✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

उप-वास स्पेशलः-साबुदाणा खिचडी....

अ — अत्रुप्त आत्मा, Mon, 08/29/2011 - 14:45
ह्या कवितेच (आ)जन्मस्थळ म्हणजे आमचा धंदा-भिक्षुकी उर्फ भटजीगिरी...विशेषतः श्रावण ते (नाकी)नवरात्र या कालावधीत आंम्हा भटजींवर या खिचडीचा जो मारा होतो,त्या---होय...होय..त्याच वेदनेतुन ही कविता प्रसवली आहे...म्हणजे हीचं आमच काही वैर नाही,पण,''त्रास होतो हो हीचा(म्हणजे खिचडीचा ;-))''...असं प्रामाणीक पणे सांगूनही,,,नाही नाही गुरुजी आंम्हाला बंरं वाटावं म्हणुन खा...खा...खा...अंसं काखा वर करुन ठ्ठो ठ्ठो ठ्ठो करत कस्टमर सॉरी सॉरी यजमान मागे लागतात...आणी आंम्हाला कारणं देता देता पळता भुई थोडी होते,,,एरवी ही बया आंम्हाला अवडत नाही असं कुठाय?मी तर माझ्या या मुळातल्या प्राणप्रीय परंतु अतीपरीचयात अवज्ञा झालेल्या या खिचडीला पहीली सलामी एका श्लोकाच्या ओळीच्या विडंबनातूनच दिली होती-म्हणजे,,, ''विश्वाधारं गगन सद्रुशं मेघवर्णं शुभांगम'' असं आहे की नाई,त्याला ''साबुदाणं रबर सद्रुशं श्वेतवर्णं च्युईंगम''...असं मी चावलं होतं ;-)...असो अता जास्त च्यावच्याव न करता उरलेलं कवीतेवर सोडतो---तर श्रोतेहो खिचडी करीता वाहातो,ही शब्दांची खिचडी....................(ही आमची पारंपारीक-गुरुजी/यजमान म्याच आहे.) यजमानांनी विचारलं-उपास...? जरा खिचडी देऊ का? चपला घालतच म्हणालो त्या पेक्षा मी येऊ का? का हो?तुंम्ही गुरुजी.. आणी खिचडीला भिता? अहो,वाचायला फार सोपी ही पचायला अवघड गीता अहो,मस्त दही टाका मजबुत दाबून हाणा.. म्हणजे नंतर सहा तास पोटात गोळे आणा? जुने गुरुजी मजबुत खायचे... एक/दोन प्लेट?...विसरा पूर्वीच्यांना उद्योग ठेवलावतात का खाण्यापलीकडे...दुसरा? पूर्वीचे गुरुजी कामं करुन पराती करायचे फस्त अहो,जुना स्कुटरचा काळ तो एव्हरेज पेक्षा इंधन जास्त जाउ दे गुरुजी आता.. राग विसरा..हट्ट सोडा कालची खिचडी पचायला आधी आणा १ सोडा अशा तह्रेनी आंम्ही यजमानांचा १प्लेट अपराध पोटात घातला पण नंतर दिवसभर... तो आमच्या पोटात उतला श्रावणाचा संपत सोमवार आंम्ही या खिचडीवर सोडला आणी यजमान/गुरुजी नववादाचा अजुन एक नारळ फोडला..... :-)

प्रतिक्रिया द्या
24235 वाचन

💬 प्रतिसाद (63)

वपाडाव यांच्या...

अत्रुप्त आत्मा
Tue, 08/30/2011 - 23:19 नवीन
शलुटचा विनम्रपणे स्वीकार करण्यात येत आहे......... :-) धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

गुरूजी आमचे दंडवत आहे

पाषाणभेद
Wed, 08/31/2011 - 00:19 नवीन
गुरूजी आमचे दंडवत आहे तुम्हाला. मस्त रेखाटलीय कविता
  • Log in or register to post comments

हाहाहा.. आता कळलं!

मयुरा गुप्ते
Wed, 08/31/2011 - 01:20 नवीन
गुर्जी कविता छान आहे. घरात वास्तुशांतीची पुजा केलेली, गुरुजीं करता साबुदाणा खिचडी व इतर नातेवाईकांकरता पोहे..नंतर नातेवाईकांनी येउन सांगितले खिचडी छान झालेली आणि गुरुजी म्हणाले पोहे छान झाले होते..तेच म्हंटलं गुरुजींना चॉईस दिल्यावर पोह्यांचा नंबर लागला. तेव्हा कळलं नव्हतं पण आता संदर्भ लागतोय... --मयुरा.
  • Log in or register to post comments

सर्व प्रतिसादकांसी पुन्हा

अत्रुप्त आत्मा
Wed, 08/31/2011 - 12:19 नवीन
सर्व प्रतिसादकांसी पुन्हा एकवार धन्यवाद..........:-)
  • Log in or register to post comments

रेवाक्कांच्या खफ. वरिल

अत्रुप्त आत्मा
Fri, 07/15/2016 - 10:29 नवीन
रेवाक्कांच्या खफ. वरिल विणंतीस मीण देऊन , साबुदाणा पुन्हा तळायला वर काढत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

खिचडीबरोबर ताक हवेच तेव्हा ते

प्रचेतस
Fri, 07/15/2016 - 10:39 नवीन
खिचडीबरोबर ताक हवेच तेव्हा ते ताकाचं लपविलेले भांडे पण वर काढा अता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

भांड्याबरोबर सायही यायला

किसन शिंदे
Fri, 07/15/2016 - 10:43 नवीन
भांड्याबरोबर सायही यायला हवीये, तस्मात ती ही वर काढा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

होय

नाखु
Fri, 07/15/2016 - 11:51 नवीन
साय आली की भाय ही येईल वडाच्या सावलीला धरून !! अखिल मिपा वाचक ते वेचक एक वाचनीय चळवळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

साय?

टवाळ कार्टा
Fri, 07/15/2016 - 12:20 नवीन
साय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

तुला साय माहीत नाही?

सूड
Fri, 07/15/2016 - 16:25 नवीन
तुला साय माहीत नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

छाण तळलात साबुदाणा, सगळ्यांनी

अत्रुप्त आत्मा
Fri, 07/15/2016 - 16:52 नवीन
छाण तळलात साबुदाणा, सगळ्यांनी! Image removed. दू दू दू दू दू! खौट! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

कविता वर काढल्याबद्दल धन्यवाद

रेवती
Fri, 07/15/2016 - 10:53 नवीन
कविता वर काढल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

:)मस्तं!

पद्मावति
Fri, 07/15/2016 - 20:11 नवीन
:)मस्तं!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा