✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

ग — गंगाधर मुटे, Sat, 07/09/2016 - 12:48
मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्‍याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतकर्‍याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्‍याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्‍याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्‍याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्‍याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय....!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय....!!!

                     - गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

प्रतिक्रिया द्या
175574 वाचन

💬 प्रतिसाद (484)

मुटे सरांचे प्रतिसाद पाहून

अभ्या..
Tue, 07/19/2016 - 21:37 नवीन
मुटे सरांचे प्रतिसाद पाहून मला (पिक्चरात पाहिलेल्या) रणांगणात एकट्याने दांडपट्टा फिरवणाऱ्या शूरवीराची आठवण आली. खूप दिवसांनी आले सर पण पार धुराळाच केला.
  • Log in or register to post comments

तुमचा प्रतिसाद पाहून मलाही

गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 21:49 नवीन
तुमचा प्रतिसाद पाहून मलाही सिनेमाची आठवण झाली. गुंडांच्या टोळीचा नि:पात झाल्यानंतर पिक्चरमधे सामान्य जनता जशी खुशीने नाचायला लागते, तसंच वाटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

आयला..

ब़जरबट्टू
गुरुवार, 07/21/2016 - 11:55 नवीन
अभ्या.. पार सामान्य जनतेच्या क्यातागिरीत गेला.. :) मुटे सर प्रतिसाद द्यायला परत धाग्यावर येतात, हे याची देहा पाहिले.. _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

सामान्यच हाय मी. त्यात काय

अभ्या..
गुरुवार, 07/21/2016 - 14:30 नवीन
सामान्यच हाय मी. त्यात काय लाजायचं. आणि मला खरच असली साउथ स्टाईल फायटिंग आवडती. एकटा हिरो लुंगी गुंडाळून सेंटरला. चारी साईडने सगळे कोयतेवाले.बाजूला कोर्पिओ, तवेरा, क्वालीस, सफाऱ्या. हे घापघीप घापघिप, नुसता धुराळा. येण्णा रासकला, मिनिस्टरा बेकू, हे घीप. शेती बेकू, हे गहिप्पप्प. पत्ता बेकू हे घीप. नुसती फायतांफाईट. पैशे वसूल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब़जरबट्टू

जस्ट लाईक 'कबाली'

महासंग्राम
गुरुवार, 07/21/2016 - 15:21 नवीन
जस्ट लाईक
'कबाली'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

आभ्यआ भावा एकच नंबर.

मितभाषी
गुरुवार, 07/21/2016 - 18:45 नवीन
आभ्यआ भावा एकच नंबर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हाहाहा!!!!

जव्हेरगंज
गुरुवार, 07/21/2016 - 21:47 नवीन
बेक्कार हासलो!!!! =))))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अवघ्या धाग्यावर एकमेवाद्वितीय

संदीप डांगे
गुरुवार, 07/21/2016 - 22:06 नवीन
अवघ्या धाग्यावर एकमेवाद्वितीय प्रतिसाद. अभ्या.. तुमको गले लगाने तमन्ना होरी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

संदीपाअण्णा,

अभ्या..
Fri, 07/22/2016 - 14:59 नवीन
संदीपाअण्णा, जस्ट आलेला वॉस्सप. . सलमाणः अपना मुवी ईदको आता है आमीरः अपना क्रिसमसको शारुखः अपना तो दिवाली को. . रजनीआन्ना: येन्ना रासकला, जिस दिन अप्ना मुवी आता है वई हॉलिडे होता है.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

आपल्या आस्वादासाठी माझा एक

गंगाधर मुटे
Fri, 07/22/2016 - 04:47 नवीन
आपल्या आस्वादासाठी माझा एक शेर; कायम गहाण सारे करण्यास सातबारा बँकेसमोर झाले लाचार शेत आहे (मिसळपाववर पूर्वप्रकाशित)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

आपल्या आस्वादासाठी माझा एक

गंगाधर मुटे
Fri, 07/22/2016 - 04:44 नवीन
आपल्या आस्वादासाठी माझा एक शेर; कोणीतरी यांची आता, पडजीभ उपटली पाहिजे नाटकी बोलतात साले, की गरिबी हटली पाहिजे (मिसळपाववर पूर्वप्रकाशित)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब़जरबट्टू

मुटे सरांचे प्रतिसाद पाहून

मितभाषी
Tue, 07/19/2016 - 23:03 नवीन
मुटे सरांचे प्रतिसाद पाहून मला (पिक्चरात पाहिलेल्या) रणांगणात एकट्याने दांडपट्टा फिरवणाऱ्या शूरवीराची आठवण आली. खूप दिवसांनी आले सर पण पार धुराळाच केला.
=)) हाहाहा काकांची चौफेर फटकेबाजी चालू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

आपल्या चरणावर आस्वादासाठी

गंगाधर मुटे
Fri, 07/22/2016 - 04:48 नवीन
आपल्या चरणावर आस्वादासाठी माझा एक शेर अर्पण करतो; घे `अभय` दांडगाई सोसून लांडग्यांची झोपून वाघ असली जोवर गुहेत आहे (मिसळपाववर पूर्वप्रकाशित)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी

मुटेकाका.,,

जावई
Tue, 07/19/2016 - 21:38 नवीन
तुम्हाला नेमकं काय साध्य करायचे आहे या सगळ्यातून.
  • Log in or register to post comments

तुम्हाला काय म्हणायचे? की या

गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 21:53 नवीन
तुम्हाला काय म्हणायचे? की या दहावीस आयड्यांनी माझ्या धाग्यावर येऊन तमाशा करावा आंणि मी माजघरात दडावं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जावई

हे शाब्बास मुटे सर...

राका
Wed, 07/20/2016 - 17:13 नवीन
हे शाब्बास मुटे सर... कुत्सित नव्हे खरंखुरं शाब्बास... धुरळाच उडवून दिलात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

आपल्या चरणावर आस्वादासाठी

गंगाधर मुटे
Fri, 07/22/2016 - 04:49 नवीन
आपल्या चरणावर आस्वादासाठी माझा एक शेर अर्पण करतो; पेरले 'अभय' अनेक बीज जाणतोस तू हे प्रभो! निदान एक अंकुरायला हवे (मिसळपाववर पूर्वप्रकाशित)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राका

साध्य बिध्य काय गरज? त्यांना

मितभाषी
गुरुवार, 07/21/2016 - 21:59 नवीन
साध्य बिध्य काय गरज? त्यांना जावयाला धोंडा द्यायचा असेल. यंदा धोंड्याचा महिना कब है?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जावई

हे चित्र आठवलं उगाच!

अनुप ढेरे
Tue, 07/19/2016 - 21:55 नवीन
हे चित्र आठवलं उगाच! Image removed.
  • Log in or register to post comments

आपल्या आस्वादासाठी माझा एक

गंगाधर मुटे
Fri, 07/22/2016 - 04:51 नवीन
आपल्या आस्वादासाठी माझा एक शेर; श्वापदे पिसाळलीत शस्त्र घ्यायला हवे झोपले असेल शेत जागवायला हवे (मिसळपाववर पूर्वप्रकाशित)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

इतर ते राजकारणी

आदिजोशी
Tue, 07/19/2016 - 22:03 नवीन
आत्तापर्यंतच्या सगळ्या सरकारांनी जे केले नाही ते मुटे काका मंत्री होऊन करणार आहेत असं ते म्हणतायत. पण मुळात समस्या काय आहे हेच ते सांगत नसल्याने मिपाकर विचारू पहात आहेत. हे थोडं केजरीवालांसारखं होतंय ना? निवडणुकीच्या आधी ते सुद्धा असंच बोलायचे. निवडून आल्यानंतर आनंदी आनंद झाला.
  • Log in or register to post comments

कवितेत हे लिहिलं आहे का?

गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 22:06 नवीन
कवितेत हे लिहिलं आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

घोडा चतूर... घोडा चतूर करू

आदिजोशी
Tue, 07/19/2016 - 22:11 नवीन
घोडा चतूर... घोडा चतूर करू नका... स्वतः कविताबाह्य उत्तरे देता आणि त्याबद्दल कुणी विचारलं की कवितेत लिहिलं आहे का म्हणून विचारता. ए नाॅय चाॅलबे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

पुन्हा एकदा वाचा.

गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 22:13 नवीन
पुन्हा एकदा वाचा. मी स्वतःहून कविताबाह्य विषय सुरू केलेला नाही आहे. प्रतिसादावर उपप्रतिसाद देत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

आता दरवर्षीप्रमाणे यंदाही

गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 22:05 नवीन
आता दरवर्षीप्रमाणे यंदाही अन्य धाग्याप्रमाणे याही धाग्यावर श्री अनूप ढेरे यांचे आगमन झालेले आहे. कंपूच्या वतिने पुढील किल्ला ते लढवतील.
  • Log in or register to post comments

मिस्टर अनूप माझ्या कंपूत

आदिजोशी
Tue, 07/19/2016 - 22:14 नवीन
मिस्टर अनूप माझ्या कंपूत नाहीत. किंबहुना माझा कुठलाही कंपू नाही ह्याची नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

कंपू म्हणण्यात माझी चूक झाली.

गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 22:18 नवीन
कंपू म्हणण्यात माझी चूक झाली. कंपू नियोजित असतो. अकस्मात आलेल्या संधीत हात धुवून घ्यायला काही लोक जमावात मिसळतात. त्याला कंपू नव्हे तर झुंड म्हणतात. चुकीची दुरुस्ती केल्याबद्दल आभार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

माझाही नाही कुठला कंपू. पण

अनुप ढेरे
Tue, 07/19/2016 - 22:34 नवीन
माझाही नाही कुठला कंपू. पण आपणाला माझा प्रतिसाद दखलपात्र वाटला याबद्दल आभारी आहे. फोटो आवडला का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

चला लोक्स

सामान्य वाचक
Tue, 07/19/2016 - 22:12 नवीन
सतरंजी उचला रात्र झाली भारतात आता उरलेली करमणूक उद्या सकाळी
  • Log in or register to post comments

तरुण आहे रात्र अजुनी

सुबोध खरे
Tue, 07/19/2016 - 22:15 नवीन
तरुण आहे रात्र अजुनी ही कविताच आहे हं कवितेच्या बाहेरचं का-ही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक

सुबोध काका कहा

महासंग्राम
Wed, 07/20/2016 - 09:44 नवीन
सुबोध काका कहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

हा धागा महाप्रलयाच्या दिशेने

सुबोध खरे
Tue, 07/19/2016 - 22:20 नवीन
हा धागा महाप्रलयाच्या दिशेने वाटचाल करू नये म्हणून प्रतिसादांना या धाग्यावर मी उपप्रतिसाद देण्याचे यानंतर टाळणार आहे. कवितेवर वाचक आपापल्या आकलनानुसार मत नोंदवू शकतात. तो त्यांचा अधिकार आहे हे मी मान्य करतो. कोण कोणास केंव्हा आणि का म्हणाले?
  • Log in or register to post comments

गलगले आले....गलगलेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे...

माम्लेदारचा पन्खा
Tue, 07/19/2016 - 22:23 नवीन
गलगले तुम्ही शांत बसा....गलगलेंची इच्छा पूर्ण झाली.... गलगले निघाले !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

हे कवितेत लिहिले आहे का?

आदिजोशी
Tue, 07/19/2016 - 22:24 नवीन
हे कवितेत लिहिले आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

=))

आनन्दिता
Wed, 07/20/2016 - 00:23 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

हा धागा महाप्रलयाच्या दिशेने

गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 22:28 नवीन
हा धागा महाप्रलयाच्या दिशेने वाटचाल करू नये म्हणून प्रतिसादांना या धाग्यावर मी उपप्रतिसाद देण्याचे यानंतर टाळणार आहे. कवितेवर वाचक आपापल्या आकलनानुसार मत नोंदवू शकतात. तो त्यांचा अधिकार आहे हे मी मान्य करतो. कोण कोणास केंव्हा आणि का म्हणाले?
मीच म्हणालो. पण कवितेवर वाचक आपापल्या आकलनानुसार मत नोंदवू शकतात. हे कळतंय ना तुम्हाला?
  • Log in or register to post comments

बरं झालं तुम्हीच म्हणाला ते

सुबोध खरे
Tue, 07/19/2016 - 22:31 नवीन
बरं झालं तुम्हीच म्हणाला ते.पण तरीही 150 च्या वर प्रतिसाद झाले नं सायेब
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

कितीचे लक्ष्य आहे नक्की.....

माम्लेदारचा पन्खा
Tue, 07/19/2016 - 22:33 नवीन
आज या धाग्याला पोहचवूनच ठेवू "तिथे" !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

महाप्रलय किती प्रतिसाद वर

सुबोध खरे
Tue, 07/19/2016 - 22:36 नवीन
महाप्रलय किती प्रतिसाद वर होतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

झाला तर एकानेही होतो...

माम्लेदारचा पन्खा
Tue, 07/19/2016 - 22:41 नवीन
नाही तर १००० नेही नाही... तसं काय नक्की नसतं ब्वा....! आपले सेहवाग हिट विकेट झाले तर...नाही तर आज शामत आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

@माम्लेदारचा पन्खा

गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 22:42 नवीन
@माम्लेदारचा पन्खा नको ते अनावश्यक काम करण्यापेक्शा पत्ता द्याना सायब पत्ता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

पत्ता सोडून बोला

माम्लेदारचा पन्खा
Tue, 07/19/2016 - 22:47 नवीन
सायेब.... हितंच बोला...लै मज्जा येऊन रायली मले...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

काय मापं, कसा हैस?

मोदक
Tue, 07/19/2016 - 22:56 नवीन
काय मापं, कसा हैस?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

सगळे बरे आहेत. मुटेकाकाही आता

खटपट्या
Tue, 07/19/2016 - 23:01 नवीन
सगळे बरे आहेत. मुटेकाकाही आता बरे आहेत. मधे मधे कधी कधी त्यांना कविता होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

दुवा देण्याचीही ऐपत नाही तर

गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 23:02 नवीन
दुवा देण्याचीही ऐपत नाही तर नुसत्या पोकळ वल्गना का केल्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

))

माम्लेदारचा पन्खा
Wed, 07/20/2016 - 00:27 नवीन
))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

किती प्रतिसाद आलेत याचेशी मला

गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 22:41 नवीन
किती प्रतिसाद आलेत याचेशी मला काहीही देणेघेणे नाही. मात्र यानिमित्ताने आपल्या देशात, देशाच्या कोनत्या भागात कोणकोनत्या तर्‍हेचे लोकं राहतात, त्यापैकी कीती बोलघेवडे, ढोंगी, पाखंडी, चालबाज, धूर्त, वगैरे तर्‍हेचे लोक राहतात, याचा सुक्ष्मसा अंदाज यायला मदत होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

+१ एकदम खरंय..

शलभ
Wed, 07/20/2016 - 00:24 नवीन
+१ एकदम खरंय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

असो असो

आदिजोशी
Tue, 07/19/2016 - 22:42 नवीन
पण मी काय म्हणतो, मुटे काका सरळ सांगून का टाकत नाहीत की कृती करणे हा माझा प्रांत नाही... मी फक्त कविता करणार. मॅटर फिनिश...
  • Log in or register to post comments

मी काय करतो, कृती करतो की

गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 22:44 नवीन
मी काय करतो, कृती करतो की नाही हे बघायला माझ्या गावाला या. संपूर्ण पत्ता देतो. वाटल्यास जाण्यायेण्याचा खर्च देतो. या. नुसत्या तोंडाची वाफ का दवडता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा