैनिक छात्र कायद्याच्या विरुद्ध जाऊन सगळी यंत्रणा वेठीला धरून दहशत निर्माण करू शकतात तर काश्मीर सारख्या अशांत (Hostile) प्रदेशात कायद्याचे पाठबळ असलेले, प्रचंड संख्येने उपस्थित असलेले सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल? आणि एक नागरिक म्हणून जर रोजच तुम्हाला हे सहन करावे लागत असेल तर तुमची प्रतिक्रिया काय होईल? प्रत्येक सुजाण नागरिकाने स्वतःची लोकशाहीची व्याख्या अधिक प्रगल्भ करण्यासाठी स्वतःला हे विचारून बघावे ही विनंती.
वर्गीकरण
वाचने
65007
प्रतिक्रिया
271
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा 'ऐसी'वर शोभणारा लेख चुकुन
Eka sansthalavar dusarya
In reply to हा 'ऐसी'वर शोभणारा लेख चुकुन by श्रीगुरुजी
आपापली वतनं असतात एकेकाची!
In reply to Eka sansthalavar dusarya by संदीप डांगे
+१
In reply to हा 'ऐसी'वर शोभणारा लेख चुकुन by श्रीगुरुजी
-1
In reply to +१ by अनुप ढेरे
अत्यन्त चुक लेख लिहिलेल असुन
.
अगय्युव....
दखलपात्र प्रतिक्रियां संबंधी: -
हे हॉरिबल आहे...
In reply to दखलपात्र प्रतिक्रियां संबंधी: - by संदीप ताम्हनकर
अतिराष्ट्रवाद्यांना म्हणजे
In reply to दखलपात्र प्रतिक्रियां संबंधी: - by संदीप ताम्हनकर
सोन्याबापू ....
In reply to अतिराष्ट्रवाद्यांना म्हणजे by कैलासवासी सोन्याबापु
'इंडियन जेम्स बॉन्ड श्री.
In reply to दखलपात्र प्रतिक्रियां संबंधी: - by संदीप ताम्हनकर
+१०००ⁿ
In reply to 'इंडियन जेम्स बॉन्ड श्री. by श्रीगुरुजी
धन्यवाद! मूळ लेख वाचल्यावर
In reply to +१०००ⁿ by संदीप डांगे
प्रचंड सहमत!!!
In reply to 'इंडियन जेम्स बॉन्ड श्री. by श्रीगुरुजी
+ infinity
In reply to 'इंडियन जेम्स बॉन्ड श्री. by श्रीगुरुजी
+ ∞
In reply to 'इंडियन जेम्स बॉन्ड श्री. by श्रीगुरुजी
____/\____
In reply to 'इंडियन जेम्स बॉन्ड श्री. by श्रीगुरुजी
गुर्जींशी सहमत!!
In reply to 'इंडियन जेम्स बॉन्ड श्री. by श्रीगुरुजी
भारत माता कि जय जय हिंद
संदीप भौ ,
In reply to दखलपात्र प्रतिक्रियां संबंधी: - by संदीप ताम्हनकर
श्री. संदीप.........
In reply to दखलपात्र प्रतिक्रियां संबंधी: - by संदीप ताम्हनकर
गल्बला
In reply to दखलपात्र प्रतिक्रियां संबंधी: - by संदीप ताम्हनकर
अन हो, एक राहिलेले म्हणजे,
गंमत
In reply to अन हो, एक राहिलेले म्हणजे, by कैलासवासी सोन्याबापु
जसं की...?? म्हणजे सरदार पटेल
In reply to गंमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
अय्या कॉसं नॉ!
In reply to जसं की...?? म्हणजे सरदार पटेल by संदीप डांगे
सो च क्युट
In reply to अय्या कॉसं नॉ! by ३_१४ विक्षिप्त अदिती
मला काय समजलं नाय समजलं किंवा
In reply to अय्या कॉसं नॉ! by ३_१४ विक्षिप्त अदिती
यातील खरी गंमत ही आहे -
In reply to गंमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
:)
In reply to यातील खरी गंमत ही आहे - by जयंत कुलकर्णी
@आता मुद्दा असा आहे की शांत
काश्मिरात पाक पुरस्कृत
प्रश्न कश्मीर भारतात ठेवणे
In reply to काश्मिरात पाक पुरस्कृत by डँबिस००७
For, the union must persist :)
In reply to प्रश्न कश्मीर भारतात ठेवणे by कैलासवासी सोन्याबापु
पुरणपोळी पण द्या!! :P
In reply to For, the union must persist :) by तुषार काळभोर
बापू, तुमचे सारे प्रतिसाद
In reply to प्रश्न कश्मीर भारतात ठेवणे by कैलासवासी सोन्याबापु
प्रश्न कश्मीर भारतात ठेवणे
आम्हाला 'फकस्त' युनियन दिसते.
In reply to प्रश्न कश्मीर भारतात ठेवणे by कैलासवासी सोन्याबापु
+१०००
In reply to प्रश्न कश्मीर भारतात ठेवणे by कैलासवासी सोन्याबापु
धन्य ते हिंदू व हिंदुराष्ट्र!
धन्य ते हिंदू व हिंदुराष्ट्र! (सुधारित)
आपला काहीतरी गैरसमज झालेला दिसतो
In reply to धन्य ते हिंदू व हिंदुराष्ट्र! (सुधारित) by सुधीर काळे
सोवरीन सोसिअलिस्ट सेक्युलर डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ इंडिया
म्हणून लिहिली गेली आहे, आता ह्या वर उल्लेखलेल्या भारताच्या अधिकारीक नावातील बहुतेक शब्द आपणाला खटकत असतील तर तो आपला प्रश्न आहे, त्याला उत्तर म्हणून प्राचीन शिल्पकलेचे अविष्कार असणारी मंदिरे आपण पेढे अन ऑइल पेंट फासून विकृत करतो तसे घटनेवर अमुक एक रंग मारून विकृत करणे मी वैयक्तिकरित्या निषेधार्ह मानतो :)संपादकमंडळींना विनंती
ताम्हनकर,
ओ साहेब, उगाच कट्टरपणा इज द
In reply to ताम्हनकर, by पिनाक
ताम्हनकर साहेब,
In reply to ताम्हनकर, by पिनाक
नेहरूंनी शेख अब्दुलांना गजाआड
In reply to ताम्हनकर, by पिनाक
माझा काश्मीरवरील लेख
सोन्याबापू!
+१०००००००
In reply to सोन्याबापू! by साती
_________/\_________
In reply to सोन्याबापू! by साती
अगदी
In reply to सोन्याबापू! by साती
+११११
In reply to सोन्याबापू! by साती
जय
मास्तर
In reply to जय by विनायक प्रभू
जोक?
खरे वास्तव
हे खरे नाही. जम्मू-काश्मिरने
In reply to खरे वास्तव by तिमा
पुनश्च एकदा गुर्जींबर सहमती,
In reply to हे खरे नाही. जम्मू-काश्मिरने by श्रीगुरुजी
श्रीगुरुजींच्या सर्व मुद्याना
In reply to पुनश्च एकदा गुर्जींबर सहमती, by कैलासवासी सोन्याबापु
आता मूळ लेखाबद्दल -
अतितीव्र सहमत
In reply to आता मूळ लेखाबद्दल - by श्रीगुरुजी
काश्मीर
Mi kaay mhanato, udavatayat
बाडीस , ताकाला जाऊन भांडी
In reply to Mi kaay mhanato, udavatayat by संदीप डांगे
एक विनंती
In reply to Mi kaay mhanato, udavatayat by संदीप डांगे
अंशतः सहमत
माझ्यामते फुटीरतावाद्यांशी
In reply to अंशतः सहमत by अमितदादा
माझ्यामते
In reply to माझ्यामते फुटीरतावाद्यांशी by आनन्दा