थोडी अनिच्छा, किंचित हूरहूर, जराशी धास्ती अशा सगळ्या मिश्र भावनांच्या नादात ती कॅफे कॉफी डे च्या दारात उभी होती. शेलाटा बांधा, पाठीवर रुळणारे केस आणि साधासाच पण सुंदर चुडीदार-कुर्ता. नजर शोधत होती विवाह मंडळाच्या वेब साईट वर प्रोफाईलमध्ये पाहिलेल्या चेहेर्याला. एंजिनीयरिंगच्या अखेरच्या सेमिस्टरची जेमतेम सुरूवातच झालेली असतांना आई-वडिलांनी भरीला घालून स्थळं शोधायला सुरूवात केल्याचा किंचित राग होताच, पण या देखण्या मुलाने तरूण वयात मिळवलेल्या व्यावसायिक यशाची माहिती आणि कुटुंबाविषयीची चांगली माहिती अशा दुहेरी positives चा विचार करून 'भेटायला काय हरकत आहे, पुढचं पुढे' अशी घरी चर्चा झाल्यावर आज इथे भेटायचं ठरलं होतं.
तो अपेक्षित चेहेरा कॅफेमध्ये दिसला नाही. तशी ती ट्रॅफिक अपेक्षेपेक्षा कमी असल्याने पाच - एक मिनिटे आधीच पोहोचली होती. 'बाहेरच थांबावं' असा विचार करून ती परत फिरली इतक्यात तो दिसला. कुणा मित्राच्या मोटरसायकलवरून उतरून रुबाबदार चालीने तो रस्त्यावरून फूटपाथवर आणि तिथून कॅफेकडे येत होता.
जवळ येताच त्याने किंचित हसून विचारलं, "लीना नं?"
"हो, आणि तू चिन्मय, right?"
"Right! सॉरी, मी आधी पोहोचायला हवं होतं, पण मित्र मला सोडणार होता त्याला वाटेत थोडं काम होतं, फार वेळ नाही ना थांबायला लागलं?"
"नाही, नाही! मीही ही आताच येतेय."
"ओ, ओके, बाहेरच बसुयात की आत?"
तिने क्षणभर विचार केला, बाहेरच्या खुर्च्यांकडे पाहिलं, रस्त्याकडे एक नजर टाकली, आणि मग आत पाहिलं, "आतच बसुयात का?"
"Sure, let's go." तिला पुढे होण्याची संधी देत तो किंचित मागे घुटमळला. तिने आत प्रवेश करता करता हातातल्या मोबाईल फोन वर बोलत आतून घाई-घाईने बाहेर येणार्या एक तरुण अनपेक्षितपणे तिला सामोरा आला. त्याची धडक सरळ तिलाच बसली असती पण अखेरच्या क्षणी चिन्मयने तिच्या मागून हात घालून त्या तरूणाला हात लांबवून थांबवलं, "जरा देखा करो, यार! You've got to be careful!" तोल सांभाळता सांभाळता त्या धक्क्याने लीना त्याच्या अंगावर रेललीच, पण चिन्मयने मागून दुसरा हात पाठीवर ठेवत तिला आधार दिला.
त्या तरुणाने हातातला फोन बाजूला करत लीनाची माफी मागितली, "Really sorry! I wasn't looking while rushing, didn't mean to bother you, I am really sorry!" क्षणार्धात घडलेल्या या प्रसंगातून सावरत लीनाने त्याला म्हंटलं, "It's OK."
त्या दोघांना आत येऊ देत तो तरूण बाहेर गेला. आत गेल्यावर डावी़कडच्या एका टेबलकडे लीना आणि चिन्मय वळले, तिने रस्त्याकडे पाठ असलेली खुर्ची निवडल्यावर समोरच्या खुर्चीत चिन्मय बसला.
"चिन्मय, Let me be tell you something right away, माझी ही पहिलीच वेळ आहे असं कुठल्या 'स्थळा'शी संबंधित मुलाशी भेटण्याची....तेंव्हा माझा अनुभव शून्य आहे!"
तो दिलखुलास हसला, आणि म्हणाला, "No worries! माझीही चौथीच आहे, त्यामुळे फार काही टेन्शन घेऊ नकोस! तू बिनधास्त बोल. याआधी तीन वेळा हा अनुभव घेतल्यावर माझ्या एक लक्षात आलंय की एकदा आपण विवाह मंडळात वगैरे नोंदणी केली की शेवटी हे एक प्रकारचं स्वयंवर आहे, open market! मनं जुळणं वगैरे पुढच्या गोष्टी, तोपर्यंत कुणी कुणाच्या प्रामाणिक प्रश्नांचा राग-लोभ मानून घेण्यात काही अर्थ नाहीये, तेंव्हा तू तुला हवं ते विचार, मी मला विचारावसं वाटतं ते विचारेन. Fair enough?"
ती हसली, आणि थोडीशी सैलावली. दोघांनी मागितलेली कॉफी आल्यावर तिने त्याला त्याच्या शिक्षणाविषयी, नोकरीविषयी प्रश्न विचारून त्यांची उत्तरे प्रोफाईलशी जुळतात की नाही त्याची मनातल्या मनात नोंद घेतली. त्यानेही तिच्या शिक्षणाविषयी विचारून थोडंफार तसंच केलं असावं. मग तो म्हणाला, "तुला खरंतर आणखी काही महिने थांबायचं होतं म्हणालीस ग्रॅज्युएशन संपेपर्यंत, मग आता कशी तयार झालीस भेटायला?"
"स्पष्टच सांगायचं तर आई-बाबांनी फारच आग्रह केला म्हणून! निदान ग्रॅज्युएशन संपेपर्यंत लग्नाला उभं रहावं लागणार नाही ही अपेक्षा आहे माझी. तो पर्यंत स्थळं पाहून, ठरवण्यात, साखरपुडा होण्यासाठी वगैरे काही महिने लागतीलच तेंव्हा हरकत नाही असा विचार केला."
"Fair enough," तो म्हणाला.
कॉफी संपेपर्यंत आणखी दहा-एक मिनिटे बोलले असतील ते, एकमेकांच्या अपेक्षा, कुटुंबातील वडिलधार्यांच्या अपेक्षा, वगैरे; पण हळू-हळू त्याचं बोलण्यातलं लक्ष कमी झालंय, बोलण्यात किंचित असंबद्धपणा आलाय असं तिला वाटलं. इतक्यात त्याचा मोबाईल वाजला, "May I..?" त्याने विचारलं. "Sure! Please go ahead!" ती म्हणाली. फोनवर बोलतांना त्याची नजर तिच्या मागून रस्त्याकडे होती. वेळ घालवायला ती इतरत्र पहायला लागली तशी तिची नजर त्याच्या पाठीमागच्या आरश्यावर आणि त्यातून दिसणार्या रस्त्यावरच्या गोष्टींकडे गेली. तितक्यात चिन्मयने फोन खिशात ठेवला आणि म्हणाला, "मला निघायला हवंय, काही अर्जंट काम निघालंय, do you mind if I pay for our coffee and leave?"
"Sure! बिल तर देशीलच तू, पण आणखीही एक गोष्ट दे."
त्याने तिच्याकडे पाहिलं.
"बाहेर रस्त्यावर तुझा तो मित्र उभा आहे ना? त्याचा फोन आणून दे मला!"
चिन्मय आ वासून पाहत होता.
"खरंतर दोघे मित्र उभे आहेत, हो ना?"
चिन्मय काहीच हालचाल करीत नाहीये हे पाहिल्यावर लीना त्याला म्हणाली, "तुला फोन आला तो त्या दोघांपैकी एकाचा, हो ना?" त्याच्या नजरेत मूक होकार दिसल्यावर ती म्हणाली, "मला धक्का मारून जाणारा तुझाच मित्र, आणि त्या धक्क्याने मी पडत असतांना तू मला मागून विळखा घालतांनाचा व्हिडिओ फोनवर काढणाराही तुझाच मित्र, हो ना?" आता चिन्मयचा चेहेरा पहाण्यासारखा झाला होता.
"मुकाट्याने तो फोन आणून तो व्हिडिओ माझ्यासमोर डिलीट कर! आत्ता!" तिचा आवाज वाढला. आजूबाजूचे लोक पहायला लागले तसं त्याने खिशातून फोन काढून मित्राला बोलावून घेतलं.
"लग्नासाठी कुणा पुरूषाला भेटायची माझी ही पहिली वेळ असेल, पण भान सांभाळायला लागण्याची पहिली वेळ नक्कीच नाही! दुर्दैवाने! पण तुझ्यामागच्या आरश्याने मला वाचवलं आज. तो व्हिडिओ तर डिलीट करशीलच तू माझ्यासमोर, पण तुझ्या आई-वडिलांबरोबर माझ्या घरी येऊन क्षमा मागणार आहेस. पोलिसांत तक्रार द्यायची की नाही ते आम्ही नंतर ठरवू."
वाचने
9601
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय ट्विस्ट आहे! फारच छान कथा
+१
In reply to काय ट्विस्ट आहे! फारच छान कथा by एस
आवडली.
प्रामाणिकपणे सांगायचं तर
फ्रस्ट्रेट झाला असेल.
In reply to प्रामाणिकपणे सांगायचं तर by धनंजय माने
हा शुद्ध हलकटपणा आहे मोदक.
In reply to फ्रस्ट्रेट झाला असेल. by मोदक
तो खरं बोलतोय हे तुम्ही गृहीत धरताय मानेसाहेब.
In reply to प्रामाणिकपणे सांगायचं तर by धनंजय माने
कमाल ट्विस्ट !! मस्त च.
+१
In reply to कमाल ट्विस्ट !! मस्त च. by स्रुजा
त्या मुलाचे आईबाबा त्या
सहीच शेवट... पण तो अस का वागत
शेअर केल्यावर समजलं ना तो काय करतोय ते.
In reply to सहीच शेवट... पण तो अस का वागत by शि बि आय
आता समजलं. सगळे ठोकळे नीट
In reply to शेअर केल्यावर समजलं ना तो काय करतोय ते. by बोका-ए-आझम
कथा मस्त वाटली. तरुण मुलींनी
शेवटचा ट्वीस्ट मस्तच.
असला प्र्कार दुर्मीळ असेल
ह्यॅ
In reply to असला प्र्कार दुर्मीळ असेल by नाखु
बरोब्र आहे
In reply to ह्यॅ by प्रसाद गोडबोले
+१
कथा छान. पण प्रत्यक्षात असे
अत्यन्त आवडेश
हे नुसतं लग्नाळू मुलं मुली एकत्र भेटणं वगैरे थोतांड आहे...
मस्तच,
छान कलाटणी
आवडली.
छान कथा! आवडली!
आवडली. मस्त आहे.
कथा वेगळेपणामुळे लक्ष वेधून
इतरानी मोबाईल फोनचा उपयोग काय
In reply to कथा वेगळेपणामुळे लक्ष वेधून by मराठी कथालेखक
हो तांत्रिक चुका आहेतच शिवाय
In reply to इतरानी मोबाईल फोनचा उपयोग काय by माहितगार
+१
In reply to हो तांत्रिक चुका आहेतच शिवाय by मराठी कथालेखक
झालंच तर पडताना आधार देतानाही
In reply to +१ by पिलीयन रायडर
मला वाटतंय फोकस हा तिच्या सजग
In reply to झालंच तर पडताना आधार देतानाही by मराठी कथालेखक
हो अर्थातच.. मुलगी सजग आहे
In reply to मला वाटतंय फोकस हा तिच्या सजग by स्रुजा
आयला...
सुरेख कथा!
कॉम्पॅक्ट तरीसुद्धा उत्तम ...
pan aslya video ni kay honar
कथा आवडली. मुलगी मुळूमुळू
खतरनाक!!!
कथा आवडली!
कथा आवडली पण एक मनुष्य धक्का
मस्त कथा!आवडली.
टू लिटल रीवॉर्ड फॉर टू मच
थोड्या सुधारणा केल्या तर गोष्ट सुपर हिट होईल...
शोधा म्हणजे सापडेल....
In reply to थोड्या सुधारणा केल्या तर गोष्ट सुपर हिट होईल... by ज्ञानोबाचे पैजार
+1
In reply to थोड्या सुधारणा केल्या तर गोष्ट सुपर हिट होईल... by ज्ञानोबाचे पैजार
कथा