✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

ग — गंगाधर मुटे, Sat, 07/09/2016 - 12:48
मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्‍याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतकर्‍याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्‍याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्‍याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्‍याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्‍याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय....!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय....!!!

                     - गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

प्रतिक्रिया द्या
175550 वाचन

💬 प्रतिसाद (484)

गवि

कपिलमुनी
Wed, 07/20/2016 - 00:48 नवीन
इथे फक्त गविंनी कवितेला कविता म्हणून वाचली बाकी लोकांनी स्कोर सेटलींग केला
  • Log in or register to post comments

आयडीचे विचार

कपिलमुनी
Wed, 07/20/2016 - 00:51 नवीन
आयडीचे विचार पटत नसतील तर सरळ जायला सामगावे किंवा रद्द करावे, हा प्राणायाम का ? सुहास नामक आयडी असाच उडाला .
  • Log in or register to post comments

आयडीचे विचार पटत नसतील तर सरळ

मितभाषी
Wed, 07/20/2016 - 00:58 नवीन
आयडीचे विचार पटत नसतील तर सरळ जायला सामगावे किंवा रद्द करावे,
हे काही समजले नाही. कोणि कोणाला जायला सांगावे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

कपिलमुनी

सुबोध खरे
Wed, 07/20/2016 - 01:06 नवीन
कपिलमुनी मोदकने सरळ स्वच्छ प्रश्न विचारले त्याला मुटे साहेबांचे उत्तर काय आले ते सांगा. बापूसाहेबांची त्यांनी अक्कल काढली. " ते ठरवायला दृष्टी लागते, अभ्यास लागतो, तारतम्य लागते, विवेक लागतो.... आणखी बरेच काही लागते. एखादा शब्द मुखोद्गत करून लिहिता आला म्हणजे त्याला त्या शब्दाची गहनता समजतेच असे नाही." "मग इतके वर्ष काया केले? इतकं क्षुल्लक समजायला इतका वेळ लागत असतो का?" हे त्यांचे प्रतिसाद आहेत अस्वस्थामा साहेब, तुम्ही मिसळपाववर आहात : 4 years 7 months मी मिसळपावर आहे : 6 years 6 months त्याचा कागदोपत्री अर्थ इतकाच की, मी मिसळपावला चांगल्या तर्‍हेने ओळखतो. मोदकाला "आता सुबुद्धी सुचलीय? मग आतापर्यंत कुठे गेली होती तुमची बुद्धी?" हे असे यांचे प्रतिसाद. असे कितीतरी प्रतिसाद आहेत. लोकांनी फक्त छान छान म्हणून मन डोलवावी का? मला पण साहित्य आणि कवितेच्या जगात काय किंमत आहे अशा तर्हेचे प्रश्न विचारले ( त्याने मला ५ पैशाचा फरक पडत नाही हा प्रश्न अलाहिदा) म्हणून मी त्यांना त्यांचा तीन वर्षांनी प्रतिसाद देऊन स्वतःच्या धाग्यावर टी आर पी मिळ्वण्याबद्दल विचारले किती ही प्रसिद्धी लोलुपता? सर्व साधारणपणे मी कुणाशी वाद घालायला जात नाही. पण इतक्या उद्धटपणे लोकांची अक्कल काढायचा हक्क यांना कुणी दिला. वर तुम्ही केवळ डावे आहेत म्हणून तथाकथित "उजव्या" कंपूवर आग पाखडण्यासाठी त्यांची बाजू घेता. अरेरे निदान जिंकणाऱ्या घोड्यावर तरी पैसे लावायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

मी डावा / कम्युनिस्ट

कपिलमुनी
Wed, 07/20/2016 - 01:08 नवीन
डावा कम्युनिस्ट किंवा आप / भाजप / कॉंग्रेस वाला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

हर हर न हिंदू न यवन

सुबोध खरे
Wed, 07/20/2016 - 01:12 नवीन
हर हर न हिंदू न यवन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

@कपिलमुनी

गंगाधर मुटे
Wed, 07/20/2016 - 00:59 नवीन
@कपिलमुनी वर्मावरच घाव घातला राव तुम्ही. मी स्वतःहून मिसळपाव सोडायला तयार आहे. फक्त मालकाने किंवा संपादकांनी मला तसे सांगावे. मी स्वेच्छेने जाईन. मात्र या झुंडीपुढे अजिबात नतमस्तक होणार नाही. मला काढून टाकले तरी माझी काहीही हरकत असणार नाही. मी इतकेच समजेन की "इंद्रायणीत अभंगगाथा बुडाली"
  • Log in or register to post comments

मुटे साहेब

सुबोध खरे
Wed, 07/20/2016 - 01:10 नवीन
मुटे साहेब तुम्हाला मिपा सोडून जा असे कोणीही सांगत नाही. हे मुनी केवळ केजरीवाल समर्थक आहेत म्हणून तथाकथित उजव्या लोकांचा स्कोअर सेटल करायचा प्रयत्न करत आहेत.म्हणून ते काड्या घालत आहेत. उद्या तुम्हाला ही ते सोडून देतील. ते सोडून द्या. इथे तुम्हाला सर्व जण छान छान म्हणतील अशी अपेक्षा असेल तर ते चूक आहे. आपल्याला जे लिहायचे आहे ते पुराव्यासहित स्पष्ट लिहा. अन्यथा टीका झाली तर ओरडू नका लोकांची बौद्धिक पातळी आपल्या इतकी उंच नसेल पण प्रत्येक माणूस आपल्या क्षेत्रात तज्ज्ञ आहे हेही लक्षात ठेवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

सोडून जा सांगायचे नाही आणि

मितभाषी
Wed, 07/20/2016 - 01:16 नवीन
सोडून जा सांगायचे नाही आणि नीट राहून द्यावचे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

केजरीवाल समर्थक

कपिलमुनी
Wed, 07/20/2016 - 01:26 नवीन
मी आप समर्थक /. विरोधक मुळीच नाही. होलसेल एजन्सी असल्यासारखा कोणत्या ही पक्षाचा समर्थन किंवा आंधळा विरोध करत नाही. आणि मुटेंना मी वरती पॉझिटीव लिहा असा लिहीला आहे त्यांना नाही पटला तर तो त्यांचा आणि लेखनशैलीचा प्रश्न आहे आपल्याला न पटणारे लेखन न वाचण्याचा मार्ग मोकळा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

??

कपिलमुनी
Wed, 07/20/2016 - 01:34 नवीन
इकडे कुठे आला हा प्रतिसाद ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अर्रर्र गल्ली चुकली काय?

सुबोध खरे
Wed, 07/20/2016 - 01:39 नवीन
अर्रर्र गल्ली चुकली काय? हा दुसऱ्या धाग्यावरचा प्रतिसाद चुकून आला. मुटे साहेब मला "घाबरू नका कायदेशीर काही करणार नाही" म्हणून सांगत होते म्हणून मी त्यांना स्पष्ट शब्दात लिहिलं आहे हिम्मत असेल तर करून "दाखवाच"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

आपल्याला न पटणाऱ्या बेफाट

सुबोध खरे
Wed, 07/20/2016 - 01:36 नवीन
आपल्याला न पटणाऱ्या बेफाट लेखनावर टीका करून ते चुकीचे आहे किंवा भंपक आहे हे पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवण्याचा ही हक्क आहे हेही लक्षात घ्या. उगाच कोणी भुतं असतात आणि अमावास्येच्या रात्री बाहेर पडू नका म्हणून लिहिले( जोवर काल्पनिक लेखन आहे आणि सत्याशी संबंध नाही अशी तळटीप नाही तोवर ) तर त्याचा प्रतिवाद करण्याचा हक्क आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

- तुम्ही मिपा सोडून जा म्हटले

गंगाधर मुटे
Wed, 07/20/2016 - 01:29 नवीन
- तुम्ही मिपा सोडून जा म्हटले तरी माझे लेखी काही किंमत नाही. - कपीलमुनी केजरीवाल समर्थक आहेत की नक्षलवाद समर्थक आहे, मला काहीही देणे घेणे नाही. - मला जे लिहायचे ते लिहेन, कुनाच्या मर्जीप्रमाणे लिहिणारा मी बाजारू कवी नाही. - तुम्हालाही मी जशास तसे उत्तर देणार. मग ओरडा की नका ओरडू मला काहीही फरक पडत नाही. - काय लक्षात ठेवायचे ते तुम्हीच ठेवा. नवकाव्य लिहिण्यासाठी व सृजनासाठी मला जुने विसरून "फ्रेश" व्हावे लागते. त्यामुळे तितकी वेळ निघून गेली की मी मेंदुतला काडीकचरा बाहेर काढून फेकून देतो. डुख वगैरे धरून बसत नाही. मात्र माझ्या शेपटीवर लाथ देण्याचा कोणी जाणून्बुजून प्रयत्न केला तर त्याला जशास तसे उत्तर देताना तो कोण बीसमारखां, तीसमारखां अथवा अमेरिकेचा राष्ट्रपती असेल तरी तमा बाळगत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

उगाच काथ्याकूट नको भंपक

सुबोध खरे
Wed, 07/20/2016 - 01:41 नवीन
उगाच काथ्याकूट नको भंपक विधाने नकोत. कायदेशीर काय ते करून दाखवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

तुमचा मी वेतनधारी सेवक

गंगाधर मुटे
Wed, 07/20/2016 - 01:47 नवीन
तुमचा मी वेतनधारी सेवक नसल्याने तुमचे कोनतेही आदेश पाळण्याचे माझेवर अजिबात बंधन नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

तुम्ही जे मत मांडले आहे ते

मोदक
Wed, 07/20/2016 - 01:51 नवीन
तुम्ही जे मत मांडले आहे ते सिद्ध करायचे तरी बंधन स्वीकारत आहात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

नाही. मी कवितेत जे म्हटलेय ते

गंगाधर मुटे
Wed, 07/20/2016 - 01:56 नवीन
नाही. मी कवितेत जे म्हटलेय ते काव्य म्हणून पुरेसे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

तुम्ही आयुष्यात ज्या कुणाचे

मोदक
Wed, 07/20/2016 - 02:02 नवीन
तुम्ही आयुष्यात ज्या कुणाचे ऐकता.. ज्या कुणाला गुरूस्थानी मानता त्यांना तुमचे या धाग्यावरचे प्रतिसाद सांगा आणि "मी बरोबर बोलतो आहे का?" असा प्रश्न विचारा. ..आणि उद्या तुमच्यावर कोणी कसलेही आरोप केले तर ती व्यक्ती ते आरोप सिद्ध करायला बांधील नाही हे लक्षात ठेवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

मी स्वतःहून कोणावर काहीही

गंगाधर मुटे
Wed, 07/20/2016 - 02:05 नवीन
मी स्वतःहून कोणावर काहीही आरोप केलेले नाही आहे. प्रतिसादाला मी उपप्रतिसाद दिलेले आहे. बाकी जेव्हा जशी वेळ येईल तेव्हा तसे ठरवेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

मी स्वतःहून कोणावर काहीही

मोदक
Wed, 07/20/2016 - 02:13 नवीन
मी स्वतःहून कोणावर काहीही आरोप केलेले नाही आहे. मी येथे चर्चा करायची थांबवत आहे. तुमचे सोपेचे सोंग सुरू राहूद्यात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

धन्यवाद! आभारी आहे.

गंगाधर मुटे
Wed, 07/20/2016 - 02:15 नवीन
धन्यवाद! आभारी आहे. प्रतिसाद येणे बंद झाले की आपोआपच उपप्रतिसाद येणे बंद होतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

मला जे लिहायचे ते लिहेन,

महासंग्राम
Wed, 07/20/2016 - 10:22 नवीन
मला जे लिहायचे ते लिहेन, कुनाच्या मर्जीप्रमाणे लिहिणारा मी बाजारू कवी नाही.
सर, बाकीचे लिहितात ते कुणाच्या मर्जीवरून कविता करतात हे कशावरून तुम्ही कविता करता तरीही दुसऱ्या कवींना बाजारू म्हणता हे दुःख झाले, ही अपेक्षा आपल्या नक्कीच नव्हती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

तुम्ही कविता करता तरीही

गंगाधर मुटे
Fri, 07/22/2016 - 03:53 नवीन
तुम्ही कविता करता तरीही दुसऱ्या कवींना बाजारू म्हणता हे दुःख झाले
मला जे लिहायचे ते लिहेन, कुनाच्या मर्जीप्रमाणे लिहिणारा मी बाजारू कवी नाही. याचा अर्थ मी सोडून बाकीचे सर्व कवी बाजारी कवी आहेत असा होतो काय? तुम्हाला खरंच मराठी भाषा कळत नाही आहे की झुंडीची मर्जी प्राप्त करण्यासाठी व झुंडीसोबत एकनिष्ठता दाखवण्यासाठी ध चा मा करत आहात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

डावे, उजवे, मंदीरवादी,

गंगाधर मुटे
Wed, 07/20/2016 - 01:46 नवीन
डावे, उजवे, मंदीरवादी, मस्जिदवादी, मंडलवादी, कमंडलवादी, परमीट, कोटा, लायसन्सवादी, तस्कर प्रवृत्तीचे नेते, गुंड प्रवृत्तेचे अधिकारी हे सारेच शेतकर्‍याचे शत्रू आहेत असे मला वाटते. मला वाटते हा माझा अधिकार आणि व्यक्तीस्वातंत्र्याचा प्रश्न आहे. मात्र व्यक्तीशः माझे वरिलपैकी कुणाशीही शत्रूत्व नाही. माझा लढा व्यक्तीशी नसून प्रवृत्तीशी आहे. मी कधीही कुणाच्या अंगावर चवताळून जात नाही. असे असूनही कोणी माझे अंगावर चवताळून यायचा प्रयत्न केला तर त्याला थेट शिंगावर घ्यायची हौस आहे. काय चुकत असेल तर ते माझ्यावर चवताळून येणार्‍याचे चुकते. स्वसंरक्षणाचा अधिकार म्हणून मी त्याला मग शिंगावर घेत असेल तर त्यात काहीही गैर नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

गांडूळ

कपिलमुनी
Wed, 07/20/2016 - 01:52 नवीन
गांडूळ शेतकऱ्याचा मित्र आहे आणि बाकी सर्व शत्रु ! म्याटर क्लोज !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

डावे, उजवे, मंदीरवादी,

सुबोध खरे
गुरुवार, 07/21/2016 - 18:17 नवीन
डावे, उजवे, मंदीरवादी, मस्जिदवादी, मंडलवादी, कमंडलवादी, परमीट, कोटा, लायसन्सवादी, तस्कर प्रवृत्तीचे नेते, गुंड प्रवृत्तेचे अधिकारी हे सारेच शेतकर्‍याचे शत्रू आहेत असे मला वाटते. मला वाटते शेतकरीच शेतकऱ्याचा शत्रू आहे. वाद संपला. मला वाटते हा माझा अधिकार आणि व्यक्तीस्वातंत्र्याचा प्रश्न आहे. माझा लढा व्यक्तीशी नसून प्रवृत्तीशी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

शेतकरीच शेतकऱ्याचा शत्रू आहे

मोदक
गुरुवार, 07/21/2016 - 18:43 नवीन
शेतकरीच शेतकऱ्याचा शत्रू आहे हे म्हणजे "बाईच बाईची शत्रू असते" या धर्तीवर तुम्ही बोलत आहात. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

तुकोबा, माफ करा!

स्पार्टाकस
Sat, 07/23/2016 - 23:16 नवीन
"इंद्रायणीत अभंगगाथा बुडाली" >>>> तुकोबा, आम्हाला माफ करा! .. .. आणि या स्वयंघोषितांना पण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

अजून एक गंगाधर ही शक्तिमान!

उडन खटोला
Sat, 07/23/2016 - 23:23 नवीन
अजून एक गंगाधर ही शक्तिमान!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पार्टाकस

या धाग्याला 'विशेष पुरस्कार'

निंजा टर्टल
Wed, 07/20/2016 - 01:57 नवीन
या धाग्याला 'विशेष पुरस्कार' देण्यात यावा अशी विनंती या ठिकाणी मी करत आहे.
  • Log in or register to post comments

निंजा टर्टल यांच्या

गंगाधर मुटे
Wed, 07/20/2016 - 02:00 नवीन
निंजा टर्टल यांच्या प्रस्तावाला मीअनुमोदन देत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निंजा टर्टल

सगळे दुत्त दुत्त आहेत.

निंजा टर्टल
Wed, 07/20/2016 - 02:05 नवीन
सगळे दुत्त दुत्त आहेत. सगळ्यांची घरे उन्हात बांधुया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

आधी तुम्ही पत्ता द्या.. कुठे

मोदक
Wed, 07/20/2016 - 02:08 नवीन
आधी तुम्ही पत्ता द्या.. कुठे घरे बांधताय ते सांगा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निंजा टर्टल

खालची आळी, घर क्रमांक ८४०,

निंजा टर्टल
Wed, 07/20/2016 - 02:12 नवीन
खालची आळी, घर क्रमांक ८४०, पोष्टाच्या मागे, हितंच, ग्रह क्रमांक 3 आणि 4 च्या मध्ये, सौरमाला, आपलीच आकाशगंगा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

अर्रर्र.... एका रात्रीत किती

शि बि आय
Wed, 07/20/2016 - 09:21 नवीन
अर्रर्र.... एका रात्रीत किती @ @ @ पडल्या राव.... म्हणून पूर येऊन राहिला बे...
  • Log in or register to post comments

अर्रर्र.... एका रात्रीत किती

शि बि आय
Wed, 07/20/2016 - 09:21 नवीन
अर्रर्र.... एका रात्रीत किती @ @ @ पडल्या राव.... म्हणून पूर येऊन राहिला बे...
  • Log in or register to post comments

कविता छान आहे. डोक्यात विडंबन

स्वामी संकेतानंद
Wed, 07/20/2016 - 09:57 नवीन
कविता छान आहे. डोक्यात विडंबन आले आहे. जमले तर आणि तुमची हरकत नसल्यास प्रकाशित करायचा विचार आहे.
  • Log in or register to post comments

ट ला ट आणि फ़ ला फ़ चे केले आणि

गंगाधर मुटे
Fri, 07/22/2016 - 03:59 नवीन
ट ला ट आणि फ़ ला फ़ चे केले आणि यमक जुळवले तरी त्याला कवितेचा दर्जा देऊन "क्या बात है" अशी दाद देणारे शेकडो मिळून जातात. पण विडंबन हे ऐर्‍यागैर्‍याचे काम नव्हे! विडंबन करायला अभ्यास लागतो, प्रतिभा लागते आणखी बरेच काही लागते. तुम्ही स्वत:चा शोध घ्या आणि तुम्हाला काय योग्य वाटते ते करा. मी निर्णय देऊ शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद

काय झाले आहे मुटेकाकांना? असे

मृत्युन्जय
Wed, 07/20/2016 - 10:51 नवीन
काय झाले आहे मुटेकाकांना? असे प्रतिसाद का देउन राहिलेत? आयडी हॅक बिक झाला की काय?
  • Log in or register to post comments

आपल्या चरणावर आस्वादासाठी

गंगाधर मुटे
Fri, 07/22/2016 - 04:01 नवीन
आपल्या चरणावर आस्वादासाठी माझा एक शेर अर्पण करतो; आसुड उगारणारा, माझा स्वभाव नाही पण; वेळ आणली या, मग्रूर लांडग्याने (मिसळपाववर पूर्वप्रकाशित)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

भरपूर प्रतिसाद दिसतायत म्हणून

विशाखा पाटील
Wed, 07/20/2016 - 12:29 नवीन
भरपूर प्रतिसाद दिसतायत म्हणून कविता वाचली, प्रतिसादातले महाभारत पूर्ण वाचले नाही. कवितेत आवेश, संताप आणि उपरोध ठासून भरलेला असला तरी तिच्यात विश्लेषण नाही. शेतमालाचा भाव, कर्जमुक्ती आणि शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न हे कवितेत मावणारे विषय नाहीत. कवितेला पूरक म्हणून एका लेखात तुमची भूमिका काय आहे, व्यवस्थेतले दोष काय आहेत, ते दूर करण्यासाठी कोणत्या योजना आखायला हव्यात हे मांडलेत तर विषयाला न्याय मिळेल.
  • Log in or register to post comments

तुमचा पत्ता द्या आधी. (मला

आदूबाळ
Wed, 07/20/2016 - 12:38 नवीन
तुमचा पत्ता द्या आधी. (मला नव्हे, मुटेसरांना.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाखा पाटील

आवरा !

देश
Wed, 07/20/2016 - 12:49 नवीन
ह.ह.पु.वा :-) देश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

कवितेत आवेश, संताप आणि उपरोध

गंगाधर मुटे
Fri, 07/22/2016 - 04:06 नवीन
कवितेत आवेश, संताप आणि उपरोध ठासून भरलेला असला तरी तिच्यात विश्लेषण नाही. कविता तशी असते हे तुम्हाला कोणत्या मास्तरणे शिकवले? त्यांचा पगारच परत मागायला पाहिजे. फुक्कटचा पगार खातात आणि काहीबाही शिकवतात.
शेतमालाचा भाव, कर्जमुक्ती आणि शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न हे कवितेत मावणारे विषय नाहीत. कवितेला पूरक म्हणून एका लेखात तुमची भूमिका काय आहे, व्यवस्थेतले दोष काय आहेत, ते दूर करण्यासाठी कोणत्या योजना आखायला हव्यात हे मांडलेत तर विषयाला न्याय मिळेल.
मी लिहिले नाही हे तुम्ही कसे ठरवले? जरा मिसळपाव शोधून पहा. मी काय लिहिले हे आता प्रत्येक आयडीच्या घरोधरी जाऊन सांगू का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाखा पाटील

मी काय लिहिले हे आता प्रत्येक

संदीप डांगे
Fri, 07/22/2016 - 04:23 नवीन
मी काय लिहिले हे आता प्रत्येक आयडीच्या घरोधरी जाऊन सांगू का?
जौ द्या हो मुटेसाहेब. पण तुमचा मुद्दा पटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

एका रात्रीत

इरसाल
Wed, 07/20/2016 - 13:45 नवीन
२७७ प्रतिसाद, काय झालय काय मिपाला ? गोपाला गोपाला, हवे करुणा राखजो हां !
  • Log in or register to post comments

काय झालय काय मिपाला ?

मुक्त विहारि
Wed, 07/20/2016 - 14:32 नवीन
मी पत्ते गोळा करत आहे. बियर बार मध्ये एका बियरच्या क्रेट बरोबर एक पत्ता फ्री.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

पत्ते

नाखु
Wed, 07/20/2016 - 14:48 नवीन
गोळा झाल्यावर सांगा बादाम सातला पाच भिडू तयार आहेत , पाँईटची रमी नको उगा भांडणाला कहार. नाखु पिसून पत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

बदाम सात

मुक्त विहारि
Wed, 07/20/2016 - 17:32 नवीन
चालेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
  • «
  • ‹
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा