कचरापेटी - शतशब्दकथा
लेखनविषय (Tags)
सकाळची नेहमीची बेल वाजली. कचरापेटी घेऊन जाण्या-या बाईची ती रोजची वेळ होती. आज त्या कच-यापेटीतून खुपच कुबट वास येत होता. नाक दाबत तिच्या हातात कचरापेटी दिली. अगदी निर्विकार चेह-याने तिने ती क्षणात रिकामी करुन मला परत दिली. या प्रसंगाने विनाकारण मला उदास करून टाकले.
दुस-यादिवशी मी मुद्दाहुन ताजी फुले आणुन ती कचरापेटीत भरुन ठेवली. सकाळी जेव्हा मी तिला ती कचरापेटी दिली तेव्हा काहीही विचार न करता , न पहाता तिने ती पेटी तिच्याकडच्या एका मोठ्या डब्यात ओतली...
मग लक्ष्ात आले की आपल्याला कच-याची इतकी सवय झाली असते की त्यात फुले जरी पडलेली असली , तरी आपण कचरा समजून ती फेकून देत राहतो.
प्रतिक्रिया
आत्ताच्या कथेला अगदी तसेच
:) :)
कोपरखळी मस्त ;-)
+११११११
+१
कल्पना आवडली.
छान आहे
मस्त.. वाचून लगेच एक कविता पडली... गोळा करुन रशिकांसमोर ठेवत आहे
Arararar..... Kahar kahar
अयायायाय,
नाय नाय
कहर, बेक्कार, वाईट !!
मस्त जमलिये...
खूप छान