✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आमचे मधुभाई...!

व
विसोबा खेचर यांनी
Fri, 07/25/2008 - 16:07  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
19641 वाचन

💬 प्रतिसाद (32)

प्रतिक्रिया

म
मुक्तसुनीत Fri, 07/25/2008 - 18:53 नवीन

भाग्याचे देणे !

तात्या , बेंगलोरच्या गदारोळात तुमचा हा सुंदर लेख लपला थोडासा. आता सर्व आलबेल अहे म्हण्टल्यावर लक्ष जाईल सर्वांचे. लेख वाचला आणि आजपावेतो अपरिचित असणार्‍या एका गुणी कलावंताबद्दल वाचून आत खोल कुठेतरी काही हलले. तुम्ही त्यांना शापित का म्हण्टले ते लिहीले नाही ; पण इथे डीटेल्सची पर्वा कुणाला ! या सुरांच्या गंधर्वाचे दर्शन तुम्ही घडवलेत , त्यातल्या माणसाचेही दर्शन घडवलेत . बस्स. त्यातल्या फोटोमुळे खुमारी आली आहे ! आता मधुभाई आमचेही स्नेही झालेत. मिपाकरांतर्फे अनेकानेक शुभेच्छा कळवा !
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 07/25/2008 - 19:03 नवीन

:)

आता सर्व आलबेल अहे म्हण्टल्यावर लक्ष जाईल सर्वांचे. अहो मुक्तराव, लक्ष नाही गेले तरी फिकीर नाही! नाहीतरी आमच्या अश्या लेखांना अलिकडे काही विद्वान 'दळणाचीच' उपमा देतात! :) असो, हे लेखन फार कुणाला नाही आवडलं तर आणि इतरही काही विद्वतजनांना दळण वाटलं तर आम्ही लिहिणं थांबवू आणि इतरांचं उत्तमोतम लेखन वाचण्यात धन्यता मानू! :) आमचे सांगितिक अनुभव आणि आम्ही पाहिलेली संगीताच्या दुनीयेतली माणसं राहू द्या आमच्यापाशीच! :) आपला, (संगीताच्या दुनीयेतला) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 07/25/2008 - 20:17 नवीन

आमचे

आमचे सांगितिक अनुभव आणि आम्ही पाहिलेली संगीताच्या दुनीयेतली माणसं राहू द्या आमच्यापाशीच! मग आमच्यासारख्या औरंगजेबांचा खजिना रिकामाच राहील! (चांगल्या माणसांची आणि लेखांची चाहती) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
क
कोलबेर Fri, 07/25/2008 - 23:55 नवीन

असो, हे

असो, हे लेखन फार कुणाला नाही आवडलं तर आणि इतरही काही विद्वतजनांना दळण वाटलं तर आम्ही लिहिणं थांबवू आणि इतरांचं उत्तमोतम लेखन वाचण्यात धन्यता मानू!
तात्या.
का बरं? ज्यांना तुमचे लेखन आवडत नाही ते नाही वाचणार, परंतु मला तुमच्या आठवणी वाचायला आवडतात. तेव्हा तुमचे लेखन तुम्ही मिपावरही अगदी अवश्य प्रसिद्ध करावे ही विनंती.
तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
म
मुक्तसुनीत Fri, 07/25/2008 - 23:57 नवीन

:-)

काय कोल्बेर आहात का चित्रगुप्त आहात !! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
व
विसोबा खेचर Fri, 07/25/2008 - 14:10 नवीन

वरूणदेवा,म

वरूणदेवा, माझ्या लेखनाचा इतक्या बारकाईने अभ्यास करतोस याचा आनंद वाटतो! तो तसाच सुरू ठेव, खूप काही शिकशील! :) बाकी, असो...! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
ड
डॉ.प्रसाद दाढे Fri, 07/25/2008 - 21:42 नवीन

अप्रतिम चित्रण

तात्या, अतिशय सुरेख लेख आहे. मधुभाई॑ना अगदी डोळ्या॑पुढे उभे केले आहेत वाचका॑च्या. मित्रहो, मी मधुभाई॑ना जवळून पाहिले आहे, त्या॑चे गाणेही ऐकले आहे. ते आमच्या डो॑बिवलीचे भूषण आहेत. तसे पाह्यला गेले तर मधुभाई॑चे व आमचे तीन पिढ्या॑चे स॑ब॑ध आहेत. त्या॑चे पिताजी प॑. गजाननबुवा जोशी हे माझ्या आजोबा॑चे औ॑ध स॑स्थानातले खास मित्र. स्वतः मधुभाई माझ्या काका॑च्या वर्गात तर त्या॑चे कनिष्ठ ब॑धू नारायणबुवा (अहमदजान तिरखवा॑चे शिष्य) माझ्या वडिला॑च्या वर्गात! भाग्याची गोष्ट अशी की माझ्या आईला व ज्येष्ठ भगिनीला प॑. गजाननबुवा व मधूभाई॑ची पुष्कळ वर्षे तालीम मिळाली व आज तात्या॑चा लेख मी माझ्या आईला वाचून दाखविल्यावर तिच्या डोळ्या॑त पाणी उभे राहिले. तिने मला तात्या॑चे आभार मानण्यास सा॑गितले आहेत. तात्या म्हणतात तसे आमचे मधुभाई खरोखरच एक शापीत यक्ष आहेत, एक दुर्लक्षित पण स्वतःच्याच मस्तीत वावरणारा स॑गीतातला बादशहा! आजही स्वर त्या॑च्या हुकुमतीत आहेत, व मधुभाई॑ची ती धु॑दी अजून ओसरलेली नाही. ती त॑द्री, समाधी जवळून निरखण्याचे भाग्य तात्या॑ना लाभले. ही गुरू-शिष्याची जोडी अक्षय्य राहो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
व
विसोबा खेचर Fri, 07/25/2008 - 23:44 नवीन

व आज

व आज तात्या॑चा लेख मी माझ्या आईला वाचून दाखविल्यावर तिच्या डोळ्या॑त पाणी उभे राहिले. दाढेसाहेब, आपल्या मातोश्री मधुभाईंकडे गाणं शिकल्या आहेत, त्यांचा सहवास त्यांना मिळाला आहे. गुरुच्या आठवणीने त्यांच्या डोळ्यात अश्रू येणे साहजिकच आहे, त्यांच्या भावना मी समजू शकतो! तिने मला तात्या॑चे आभार मानण्यास सा॑गितले आहेत. आपल्या मातोश्रींना माझाही दंडवत कळवा. पुण्यात आलो की त्यांना भेटायला मला आवडेल.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.प्रसाद दाढे
म
मानस Fri, 07/25/2008 - 19:15 नवीन

असेच म्हणतो

सुरेख लेख आणि मधुभाईंसारख्या कलावंताचे दर्शन धडवलेत, मनःपूर्वक धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
प्रगती Fri, 07/25/2008 - 19:40 नवीन

फारच सुरेख लेख!

नेहमी प्रमाणेच तात्या हा लेख पण फारच छान आहे. तात्या तुम्ही खरंच भाग्यवान आहात अशा अलौकीक व्यक्तीचा सहवास तुम्हाला लाभला आणी तुमच्यामुळे आम्हाला पण अशा अज्ञात गुणी गायकाची ओळख झाली. "आमचे सांगितिक अनुभव आणि आम्ही पाहिलेली संगीताच्या दुनीयेतली माणसं राहू द्या आमच्यापाशीच" असं करु नका निदान आमच्यासाठी तरी तुमचे अमुल्य सांगीतिक अनुभव लिहा. :S
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 07/25/2008 - 19:50 नवीन

सुरेख व्यक्तिचित्रण

सुरवातीला स्क्रीनवर छायाचित्रे दिसली नाहीत म्हणून सांगायचे म्हणणार इतक्यात खाली स्क्रोल केल्यावर दिसली. अशा "यक्षांबद्दलची" माहीती जगाला करून देणे म्हणजे काही अंशी तरी त्यांच्या प्रतिभेला आणि तपश्चर्येला न्याय दिल्यासारखे वाटते.
  • Log in or register to post comments
व
वाटाड्या... Fri, 07/25/2008 - 19:56 नवीन

जाता जाता...

तात्या... नेहमीप्रमाणेच एका दिग्गज कलाकाराची ओळख करून दिल्याबद्दल शतशः धन्यवाद. कोणी काहीही म्हणो पण हा मिपावरचा संगीत यज्ञ बंद करू नका. बोलणारे बोलत असतात. आपण चालत रहाव. ह्या यज्ञातून आम्हा सारख्या नव विद्यार्थ्यांना काय ज्ञान मिळतं ते बाकी कोणाला काय कळणारं? उलट मी तर म्हणतो ह्या पुढे अजुन एक पायरी म्हणजे एक राग मालिका चालू करा, ज्यात एका एका रागाची यथोचीत माहीती व विश्लेषण (संज्ञेसकट) जी शास्त्रिय संगीत ऐकणार्याला व आवडणार्‍या प्रत्येकाला ज्ञानाचा सागर देईल. कदाचीत अशी मालिका जालावरची एकमेव व पहीलीच राग मालिका असेल व होवु देत. आपण फार नशिबवान आहात ज्याना अश्या मोठ्या लोकांचा सहवास (सांगितीक) लाभला. बाकी मुंबैच्या कलाकारांची माहीती आपण नेहमीच देता. पण माहीती म्हणुन पुण्याच्या आणि इतर ठिकाणच्या कलाकारांची माहीत पण टाकाना... आपलाच, मुकुल
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Fri, 07/25/2008 - 22:47 नवीन

मुकुल,

मुकुल, तात्यांनी रागाबद्द्ल आधीच लिहायला सुरवात केलीय, कितीतरी भाग प्रसिद्ध झालेत .. 'बसंतचे लग्न' नाही वाचलंत का? जरूर वाचा.. जालावरची पहीली राग मालिका आली आहे ऑलरेडी.. :) तात्या लेख खूप आवडला.. संगीतामधले फारसे कुणी माहीत नसल्याने या लेखमालेचा मला नक्कीच फायदा होतो.. बरीच माहीती मिळते.. तुम्ही प्लीज हे बंद करू नका.. भाईकाकांचेच एक वाक्य विसरलात का? किर्तनकाराने किर्तन सांगत जावे, ऐकायला कुणी आहे की नाही याची चिंता करू नये.. आणि हो, इथे कुणीच तुमचं ऐकायला विसरणार नाही, तेव्हा येऊदे अजुन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाटाड्या...
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 07/25/2008 - 19:56 नवीन

भेट आवडली.

तात्या, पुन्हा एकदा मोठ्या माणसाचा परिचय करुन दिला. संगीतक्षेत्रातील तुमचा परिवारच मोठा आहे, आज मधुभाईंच्या सहवासाचे क्षण, आणि ओळख वाचायला आवडली. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 07/25/2008 - 20:16 नवीन

असेच म्हणतो

या मोठ्या कलाकारांबरोबर तुमचा राबता आहे, आम्हाला आयतेच दर्शन आणि वाचनसुख.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
न
नंदन Sat, 07/26/2008 - 07:27 नवीन

सहमत

सरांशी सहमत आहे. लेख आवडला. मधुभाईंबद्दल, त्यांच्या गाण्याबद्दल अजून वाचायला आवडेल.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्राजु Fri, 07/25/2008 - 20:02 नवीन

तात्या,

एका अतिशय प्रतिभावान कलाकाराची ओळख करून दिलीत. सुंदर लेखन. वर्णन सुंदर. आणि फोटो पाहिल्यावर तर तुम्ही केललं वर्णन मधुभाईंच वर्णन किती अचूक आहे याची प्रचिती आली. धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 07/25/2008 - 21:58 नवीन

वा तात्या!

काय छान ओळख घडवलीत! अशा एकेक दिग्गजाकडे जावे त्यांच्या पायाशी बसून शिकावे, गप्पा कराव्यात, त्यांना एका वेगळ्या बाजूने समजून घेण्याचा प्रयत्न करावा हे किती जण करतात हो? तुम्ही करता आणि त्या अनुभवांचा थोडा वाटा आमच्या बरोबर वाटून देता म्हणून चांगले वाटते. आमचीही मधूभाईंशी तोंडओळख झाल्याचा आनंद होतो. आता हे नाव पुन्हा ऐकलं की हा लेख डोळ्यांसमोर येणार हे नक्की! चतुरंग
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 07/25/2008 - 22:01 नवीन

तात्या,

तात्या, एकदम मस्त लिहिले आहेत :) असलं दळण दळायला पण नशीब लागतं! लिहा अजून.
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Fri, 07/25/2008 - 23:49 नवीन

सुंदर!

लेख आवडला. जेवतानाचा फोटो तर मस्तच. फोटोतील मधुभाईंच्या चेहर्‍यावरील भाव, डॉ.दाढेंच्या ह्या ओळींची प्रचिती देतात.
एक दुर्लक्षित पण स्वतःच्याच मस्तीत वावरणारा स॑गीतातला बादशहा! आजही स्वर त्या॑च्या हुकुमतीत आहेत, व मधुभाई॑ची ती धु॑दी अजून ओसरलेली नाही.
-कोलबेर
  • Log in or register to post comments
च
चित्रा Sat, 07/26/2008 - 01:01 नवीन

असेच

म्हणते. फोटो आणि ओळख छान!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
न
नीलकांत Sat, 07/26/2008 - 00:42 नवीन

लेख आवडला

वाह अश्या अनोळखी लोकांबद्दल वाचायला आवडतं नीलकांत
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Sat, 07/26/2008 - 13:41 नवीन

हेच म्हणतो..

तात्याशेठ, वाह अश्या अनोळखी लोकांबद्दल वाचायला आवडतं लेख आय मीन दळण उत्तम..आवडले.. असेच वरचे वर लिहित रहा आय मीन दळत रहा.. (निवृत्त दळ्या)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत
प
पिवळा डांबिस Sat, 07/26/2008 - 07:25 नवीन

नेहमीप्रमाणेच छान लेख!

गजाननबुवांचे गायन लहानपणी एकदा कधीतरी गणेशोत्सवात ऐकल्याचे अंधुकसे स्मरते.... हो! त्यावेळी गणेशोत्सवात शास्त्रीय संगीतही गायले जात असे.....:) मधुकररावांना ऐकायचा योग कधी लाभला नाही... असो. फोटो टाकल्याने व्यक्तिचित्र अजून छान झाले आहे तात्या!! आपला, पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 07/26/2008 - 08:11 नवीन

नणंदीके बचनवा.. :)

या लेखात उल्लेख केलेली यमन मधली नणंदीके बचनवा सहे ना जाए... ही बंदिश इथे ऐका.. शशांक मक्तेदारने ही बंदिश गायली आहे. शशांकला पं उल्हास कशाळकरांकडून खूप चांगली तालीम मिळालेली आहे/मिळते आहे! शशांकचं गाणंही मला आवडतं, खूप छान गातो. आमचे मधुभाई तर इतकी सुरेख रंगवतात ही बंदिश की क्या केहेने...! अगदी नुसतं ऐकत रहावं, शिकत रहाव! नणंदीके बचनवा सहे ना जाए, सोच सोच कही ना जात हमसो उमंग उमंग असूवन बरसत नीर... ऐका मंडळी, किती सुरेख बंदिश आहे ही! या बंदिशीच्या सौंदर्याविषयी पुन्हा केव्हातरी... आपला, (ग्वाल्हेरप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 07/26/2008 - 09:32 नवीन

छान

लेख आवडला. फक्त एकच खंत मधुभाईंची एखादी तरी ध्वनिफीत चढवायला पाहीजे होती.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Sat, 07/26/2008 - 09:52 नवीन

सहजरावांशी सहमत!

लेख आवडला. फक्त एकच खंत मधुभाईंची एखादी तरी ध्वनिफीत चढवायला पाहीजे होती. अवांतर: शशांकचे गाणे ऐकून बापुसाहेब पलुस्करांची आठवण झाली. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
ध
धोंडोपंत Sat, 07/26/2008 - 13:30 नवीन

क्या बात है

क्या बात है!!! उत्तम कथन. तात्या लेख अप्रतिम झालाय हो. छायाचित्रामुळे अजून रंगत वाढलेय. मधुभाईंना आमचा दंडवत सांगावा. आपला, (नतमस्तक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
अ
अन्जलि Sat, 07/26/2008 - 14:11 नवीन

दळण

अहो आम्हाला तुमच्यामुळे कितितरि नविन माहिति मिळ ते. ज्याना त्याला दळ ण म्हणायचे असेल त्याना म्हणु देत पण आम्हि तर आनदाने वाचतो न. तुम्हि लिहित राहा. आमच्या नशिबि त्या थोर लोकान्चि प्रत्यक्श भेट नसेल पण तुम्च्यामुळे तो आनन्द तर मिळतो.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Sun, 07/27/2008 - 17:30 नवीन

मस्त लेख

आमच्या नशिबि त्या थोर लोकान्चि प्रत्यक्श भेट नसेल पण तुम्च्यामुळे तो आनन्द तर मिळतो हेच म्हणतो.... फोटोंमुळे एक पर्सनल टच असतो तुमच्या लेखांना.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्जलि
म
मनस्वी Mon, 07/28/2008 - 10:40 नवीन

छान

>> अहो आम्हाला तुमच्यामुळे कितितरि नविन माहिति मिळ ते. >> आमच्या नशिबि त्या थोर लोकान्चि प्रत्यक्श भेट नसेल पण तुम्च्यामुळे तो आनन्द तर मिळतो. हेच म्हणते. या ओळखीमुळे आमच्या माहितीत भरच पडते तात्या. असे अनेक उत्तमोत्तम अव्वल दर्जाचे कलाकार जगासमोर प्रसिद्ध न पावल्याने अनोळखीच रहातात. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्जलि
व
विसोबा खेचर Sun, 07/27/2008 - 17:40 नवीन

कालच,

कालच मधुभाईंची त्यांच्या शिष्यवर्गाने डोंबिवलीत गुरुपौर्णिमा साजरी केली. सगळा कार्यक्रम खूप छान झाला. पूजा आठवले, नुपूर काशिद, अपूर्वा गोखले, पल्लवी जोशी इत्यादी मधुभाईंच्या शिष्यांनी चांगले गायन सादर केले. पूजाने यमन, नुपूरने भूप, अपूर्वाने मालकंस तर पल्लवीने गौडमल्हार सादर केला. तिघीही जणी खूप छान गायल्या. अपूर्वाने मालकंस तर फारच सुंदर मांडला! त्यानंतर स्वत: मधुभाईंनी बसंतबहार आणि भैरवी सादर केली. केवळ अप्रतीम आणि शब्दातीत! त्यानंतर एका जिवलग मित्रासोबत कुंद पावसळी वातावरणात दोन घोट स्कॉचचे मारून मधुभाईंच्या बसंतबहारच्या धुंदीत घरी परतत होतो तेवढ्यात अमेरिकेहून मिपाकर कट्टेकरींचा फोन आला व त्या सर्वांशी बोलण्याचा आनंद मिळाला! एकंदरीत कालच दिवस एकदम मस्तमजेत गेला. परंतु घरी आल्यावर अहमदाबादच्या स्फोटांबद्दल कळले आणि सर्व आनंदावर विरजण पडले! असो..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा