Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by गंगाधर मुटे on Wed, 08/14/2013 - 13:57

लोकशाहीचा अभंग

आपुलिया हिता । असे जो जागता ।
फक्त त्याची माता । लोकशाही ॥

कष्टकरी जणू । सवतीचे पुत्र ।
वटारते नेत्र । लोकशाही ॥

पुढारी-पगारी । लाडके जावई ।
माफियांची ताई । लोकशाही ॥

संघटन, एकी । मेळ नाही ज्यांचे ।
ऐकेचना त्यांचे । लोकशाही ॥

मिळवुनी माया । जमविती धाक ।
त्यांची घेते हाक । लोकशाही ॥

वापरता तंत्र । दबाव गटाचे ।
तालावरी नाचे । लोकशाही ॥

सत्तापिपासूंच्या । द्वारी मटकते ।
रस्ता भटकते । लोकशाही ॥

चार पिढ्या सत्ता । एका कुटुंबाला ॥
म्हणू कशी हिला । लोकशाही? ॥

जनता 'अभय' । निर्भयाने व्हावी ।
ताळ्यावर यावी । लोकशाही ॥

                            - गंगाधर मुटे
------------------------------------------------
सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा....!
------------------------------------------------

Submitted by गंगाधर मुटे on Wed, 07/20/2016 - 00:44

In reply to तुमच्या उत्तराला केराची टोपली by सुबोध खरे

Permalink

तुमच्या उत्तराला केराची टोपली

तुमच्या उत्तराला केराची टोपली दाखवली जाण्याची शक्यता दाट आहे.
मी स्वतः उत्तर शोधत आहे. असे म्हटले आहे. नीट वाचावे. झुंड ही झुंड असते. त्यात कोण आहे याला काहीही महत्व नसते. झुंडीत शिरून झुंड प्रवृत्तीने हात धुवून घेणारे झुंडीचे सदस्य असतातच. बापूसाहेब कोण ते मला माहीत नाही. मी त्यांना तुम्ही झुंडीत आहात असेही म्हटले नाही. ज्यांना म्हणालो, त्यांना स्पष्टपणे म्हणालो आहे. उगीच तुमच्या झुंडीत इतरांना गोवू नका. तुमचा किल्ला आता तुम्हीच लढवा.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 07/20/2016 - 00:47

In reply to तुमच्या उत्तराला केराची टोपली by गंगाधर मुटे

Permalink

उत्तर मिळाले की जाहीर करेन.

उत्तर मिळाले की जाहीर करेन. हे तुम्हीच लिहिले आहे ना? का ते आपणहून आले आपल्या प्रतिसादात
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 07/20/2016 - 00:20

Permalink

कायद्याची भाषा न कराल तर ठीक

कायद्याची भाषा न कराल तर ठीक आहे. बाकी वेद पुराण गीता इ काही मी वाचलेली नाही. प्रगल्भता म्हणाल तर ती आताही आलेली नसेल. हा झुंडखोरीचा बेफाट आरोप तुम्ही करता आहेत याला काही पुरावा आहे का? "ज्याला कवितेतील "क" सुद्धा समजत नाही" हा आरोप तुम्ही केलात तो कशावरून? तीन वर्षांनी आपला धागा वर काढण्यासाठी आणि टी आर पी मिळवण्यासाठी तुम्ही केलेली केविलवाणी धडपड सारे काही सांगून जाते. वितंडवाद कितीही वेळ मला घालता येईल. न्यायालयात साडेतीन वर्षे मी ते केलेले आहे तेंव्हा तुमच्याशी वाद घालायला मला काही शष्प फरक पडणार नाही. आणि मी काही पॉलिटिकली करेक्ट असावा असा माणूस नाही. जे चूक त्याला चूक म्हणण्याची माझी हिम्मत आहे. कितीही झाला तरी माझंच खरं हे म्हणणे सोडून द्या.
  • Log in or register to post comments

Submitted by गंगाधर मुटे on Wed, 07/20/2016 - 00:37

In reply to कायद्याची भाषा न कराल तर ठीक by सुबोध खरे

Permalink

कायद्याची भाषा न कराल तर ठीक

कायद्याची भाषा न कराल तर ठीक आहे.
माझ्या धाग्यावर येऊन कुणी हुल्लड करत असेल तर त्याला जशास तसे उत्तर देण्याचा मला नैतिक अधिकार आहेच पण कायदेशीर अधिकारही मिळून जाईल. यात काय गैर आहे?
हा झुंडखोरीचा बेफाट आरोप तुम्ही करता आहेत याला काही पुरावा आहे का?
माझ्या काही कवितांच्या धाग्यावर येऊन असंबद्ध प्रतिसाद नोंदवणारे जर "समान व्यक्ती/आयड्या" असतील तर त्या आयड्यांना एकत्र मिळवले की आपोआपच झुंड तयार होते. वेगळ्या पुराव्याची गरज भासत नाही.
कितीही झाला तरी माझंच खरं हे म्हणणे सोडून द्या.
हा सर्वस्वी माझा खजगी प्रश्न आहे. कुनाला गुरु मानायचे, कुनाचे ऐकायचे हा सुद्धा माझा खाजगी प्रश्न आहे. उलट न मागता सल्ला देणे, हाच फाजिलपणा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 07/20/2016 - 00:46

Permalink

कायदेशीर अधिकार कसा मिळेल हे

कायदेशीर अधिकार कसा मिळेल हे जरा सविस्तर सांगता काय? हे खाजगी संस्थळ आहे हे लक्षात घेऊन. वेगळा पुरावा देता येत नाही म्हणून तुम्ही वेगळा पुरावा द्यायचा प्रश्न येत नाही असे म्हणता मला कवितेतील "क" समजत नाही हा आरोप तुम्ही कशावरून केला हेही सांगत नाही.असे बेफाट आरोप करायला श्री केजरीवालांकडून शिकला काय? तुम्हाला सल्ला द्यायची मला गरज वाटत नाही. तास मला अधिकारही नाही बेफाट आरोप करून पुरावा न देता आपले तेच रेटून बोलण्यासाठी मी तुम्हाला सांगितले त्याला तुम्ही सल्ला समजला हा तुमचा गैर समज आहे. आपण सर्वज्ञानी आहात तेंव्हा तुम्हाला सल्ला देणारा मी कोण? पण वरच्या दोन प्रश्नांची उत्तरे देता आली तर पहा.
  • Log in or register to post comments

Submitted by गंगाधर मुटे on Wed, 07/20/2016 - 01:16

In reply to कायदेशीर अधिकार कसा मिळेल हे by सुबोध खरे

Permalink

कायदेशीर अधिकार कसा मिळेल हे

कायदेशीर अधिकार कसा मिळेल हे जरा सविस्तर सांगता काय? हे खाजगी संस्थळ आहे हे लक्षात घेऊन. मला काहीही कायदेशीर वगैरे करायचे नाही आहे. उगीच घाबरू नका. मी झुंडीच्या विरोधात बोललो. संस्थळाच्या विरोधात बोललो नाही. या संस्थळाविषयी माझी काहीही तक्रार नाही. या मिसळपावशी माझं भावनिक नातं जुळलेलं आहे. माझी कविता फुलवण्यात आणि मला कवी व लेखक बनवण्यात मायबोली आणि मिसळपाव या दोनच संस्थळाचा पूर्ण वाटा आहे. माझे स्वतःचे संकेतस्थळ, फेसबूक, ब्लॉग, ऑर्कूट, व्टीटर, व्हाटसप नंतर आलेत. पण मिसळपावला मी आईचा दर्जा देत असलो तरी तुमच्यासारख्या झुंडींना कवडीची किंमत देत नाही, हे तितकेच खरे आहे. तुमच्यासारख्यांच्या निरर्थक प्रश्नांना मी उत्तरे दिलीच पाहिजे असेही मला वाटत नाही.
मला कवितेतील "क" समजत नाही हा आरोप तुम्ही कशावरून केला हेही सांगत नाही.
कवितेच्या धाग्यावर कवितासोडून अवांतर विषयावर कोण बोलू शकतो?
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 07/20/2016 - 01:25

Permalink

. उगीच घाबरू नका.

. उगीच घाबरू नका. उगाच स्वतःबद्दल गैरसमज करून घेऊ नका मी भारतीय लष्करा विरुद्ध साडे तीन वर्षे 'सर्वोच्च न्यायालयात" सर्व तर्हेच्या धमक्यांना भीक न घालता लढून जिंकून निवृत्ती वेतन किंवा संतोष फंड न घेता बाहेर पडलो आहे. तुम्हाला मी घाबरेन हा गैरसमज काढून टाका. उगाच स्वतःबद्दल भ्रामक कल्पना बाळगू नका. तुम किस खेत की मूली हो? मीच तुम्हाला आव्हान देतो. काय ते कायदेशीर करूनच दाखवा. फुसके फटाके फार झाले. दाखवाच करून. नाही तर शेपूट घालून पळून जा कवितेच्या धाग्यावर कवितासोडून अवांतर विषयावर कोण बोलू शकतो? आणि कवितेबद्दल परत असं गोल गोल बोलू नका स्पष्ट पुरावा द्या. बाप दाखव नाही तर श्राद्ध कर
  • Log in or register to post comments

Submitted by गंगाधर मुटे on Wed, 07/20/2016 - 01:52

In reply to . उगीच घाबरू नका. by सुबोध खरे

Permalink

तुमचा मी वेतनधारी सेवक

तुमचा मी वेतनधारी सेवक नसल्याने अथवा तुम्ही माझे सेनापती नसल्याने तुमचे कोनतेही आदेश पाळण्याचे माझेवर अजिबात बंधन नाही. मी माझ्या मर्जीचा मालक आहे. काय करायचे काय नाही करायचे हे ठरवण्याचा अधिकारही माझाच आहे. तुम्हाला काय करायचे ते तुम्ही ठरवा.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 07/20/2016 - 09:47

In reply to तुमचा मी वेतनधारी सेवक by गंगाधर मुटे

Permalink

तुमचा मी वेतनधारी सेवक

तुमचा मी वेतनधारी सेवक नसल्याने अथवा तुम्ही माझे सेनापती नसल्याने तुमचे कोनतेही आदेश पाळण्याचे माझेवर अजिबात बंधन नाही. मुटे साहेब तो आदेश नाहीये ते आव्हान आहे. झेपत नाही तर कशाला फटाके फोडू म्हणता. उगाच फुसके निघतात आणि अब्रू जाते. म्हणे कायदेशीर अधिकार
  • Log in or register to post comments

Submitted by निंजा टर्टल on Wed, 07/20/2016 - 02:03

Permalink

आज कलकलाट झालेला दिसतोय.

आज कलकलाट झालेला दिसतोय. मुटे काका, हे सगळे लोक दुत्त दुत्त आहेत. कोणाकोणाकडे लक्ष देऊ नका. सगळ्यांना तिकडे फाट्यावर मारा. कविता सादर करा.
  • Log in or register to post comments

Submitted by निंजा टर्टल on Wed, 07/20/2016 - 02:03

Permalink

आज कलकलाट झालेला दिसतोय.

आज कलकलाट झालेला दिसतोय. मुटे काका, हे सगळे लोक दुत्त दुत्त आहेत. कोणाकोणाकडे लक्ष देऊ नका. सगळ्यांना तिकडे फाट्यावर मारा. कविता सादर करा.
  • Log in or register to post comments

Submitted by गंगाधर मुटे on Wed, 07/20/2016 - 02:12

In reply to आज कलकलाट झालेला दिसतोय. by निंजा टर्टल

Permalink

कविता सादर करायला संपूर्ण

कविता सादर करायला संपूर्ण आयुष्य शिल्लक आहे. आजचा दिवस या झुंडशाहीच्या नावानेच साजरा करायचा ठरवला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by निंजा टर्टल on Wed, 07/20/2016 - 02:17

In reply to कविता सादर करायला संपूर्ण by गंगाधर मुटे

Permalink

वृत्ती बेकार आहे ओ लोकांची,

वृत्ती बेकार आहे ओ लोकांची, सोडून सोडा झालं. बाद कार्टी हायेत. त्ये येक डाक्टर हाय, त्ये बी बाद हाय. आनि येकटं उगा सिक्स सिग्मा वगैरे करतंय. त्ये तर लै वंगाळ. एकटं कायतं शेनेत हाय, येक तकडं आमेरिकेत, येक हिकडं लंडन बुद्रुक ला, येक गाबड़ं आनि कुडं हाय. मरू दे. झोपू का?
  • Log in or register to post comments

Submitted by गंगाधर मुटे on Wed, 07/20/2016 - 02:20

In reply to वृत्ती बेकार आहे ओ लोकांची, by निंजा टर्टल

Permalink

नाही, झोपू नका.

नाही, झोपू नका. झोप प्रकृतीस हानीकारक असते हे रशियन तज्ज्ञ डॉ. कुत्रा चावलास्की यांनी सप्रमाण सिद्ध केलं आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Wed, 07/20/2016 - 02:40

In reply to नाही, झोपू नका. by गंगाधर मुटे

Permalink

काळजी घ्या...

काळजी घ्या...
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • Log in or register to post comments
  • 15509 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com