✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भारतरत्न सचिन....

अ
अनिरुद्ध प्रभू यांनी
Wed, 07/20/2016 - 16:14  ·  लेख
लेख
मी लिहिणार नव्हतोच खरतरं....हा माझा विषयसुद्धा नाही पण तरीही लिहितोय..मी एक टिपिकल मध्यमवर्गिय घरातुन वाढलेला मुलगा...'लोक काय म्हणतील' या अमुल्य संस्काराबरोबर अजुन एक संस्कार 'आपल्याला काय करायच आहे? त्याचे तो बघेल ना...' हा सुद्धा पिढिजातपणे मला देण्यात आला. आता ही दोन्ही रत्न आमच्यात आली नाहीत हे दुर्दैवच (कुणाचं हे विचारु नये...)! पण वरील दोन्ही गोष्टींना काही ना काही मर्यादा आहेत याला कुणाचे दुमत नसावे. हे ही प्रकरण असच.. पाणी छातीपर्यंत आलं, आम्ही ढम्म....गळ्यापर्यंत आलं तरीही आम्ही ढम्म...आता नाकातोंडात जाइल अशी वेळ ठेपली आता मात्र व्यक्त झालचं पाहिजे...बास्स झालं आता...भावना उफाळल्या नि मी लिहिता झालो...!! काल अगदी नेहमीसारखच मी कार्यालायातुन आंतरजालावरुन बातम्या वाचत होतो...(मला कार्यालयात काही काम नसतं हे मान्य आहे, उगाच प्रश्न उपस्थित करु नयेत..) चाळता चाळता एक बातमी नजरेसमोर आली... पर्रिकरांनी सचिनला फटकारलं... फटकारलं??? काय प्रकार असेल बाबा हा? उगाच आपली उत्सुकता.....पान उघडल्यावर सगळा प्रकार समोर आला.. तर आदरणीय सचिन तेंडुलकर साहेब यांचा एक जिवश्च-कंठश्च मित्र श्री. संजय नारंग यांनी कुठेतरी लश्कराच्या जागेवर आपला रेसॉर्ट बांधला. त्याला परवाणगी होतीच पण एका मर्यादेपर्यंतच... तरीही साहेबांनी त्याजागी मोठाले इमले उभे केले..मग काय लागलं लष्कर मागं. बहुदा या मित्रवर्यांच्या लक्षात आलं, अरेच्च्या आपला मित्र तर भारतरत्न आहे..तो कहीतरी करु शकेल...भारतरत्न आहे ना सरकार ऐकेल की त्याचं...मग हे साहेब गेले भारतरत्नांकडे आणि ते गेले पर्रिकर साहेबांकडे....पर्रिकर साहेब मोठा माणुस(कसले मोठे ते ज्यानं त्यानं ठरवाव) .... त्यानीं साहेबांच ऐकुन घेतलं नि निक्षुण सांगितल मी हस्तक्षेप करणार नाही...मनात म्हटलं असा प्रकार आहे होय....सगळा प्रकार कळाला नि संताप येउ लागला.. संताप कोणाचा? आपण भारतरत्न आहोत हे विसरुन एका मित्राच्या अनैतिक कामासाठी थेट सरकारपर्यंत जाणार्‍या सचिनचा, फक्त आणि फक्त खेळाडु म्हणुन असलेल्या लोकप्रियतेच्या निकषवरुन त्याला भारतरत्न देणार्‍याचा कि एवढ सगळं निमुटपणे सहन करणार्‍या तुमच्या-माझ्यासारख्यांचा?? प्रकरण साधं नेहमिच आहे निदान आपल्या देशात तरी पण विचार करण्यासारखा नक्की आहे..
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
26945 वाचन

💬 प्रतिसाद (92)

प्रतिक्रिया

परिरकर साहेबंचे अभिनंदन.

मितभाषी
Wed, 07/20/2016 - 16:19 नवीन
परिरकर साहेबंचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments

फक्त खेळाडु म्हणुन असलेल्या

अनुप ढेरे
Wed, 07/20/2016 - 16:23 नवीन
फक्त खेळाडु म्हणुन असलेल्या लोकप्रियतेच्या निकषवरुन त्याला भारतरत्न देणार्‍याचा
हे सोडून बाकिच्याशी सहमत. भारतरत्न त्याला मिळायला हवाच होता.
  • Log in or register to post comments

योग्य केलं पर्रीकर साहेबांनी.

शिद
Wed, 07/20/2016 - 16:25 नवीन
योग्य केलं पर्रीकर साहेबांनी. लोकं दिसला अभिनेता बसवला डोक्यावर...दिसला क्रिकेटवीर की बनव देव...नसती थेरं च्यायला.
  • Log in or register to post comments

सहमत आहे

गॅरी ट्रुमन
Wed, 07/20/2016 - 16:27 नवीन
सहमत आहे.या प्रकरणामुळे सचिनविषयी वाटणारा आपलेपणा नक्कीच कमी झाला आहे. इतके दिवस ज्याला अत्यंत विनम्र, कुठल्याही भानगडींमध्ये कधीच नसणारा इत्यादी इत्यादी समजत होतो त्याचे पायही मातीचेच आहेत की काय या प्रश्नामुळे मात्र अस्वस्थता नक्कीच आली.
  • Log in or register to post comments

पर्रीकरांबद्दल खरच खुप आदर

जागु
Fri, 07/22/2016 - 12:04 नवीन
पर्रीकरांबद्दल खरच खुप आदर वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

मला तर नेहमीच संशय आहे, की

५० फक्त
Wed, 07/20/2016 - 17:07 नवीन
मला तर नेहमीच संशय आहे, की त्याचे पाय देखिल मातीचेच आहेत, फक्त वरुन चंदनलेपन केल्यानं दिसत नाहीत. आता बिसिबियात मोठे बदल अपेक्षित आहेत, ते झाल्यावर ब-याच चम्त्कारीक आणि सुरस कहाण्या बाहेर पडतील पुढच्या ३-४ वर्षात.
  • Log in or register to post comments

म्हटलं तर बारामतीकर

संदीप डांगे
गुरुवार, 07/21/2016 - 00:33 नवीन
म्हटलं तर बारामतीकर काकांविरोधात कोणतेच पुरावे नाहीत, तरी ... पाय मातीचेच आहेत, काही गोष्टींचे पुरावे देता येत नाहीत इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

पर्रिकरांनी सचिनला फटकारलं...

महासंग्राम
Wed, 07/20/2016 - 17:11 नवीन
पर्रिकरांनी सचिनला फटकारलं...
रेफरन्स आहे का ??? http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/sachin-tendulkar-denies-commercial-interest-in-disputed-property/articleshow/53285084.cms
  • Log in or register to post comments

यात नक्की कोणाची बाजू बरोबर

श्रीगुरुजी
गुरुवार, 07/21/2016 - 15:27 नवीन
यात नक्की कोणाची बाजू बरोबर आहे (नारंगची का लष्कराची) ते वरील बातमीवरून स्पष्ट नाही. सचिन हा माझा अत्यंत आवडता खेळाडू आहे. अशा बातम्यांमुळे माझ्या मनातील त्याच्या प्रतिमेवर अजिबात परीणाम होणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

सहमत.

एस
Wed, 07/20/2016 - 17:23 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments

बरचं काही

रघुनाथ.केरकर
Wed, 07/20/2016 - 17:25 नवीन
पर्रीकर साहेबांवीषयी असं बरच काही आहे, गोयंकार मिपा सदस्य सांगु शकतील.
  • Log in or register to post comments

बातमी कुठे आहे लिंक द्या

लालगरूड
Wed, 07/20/2016 - 17:25 नवीन
बातमी कुठे आहे लिंक द्या
  • Log in or register to post comments

ही घ्या लिंक

रॉजरमूर
गुरुवार, 07/21/2016 - 01:42 नवीन
बातमीची लिंक बातमी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लालगरूड

लश्कराच्या जागेवर आपला

पुंबा
Wed, 07/20/2016 - 17:37 नवीन
लश्कराच्या जागेवर आपला रेसॉर्ट बांधला. त्याला परवाणगी होतीच पण एका मर्यादेपर्यंतच... ही परवानगी देखील मिळायला नको होती. लष्कराच्या जागेत अश्या प्रकारे खाजगी मालमत्ता उभारण्यास परवानगी मिळाली यातच भ्रष्टाचार झाला नाही का?
  • Log in or register to post comments

लष्कराच्या जागेत नाही बांधला.

स्वामी संकेतानंद
Wed, 07/20/2016 - 18:47 नवीन
लष्कराच्या जागेत नाही बांधला. DrDO च्या 50 फूट हद्दीत कसलेही मोठे बांधकाम करायला परवानगी नाही. लहान कामे करता येतात मात्र परवानगी लागते. त्यांनी परवानगी बहुतेक टेनिस लॉनची घेतली होती आणि बांधला मात्र चांगला रिसॉर्ट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

सुरक्षेच्या द्रुश्टीने पाहता,

पुंबा
Wed, 07/20/2016 - 19:25 नवीन
सुरक्षेच्या द्रुश्टीने पाहता, असा रिसॉर्ट डीआरडीओ सारक्या संस्थेच्या ५० मी. हद्दीत असणे अत्यंत घातक आहे. सचीनसारख्या समाजात मानाचे स्थान असणार्या व्यक्तीने (शिवाय भारतरत्न, राज्यसभा खासदार) अश्या प्रकारे क्रोनीइझमला पाठींबा देणे अनुचीत आणि त्याला लोकांच्या मनातून उतरवणारे आहे. शेवटी पाय मातीचेच हेच वारंवार सिध्द होत असते आणि भरतीय जनता मात्र नव्या जोमाने नवनवे हीरोज जन्माला घालून मनोभावे पूजत राहते. मिडीयाची बोंबाबोंब अश्या वेळी तीव्र गरजेची वाटते अन्यथा अशी प्रकरणे दाबली जातात आणि भ्रष्ट नामानिराळे राहतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद

हम्म

माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 07/20/2016 - 19:28 नवीन
संजय नारंग म्हणजे ६०/७० च्या दशकातला स्मगलर मनु नारंग ह्याचा मुलगा रे अनिरुद्धा. http://indiatoday.intoday.in/story/smuggling-of-art-treasures-from-india-and-holding-of-national-treasures-in-western-museums/1/401612.html http://udayindia.in/2010/10/23/blood-stained-brown-gold-and-mean-streets-of-mumbai-housing-mafia-and-mumbai-underworld/ अर्थात अहोरात क्रिकेट खेळून देशाची सेवा करणार्या सचिनला ह्याची कल्पना नसणार म्हणा.
  • Log in or register to post comments

वाह! मस्तं अर्टिकल आहेत

अनुप ढेरे
गुरुवार, 07/21/2016 - 11:54 नवीन
वाह! मस्तं अर्टिकल आहेत दोन्ही. विशेषतः दुसरं. धन्यवाद माई! ( कोणा गाढवाला हा त्या नाना नेफळेचा डुआयडी वाटतो समज नाही!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

क्रिकेट खेळनार्या सचिन बद्दल

भीमराव
Wed, 07/20/2016 - 19:39 नवीन
क्रिकेट खेळनार्या सचिन बद्दल मला नितांत आदर श्रद्धा व भक्तीभाव आहे, परंतु मैदाना बाहेरच्या थेरांबद्दल मि त्याचे समर्थन करणार नाहीच, परंतु याचा त्याच्या मैदानामधला सचिन चे जे देवत्व आहे यावर काडीचाही फरक पडणार नाही.
  • Log in or register to post comments

मुळात सचिनला भारत रत्न देणे

अभिजीत अवलिया
Wed, 07/20/2016 - 21:31 नवीन
मुळात सचिनला भारत रत्न देणे हेच चुकीचे वाटते. क्रीडा जगतातील सर्वोच्च कामगिरीसाठी राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार होताच आपल्याकडे. भारतरत्न हा सर्वोच्च 'सिव्हिलिअन अवॉर्ड' होता जो कुठल्याही खेळासाठी दिला जात नसे. तसेच त्याचा देव म्हणून उल्लेख करणे देखील पटत नाही.
  • Log in or register to post comments

सहमत

खटपट्या
गुरुवार, 07/21/2016 - 00:04 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया

माझी एक मूलभूत शंका..

मोदक
गुरुवार, 07/21/2016 - 00:44 नवीन
माझी एक मूलभूत शंका.. ऑस्ट्रेलिया किंवा इतर बाहेरच्या देशांनी त्यांच्या हायेस्ट सिव्हिलीयन अ‍ॅवार्डने सचिनला गौरवले आहे आणि भारताने गौरवले नाही असे विचित्र काहीतरी गणित झाले असते तर पुन्हा सरकारलाच शिव्या खाव्या लागल्या असत्या आणि "बघा त्यांनी कौतुक केले पण मातृभूमीने केले नाही" असे काहीसे झाले नसते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया

असं कुठेही लिहिलेलं नाही

बोका-ए-आझम
गुरुवार, 07/21/2016 - 07:03 नवीन
की भारतरत्न हा बहुमान खेळाडूंना देता येणार नाही. आणि त्याचा देव हा उल्लेख त्याच्या समकालीन क्रिकेटर्सनी पहिल्यांदा केला आणि त्यावरून तो मिडियाने उचलून धरला. त्याच्याशिवाय इतर अनेक खेळाडू - उदाहरणार्थ कै. ध्यानचंद आणि विश्वनाथन आनंद - या बहुमानास पात्र होते, पण तो निर्णय सर्वस्वी सरकारचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया

होय

नाखु
गुरुवार, 07/21/2016 - 11:25 नवीन
आप्ल्या येथील युसुफभाईना आधी पाकिस्तानने पुरस्कार दिला आणिइ नंतर भारतानेही दिला.. खेळाडू असलेल्या सचिनचे व्य्वहारीक जगात अगदी आदर्श वागणे असावे ही अपेक्षा असू शकते पण ......... त्याच्या खेळावर व खेळातील वागण्यावर फिदा असलेला नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

युसुफभाई यांचे कर्तुत्व नक्की

टवाळ कार्टा
गुरुवार, 07/21/2016 - 12:45 नवीन
युसुफभाई यांचे कर्तुत्व नक्की काय म्हणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

मुळात युसुफभाईंना भारतरत्न

मोदक
गुरुवार, 07/21/2016 - 13:48 नवीन
मुळात युसुफभाईंना भारतरत्न कुठे मिळाले आहे..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

भारत रत्न नाही

नाखु
गुरुवार, 07/21/2016 - 13:54 नवीन
पण पाकने पुरस्कार (इथला स्र्वोच्च नागरी पुस्रस्कार) दिल्यानंतर भारतानेही दिला इतकेच म्हणायचे होते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

तुलना होत नाही काकाश्री...

मोदक
गुरुवार, 07/21/2016 - 15:07 नवीन
तुलना होत नाही काकाश्री... निशान-ए-इम्तियाज आधी भारताने पद्मभुषण दिलेच होते की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

खेळाव्यतिरिक्त थोडीही

कंजूस
गुरुवार, 07/21/2016 - 00:44 नवीन
खेळाव्यतिरिक्त थोडीही स्टारव्हॅल्यु नसलेला खेळाडू.
  • Log in or register to post comments

स्टारव्हॅल्यु म्हणजे?

मोदक
गुरुवार, 07/21/2016 - 00:45 नवीन
स्टारव्हॅल्यु म्हणजे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

कैच्याकै हुकलाय हा प्रतिसाद

टवाळ कार्टा
गुरुवार, 07/21/2016 - 00:55 नवीन
कैच्याकै हुकलाय हा प्रतिसाद काका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

टकाशी सहमत. स्टारवॅल्यू बद्दल

संदीप डांगे
गुरुवार, 07/21/2016 - 01:05 नवीन
टकाशी सहमत. स्टारवॅल्यू बद्दल माहित नाही पण ब्रॅण्डवॅल्यू कडक आहे महाराजा. एका क्लायंटच्या फारीन डेलिगेट्स ना सचिनने साईन केलेल्या ब्याटी भेट द्याव्या असा काही प्रस्ताव आला. त्यावर सचिन कडून प्रत्येक सहीचे ७६ हजार घेईन असे मॅनेजरकरवी उत्तर आले होते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

७६ हजार हा आकडा कुठुन आला

मोदक
गुरुवार, 07/21/2016 - 01:12 नवीन
७६ हजार हा आकडा कुठुन आला असेल..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

अहो, तेच तर नै माहित. असा

संदीप डांगे
गुरुवार, 07/21/2016 - 01:13 नवीन
अहो, तेच तर नै माहित. असा अधेमधे आकडा आल्यामुळेच तो अजून लक्षात आहे. काही नुमरॉलॉजी असेल बुवा. लै मानतात ते हे सगळं असं ऐकुन आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

असले अधले मधले आकडे असले ना...

तुषार काळभोर
Fri, 07/22/2016 - 11:49 नवीन
युएसडी किंवा युरोत कन्वर्ट करून पाहायचं. ७६००० रुपये म्हणजे १००० युरो, असं काहीतरी गणित असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

५०००० + वॅट + स्वच्छ भारत सेस

अनुप ढेरे
गुरुवार, 07/21/2016 - 10:11 नवीन
५०००० + वॅट + स्वच्छ भारत सेस + कृषी कल्याण सेस =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

मला तरी brand value आणि star value

बोका-ए-आझम
गुरुवार, 07/21/2016 - 01:17 नवीन
या दोन समानार्थी संज्ञा वाटताहेत. Brand value साठी Brand Equity हाही शब्द ऐकलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

स्टार वॅल्यू वेगळी,

संदीप डांगे
गुरुवार, 07/21/2016 - 01:24 नवीन
स्टार वॅल्यू वेगळी, ब्रॅण्डवॅल्यू वेगळी. थोडी समानता आहे पण अंधूकसा फरक आहे. एखादा अभिनेता त्याच्या भूमिकेने एखादा चित्रपट तारून नेत असेल तर ती स्टारवॅल्यू, पण तोच अभिनेता एखादे उत्पादन विकण्यास उपयोगी पडत नसेल तर त्याला ब्रॅण्डवॅल्यू नाही. कंपनीच्या सेल्सला एखादी एन्डॉर्न्समेंट किती प्रभावित करु शकते ह्यावर एन्डॉर्सीची ब्रॅण्डवॅल्यू ठरते. ज्यायोगे भरमसाठ जाहिराती करणारा शाहरुखची ब्रॅण्डवॅल्यू, तुलनेने कमी व निवडक उत्पादनांची जाहिरात करणार्‍या धोनीपेक्षा कमी असू शकते. स्टारवॅल्यूच्या बाबतीत उलटे घडते. अर्थात हे माझे अभ्यास व निरिक्षनावर आधारित वैयक्तिक मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

अच्छा!

बोका-ए-आझम
गुरुवार, 07/21/2016 - 06:54 नवीन
एक शंका - हे झालं films च्या बाबतीत, जिथे या दोन गोष्टी सरळसरळ वेगळ्या काढता येऊ शकतात. पण Cricket मध्ये असा फरक कसा करणार? कारण films ना repeat audience असू शकतो. उदाहरणार्थ १९९४-९५ चा अंदाज अपना अपना अजूनही लोकप्रिय आहे. पण क्रिकेटच्या बाबतीत असं कसं ठरवतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

It's not about films or

संदीप डांगे
गुरुवार, 07/21/2016 - 10:27 नवीन
It's not about films or sports, it's about personality. Will detail this in evening.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

बोकाशेठ, लोकप्रिय आणि

संदीप डांगे
Fri, 07/22/2016 - 01:01 नवीन
बोकाशेठ, लोकप्रिय आणि प्रसिद्ध असणे ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत, एकसारख्या वाटत असल्या तरी. सूक्ष्म फरक आहे. जरा विस्ताराने लिहितो - जित्याची खोड मोडायची नाहीच.. ;) अंदाज अपना अपना ही एक कलाकृती आहे. लोकप्रिय आहे. पण तीला ब्रॅण्डवॅल्यू नाही. क्रिकेटला आहे. क्रिकेटरला आहे. क्रिकेटचा आधार घेऊन आज अक्षरशः काहीही विकले जाऊ शकते. आयपीएल-बीसीसीआयला असतांना मिडीया, अ‍ॅडवर्टायझिंग अ‍ॅण्ड प्रमोशन्स च्या खात्यातच काम केलेले असल्याने बर्‍याच गोष्टी फार जवळून, आतून माहित आहेत. एखादा नट केवळ तो नायक आहे म्हणून चित्रपटाला गर्दी खेचू शकतो ही स्टारवॅल्यू. राजेशखन्ना, अमिताभ ह्यांनी सर्वात शुद्ध अवस्थेतली स्टारवॅल्यू प्राप्त केली होती. आज अमिताभला स्टारवॅल्यू नाही पण ब्रॅण्डवॅल्यू आहे. आता ब्रॅण्डवॅल्यू म्हणजे काय? ब्रॅण्ड म्हणजे ओळख. हा एका जुन्या शब्दाचा अपभ्रंश आहे. मूळ शब्द brandr म्हणजे बर्न्ट. म्हणजेच 'जाळलेला'. जुन्या काळी घोड्यांची विशेष मागणी असायची. जातीवंत घोड्यांच्या पागांचे (स्टेबल्स) मालक आपल्या पागेचा घोडा भरबाजारात गिर्‍हाईकांना ओळखू यावा म्हणून तापलेल्या लोखंडी शिक्क्याने घोड्यांच्या पाठीवर मार्क करायचे. आताआतापर्यंत करत होते -बहुतेक. आता अशा अमूक एका पागेचा-मालकाचा शिक्का असलेला घोडा म्हणजे अस्सल जातीवंतच ही खात्री तो मार्क् -ते चिन्ह- असायचा. अशा खुणांचा वापर आपल्या उत्पादनांवर करणे हे कॉमन असले तरी अस्सल, उत्तम उत्पादनांची खात्री म्हणजेच ब्रॅण्डनेम. खात्रीशीर, उत्तम उत्पादन-सेवेद्वारे ग्राहकांच्या मनात आपली एक खास जागा, हक्काचा कोपरा मिळवणे म्हणजेच ब्रॅण्डवॅल्यू. ह्यात बरेचदा लोक कन्फ्युज होतात, ते असे की भरमसाठ जाहिराती केल्या- टीवीकमर्शियलचा रतीब घातला की झाला ब्रॅण्ड तयार. असे नसते. मुळात सुरवातीला तरी अव्वल दर्जा पाहिजेच पाहिजे. लोकांची गरज (भौतिक, मानसिक) उत्तम पद्धतीने परिपूर्ण केली की झाला ब्रॅण्ड तयार. एकदा ब्रॅण्ड तयार झाल्यावर काही केल्या ती जादू उतरत नाही.(अपवाद असतातच) नुसते एखाद्या कामात-सेवेत-उत्पादनात नाव कमावणे म्हणजे ब्रॅण्ड नव्हे. ब्रॅण्डचा संबंध टॅन्जीबलपेक्षा इन्टॅण्जीबल गोष्टींशी जास्त असतो. सर्व काही समान असले तरी अ‍ॅपलचा फोन स्वस्तातल्या चायनाफोनसमोर भाव खाऊन जातो. ग्राहकाच्या मनात ब्रॅण्डची एक प्रतिमा असते. बरेचदा ती तशी मुद्दाम तयार केली जाते. उदा. पीटर इन्ग्लन्ड शर्ट्स. अगदी कालपरवापर्यंत अनेकांना, काहींना आजही हे माहित नसेल की पीटर इन्गलन्ड शर्ट्स हे भारतीय कंपनी बनवते, शंभर टक्के भारतीय माल आहे. लोकांचा समज असाच आहे-होता की हे शर्ट्स इम्पोर्टेड आहेत. कंपनीने हे अचूक हेरून ब्रॅण्ड डेवलप केला. मूळ भावना: भारतीय लोकांना लोकल शर्ट्सपेक्षा इम्पोर्टेड कपड्यांची क्रेझ आहे, त्याने आत्मविश्वास वाढतो, आपण उच्चभ्रूंमधे गणल्या जाऊ अशी भावना येते. 'बीइंग ह्युमन' ही कुठलीतरी एन्जीओ असावी असे समजल्या जाते, पण ती एन्जीओ खरेतर एका कपड्याच्या कंपनीने आपले कपडे खपवण्यासाठी हेतुपुरस्सर तयार केलेला दर्शनी देखावा आहे. सलमान खान त्याचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर. म्हनजे 'बीइंग ह्युमन्चे टीशर्ट घालायचे आणि समाजकार्य करतोय असे दाखवायचे' ह्या कामाची सदर कंपनी सलमानभाईला किम्मत मोजते आहे. (मजकडे ह्या ब्रॅण्डची डेवलपमेंट केसस्टडी तिथेच काम करणार्‍या एका व्यक्तिकडून आली होती, तेव्हा कळले हे ;) ) तर ब्रॅण्ड म्हणजे १० टक्के दर्जाचा आणि ९० टक्के भावनेचा खेळ, सरळ सरळ. पद्मिनी, मारुती ८०० नंतर भारतीयांची कौटुंबिक वाहनाची, नवसंपन्नतेच्या मुसंडीची ओळख बनली ती टाटा इन्डिका - बडी छोटी गाडी. धपाधप सेल झाला. नंतर ट्रान्स्पोर्ट, ट्रॅवल्सवाल्यांनी पिवळ्या प्लेट लावायला सुरुवात केल्यावर ह्या नवसंपन्न भारतीयांच्या मनाचा एक कोपरा हलला. ह्यॅ, ही तर काय कोणीही - अगदी टॅक्सीवालेही घेतात. इंडिकाला जी प्रतिमा मिळाली ती गमावली, सेल कमी झाला. टाटाने इन्डिका विस्टा हे महाग आणि अधिक लग्जरीयस वर्जन आणलं. नंतर तर अशा लग्जरियस महाग वाहनांचा पोळा फुटला भारतीय बाजारात. लक्षात घेण्याची केसस्टडी अशी की जरी उत्तम दर्जा होता तरी ग्राहक कमी होत जाण्यामागे दुसरे नाजूक कारण होते. ते म्हणजे ब्रॅण्डची प्रतिमा. प्रतिमा हीच जाहिरात जगाचा आत्मा आहे. मार्केटींगचा कणा आहे, सेल्सची प्रेयसी आहे. तर अशा काही प्रतिमा ओवर द पिरियड बनत जातात, काही मुद्दाम साच्यात घडवून बनवल्या जातात. अमिताभ अशीच एक प्रतिमा आहे, शाहरुखही, अमिरही, सलमानही, राखी सावंत ही, पूनम पांडेही आणि सनी लियोनही. प्रत्येकाची आप आपली प्रतिमा आणि आपआपली ब्रॅण्डवॅल्यू. जाहिरात एजन्सीला आपल्या क्लायंटच्या प्रॉडक्टला सूट होईल अशी प्रतिमा असलेला सेलेब्रिटी वापरावा लागतो. (हे टेक्स्टबुकीय ज्ञान आहे, भारतातच ह्या अमूल्य ज्ञानाचा विचका केलेला जागोजाग आढळून येतो. महागडा, गडगंज श्रीमंती आव आणणारा रिडअ‍ॅण्डटेलर कपड्यांचा ब्रॅण्डअ‍ॅम्बेसेडर अमिताभ शेतातल्या पाण्याचा उपसा करणार्‍या पंपाचीही जाहिरात करतो. इट्स डिस्गस्टींग फॉर अ‍ॅन अ‍ॅडवर्टायजिंग प्रोफेशनल लाईक मी) फिटनेसफ्रीक असलेली बिपाशा फॄटज्यूसची जाहिरात करणार हे संय्युक्तिक, तसेच धोनी एखाद्या एनर्जी ड्रिंकचा ब्रॅण्डअ‍ॅम्बेसेडर हेही. दोघांनी मिळून बहुतेक धावण्याच्या शूजची जाहिरात केलेली, तेही योग्यच. लोकप्रिय व्यक्तिमत्वाच्या सर्वात ज्ञात व परिणामकारक पैलूशी आपल्या उत्पादन/सेवेची सांगड घालून आपल्या उत्पादन/सेवेचे मूल्य वाढवणे म्हणजे ब्रॅण्डवॅल्यू वाढवणे. लोकप्रियता हा निकष महत्त्वाचा असला तरी तो व्यक्तिमत्वाच्या कोणत्या बाबीमुळे आहे हे तपासणे महत्त्वाचे. ती बाब म्हणजे ब्रॅण्डवॅल्यू, निव्वळ लोकप्रियता म्हणजे ब्रॅण्डवॅल्यू नाही. नाईके, आदीदास ह्यांनी उत्तम उत्पादने दिलीत पण ती उत्तम खेळाडूंना जाहिरातीत झळकवून, त्यांना खेळतांना आपले उत्पादन वापरायला लावून. उत्तम खेळाडूंचे सगळेच उत्तम असते ही भावना जनसामान्यांत असते. मग तो रिबॉक असेल तर "तो उत्तमच असेल, त्याशिवाय का तो त्याने घातला आणि भन्नाट परफॉरमन्स दिला". क्रिकेटमधे ब्रॅण्डवॅल्यू अशीच बनते. सचिन उत्तम खेळतो, अनेक विश्वविक्रम करतो, तो सर्वोत्कॄष्ट आहे, त्याची चॉईसही सर्वोत्तम असेल. मग तो जे जे उत्पादन एन्डॉर्स करतो त्याचीही वॅल्यू वाढते. किंवा ब्रॅण्डेड कंपन्या अशा सर्वोत्तमांना घेऊन 'दोन समान दर्जाचे लोकच मैत्री करु शकतात' ह्या जनसामान्यांच्या अंडरकरंट भावनेला कुरवाळतात. मग सचिन कशाचीही जाहिरात करो तिला एक आश्वासक खात्री त्याने त्याच्या उपस्थितीने मिळवून दिलेली असते. ल्युमिनस बॅटरी हे एक उदाहरण आत्ता आठवते. जुने म्हणजे अगदी सुरुवातीचे ते, 'सनी' ह्या दुचाकीची जाहिरात. चित्रपटक्षेत्रातल्या कलाकारांना फक्त लोकप्रियता ह्या निकषावर निवडले जाते. अगदी टेक्स्टबुकिय ज्ञान लावायचे झालेच तर ज्या समुहातल्या लोकांना जो आवडतो त्या समूहासाठीच्या उत्पादनांसाठी ते ते अभिनेते, अभिनेत्री वापरल्या जातात. डॉलर, अमूल माचो, लक्स कोझी, रुपा, खुशबूवाला व्हील, हे एकाबाजुला तर डीबीअर्स, ल ओ रियल, नेस्कॅफे, गार्नियर दुसरीकडे. डू आय नीड टू से मोअर? तसेच क्रिकेटमधे किंवा एकूण स्पोर्टसमधे राष्ट्रीय (भारतात राष्ट्रीयला तशी फार वॅल्यू नाहीच) आंतरराष्ट्रीय ख्यातीचे झाल्यावरच ब्रॅण्डवॅल्यू तयार होते. पण मनोरंजनक्षेत्रात फार लोकल लेवललाही सेलेब्रिटी स्टेटस मिळत असल्याने पॉप्युलॅरीटी वॅल्यू मिळते. कुठल्या भंगार पण लोकप्रिय सिरीयलमधल्या काहीही हं करनारीला सुद्धा एन्डॉर्समेंट्चे कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतात. प्रियंका, दिपिकाच्या एक शतांश वा एक हजारांश तरी मोबदला मिळतो. दुकानाची फित कापायला पाच पंचेवीस हजारात अशा सेलेब्रिटी येऊन जातात. तालुका-शहर पातळीवर सदर आस्थापनाचा गवगवा होतो, पैसा वसूल होतो. पण अशी वॅल्यू फर्स्टक्लास क्रिकेट खेळणार्‍याला नाही मिळत. कोहलीला दुसरा सचिन म्हटल्या जात आहे, त्यामागे जाहिरातबाजच आहेत. सचिन आता खेळत नाही, त्याच्या रिटायरमेंटला उशिर होण्यामागेही जाहिरातदार आणि त्यांचे एन्डॉर्समेन्ट्स होत्या. आता ही सचिन नामे सोन्याची कोंबडी खुडूक झाल्यावर व त्याच्याइतकी ब्रॅण्डवॅल्यू+इमेजवाला दुसरा कोणी तयार झालेला नसल्याने कोहलीला सचिनचा उत्तराधिकारी म्हटले जाऊ लागले. उत्तराधिकारी तो फक्त ह्या एन्डॉर्समेन्टचाच. कारण जाहिराती चालणे उत्पादकांसाठी आवश्यक, आणि क्रिकेट चालणे जाहिरातींसाठी आवश्यक. क्रिकेटमधे सचिन असणे क्रिकेटसाठी आवश्यक. पण तो नाही तर कोहलीला पुढे केले जात आहे. आणि तो आहेही आजच्या तरूणांसारखा, बेधडक, बिन्दास्त. कोणे एकेकाळी थकलेल्या, मरगळलेल्या भारतीय तरूणांच्या आत्मविश्वासाला फुंकर घालायचे काम सचिन ने केले. त्यानंतर एक पिढी निघून गेली. नव्या पिढीची, नव्या क्रिकेटची प्रतिमा म्हणून कोहली गाजत आहे, गाजवला जात आहे. अजून बरंच आहे काय काय... तुर्तास एवढे लेक्चर पुरेसे ;) आणि तुम्हीही मासकम्युनिकेशन मधे शिकलात-की-शिकवता असे थोडेसे आठवते, तुम्हाला अधिक काय सांगणे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

माहीतीपुर्ण प्रतिसाद. बीइंग

अंतु बर्वा
Fri, 07/22/2016 - 01:55 नवीन
माहीतीपुर्ण प्रतिसाद. बीइंग ह्युमन बद्दल ठाउक नव्हतं.. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

सुंदर प्रतिसाद !

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 07/22/2016 - 04:44 नवीन
सुंदर प्रतिसाद ! बिईंग ह्युमन ही सलमानने स्थापलेली (आणि त्याच्या कोर्टात चालू असलेल्या खटल्यांत सहानभूती मिळवण्यासाठी उपयोगात आणली जाणारी) एनजीओ आहे असाच सर्वसाधारण समज आहे... आता तुम्ही दिलेली माहिती वाचून ती संस्था सलमानने स्थापन केली आहे "समज करून दिला गेला आहे" असे वाटते ! :) :( ====== वरच्या पॉप्युलॅरिटी, स्टार व्हॅल्यु आणि ब्रँड व्हॅल्यु यांच्या संदर्भात प्रतिसाद द्यावा म्हणुन इन्स्टिस्ट्युशनालायझेशनवर (institutionalization) काही लिहिले. ते जरा लांबत गेले. या धाग्यावर फार अवांतर होऊ नये यासाठी ते दोन पैश्याचे नाणे स्वतंत्रपणे इथे प्रसिद्ध केले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

संदीप प्रतिसाद अत्यंत

बेकार तरुण
Fri, 07/22/2016 - 07:22 नवीन
संदीप प्रतिसाद अत्यंत माहितीपूर्ण आहे. आवडला. बीईंङ ह्युमन = मंधाना ईंडस्ट्रीज?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

संदीप डांगे तुम्चा विवेचन

नाखु
Fri, 07/22/2016 - 09:24 नवीन
म्हणजे ह्याला म्हणतात प्रतिसाद अश्या उच्च पक्षी किचकट माहीती आणि सोप्या भाषेत सांगणे याचा मिलाफ आहे. अगदी असाच नाही पण किमान माहीती देणार्या (न खेकसता) प्रतिसादाची अपेक्षा होती मिपालोकांची तुमच्या मित्राकडून, बाकी फार अपेक्षा नाही, सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे ! आपलाच नेहेमीच नम्र नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेकार तरुण

या माहितीबद्दल धन्यवाद.

बोका-ए-आझम
Fri, 07/22/2016 - 13:23 नवीन
ही माहिती पुस्तकी स्वरूपात होती. Practical स्वरूपात नव्हती. प्रत्यक्ष जाहिरात आणि branding क्षेत्रात काम करणाऱ्या तुमच्यासारख्या मित्रांकडून practical माहिती समजते, म्हणूनच तो प्रश्न विचारला होता. पुन्हा एकदा धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

प्रतिसाद आवडला

फारएन्ड
Fri, 07/22/2016 - 19:28 नवीन
मीडिया ने कोहलीचा सचिन करणे सुरू केल्याचे लक्षात आले होते. कारण भारतीय क्रिकेट पेक्षा मीडिया व स्पॉन्सरर्स ना नवीन सचिन ची गरज होती. बाकी ब्रॅण्ड बद्दलची माहितीही छान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

डांगे ब्वा दंडवत स्वीकार

कैलासवासी सोन्याबापु
Sat, 07/23/2016 - 14:44 नवीन
डांगे ब्वा दंडवत स्वीकार करावा ही विनंती _______/\________
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

ह प्रतिसाद वाचनात आलाच नव्हता

अभ्या..
Sat, 07/23/2016 - 14:50 नवीन
ह प्रतिसाद वाचनात आलाच नव्हता. आम्ही एक्काकांच्या धाग्यावरुन इकडे आलो ब्वा. एनीवे. संदीपराव, अल्टीमेट प्रतिसाद. इतका डीट्टेल अभ्यास आमच्याने कधी झाला नाही ब्वा. मुख्य म्हणजे असे सुसंगत लिहायला जी स्थिरता लागते ती आपल्याकडे जबरी आहे. आवडले आहे अत्यंत. अशा स्वरुपाचे आपल्या फिल्डमधले अजून लिखाण होत राहावे हि शुभेच्छा. बाकी बीईंन्ग ह्युमनचे सुझुकीसोबत टायप (सुझुकीचा ब्रान्ड अम्बासिडर सलमान आहे. प्रत्येक सुझुकीवर बीईंग ह्युमनचा लोगो असायचा) माहीत होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

अशा स्वरुपाचे आपल्या

कैलासवासी सोन्याबापु
Sat, 07/23/2016 - 14:54 नवीन
अशा स्वरुपाचे आपल्या फिल्डमधले अजून लिखाण होत राहावे हि शुभेच्छा. +10000
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा