Skip to main content

गुर्जीSSS……कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS

लेखक टवाळ कार्टा यांनी गुरुवार, 23/04/2015 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णा - https://www.youtube.com/watch?v=mz4bTkh9elg इशेश ईणंती - गुर्जी (http://www.misalpav.com/comment/685412#comment-685412) आमच्या गुर्जींनी (इथे कानाच्या पाळीला हात लावण्यात आलेला आहे) तांबिय संस्थानाच्या मठाधिपतीची वस्त्रे तूर्तास बाजूस ठेउन इतर कार्ये हाती घेतल्यानंतर प्रथमच जाहीर ईणंती केल्याने हे ईडंबन लिल्हे आहे अवधूत गुप्ते यांची माफी मागून… ---------------------------------------------------------- सकाळच्याSSS पारी मिळेना वाट होSSS…सकाळचे धुके फार घनदाट होSSS आपली माणसं आजूबाजु बसती…तरी कोणीतरीSSS बघण्याची भीती गुर्जीSSS...कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS
नवख्यांची आपसात...चाले नेत्रपल्लवी...पलिकडे त्यांचा कोपरा होताSSS... पलिकडे त्यांचा कोपरा होताSSS पुरे झाली ता...उगा शोधाशोधी...दगडात माझा जीव होता... दगडात माझा जीव होताSSS
गुदगुल्या नको म्हणुनीया टाळतो लवलवती पाती एकटेच बसावे...इथे नको साथी गुर्जीSSS...कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS
डुरडुरण्यावीणा व्यर्थ हे *गणं गुपचूप संपून जाई...गुपचूप संपून जाई...गुपचूप संपून जाई लगबग बाजूची...बघुनी समजलं...कुंथत इथ कोणी नाही...कुंथत इथ कोणी नाही...
प्रहरी सकाळी अन् सारखीच घाई...ओढी बीडी सगळे, धरुनी एका हाती पाण्याची ना-सक्ती, दगडाचीही प्रीती गुर्जीSSS…कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS

वाचने 23989
प्रतिक्रिया 109

प्रतिक्रिया

In reply to by टवाळ कार्टा

टवाळ बालका, विनोद हा विनोद म्हणून घे!! डू आयडींचं काय करायचं ते ठरवायला तो डू आयडीच आहे हे कसं ठरवायचं त्याचा विचार कर. असल्या टुकार गोष्टी ही तुझी ओळख होऊ नये असं वाटलं. बाकी तुझी इच्छा!!

In reply to by सूड

हाहाहा...ते समजले रे...बाकी जे कोणी हिच माझी ओळख असे पकडून चालणार असतील त्यांना आंतरजालावर कसे वागावे हे जरासुध्धा कळ्ळत नै :)

In reply to by टवाळ कार्टा

बाकी जे कोणी हिच माझी ओळख असे पकडून चालणार असतील त्यांना आंतरजालावर कसे वागावे हे जरासुध्धा कळ्ळत नै
अगदी!!

In reply to by जेपी

just like सूड
असं चारचौघात मान्य करायचं नाही म्हणून अगदी लिहीलं ना? ;)

In reply to by टवाळ कार्टा

चक्क सूड माझ्याशी सहमत
हो, वाद घालून तुझी कळ वाढवण्यापेक्षा म्हटलं सहमत व्हावं. म्हणजे हवा तो तांब्या घेऊन निघालास की मी नाक...आपलं डोळे किंवा दोन्ही मिटायला मोकळा!!

वरील प्रतिसादाशी सहमत.

याच अशा वेळी याच अशा अवस्थेत एखादी म्हैस द्रुतगतीने आपल्याकडे चाल करुन येऊ लागल्याचा अनुभव कोणाला आहे का? अनुभव आणि उपाय, दोन्ही एकातच साधते. असो. हल्ली कोण खेडेगावात जातो हे अनुभव घ्यायला..?

९९

In reply to by सूड

ताब्यांचे प्रकार आणि उपप्रकार ठरवण्यासाठी पेशल कमिटी 'बसवली' आहे. ;) तिचं काम उरकलं की आलेल्या रिपोर्टवरून कोणता तांब्या योग्य ते ठरवता येईल. :)

In reply to by नाखु

"गुर्जींचे परममित्र" हा मिसळीच्या पाककृतीतलाच एक जिन्नस आहे...त्यामुळे तो नसेल तर मिसळ बनत नाही...तस्मात मिसळीची भूक लोणावळ्याच्या बुवा मिसळीवर भागवावी म्हणतो

गुड मॉर्निंग पथक दाखल झालय...मिपावर