राम राम मंडळी,
काही दिवसांपूर्वी मिपावर आम्ही आमचे मधुभाई हा लेख लिहिला होता. त्यात काही मंडळींनी मधुभाईंनी गायलेले काही ध्वनिमुद्रण असल्यास ते जालावर चढवावे असे आम्हाला सुचवले होते म्हणून मुद्दाम हा लेखनप्रपंच.
परवा खूप दिवसांनी सवड मिळाली म्हणून आम्ही मधुबुवांच्या घरी गाण्याची तालीम घ्यायला गेलो होतो.
"अरे ये ये!" असं नेहमीप्रमाणे मधुभाई हसतमुखाने म्हणाले. तिथे त्यांच्या अजून दोन शिष्या बसल्या होत्या. त्यांच्या गाण्याची तालीम सुरूच होणार होती तेवढ्यात आम्ही तिथे हजेरी लावली!
"काय मग? आज वेळ मिळाला वाटतं? आज कसे काय उगवलात?" अशी मधुभाईंनी पुन्हा आमची थट्टा केली! :)
"हम्म! लाव पाहू तंबोरा!" असा हुकूम केला. आम्ही चुपचाप तंबोरा जुळवला आणि बुवांना हळूच म्हटलं,
"बुवा, आज जरा बिलावल दाखवा ना!"
"बिलावल? बरं बरं!" :)
त्या मुलींचा कुठला राग सुरू होता हे मला माहीत नव्हतं तरीही मधुभाईंनी माझा हट्ट पुरवला आणि हसतमुखाने होकार भरत डायरेक्ट बिलवल सुरूच केला. तो मी मुद्दामून माझ्या आयपॉडवर ध्वनिमुद्रीत केला! :)
त्यातलाच थोडासा भाग आज आपल्याकरता इथे उपलब्ध करत आहोत! पाहा तरी ऐकून आणि कसं वाटलं ते अवश्य सांगा! :)
खरंच सांगतो मंडळी, आमच्या मधुभाईंकडे जाऊन गाण्याची तालीम घेणं, रागाचं -लयतालाचं, बंदिशींचं सौंदर्य समजावून घेणं ही मम सुखाची ठेव! माझ्या निखळ आनंदाचा तो एक भाग आहे. आपण जर हे ध्वनिमुदण ऐकलंत तर आपल्या लक्षात येईल की सुरवातीला फक्त सरगमच्या साहाय्याने किती सुंदर रितीने मधुबुवांनी बिलावल हा राग उलगडून दाखवला आहे!
मंडळी, आज इतक्या सुंदर रितीने फार कमी ठिकाणी गाणं शिकवलं जातं. आज मधुबुवांसारख्या दिग्गजाच्या पायाशी बसून चार स्वर शिकायला मिळताहेत ही मी भाग्याची गोष्ट मानतो. आजच्या धकाधकीच्या आणि हजार व्यवधानांच्या जमान्यात मला गाणं किती येईल, किती नाही, हा भाग वेगळा परंतु ते शिकत राहण्याचा आनंदच खूप मोठा आहे आणि त्याची कशाशीच तुलना होऊ शकत नाही! हमीर, छायानट, भूप, बिलावल, बसंतबहार, ललितागौरी यासारखे सुंदर राग बुवांच्या पायाशी बसून आयुष्यभर शिकत रहाणे हीच आमची इच्छा आणि त्यातच आमचं स्वर्गसुख सामावलेलं आहे! :)
आज माझ्या आयपॉडमध्ये जी मिठाई भरलेली आहे ती कुणीही कितीही पैसे दिले तरी बाजारात अन्यत्र मिळणार नाही! या जगात काही काही गोष्टींचं मोलच करता येत नाही, त्या केवळ अनमोल असतात!
अजून काय लिहू?
- तात्या अभ्यंकर.
वाचने
8231
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
खास करून
+१
In reply to खास करून by विसोबा खेचर
आयपॉड वर ध्वनिमुद्रण?
तात्यांच्
In reply to आयपॉड वर ध्वनिमुद्रण? by मैत्र
छान आहे सुरावट..
तिरथको सब
In reply to छान आहे सुरावट.. by प्राजु
शामकल्याणही आठवला.
In reply to तिरथको सब by विसोबा खेचर
ध्वनिमुद्
छान वाटले ऐकायला!
माझ्या
ओ राही गया
In reply to माझ्या by रामदास
हंसध्वनी
In reply to ओ राही गया by विसोबा खेचर
हो जवळपास
In reply to हंसध्वनी by घाटावरचे भट
तात्या,
आणि खरं तर
In reply to तात्या, by बिपिन कार्यकर्ते
तानपुरा...
In reply to आणि खरं तर by विसोबा खेचर
मी असं
In reply to तानपुरा... by बिपिन कार्यकर्ते
क्या बात है ..!
In reply to आणि खरं तर by विसोबा खेचर
छान
राग आणि थाट
थाट
In reply to राग आणि थाट by सुनील
चांगली माहिती
In reply to थाट by घाटावरचे भट
बिलावल आवडला
सर्व रसिक