✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कवी हूँ मैं

स — स्वामी संकेतानंद, Sat, 07/23/2016 - 20:34
"कवींनी धुमाकूळ घातलाय निव्वळ उच्छाद जिकडेतिकडे ब्लॉगचा कट्टा ,फेसबुकची भिंत ते ट्विटरची टाइमलाईन कवीच कवी सापडतात इकडेतिकडे चोहीकडे एक जागा मोकळी सोडली नाही.. गझला काय, चारोळ्या काय अरे दीर्घकाव्य लिहून उप्पर से हायकू कायकू लिखनेका बाबा? 'कवी इलो' ची हाकाटी ऐकू आली की पळत सुटतात सगळे सैरावैरा कवींना दिलंय आपण मोकळे रान आपले व्हाट्सऍप खुले सोडले दिली आपली व्यासपीठं आंदण.. व्यासा, तू पण कवीच होतास ना रे? आता यावर एकच उपाय उरलाय......" वरच्यासारखं कुणी परत लिहताना दिसलं तर त्याला पार उद्ध्वस्त करायचे.. शीघ्रकवितांचे धरण फोडून मुक्तछंदांचा महापूर आणून घरात त्याच्या सोडायचे शेरोशायरींचे झुरळ.... त्याची पार शेळी करायची शार्दूलविक्रीडीताच्या हल्ल्याने... पाताळात दाबायचे पृथ्वीच्या ओझ्याखाली.... तेजोभंग करायचा त्याचा अभंगांच्या हत्याराने.. इंद्रवज्राच्या एका तडाख्याने कोळसा करावा त्याचा! ना ना मुझे छूना ना दूर ही रहना.... कवी हूँ मैं.... कवी हूँ मैं... - स्वामी संकेतानंद

प्रतिक्रिया द्या
3531 वाचन

💬 प्रतिसाद (12)

मुक्तीचा छंद लागलेला दिसतो

ज्योति अळवणी
Sat, 07/23/2016 - 20:39 नवीन
मुक्तीचा छंद लागलेला दिसतो आहे तुम्हाला स्वामी. पण बरी जमली आहे......... नसलेली कविता!
  • Log in or register to post comments

स्वा मी . . . कं टा ळ आ ला

मदनबाण
Sat, 07/23/2016 - 20:52 नवीन
स्वा मी . . . कं टा ळ आ ला अ से ल त र प री हुं में ऐ का ... ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Bass Rani - Mumbai Dance feat. Julius Sylvest :- Nucleya
  • Log in or register to post comments

परी हूं मै

स्पार्टाकस
Sat, 07/23/2016 - 20:54 नवीन
हेच म्हणणार होतो. लेखाचे शिर्षक वाचुन परी हूं मै चीच आठवण झाली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

शेवटच्या २ ओळी त्यातल्याच तर

स्वामी संकेतानंद
Sat, 07/23/2016 - 20:59 नवीन
शेवटच्या २ ओळी त्यातल्याच तर उचलल्या आहेत.परीला कवी केले,बास! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पार्टाकस

:)

नीलमोहर
Sat, 07/23/2016 - 21:32 नवीन
मस्त !!
  • Log in or register to post comments

ह्या ह्या ह्या... =))

अत्रुप्त आत्मा
Sat, 07/23/2016 - 21:37 नवीन
ह्या ह्या ह्या... =)) स्वामिज्जी पेटले! बुंगाट सुटले. नवकवींचे धरण अटले.
  • Log in or register to post comments

ओ हलकटा स्वाम्याच्या

कैलासवासी सोन्याबापु
Sat, 07/23/2016 - 22:02 नवीन
व्यासा, तू पण कवीच होतास ना रे? खासच!! यु नो व्हाय =)) =))
  • Log in or register to post comments

फेबुसकवर वाचलेली, आवळेल हाय..

संदीप डांगे
Sun, 07/24/2016 - 00:50 नवीन
फेबुसकवर वाचलेली, आवळेल हाय...
  • Log in or register to post comments

मला वाटले अायुषमान खुराणा

प्रीत-मोहर
Sun, 07/24/2016 - 07:29 नवीन
मला वाटले अायुषमान खुराणा च्या येहीं हुं मैं वर बेतलेय का काय =))
  • Log in or register to post comments

महाराज.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 07/24/2016 - 07:45 नवीन
मु़क्तछंद आवडले. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

छान कविता

गंगाधर मुटे
Sun, 07/24/2016 - 13:27 नवीन
छान कविता
  • Log in or register to post comments

कविता पाडतोस

पैसा
Mon, 07/25/2016 - 09:19 नवीन
कविता पाडतोस, लोकांना छळतोस त्याची पण कविता लिहितोस? भेटच तू एकदा, तुला शिकवीन चांगलाच धडा!! =))
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा