Skip to main content

मुग-बटाटा कटलेट्स

लेखक गौतमी यांनी मंगळवार, 12/07/2016 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारा वेळ: २० मिनिटे लागणारे जिन्नस: १ वाटी मुग (अर्धवट वाफवलेले) १ते दिड बटाटा वाफवुन आलं-लसुण - हिरवी मिरची पेस्ट आवडीप्रमाणे अर्धा कप / आवडीनुसार कोथिंबीर बारीक चिरलेली १ चमचा लाल तिखट थोडीशी हळद १ ते २ चमचे लिंबाचा रस मीठ बाईंडींगसाठी भाजलेले पोहे मिक्सरमध्ये बारीक करुन तेल क्रमवार पाककृती: रेसिपी एकदम सोप्पी आहे. मुग वाफवुन घेऊन थोडेसे क्रश करुन घ्यायचे. यात वाफवलेला बटाटा मॅश करुन मिक्स करा. आता यात वर दिलेले सगळे मसाले आवडीनुसार टाकुन एकत्र मिस्क करा तसेच बाईंडींग साठी भाजलेल्या पोह्यांची पुड टाकुन सगळे मिश्रण एकजीव करुन त्याचे लहाल लहान चपट्या आकाराचे कट्लेट्स तयार करुन घ्या. एका फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करुन त्यात हे कटलेट्स गोल्डन ब्राऊन रंगात शॅलो फ्राय करुन घ्या. गरम गरम अस्तानाच चटणी किंवा सॉस बरोबर गट्ट्म करा. 1 2. 3

वाचने 23761
प्रतिक्रिया 46

प्रतिक्रिया

In reply to by सूड

सूड,असं काय बरं. त्यांना आवडेल त्याच पाककृतीवर ते प्रतिसाद देणार ना!ते प्रतिसाद देत नसले तरी पाककृती वाचत असतीलच. आखिर पापी पेटका सवाल है.जेवत तर असतीलच ना!

मस्त

यात अजून थोडा हेल्दीनेस आणण्यासाठी आपण बटाट्याऐवजी रताळ्याचा किस किंवा कच्ची केळी उकडून वापरली तर ?आणि हो ब्रेडक्रम्स ऐवजी पोह्यांचा चुरा वापरण्याची आयडिया आवडली.टेक अ बो गौतमीतै :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

@ आत्मुस मग घरची वाट धरून कारभारणीला सांगा व जरा बनवायला ;) न आमालाबी बोलवा चा पाण्याला :) बाकी कटलेट यम्मी हा :)

भाजलेल्या पोह्याच्या पिठाचे प्रमाण काय ? (१ वाटी मुग व १ते दिड बटाटा साठी ) कृपया प्रमाण वाटी-प्रमाणे सांगणे.

सोपी आणि चविष्ट पाककृती

छान पाकॄ आणि मस्त फोटो. स्वाती

पाककृती आवडली. -दिलीप बिरुटे

मस्त दिसताऐत क्रीस्पी

कधी नव्हे ती मिपावरील सोपी पाककृती पाहुन आमच्याकडे प्रयत्न केला गेला आहे. अर्थात कोणाचा तरी फोर्स होताच करा म्हणून. मस्त लागलेत. कुरकुरीत झालेत. मंडळ, आभारी आहे. :) -दिलीप बिरुटे

In reply to by कंजूस

काका, गौतमी अशीच सोपी पाकृ देतील तर गटारीही साजरी करू. :) दिलीप बिरुटे

मस्त.. मागे एकदा अशीच पाकृ आली होती .. ती वाचून लगेच करुन पाहिले होते, खूपच छान झाले होते. आणि बरेच पटकन होतात म्हणून विशेष आवडले :)

करुन पाहिले. उत्तम ब्रेकफास्ट झाला. अॅडिशन म्हणजे धनेजिरे पावडर आणि कोथिंबीर. उत्तम चव. धन्यवाद. तव्यावर: तयार:

मस्तच रेसेपी!! माझ्याकडून पोहे जास्त झाले की हमखास होणारा पदार्थ! मी पोहे मायक्रोवेव्हमध्ये अजुन गरम करुन घेते म्हणजे ते मऊ होतात आणि मग त्यात बटाटा आणि इतर भाज्या घालुन कटलेट करते. पोहे उत्तम बाईंडिंग करतात, ब्रेडची गरज अजिबात पडत नाही हे महत्वाचं.