Skip to main content

सातकापे aka सातकप्पे घावन

लेखक यशोधरा यांनी गुरुवार, 18/02/2016 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारा वेळ: ३० मिनिटे लागणारे जिन्नस: घावन बनवण्यासाठी - २ वाट्या तांदूळ पिठी, २ वाट्या नारळ पाणी आणि चवीसाठी मीठ सारण बनवण्यासाठी - १ वाटी खवलेले खोबरे, साधारण अर्धा ते पाऊण वाटी गूळ, अर्धा चमचा वेलची पूड १ टेस्पू खसखस तेल घावनासाठी आणि तूप सारण बनवण्यासाठी. क्रमवार पाककृती: १. प्रथम गॅसवरील पातेल्यात १-२ चमचे तूप घालून त्यात खोबरे, गूळ, वेलची पूड, खसखस हे एकत्र करुन सारण बनवून घ्या व थंड करायला ठेवा. २ .घावनासाठी पीठ तयार करताना तांदळाच्या पिठीमध्ये नारळपाणी घालत हलवत रहा, कुठेही गुठळ्या राहणार नाहीत असे पहावे. चवीपुरते मीठ घालावे. ३. तवा गरम करुन त्यावर आधी तेल सोडावे व त्यावर घावनाचे पीठ घालावे (डोश्याप्रमाणे) बाजूने तेल सोडावे. ४. घावन खालून सुटू लागले की त्यातील अर्ध्या भागात सारण पसरावे व उरलेला अर्धा भाग त्यावर उलटून झाकावा. - १ ला कप्पा ५. रिकाम्या अर्ध्या भागात आता पुन्हा घावनाचे पीठ घालावे व तो भाग शिजत आला की त्यावर सारण पसरुन, आधीचा कप्पा त्यावर उलटावा - २ रा कप्पा. असे ७ कप्पे होईतोवर करायचे व सातवा कप्पा झाला की खाली उतरवायचे.. aa थंड झाले की गट्टम् करायचे! कोणी केले तर प्लीज फोटो टाका.

वाचने 26423
प्रतिक्रिया 72

प्रतिक्रिया

कोणी केले तर प्लीज फोटो टाका. काय हे मिपा वरच्या निलम गोर्‍हे ताई... हे म्हणजे फक्त "लिहुन दाखवले" असे झाले की ! :प

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- आय लव्ह यू... :- Maha-Sangram


In reply to by यशोधरा

मिपा वरच्या निलम गोर्‍हे ताई यात तुम्ही स्वंपाकिय राजकारण आणु नका ! =))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- आय लव्ह यू... :- Maha-Sangram


प्रकार दिसतो आहे , पण किचकट प्रकार दिसतोय. पेशन्स आणि वेळाचे काम दिसतेय. चव मस्तच लागत असेल.. स्वाती

एका घावनाच्या ७ घड्या? म्हणजे मूळ घावनाच्या १/१२८ पट????? फोटो द्या बॉ. विश्वास नाय बसत ह्या पाकृवर.

In reply to by सुनील

राजे घड्या नाही घालायच्या, पहिली घडी घालून जी रिकामी जागा उरेल त्यात पीठ पसरवायचं; मग त्यावर साऱण पसरुन पुन्हा घडी, पुन्हा उरलेल्या अर्ध्या जागेत घावनाचं पीठ, असं सात वेळा.

प्रचंड निराश झालो. यशोधरा काकूकडून अशी अपेक्षा नव्हती. :( -दिलीप बिरुटे

हुश्श! रेकॉर्ड फोटोग्राफ्स फक्त. कलात्मक मूल्य वगैरे शोधायला जाऊ नये प्लीज!

In reply to by सूड

प्रत्येक कप्प्याचा फोटो नाही काढाला आहे सूड. शेवटच्या फोटोमध्ये दुमडलेले ७ कप्पे पूर्ण झालेले आहे. बाकी इतर फोटो घावन कसे बनवायचे त्याची कल्पना यायला दिले आहेत फक्त.

In reply to by यशोधरा

आता कॉम्प्लेक्स आला. बघू आमची मजल किती कप्प्यांपर्यंत जाते. पीठी आहेच, एक नारळ आणावा लागेल.

साहित्य उकडीच्या मोदकाचे असल्याने चवही तशीच लागेल असा अंदाज आहे. हे प्रकरण जरा सुगरणींचं काम आहे असे वाटतय. फोटू अजून दिसला नाहीये.

एक नंबर पाकृ. अशा पारंपारिक कोकणी पाकृ खायला असतील तर स्वर्ग नको बघायला. बांदा पत्रादेवी ला भालेकरच्या महालक्ष्मी हॉटेलसमोर आधीपासून सावली नावाचे फक्त तऱ्हेतऱ्हेचे घावन देणारे हॉटेल आहे. तिथे रसातले आणि असे पुरणाचे ४ घड्यांचे घावन खाल्लेत. करायचा प्रयत्न केला नाही कधी.

In reply to by पैसा

ए बायांनो, साधं सरळ आमटी भाजी पोळी भात करायला काय जीवावर येतं गं तुमच्या? इथे बसुन सँडविच घशाखाली उतरत नाही मग ! करुन बघणार आणि काम वाढवल्याबद्दल यशो चा निषेढ करत खाणार.. गुडघे दुखतात आताशा पोरींनो.. तरी म्हणाल म्हातारीला या वयात खायचा किती तो सोस ! ;)

सगळ्यांचे आभार! फोटो नाहीत अशी ज्यांची तक्रार होती, तिचे निराकरण करण्यासाठी खास घावन बनवून फोटो टाकले आहेत.

पण बराच किचकट दिसत आहे. आम्हाला धड एक ऑम्लेट पण करता येत नाही, ह्या घावनाच्या मागे कोण लागणार?

In reply to by मुक्त विहारि

घावनाच्या मागे कशाला लागताय? मुवि काकुंच्या मागे लागा घावनं हवीत म्हणुन ;) आपोआप मिळतील.

In reply to by स्रुजा

हा तुमचा भ्रम आहे. तिच्या मागे ह्या गोष्टी साठी लागलो तर ती बर्‍याच अटी घालते. १. घावने मिळतील पण चटणी तुम्हालाच करावी लागेल. २. घावन खाल्यानंतर तिला माझ्याच हातच्या वड्या हव्या असतात. ३. ज्या दिवशी घावने असतील, त्या दिवशी २-३ तास मिपा-मिपा खेळायचे नाही. आणि ४. त्या महिन्यात कुठलाही कट्टा करायचा किंवा कट्टा आखायचा बेत करायचा नाही. ह्या अशा अटी पाळण्यापेक्षा, आम्ही आपले जसे जमेल तसे ऑम्लेट करून घेतो.

करायला पायजे.. एक प्रश्न-तांदळाची पिठी मंजे तांदुळ भिजवुन,वाळवुन ,,पीठ तयार करतात ते का ? का काही वेगळे?

In reply to by जेपी

पीठी म्हण्जे दळलेले तांदूळ. तुमचे घाटावरचे लोक नै का पानाच्या टपरीला पानाचा ठेला म्हणतात तसं आम्ही कोकणात तांदळाची पीठी म्हणतो. म्हणजे जरा अलंकारिक वाटतं.

मेरे डोस्केमे क्या शिराच नै. कैसे घाव्न, कहा दुमडनेका, किदर कप्पे बनानेका और कैसे तवेपर रखनेका. :( जरा ऑरिगामी स्टैल मे बताती क्या आपा?

मी फोटो पाहिले नाहीत, मी लेखही वाचला नाही. मी निषेधसुद्धा साधा, इथे नोंदवलेला नाही!

यशो, मी केलं. झकास झालं. पण तू फोटोत दाखवलं आहेस त्यापेक्षा थोडंसं जाड झालं बहुतेक. पण सगळ्यांनी हाणलंय दाबून. म्हणून खूष आहे मी. :) आता ती रसपोळी की काय ती सांग कशी करायची ते...

In reply to by सविता००१

अरे वा! मस्त! फोटो टाकायचास ना :) सात घड्या एकमेकींवर आल्या की जरा जाड होईलच. तुम्हां सगळ्यांना आवडलं हे वाचून आनंद झाला :)

केलं पण जमणार आहे की नाही हे माहीत नव्हतं ना... आणि नंतर हातातोंडाची गाठ पडली. कसला फोटो न कसलं काय :)

पाकृ समजून घ्यायलाच ७ दिवसाच्या वर लागत आहेत.....सात घड्या काय कप्पाळ जमणार. आयते करुन घालशील का?? येत्या जून मधे येतोय...बाकि पाकृ अनवट आणि फोटो फर्मास.

हे करुन पाह्यले ह्या शन्वारी.. फक्त एक चीटिंग केली, ते नारळाचं पाणी वैगरे घाट न घालता घरात असलेलं डोशाचं पीठ घेतलं. saatakpe1 saatakpe2