Skip to main content

लग्नाचा बाजार

लेखक वाल्मिक यांनी बुधवार, 06/07/2016 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
इथे किती लोकांना स्वतः स्वतःसाठी वर / वधू संशोधन करायचा प्रसंग आलाय शादी ,वगैरे प्रोफिले टाकल्यावर मला येणारे हमखास अनुभव 1) तुमचं प्रॉपर्टी किती आहे 2) तुमचं तुमचं घरच्यांना येऊन घरी यावे लागेल मगच बोलू 3) चुकून request accept केली 4) सकाळपासून 50 call आले 5) अहो तुम्ही सॉफ्टवेअर आहेत मग स्वतःचा फ्लॅट नाही ? 6) आधी कुंडली बघू ,मग नाडी,मग नातेवाईक ,मग बोलू 7) तुमचे अजून 10-12 फोटू टाका आणि सर्वात भयानक 8) मुलाच्या छातीवर केस पाहिजे

वाचने 40506
प्रतिक्रिया 225

प्रतिक्रिया

अनुरूप हवे स्थळ, तर भावकीतंच करा की शोध घेण्यापेक्षा. अनुरूपता नकारात्मक प्रतिक्रिया झाकण्यास उपयोगी, मराठी अस्मिता सारखे. शोधले की सापडते वाली नाहीं बरं का! योग जुळत नाहीं - हे मोघम. बाकी -बेचा हुआ माल वापिस नहीं लिया जाता - असल्याने नीट तपासून घेणारी सून अभिनंदनीय, कधीही, मधुचंद्रापर्यंत.

लोकहो, >> 8) मुलाच्या छातीवर केस पाहिजे ही अट वाचून मन प्रसन्न झालं. समाजात सभ्यपणा आजूनही टिकून आहे हे कळून चुकलं आणि जीव भांड्यात पडला. योग्य ठिकाणी थांबल्याबद्दल वधूपक्षाचं अभिनंदन. आ.न., -गा.पै.

In reply to by वाल्मिक

वाल्मिक, सगळं उलगडून सांगू म्हणता? अहो, मुलीकडच्यांना पॉर्नस्टार नकोय असं म्हणायचं होतं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मुलीकडच्यांना पॉर्नस्टार नकोय असं म्हणायचं होतं.
छातीचे केस व पॉर्नस्टारचा काय संबंध? आजकाल पुरूष बॉडीबिल्डर, अभिनेता (ए ग्रेड म्हणतोय) किंवा मॉडेल्स देखील अंगावरचे केस सर्रास काढतात.

In reply to by गामा पैलवान

आपण पॉर्न असे बारिकपणे बघता का ?? . पॉर्नस्टार बनण्यासाठी छातीवर केस नसणे ही अट आहे का ? आपला अभ्यास बघून धान्य झालो ( की आपण अर्ज केला होता ?) ( कृपया हे गमतीने घेणे . जर गंभीर असेल तर बाकिचंग्यांना पण पॉर्नस्टार कसे बनावे याचे मार्गदर्शन करणे ) आपला विनम्र , हे

In reply to by हेमन्त वाघे

हेमंत वाघे, अहो, मुलीकडचे लोक अशा नीलफिती बघतात की ज्यांच्यातले स्टार लोकं पार गुळगुळीत झालेले दाखवतात. ;-) आ.न., -गा.पै.