Skip to main content

सातकापे aka सातकप्पे घावन

लेखक यशोधरा यांनी गुरुवार, 18/02/2016 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारा वेळ: ३० मिनिटे लागणारे जिन्नस: घावन बनवण्यासाठी - २ वाट्या तांदूळ पिठी, २ वाट्या नारळ पाणी आणि चवीसाठी मीठ सारण बनवण्यासाठी - १ वाटी खवलेले खोबरे, साधारण अर्धा ते पाऊण वाटी गूळ, अर्धा चमचा वेलची पूड १ टेस्पू खसखस तेल घावनासाठी आणि तूप सारण बनवण्यासाठी. क्रमवार पाककृती: १. प्रथम गॅसवरील पातेल्यात १-२ चमचे तूप घालून त्यात खोबरे, गूळ, वेलची पूड, खसखस हे एकत्र करुन सारण बनवून घ्या व थंड करायला ठेवा. २ .घावनासाठी पीठ तयार करताना तांदळाच्या पिठीमध्ये नारळपाणी घालत हलवत रहा, कुठेही गुठळ्या राहणार नाहीत असे पहावे. चवीपुरते मीठ घालावे. ३. तवा गरम करुन त्यावर आधी तेल सोडावे व त्यावर घावनाचे पीठ घालावे (डोश्याप्रमाणे) बाजूने तेल सोडावे. ४. घावन खालून सुटू लागले की त्यातील अर्ध्या भागात सारण पसरावे व उरलेला अर्धा भाग त्यावर उलटून झाकावा. - १ ला कप्पा ५. रिकाम्या अर्ध्या भागात आता पुन्हा घावनाचे पीठ घालावे व तो भाग शिजत आला की त्यावर सारण पसरुन, आधीचा कप्पा त्यावर उलटावा - २ रा कप्पा. असे ७ कप्पे होईतोवर करायचे व सातवा कप्पा झाला की खाली उतरवायचे.. aa थंड झाले की गट्टम् करायचे! कोणी केले तर प्लीज फोटो टाका.

वाचने 26423
प्रतिक्रिया 72

प्रतिक्रिया

In reply to by अभ्या..

ते जे काही थर दिसतायेत दोज आर कप्पेज, आय ह्याव कट इट सो द्याट कप्पेज आर व्हिजिबल. याउपर शंका असतील तर पुण्यात या, करुन खायला घालू. =))